"तो पेपर ठेवा आता आणि जरा वर्तमानपेक्षा भुत आणि भविष्याकडे पहा."
" काय म्हणतेस ? मी जरा दुर्लक्ष करु पहात होतो तोच हिन पेपर हिसकाऊन घेतला.
" काय म्हणतेस काय ?
मी काही दर वेळेस म्हणायला पाहिजे का ? तुमच लक्ष नाही का ? तुम्हाला दिसल नाही का घरात काय चाललय ते ? रोख ठोक सवाल रोहिणीने केला.
" रोहिणी अस कोड्यात न बोलता स्पष्ट बोलना. काय झाल ?" मी जरा नरमाई दाखवली.
"बघीतलत माझा स्वर पाहुन कसे नरमाईन बोललात ? हेच आपल्या सिध्दार्थला का कळत नाही ? ठिक आहे की पुनम त्याच्यावर रागावली आहे. का रागावली आहे जाणुन नको घ्यायला ? आज चार दिवस झाले. पुनम माहेरी गेली आहे. मी विचारल पुनम परत कधी येणार आहे ? मला म्हणतो यायची तेव्हा येईल. काय म्हणाव या वागण्याला ? सहा महिने झालेत लग्नाला तर ही तर्हा.
" हे बघ रोहिणी नवरा बायकोच्या भांडणात तिसर्याने जाऊ नये. जन्मदात्यांनी सुध्दा पडु नये. "
" मी कशाला जाते बाई ? संध्याकाळी ऑफिसहुन आईकडे जाते म्हणाली पोर चार दिवसांपुर्वी. तीचा फोन नाही. हाही घरात घुम्यासारखा रहातो. कधी येणार म्हणुन सहज विचारल तर हे उत्तर. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर माहेरी गेलेली सुन चार दिवस झाले तरी सासरी परत येत नाही मग विचारायला नको ?"
" हो, पण अस सरळ सरळ कशाला विचारायच ? कुणाच नाव घ्यायच. विचारत होत म्हणायच."
" अहो मला काही कळत नाही का ? पण यांच भांडण झाल असेल अस वाटल नाही म्हणुन विचारल.
" काळजी करु नकोस. अजुन त्यांचा नवीन संसार आहे. रुळायला वेळ लागणार . मॅरेजेस आर अरेंज्ड इन हेव्हन बट फायनली सेट्ल्ड इन बेड." अशी इंग्रजीत म्हण आहे. त्याला अजुन वेळ आहे. एकमेकांशिवाय रहाण अजुनतरी त्यांना शक्य आहे म्हणुन भांडायला जमतय. एकदाका संसाराची गोडी कळली की बघ कशी माघारी पळत येईल सासरी आपली पुनम."
" काहीतरीच काय? "
" काहीतरीच काय ? आठवतय का तुला ? लग्न झाल्यावर चारच महिन्यांनी तुझ्या मावशीच कसलस ऑपरेशन होत. तिन विचारल येशील का ग माझ्या सोबत हॉस्पीटलमध्ये ? तु चांगली आठ दिवस तिकडे राहिलीस. कारण काय्.........."
"पुरे..... आपल सोडा आणि सिध्दार्थ आणि पुनमचा विचार करा. काय झाल असेल दोघांमधे ? मला तर सारख द्डपल्यासारख होत. पुनमशी बोलताना सासु बोलते आहे हा भाव येऊ नये म्हणुन काळजी घेते. तुमच तर वागण सरळ मग काय बोचल या पोरीला ? "
"मला नाही वाटत आपण कारण आहोत. त्यांना स्वतंत्र बेडरुम टी.व्ही आणि अगदीच हव असेल तर किचन सुध्दा वेगळ करता येईल अशा सर्व सोयी आहेत आपल्या घरात. मी बोलत नाही पण माझ लक्ष असत. तुझ काही चुकत नाही रोहिणी. हा ग्रह काढुन टाक की आपल काही चुकतय."
" अहो मग कारण काय भांडणाच ?"
" हा विचार आपल्या चिरंजीवाने करायला हवा आपण नाही रोहिणी."
" तुम्ही जरा त्याला विचारा. अशी बेफिकीरी का म्हणाव ? मला बाई काळजी वाटते."
" बर.. आजच संध्याकाळी विचारतो पण त्या साठी महाराज वेळेवर घरी यायला हवेत. ऑफिसमधे काम असत हे कारण आहेच. त्या शिवाय त्याच बॅडमिंटन, ते झाल की पोहण एकदिवसाआड काहीना काही असतच. बाहेर काही खाऊन दहा वाजता रात्री उगवणार. जरा अन्न चिवडल की चालली स्वारी झोपायला."
"रोहिणी, मला वाटत हेच कारण असाव. जेमतेम महिनाभर घरी वेळेवर आला लग्नानंतर हा. मग ऑफिसची टुर झाली. ते संपल की बॅडमिंटनच्या टुर्नामेंटस आल्या. पुनमला काही त्यात रस नाही. हा तिला वेळ म्हणुन देत नाही.
अहो, हो खरच, मागच्या आठवड्यात पुनम मोबाईलवरुन बोलत होती. ती सिध्दार्थला म्हणत होती सिनेमा पहायला जाऊ या. चक्क नाही म्हणाला."
"कशावरुन ?"
"अहो, पुनमचा चेहेरा पडलेला होता. आणि गेले असते सिनेमाला तर सांगुनच गेले असते ना ?"
"आपल्या सिध्दार्थला काही हौस मौज माहितच नाही. ह्या पोरीन कधी अस सांगीतल नाही की सिध्दार्थने हे माझ्यासाठी आणल. याला साधा गजरा आणण माहीत नाही. आजकालच्या मुलींचे बॉयकट असतात पण पुनम मात्र जुन्या वळणाप्रमाणे लांब केस् ठेऊन आहे. यात गजरा माळायला तिलाही आवडत पण याला कळेल तर शप्पथ. "
"आणखी एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या रोहिणी ?"
"काय हो ?"
"पुनम तीच्या ऑफीसला जायला सिध्दार्थच्या आधी निघते. तयार होऊन ती बेडरुम मधुन येते तेव्हा हा ठोब्या हॉल मध्ये पेपर वाचत असतो. ती किचन मधे येऊन तुला सांगते, आई मी येते. मग सिध्दार्थचा पेपर हलवुन त्याला सांगते सिद, मी येते. हा वेडा एकदाही म्हणाल्याच आठवत नाही की तु आज छान दिसतेस किंवा हा ड्रेस तुला खुलतो. "
"अहो, तो लाजत असेल आपल्या समोर"
"छे, लाजतो कुठला ? याच्या चेहेरा निर्विकर असतो. ती मुद्दाम पेपर बाजुला करते याचा अर्थ सुध्दा कळत नाही. तोंडाने नाही बोलला तर डोळे असतात. तुसत्या चेहेर्यावरुन समोरच्याला कळत की त्याच्या मनात काय भाव आहेत आणि आणखी काही हवच असेल तर आपल्या बेडरुम मध्ये बसाव अश्यावेळेला. "
"आपल्या काळात कुठे स्वतंत्र बेडरुम होती पण आई अण्णांच्या डोळ्यात धुळ फेकुन दाराच्या पडद्याआड रंगायचा की नाही आपला रोमान्स ?"
"तुम्ही जरा जास्तच हे आहात."
"रोहिणी, जास्तच आहात काय म्हणतेस; होतो अस म्हण."
"छे, तसुभरही फरक नाही. तुम्ही रिटायर्ड आहात हे आठवाव लागत."
"माणस मनान निवृत्त झाली म्हणजे खरी निवृत्त. माझे सकाळी फिरायला जाणे. पेन्शनरर्स क्लब मधे जाणे तिथले उपक्रम सगळ कस भरगच्च चालु आहे. चार वर्ष आधी रिटायर्डमेंट घेतली बँकेतुन पण कधी म्हणलोय वेळ जात नाही म्हणुन ?
आपल जाऊ देत. मला जायचय क्लबला. आल्यावर घेतो झाडा झडती सिध्दार्थची."
-----------------------------------------------------------
दारावरची बेल वाजली. रोहीणीने पुढ होऊन दरवाजा उघडला. दरवाज्यात सिध्दार्थ होता. आजही पुनम दरवाजा उघडेल ही सिध्दार्थची आशा फोल ठरली. नेहमीच्या सवयीने सॅक हॉल मध्ये फ़ेकुन तिथेच चहा पित बसायची सवय सोडुन तो बेडरुम मधे गेला. पुनम बेडरुम मधे आली असेल ही त्याची आशा फ़ोल ठरली. बेडरुमला अटॅच्ड बाथरुमचाही लाईट चालु नव्हता आणि बाथरुमची कडी बाहेरुन लावलेली होती. सॅक बाजुला ठेऊन सिध्दार्थने किचन शोधल, बाल्कनी शोधली पण पुनम परत आल्याची कोणतीच लक्षणे त्याला दिसली नाहीत.
आज चार दिवस झाल्यावर त्याचा जीव वेडापिसा झाला होता. तिन माहेरी जाताना सिध्दार्थला काहीच सांगितले नव्हते. घरी आल्यावर रोहिणीने पुनम ऑफ़िसातुन परस्पर माहेरी जाण्याची बातमी त्याला दिली होती. रोहीणीलाही तो सुध्दा परस्पर तिच्या माहेरी कसा नाही गेला याचे आश्चर्य त्या दिवशी वाटले होते.
चार दिवसापुर्वी जेव्हा सिध्दार्थ झोपेतुन उठला तेव्हा पुनम नेहमी प्रमाणे त्याच्या आधीच उठुन कामला लागल्याचे त्याला दिसले. त्याने तिला हवे तसे वागण्याचे कबुल करुन त्याच गोष्टी आज घडल्या होत्या. ती ऑफ़िसला निघण्यापुर्वी सहज परत बेडरुममधे गेली तेव्हा सिध्दार्थने पांघरलेला रग तसाच अर्धा बेडवर अर्धा खाली लोंबकळत होता. बेडवरची बेडशीट तशीच चुरगळलेली होती. न बोलता पुनमने रगची घडी केली. बेडशीट ठिकठाक केली आणि वळली. मागे सिध्दार्थ उभा होता.
"तु मला हे काम करण्याची संधीच देत नाहीस" त्याने तिच्याकडे पहात शेरा मारला.
" हे काम उठ्ल्या उठ्ल्या केल की मग संधी मिळते.
" मग तुला हा कुजका रिमार्क मारण्याची संधी कशी मिळणार ?"
" कुजका" ? मी विचारल का सिध्दार्थ तु हे का नाही केलस ?
"बोलली नाहीस पण कृतीने दाखवण्याचा तुझा प्रयत्न होता.
" ठीक आहे, उद्या ही वेळ येणारच नाही"
रागावलेल्या सिध्दार्थला कल्पना आली नाही की काय घडणार आहे. ऑफ़िस मधुन घरी आल्यावर त्याला कल्पना आली काय घडलय त्याची. मग त्याचा राग आणखी वाढला. अशी कशी ती मला न सांगता माहेरी गेली ? पुनमनेही फ़ोन केला नाही सिध्दार्थने ही केला नाही. चार दिवसांनी जेव्हा आपली चुक सिध्दार्थला उमगली तरी पण माघार घेण्याची वृत्ती त्याचाकडे नव्ह्ती. किंबहुना एकट्या वाढलेल्या या मुलाला आयुष्यात तडजोड, माघार, सुसंवाद, सहजीवन याचा फ़ारसा अनुभव नव्हताच. त्याच विश्व एकट्याच होत. दुसर भावंड नाही, भांडण नाही. सह्भागाने जगण्याची आवश्यकताही नव्हती.
सगळी भौतीक सुख लहानपणा पासुन हात जोडुन उभी होती. भावाबरोबर सायकल शेअर केली, बहीणी बरोबर कॉप्युटर शेअर केला असल्या तडजोडी कराव्या न लागल्यामुळे याची सवयच सिध्दार्थला नव्हती. कुणाचा उणा शब्द ऐकावा, उत्तर द्यायच टाळल्याने समोरच्याला कधीतरी आपली चुक समजेल अशी अपेक्षा ठेवावी असली सवय सिध्दार्थला नव्हती. शाळेतला हुशार विद्यार्थी, कॉलेजमधला टॉपर अशी प्रतिमा जपताना संवादकला कधी जोपासलीच गेली नाही. व्यावसायीक आयुष्यातही त्याच्या हुशारीमुळे इतर सहकारी त्याच्याशी जुळवुन घेत. त्याचा आय.टी. कंपनीतला जॉब म्हणजे असाच . नाही जमल इतरांबरोबर की जॉब बदलायचा. आपल्यात काय बदल हवा आहे हा विचार नाही करायचा.
पुनमला हे वागण जड वाटत होत पण याची कधीतरी जाणिवही देण्याची गरज आहे या भावनेतुन ती वागत होती. तिला वाटल की सिध्दार्थ फ़ोन करेल. मग तुला सांगायचच राहिल अस म्हणुन ती तडजोड करणार होती. पण झाल भलतच. सिध्दार्थ अजुनच रागावला. मग तिनेही ताणल. सासु सासरे आपल्या मुलाचे गुण जाणुन तिला दोष देत नव्हते. चार दिवस झाल्यावर मात्र ही कोंडी फ़ुटावी अशी अपेक्षा मात्र करत होते.
पुनमने सासरी आल्यावर महिनाभरातच सिध्दार्थची तक्रार रोहिणिकडे चांगल्या शब्दात केली होती. सिध्दार्थ कमीत कमी स्वत:च्या गोष्टी निट ठेवत का नाही याबाबत तक्रारीपेक्षा हा असा का ? हे जाणुन घेण्याचा कल त्या संवादात जास्त होता.
दाढी केल्यावर रेझर धुवुन ठेवावा असे याला का वाटत नाही. मोजे वेळच्यावेळी का धुवायला टाकत नाही. लुजर जिथे काढतो तिथेच काढलेल्याच स्थितीत मराठी ळ अक्शरासारखी दुसर्याने उचलेपर्यत पडलेली असते. ड्रेसिंग टेबलवर पावडर सांडलेली असते. कंगवा केस अडकलेल्या स्थितीत तसाच पडलेला असतो. इंटीमेट वापरल्यावर त्याच झाकण घट्ट लाऊन स्प्रे जाग्यावर ठेवावा हे काय सांगायला लागत का ? बेडरुम मधला, ड्रेसींग टेबलवरचा, संडासमधला दिवा बंद करणे हे त्याला जणु माहीतच नव्हते.
पहिला महिनाभर तिला वाटे सिध्दार्थ विसरतो. मग ती प्रेमाने हे सर्व करे. सासुशी बोलल्यावर हे समजले की सासु किंवा सासरे लग्ना आधी हे सर्व बिनबोभाट हे सर्व करत होते. आता सासु किंवा सासरे यांनी बोलावल्याशिवाय त्यांच्या बेडरुममधे जात नाहीत. रोहिणीने पुनमला सिध्दार्थला या चांगल्या सवय़ी लावण्यात आम्ही कमी पडलो अशी स्पष्ट कबुलीच दिली व तिला गोडी गुलाबीने ह्या सवयी लावावयाला सांगीतले.
पुनमने चलाखीने काही गोष्टी चुक न दाखवता सिध्दार्थ कडुन दररोज करणार असे वदवुन घेतले. दोन चार दिवस तसे घडलेही. दोन चार दिवसात सवयी थोड्याच लागतात. मागे लागुन करुनच घ्यायच हा पुनमचा स्वभाव नसल्याने आणि सिध्दार्थला चांगल्या सवयीसाठी कष्ट घ्यायची सवय नसल्याने हा उपक्रम मागे पडला. परत वेळ मिळेल तसे पुनम सिध्दार्थला समजाउन सांगायची. सिध्दार्थ आता कारणे सांगु लागला होता.
-----------------------------------------------------------
चार दिवसांपुर्वी कहरच झाला. मला कुजका शेरा मारायची संधी मिळावी म्हणुन मी मुद्दामच हे करते अस सिध्दार्थने म्हणण म्हणजे स्वत:च बरोबर हे दाखवण्यासाठीचा हा केलेला प्रयत्न होता. बोलताना कळल नसेल की मला काय दु:ख झाल असेल. नंतर मोबाईलवर बोलु शकला असता. दुसर्याच्या भावना जाणण्याची कला सुध्दा याला शिकवावी लागणार हे तिला जाणवले.
मला सिध्दार्थच्या या वागण्यान वाईट वाटल. आई नाहितरी म्हणतच होती की खुप दिवस झाले तु माहेरी आली नाहीस. मग मी ठरवल की आजच माहेरी जायच. आईंना सांगुन मी परस्पर माहेरी जायच ठरवल. कल्पना अशी होती की दिवसभरात सिध्दार्थचा फ़ोन येईल मग त्यालाही सांगु.
सिध्दार्थचा स्वभाव आताशा कळु लागला होता. आपली चुक मान्य करण्याऐवजी आपणच रागवायच आणि दुसर्या माणसाने शेवटी तडजोड करायची हा त्याचा स्वभाव.
त्याचा फ़ोन आलाच नाही. संध्याकाळी घरी पोचल्यावर त्याला कळलच असेल की मी माहेरी गेले. मलाच वेडी आशा की तो फ़ोन करेल. आत्ताच मी पण तुझ्या आईकडे येतो तुला न्यायला अस म्हणेल. मग रात्री आपण परत घरी येऊ. रात्री ११ वाजेपर्यत वाट पाहुनही फ़ोन आला नाही मग मीही तो जस वागतो तसच वागायच ठरवल.
-----------------------------------------------------------
"आई पुनम कधी येणार आहे ? "
सिध्दार्थने अपेक्षीत प्रश्न विचारताच रोहिणी आणि सिध्दार्थचे वडिल यांच्यात नेत्रपल्ल्वी झाली. प्रकाशने म्हणजे सिध्दार्थच्या वडिलांनी इशारा करताच रोहिणीने उलटाच पवित्रा घेतला.
"सिध्दार्थ तुझी बायको तुझ्याशी आधी बोलेल का माझ्याशी ?"
"आमच भांडण झालय"
"म्हणजे काय तुच तिला काहीतरी बोलला असशील" रोहिणीने उलट प्रश्न केला.
"नवरा बायकोच्या भांडणात जो मधे पडतो त्यालाच पुढे प्रत्येक गोष्टीला जबाबदार धरल जात आणि भांडण तिसर्याने मिटवायच हा प्रघात पडतो. तुला आवडणार नाही पण सांगते की हे भांडण तुम्ही दोघ मिळुन मिटवा."
"म्हणजे काय मी माघार घेऊ ?"
"चुक असो अथवा नसो कुणीतरी माघार घ्यायलाच हवी. संसार हा काही फ़क्त स्त्रीचा नसतो. तिनेच कायम पडत घ्यायच , हा नियम नसतो."
कमीतकमी बाबांच म्हणण एक पुरुष म्हणुन या पेक्षा वेगळ असेल अस वाटुन सिध्दार्थने बाबांकडे पाहिल पण त्यांनी संवादात भाग घ्यायच टाळल.
" तुम्हाला काय वाटत बाबा ?" सिध्दार्थला आता बाबांना संवादात ओढ्ण्याची गरजच भासली.
"लग्नाला वीस पंचविस वर्ष ज़ाली म्हणजे पती आणि पत्नी यांच्या मतात भिन्नता रहात नाही. हा नाईलाज नसतो. प्रेमाने झालेल हे परिवर्तन असत. अगदी टोकाचा पती किंवा पत्नी यांची बहुतांशी मत परस्परांना पुरक होतात ती एकमेकांवरच्या विश्वासाने, प्रेमाने. अस न झाल्यास तो संसार न म्हणता फ़क्त तडजोड म्हणावी लागेल. "
"माझ मत रोहिणीपेक्षा वेगळ नाही. आजपर्यत आम्ही तु एकटा म्हणुन तुला कायम झुकत माप दिल. आता दुसयाची मुलगी घरात आणली आहे. तिला तुझी चुक आहे हे माहित असताना माघार घ्यायला लाऊ? तु माघार घेतल्याने काय फ़रक पडणार आहे ? तुझा संसार सुखाचा होण्यासाठी हेच गरजेच आहे की तुला पडत घ्यायची सवय लागावी. यावेळी आम्ही चुकलो तर ही चुक फ़ारच महागात पडेल."
सिध्दार्थला हे मानवल नाही. दाण दाण पावल आपटत तो आपल्या बेडरुम कडे गेला. रात्री जेवायला बोलावायला गेलेल्या रोहिणीवर त्याने आगपाखड केली. घुश्यात तसाच झोपला.
रोहिणी व प्रकाशही न जेवता तसेच झोपले. झोपताना रोहिणी प्रकाशला म्हणाली " हा पोरगा असा. कस व्हायच याच."
"रोहिणी काळजी करु नकोस आज झोप लागणार नाही त्याला पण त्याचा परिणाम चांगलाच होईल. रात्रभर उपाशी पोटी झोपला म्हणजे दोन्ही बाजुचा विचार आपोआप करेल तो."
-----------------------------------------------------------
सकाळ झाली. रात्रभर उपाशी पोटी झोपल्यामुळे कुणालाच निट झोप लागली नाही. सकाळी सिध्दार्थ उठ्ला ब्रश करुन किचन मधे आला.
"आई काही खायला करना, भुक लागली आहे."
"हो बस इथे शिरा करते तुझ्या आवडीचा."
न बोलता रवा भाजायला रोहिणीने कढई ठेवली.
"येवढ वाईट बोललो काल तुला विनाकारण तरी माझ्या आवडीचा शिरा"
"तडजोड काय असत ते समजाव म्हणुन रे बाळा. हेच तर तुझे वडिल तुला सांगत होते."
"आई, माझ चुकल. कमीत कमी तुला मी..........."
हे बघ तुला आता पटल असेल तर पुनमला काय आवडत ते घेऊन तिच्या माहेरी जा. हव तर तिला फ़ोन वर चुकल म्हण आणि घरी घेऊन ये. उसवलेल्या कपड्याला वेळीच टाका घातला म्हणजे जास्त उसवत नाही.
सिध्दार्थ ने गुपचुप शिरा खाल्ला आणि पुढच्या मार्गाला लागला.
----------------------------------------------------------
संध्याकाळी सिध्दार्थ जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या सोबत पुनमही होती. रोहिणीने दोघांच घरात स्वागत केल. दोघही चेंज करायला बेडरुम मधे गेली. बराच वेळ बेडरुमचा दरवाजा उघड्ला नाही. रोहिणीने काळजीने प्रकाश कडे पाहिले. हसत ह्सत प्रकाश म्हणाला " रोहिणी काळजी करु नकोस. दुरावा संपलाय आता. चार दिवसांच्या विरहाच पारण फ़ेडल जातय. चला रात्रीच्या जेवणाची तयारी करुयात काय ?
मजा आलि ....... सुन्दर
मजा आलि ....... सुन्दर भाग.....
मस्तच! गोड शेवट....
मस्तच! गोड शेवट....
कथेचा आशय छान आहे. मुख्य
कथेचा आशय छान आहे. मुख्य म्हणजे मुलाचे आई-वडील इतके समंजस आहेत. छान वाटलं
पण मांडणी नीट झाली नाहीये का? घाईघाईत पोस्टलीत का? सुरुवातीच्या थोड्याशा भागानंतर अवतरणचिन्हे नाहीतच संवादांना.
त्याचप्रमाणे कथेची सुरुवात प्रथमपुरुषी केली आहे, पण शेवटी शेवटी तृतीय पुरुषी असं का?
मस्तच कथा ! एवढं सुचायला
मस्तच कथा ! एवढं सुचायला किती विचार करावा लागत असेल ना ? कि वाचनामूळे विचार समृद्ध होतात ?
आवडली... १) छान विषय.. २)
आवडली... १) छान विषय..
२) मुख्य म्हणजे मुलाचे आई-वडील इतके समंजस आहेत. >> अनुमोदन
३) मुलगाही तसा समजूतदार दाखवलाय, पण चांगल्या सवयींचा अभाव... अतिलाडामुळे
४) सगळ्यांची आपापसातील नातेसंबंधांची गुंफण मस्त दाखवलेय.
सुधारणा...
१) अवतरण चिन्हांचा घोळ आहेच. रोहिणी आहात काय म्हणतेस होतो अस म्हण.>> हे वाक्य आणि अशी काही वाक्ये पुन्हा वाचावी लागतात.
२) कथेची सुरुवात प्रथमपुरुषी केली आहे, पण शेवटी शेवटी तृतीय पुरुषी असं का>> मोदक. मलाही हा प्रश्न पडलेला..
त्या सुधारणा केल्या तर कथा मस्तच!
अवतरणांविषयी... शेक्सपिअरला (बहुदा :अओ:) अवतरणे टाकायचा कंटाळा यायचा.. संपादकाने कथा परत पाठवली, अवतरणे टाका आणि पाठवा म्हणून!
या महाशयांनी आहे तशीच कथा पाठवली एक टाचण अडकवून ज्यात सर्व अवतरणांची यादी होती... पाहीजेत ती वापरा आणि उरलेली परत पाठवा... अशी नोट लिहून!
आयडीया बुरा नही है, पण तुम्ही ट्राय करू नका..
निंबुडा आणि dreamgirl अवतरण
निंबुडा आणि dreamgirl अवतरण चिन्हांचा घोळ निस्तरला आहे. धन्यवाद
छान विषय आणि गोष्ट
छान विषय आणि गोष्ट
छान गोष्ट!
छान गोष्ट!
मुख्य म्हणजे मुलाचे आई-वडील
मुख्य म्हणजे मुलाचे आई-वडील इतके समंजस आहेत. >>नाही पटले. तसे असते तर त्या आई-वडीलांनी लहानपणीच योग्य वळण लावले असते..एकुलता एक म्हणुन लाडावून ठेवले नसते...
मस्त जमलीये कथा... खूप
मस्त जमलीये कथा... खूप आवडली...
आवडली कथा... आई वडील समंजस
आवडली कथा... आई वडील समंजस आहेत.... नक्कीच.
मूल एकुलतं एक आहे. त्याला वाढवताना झालेल्या चुका त्यांनी धरून ठेवलेल्या नाहीत. त्याची झापड नाही डोळ्यांवर आणि म्हणूनच समंजस "आहेत"... शहाणपणा उशीराने का होईना पण शिकून आहेत.
समंजस "होते" म्हटलं असतं तर... कठीण होतं.
हो.. आणि अवतरणांचं बघाच. वाचणार्यांसाठी बरं असतं ते
आवडली कथा
आवडली कथा
छान गोष्ट
छान गोष्ट
प्रतिसादाबद्दल सर्वांचेच
प्रतिसादाबद्दल सर्वांचेच आभार.
हम्म्म्म! छान आहे
हम्म्म्म! छान आहे
त्याचप्रमाणे कथेची सुरुवात प्रथमपुरुषी केली आहे, पण शेवटी शेवटी तृतीय पुरुषी असं का? >>>>> निंबुडा शी सहमत
आवडली गोष्ट. निंबुडा आणि
आवडली गोष्ट. निंबुडा आणि मंजिरीशी सहमत.
कथेचा आशय व विषय दोन्ही
कथेचा आशय व विषय दोन्ही आवडले. चांगली लिहिली आहेत कथा. जरा अवतरणे, र्हस्व- दीर्घ, संबोधन इत्यादी नीट दुरुस्त कराल का? मुख्य म्हणजे कथा एकांगी न वाटता संतुलित वाटली. सर्वांच्या भूमिका त्यात मांडल्या गेल्या आहेत आणि शेवटी संसार करायचा तर सर्वच बाजूंनी तडजोड हवी हे सूचित केले आहे, हे आवडले.
नेहमिप्रमाणेच मस्त.
नेहमिप्रमाणेच मस्त.
खूप छान कथानक..आवडली
खूप छान कथानक..आवडली .नेहमीप्रमाणे हाही विषय एकदम वेगळा..
मुख्य म्हणजे मुलाचे आई-वडील इतके समंजस आहेत. >> अनुमोदन...
मोठी माणसं समजूतदार असली तर चुकत असलेल्या (मोठ्ठ्या)मुलांनाही योग्य मार्गदर्शन मिळू शकतं..
नितिन खुप छान कथा.. शेवट गोड
नितिन खुप छान कथा.. शेवट गोड आहे. मला वाटत एकटं वाढलेल्या मुलांचे प्रश्न असेच असतिल काहिसे. चांगला विषय घेतलाय.
आवडेश...
आवडेश...
(No subject)
कथा आवडली.
कथा आवडली.
छान आहे...... ( मुलाच्या
छान आहे...... ( मुलाच्या आईवडिलांवर अवतरणे टाकणार्याना फक्त मुलीच आहेत की काय? एक शंका.. )
नितिन कथा आवडली.
नितिन कथा आवडली. नेहमीप्रमाणेच तुम्ही मनाला भिडणारे लेखन करता. हा विषयच एवढा नेमका मांडला आहे की ही घर घर की कहानी आहे हे पटते. आता आईवडिलांनी एकढे लाड करायला नको होते वगैरे प्रतिक्रिया स्वाभाविक आहेत पण सामाजिक प्रतिबिंब आहे हे त्यात तुम्ही आम्ही सर्वच येतो हे न विसरता लक्षात घेणे आवश्यक आहे.पण लक्षात कोण घेतो ? असो.
नितिनजी, कथा आवडली
नितिनजी, कथा आवडली
कथा आवडली. विषय, मांडणी,
कथा आवडली. विषय, मांडणी, कथेचे नाव पण छान.
प्रत्येक आई वडिल मुलांना चांगलेच संस्कार देण्याचा / सवयी लावण्याचा प्रयत्न करतात. मुल लाडवण्याचे अजुन बरेच कारण असु शकतात. हे मात्र खरे कि दुस्र्याचे बघुन शिकणे हे मोठया कुटुंबात सहज होते.
खूप सुंदर !!!
खूप सुंदर !!!
फार छान गोष्ट, खूप आवडली...
फार छान गोष्ट, खूप आवडली...
(No subject)
Pages