खरबी आणि कोलंबी असे पावसाळ्यात वाटे मिळतात. हॅच्या कॉम्बिनेशनचे कालवण म्हणजे ह्या दिवसातिल चविष्ट मास्यांमधील एक. ही बहुतेक खाडीतुन मच्छी येते. त्यामुळे अजुन चविष्ट असते.
खरबी इतर छोट्या माश्यांसारखी म्हणजे खवल काढून पोट साफ करुन शेपुट काढायचे. कोलंबीच्या डोक्यावरील तुरा काढावा पुर्ण डोक काढू नये. कारण डोक्याच्याच भागाला जास्त चव असते. व शेपुट आणि मधली शेपटे काढावीत.
१ वाटा खरबी कोलंबी,
८-१० लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
२ चमचे मसाला
थोडा चिंचेचा कोळ
चविपुरते मिठ
थोडी कोथिंबीर,
१ मिरची मोडून
तेल
प्रथम तेलावर लसणीची फोडणी द्यायची. मग त्यावर हिंग, हळद, मसाला घालुण ढवळून चिंचेचा कोळ, खरबी कोलंबी, मिठ कोथिंबीर व मोडलेली मिरची घालून कालवण उकळू द्यावे. ३-४ मिनीटांनी गॅस बंद करावा.
हिच खरबी कोलंबी मिठ, मसाला, हिंग, हळद लावुन तळता येते. कोलंबी तळायला वेळ लागतो. कोलंबी वेगळी तळायला टाकायची.
कोलंबी तळायची म्हणजे शॅलो फ्राय करायची. ती करत असताना थोडा वेळ झाकण ठेवल वरुन तर लवकर शिजते.
कालवण करत असताना गॅस मिडीयम ठेवायचा नाहीतर खरबी तुटते.
खरबीचा फोटो टाकतेस का? लक्षात
खरबीचा फोटो टाकतेस का? लक्षात येत नाहीये ही मासळी.
ही आहे खरबी कोलंबी ही तळलेली
ही आहे खरबी कोलंबी
ही तळलेली खरबी कोलंबी
हे आहे कालवण
धन्यवाद जागू. ही मासळी नव्हती
धन्यवाद जागू. ही मासळी नव्हती पाहिली.
शप्पथ ! कालवण काय भारी दिसतय.
शप्पथ ! कालवण काय भारी दिसतय. भात स्क्रीनसमोर आणून ओतावं वाटतय , यम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्मी !
जागू, तू अन तिकडे योगेश अगदी छळताय बरं
जागु , कालवण खुपच भारी दिसतय
जागु , कालवण खुपच भारी दिसतय ,भूक लागलेय , पण आज गुरुवार आहे .
बघवत नाही.. आरती तुला काय
बघवत नाही.. आरती तुला काय म्हणावं कळेना....
आरती, नुतन, बी आज बघवत नाही
आरती, नुतन, बी आज बघवत नाही गुरुवार म्हणून तर उद्या बघा.
ही कोलंबी पाहिलीय मी.
ही कोलंबी पाहिलीय मी. खाडीतली असते शिवाय कधीकधी जिवंतही असते. कोळणीच्या टोपलीत मध्येच एखादी कोलंबी उडी मारते.
मी ह्या कोलंबीलाच खरबी कोलंबी समजत होते. खरबी हा वेगळा मासा आहे माहित नव्हते.
ह्या कोलंबीचे कवच काढायला जरा कठीण असते, लवकर निघत नाही.
बाजारात जाऊन पाहायला पाहिजे काय काय मिळतेय सध्या ते... आज संध्याकाळी बेलापुर गावातल्या बाजारात जाईन. तिथे मिळेल अशी आशा आहे... (मी फारसे नॉनवेज खात नाही, त्यामुळे जेव्हा खाते तेव्हा वार वगैरे बघत बसत नाही, आले मनात की खाल्ले )
साधना हो ग ही कोलंबी उडत
साधना हो ग ही कोलंबी उडत असते. घरी गेल्यावरही बराच वेळ जिवंतच असते. मग मी ही कोलंबी फ्रिजर मध्ये टाकते. मग थोड्या वेळाने बाहेर काढते.
मग मी ही कोलंबी फ्रिजर मध्ये
मग मी ही कोलंबी फ्रिजर मध्ये टाकते. >>> पण जरा स्वेटर घाल त्यांना.
आत्ता तुला लिंक टाकणारच होते.
आत्ता तुला लिंक टाकणारच होते. म्हटल तुझी इथे हजेरी कशी नाही ?
पण जरा स्वेटर घाल
पण जरा स्वेटर घाल त्यांना.
तु देना छोटे छोटे स्वेटर विणुन.. थोडे कोलंब्यांसाठी, थोडे शिवल्यांसाठी. त्यांनाही काहीजण फ्रिजरमध्ये ठेवतात...
रच्याकने, कोलंबी आणुन फ्रिजरमध्ये थोडावेळ ठेवली की त्यांचा मधला दोर अगदी पुर्णपणे आणि सहजगत्या निघतो. तेच आणल्याआणल्या लगेच साफ करायला घेतली तर तो दोर तुटतो आणि अर्धा आतच राहतो.
साधना आणि ही खाडीतली कोलंबी
साधना आणि ही खाडीतली कोलंबी ताजी असते. ताजी कोलंबी कडक असल्यामुळे तिचे साल पटकन निघत नाही. फिजमध्ये ठेवल्यावर साल लवकर निघते.
ओक्क्के... मी ही घ्यायला
ओक्क्के... मी ही घ्यायला फारशी उत्सुक नसते कारण साले निघत नाहीत पटकन..
बी , तिने शीर्षकातच मासे असं
बी , तिने शीर्षकातच मासे असं लिहिलंय ना ? मग उघडतोच कशाला धागा? तुला बघवत नाही तर स्किप कर ना सऱळ.
ह्याला आमच्याकडे झिला-मोडि
ह्याला आमच्याकडे झिला-मोडि असे म्हणतात, आणि हे फ्क्त पावसाळ्यात् च मिळ् तात
साधना ह्यांच्या सालात् च चव
साधना ह्यांच्या सालात् च चव अस्ते , माझा मुल्गा तर हि सालासक्ट्च खातो
खरबी गोड्या पाण्यातही मिळते
खरबी गोड्या पाण्यातही मिळते मात्र खुप उथळ पाणी आणी रेती असेल तीथेच. खुप टेस्टी मासा.
जागू कुठे रहातेस?
जागू कुठे रहातेस?
जागू ताई तू कोलंबी बरोबर जे
जागू ताई तू कोलंबी बरोबर जे बारीक मासे आहेत ना त्याला चोर बोंबील बोलतात मालवणात.
मानु खरच हिच्या सालालाही मस्त
मानु खरच हिच्या सालालाही मस्त चव असते.
झिला मोडी आणि चोर बोंबील नविन नावे मिळाली. धन्स.
झिला मोडी आणि चोर बोंबील >>
झिला मोडी आणि चोर बोंबील >>
जागू तुझे माश्याच्या रेसिपीचे जुने बीबी आणि नविन बीबी यातली सुधारणा किती छान आहे.. (लिखाणातली म्हणतेय मी.. कृ. नों. घ्या.)
मस्तंच..