मासे १) खरबी - कोलंबी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 July, 2010 - 06:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खरबी आणि कोलंबी असे पावसाळ्यात वाटे मिळतात. हॅच्या कॉम्बिनेशनचे कालवण म्हणजे ह्या दिवसातिल चविष्ट मास्यांमधील एक. ही बहुतेक खाडीतुन मच्छी येते. त्यामुळे अजुन चविष्ट असते.

खरबी इतर छोट्या माश्यांसारखी म्हणजे खवल काढून पोट साफ करुन शेपुट काढायचे. कोलंबीच्या डोक्यावरील तुरा काढावा पुर्ण डोक काढू नये. कारण डोक्याच्याच भागाला जास्त चव असते. व शेपुट आणि मधली शेपटे काढावीत.
१ वाटा खरबी कोलंबी,
८-१० लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
२ चमचे मसाला
थोडा चिंचेचा कोळ
चविपुरते मिठ
थोडी कोथिंबीर,
१ मिरची मोडून
तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम तेलावर लसणीची फोडणी द्यायची. मग त्यावर हिंग, हळद, मसाला घालुण ढवळून चिंचेचा कोळ, खरबी कोलंबी, मिठ कोथिंबीर व मोडलेली मिरची घालून कालवण उकळू द्यावे. ३-४ मिनीटांनी गॅस बंद करावा.

हिच खरबी कोलंबी मिठ, मसाला, हिंग, हळद लावुन तळता येते. कोलंबी तळायला वेळ लागतो. कोलंबी वेगळी तळायला टाकायची.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

कोलंबी तळायची म्हणजे शॅलो फ्राय करायची. ती करत असताना थोडा वेळ झाकण ठेवल वरुन तर लवकर शिजते.
कालवण करत असताना गॅस मिडीयम ठेवायचा नाहीतर खरबी तुटते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शप्पथ ! कालवण काय भारी दिसतय. भात स्क्रीनसमोर आणून ओतावं वाटतय , यम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्मी !
जागू, तू अन तिकडे योगेश अगदी छळताय बरं Happy

ही कोलंबी पाहिलीय मी. खाडीतली असते शिवाय कधीकधी जिवंतही असते. कोळणीच्या टोपलीत मध्येच एखादी कोलंबी उडी मारते.

मी ह्या कोलंबीलाच खरबी कोलंबी समजत होते. खरबी हा वेगळा मासा आहे माहित नव्हते.

ह्या कोलंबीचे कवच काढायला जरा कठीण असते, लवकर निघत नाही.

बाजारात जाऊन पाहायला पाहिजे काय काय मिळतेय सध्या ते... Happy आज संध्याकाळी बेलापुर गावातल्या बाजारात जाईन. तिथे मिळेल अशी आशा आहे... (मी फारसे नॉनवेज खात नाही, त्यामुळे जेव्हा खाते तेव्हा वार वगैरे बघत बसत नाही, आले मनात की खाल्ले Happy )

साधना हो ग ही कोलंबी उडत असते. घरी गेल्यावरही बराच वेळ जिवंतच असते. मग मी ही कोलंबी फ्रिजर मध्ये टाकते. मग थोड्या वेळाने बाहेर काढते.

पण जरा स्वेटर घाल त्यांना.

तु देना छोटे छोटे स्वेटर विणुन.. थोडे कोलंब्यांसाठी, थोडे शिवल्यांसाठी. त्यांनाही काहीजण फ्रिजरमध्ये ठेवतात... Happy

रच्याकने, कोलंबी आणुन फ्रिजरमध्ये थोडावेळ ठेवली की त्यांचा मधला दोर अगदी पुर्णपणे आणि सहजगत्या निघतो. तेच आणल्याआणल्या लगेच साफ करायला घेतली तर तो दोर तुटतो आणि अर्धा आतच राहतो.

साधना आणि ही खाडीतली कोलंबी ताजी असते. ताजी कोलंबी कडक असल्यामुळे तिचे साल पटकन निघत नाही. फिजमध्ये ठेवल्यावर साल लवकर निघते.

झिला मोडी आणि चोर बोंबील >> Lol
जागू तुझे माश्याच्या रेसिपीचे जुने बीबी आणि नविन बीबी यातली सुधारणा किती छान आहे.. (लिखाणातली म्हणतेय मी.. कृ. नों. घ्या.)
Happy मस्तंच..