ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद नितीनचंद्रजी,

आपला कयास योग्यच आहे. मी जैन धर्मीय असून शाकाहारी आहे. व्यसनांपासून दूर आहेच. तरीही गेल्या दीड वर्षापासून प्रकृतीच्या गंभीर तक्रारी आहेत. कोलेस्ट्रोलची समस्या आहेच. चपट्या पेशी (प्लेटलेट्स) कमी असून अनेकदा हातापायांना मुंग्या येतात तसेच गरगरल्यासारखे होते.

संपर्क तपशील
chetangugale@gmail.com
भ्र. ९५५२०७७६१५

हरीण कासवा पोटी परळ्यात बाळ जलमला

परवा एका जातकाशी बोलत असताना अचानक ही ‘उक्ती’ आठवली आणि हसायला आले.

खूप वर्षापूर्वी मी ही ‘उक्ती’ एका कडून ऐकली होती , आज आपल्यासमोर एका वेगळ्या संदर्भात सादर करत आहे.

गोष्ट तशी जुनी , एक सरकारी अधिकारी, गावोगावी , खेड्यापाड्यात जाऊन सरकारी योजनांची माहीती देणे, सर्व्हे करणे अशी त्याची कामे. अशाच कामासाठी त्याला एका आडवळणाच्या , दुर्गम अशा खेड्यात जावे लागले. सकाळच्या यस्टीने , खड्ड्यांच्या रस्त्याने हाडे खिळखिळीं करुन घेत , सर्वांग धुळीने माखून घेत तो अधिकारी त्या गावात पोचला , काम संपायला संध्याकाळ झाली. आता परत जायचे , पण कसे?

“सायेब , लय येळ झाला , सांजच्याला येनारी यस्टी आजून आलीच नाय बगा, ईतका लेट झाला म्हनजे आता कस्ली येतेय ती.. हुतयं काय काय टायमाला आसं ”

“मग आता मी कसे परत जाणार”

“ही येनार हुती तीच लास्ट , आता यानंतर दुसरी यस्टी नाय बा , यकदम उद्याच्याला सकाळच्यान हाय बगा “

“मग आता?”

“नाय , आता तुम्ही म्हणतासा तर गाडी जूपून पार सडकेवर सोडतो , थितून भ्येटेल तालुक्याची यस्टी , पण तेचा बी काय भरुसा नसतोय , लै येळ वाट बघाया लागल , लै टायम लागल..”

“बापरे !”

“सायेब, त्यापरिस आज रातच्याला हिथेच मुक्काम का करत नाय , सम्दी सोय करतु तुमची , यकदम बिनघोर र्‍हावा, आन उद्याच्याला पयल्या यस्टिनं जावा की , कसं.. आन नायतर तुमच्या सारकं लोक आमा गरीबाच्या वस्तीव कदीच्यान येनार? ”

तो अधिकारी दिवसभराच्या कामाने, धुळीने,उकाड्याने पकला होता, आता परत बैलगाडीने धक्के खात सडके पर्यंत जावून , तिथून परत बस ने तालुका गाठायचे त्राण पण त्याच्यात राहीले नव्हते . तेव्हा गावकर्‍यांच्या आग्रहाला मान देत त्याने गावातच मुक्काम करायचे ठरवले.

गावच्या पाटला कडे जेवण झाले , पानसुपारी फिरली, तसे पाटील म्हणाले “पाव्हणं , रातच्याला आमच रोज भजन असतया मारतीच्या द्येवळात , चला दोन घटका , तेवडाच टायमपास तुमाला“

देवळात भजन रंगात आले , अधीकारी तसा धार्मिक वृत्तीचा त्याचे मन नाही म्हणले तरी त्या भजनात रंगलेच. रात्र चढत चालली तसे भजनी मंडळाचा आवाज तापला , आणि मग त्यांचे एक खास भजन चालू झाले ” हरीण कासवा पोटी परळ्यात बाळ जलमला.. हरीण कासवा पोटी परळ्यात बाळ जलमला..”

संपूर्ण लेख माझ्या ब्लॉगवर http://suhasgokhale.wordpress.com/ उपलब्ध आहे. आपला अभिप्राय अवश्य कळवावा ही विनंती.

सुहास.

आज शनि वॄश्चिक राशीत आलेला आहे, माझी वॄश्चिक रास आहे मला त्याचे काय परिणाम अनुभवावे लागतील ??
माझ्या पत्रिकेत वॄश्चिक रास षष्ठ स्थानी आहे.

हम तो सिर्फ सुंघ के बताते है । भाग 1

हा किस्सा माझा मित्र प्रकाश याने खूप वर्षापूर्वी सांगितला होता, तो आठवला की आजही धमाल हसायला येते. त्याचे झाले असे...

प्रकाश त्यावेळी 'फिलिप्स' च्या इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रूमेंट्स च्या वॉरंटी सर्व्हिस विभागात सुपरवायझर म्हणून काम करत होता होता. एकदा 'मंदार', हा प्रकाशच्या हाताखाली काम करणारा एक शिकाऊ (ट्रेनी) इंजिनियर, त्याच्याकडे आला...

"सर, ह्या इंस्ट्रूमेंट मध्ये काय फॉल्ट आहे तेच समजत नाही, सगळ्या टेस्ट्स केल्या, आख्खा दिवस गेला त्यात, सॉरी सर, पण फॉल्ट सापडला नाही.."
"बघू , जरा तो सर्किट बोर्ड.."

खरेतर प्रकाशचा त्या प्रकारची इंस्ट्रूमेंट दुरुस्त करण्यात इतका हातखंडा होता की सर्किट बोर्ड न बघताच केवळ सांगितलेली समस्या व लक्षणे (सिम्प्टोम्स) ऐकूनच फॉल्ट कोठे आहे, काय आहे , त्यावर उपाय काय, हे त्याला सांगता आले असते, तरी पण एकदा खात्री करून घेण्याच्या हेतूने त्याने तो सर्किट बोर्ड हातात घेऊन नीट बघितला, बोर्ड कोणत्या बॅचचा आहे हे वाचले, हा बॅच नंबर अगदी बारीक अक्षरात लिहिलेला असल्यामुळे बोर्ड अगदी डोळ्या जवळ नेऊन वाचावा लागायचा.

"अरे काही नाही, Q9 क्रमांकाचा ट्रान्सीस्टर जळला आहे, तो बदल, होईल बोर्ड चालू"

मंदार ला मोठे नवल वाटले, अरे मी दिवसभर झगडलो पण फॉल्ट कोठे आहे आहे ते कळले नाही ह्यानी बोर्ड नुसता हातात घेऊन क्षणात फॉल्ट काय आहे ते सांगितले, मानले बुवा..

दुसऱ्या दिवशी मंदार पुन्हा प्रकाश समोर उभा!

"मंदार, काय रे, सुटला ना प्रॉब्लेम?"
"येस सर, केव्हाच, आपले डायग्नोसिस अचूक होते, तुम्ही सांगितलेला तेव्हढा एकच बदल केला, बस्स, झाले चालू इंस्ट्रूमेंट. थॅंक्यू सर."
"गुड जॉब, दुसरे काही काम आहे का?"
"सर, एक विचारायचे होते.."
"बोल"
"त्या कालच्या प्रॉब्लेम बद्दल , मी दिवसभर झगडलो पण फॉल्ट कोठे आहे ते कळले नाही आणि आपल्याला बोर्ड हातात घेताच एका क्षणात कसे काय समजले ते कळले नाही .."

प्रकाशला मंदारच्या भाबडेपणाची मजा वाटली तेव्हा त्याची जरा फिरकी घेण्याच्या हेतूने तो म्हणाला ..

"असे बघ, काल मी नेमके काय काय केले होते ते आठवतेय?"
"हो सर, आपण तो बोर्ड हातात घेऊन फक्त न्याहाळला एकदा आणि लगेच फॉल्ट काय ते सांगितले. बाकी काहीच केले नाही..."
"इथेच तर चुकते ना तुम्हा नव्या लोकांचे.. निरीक्षण कमी पडते तुमचे."
"मी समजलो नाही सर"
"मी तो बोर्ड अगदी डोळ्याजवळ नेला होता ते तू बघितले होतेस ना?"
"हो सर"
"खरेतर मी त्यावेळी बोर्डाचा वास घेतला होता !"
"वास म्हणजे 'स्मेल' ?"
"येस, अरे मै वो बला हू जो बोर्ड को सुंघ के च फॉल्ट बताती है "
(इथे प्रकाशने प्रेम चोपडा च्या त्या सुप्रसिद्ध आवाजाची नक्कल केली असणार , मला खात्री आहे, प्रकाशला काही आज ओळखत नै !)
"फक्त वास घेऊन फॉल्ट कळतो?"
"अलबत् ! तू बघितले नाहीस का? प्रत्येक फॉल्टचा एक विशिष्ट असा 'वास' असतो. हा, आता ही गोष्ट वायली की तो ओळखायला 'तजुर्बा' लागतो.."
"यस सर .."
"नुसती मुंडी हालवू नकोस, काय लागतो ?"
"तजुर्बा लागतो, समजले सर.."

मंदार आपल्या जागेवर गेला आणि प्रकाशला हसू आवरले नाही.पण प्रकरण येवढ्यावरच थांबले नाही!

मंदारला आपली फिरकी घेतली गेलीय हे लक्षातच आले नाही, त्याने ही टीप इतकी मनावर घेतली की, आता तो समोर येणाऱ्या प्रत्येक फॉल्टी बोर्डाचा वास घेत सुटला ! अर्थातच असा वास घेऊन फॉल्ट काय ते त्याला कधीच कळले नाही (आणि कळणार ही नव्हते म्हणा!). काही दिवस ही 'हूंगेगिरी' करून काहीच सुधरत नाही हे लक्षात येताच एके दिवशी मंदार पुन्हा प्रकाश च्या समोर..

"मंदार, काय रे, आता काय?"
"सर, सॉरी पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आता प्रत्येक फॉल्टी बोर्ड चा वास घेतोय , व्यवस्थित नोट्स ठेवतोय, पण मला कळत नाही, ह्या सगळ्या बोर्डस ना एकाच प्रकारचा प्लॅस्टिकचा वास का येतोय, फॉल्ट तर दरवेळी वेगवेगळे असतात मग वास वेगवेगळे यायला हवे ना? माझे काही चुकतेय का ?"
"बरेच.."
"माझ्या लक्षात नाही आले सर.."
"अरे वरवर जरी वास सारखेच वाटले तरी त्यात सूक्ष्म असा फरक असतोच, तो लक्षात आला पाहिजे ना, खरे स्किल तर तिथेच आहे , बाकी वास काय कोणीही घेईल?"
"हो सर, पण सर, हा सूक्ष्म फरक कसा ओळखायचा?
"नाका चे 'कंडिशनिंग' !"
"म्हणजे?"
"हे बघ, आपण 'वास' कशाने घेतो?"
"नाकाने , सर.."
"म्हणजे घेतलेल्या वासाचे इंटरप्रिटेशन करायला आपल्या नाकात एक प्रकारचा 'सेन्सर' असणार ना? मग फॉल्टी इलेक्ट्रोनिक्स पार्ट्स चे खास सूक्ष्म वास ओळखायला त्या सेन्सर चे 'कंडिशनिंग' आणि 'कॅलिब्रेशन' करायला नको का?"
"लक्षात आले सर, पण हे कंडीशनींग आय मीन कॅलिब्रेशन करायचे कसे?"
"सरसूचे तेल !"
"सरसूचे तेल?"
"बाजारात मिळते.."
"म्हणजे नक्की काय करायचे सर?"
"सोपे आहे, तू असे कर, नीट बघून चांगल्या ब्रॅन्ड्चे एक लीटर भर सरसूचे तेल आण, रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर हे तेल डोक्याला थाप, अगदी भरपूर लावायचे, हयगय करायची नाही, पार गालापर्यंत ओघळ वाहिले पाहिजेत, असे तेल लावूनच कामावर ये म्हणजे फाईन ट्यूनिंग पण करता येईल. समजलं"
"येस सर .. लगेचच सर..पण हे किती दिवस चालू ठेवायचे?"
"बाटली संपे पर्यंत"
"नंतर?"
"तुला आपोआपच सगळे वास यायला लागतील"
"पण सर, डोक्याला तेल लावून नाकाचा सेन्सर कसा काय कॅलीब्रेट होत असेल?"
"ते विचारू नकोस बेटा, हा आयुर्वेदिक नुस्का आहे, एकदम जालीम... जा आता.."
"येस सर"

आणि मंदार ने तो 'नुस्का' (?) लगेचच अमलात आणला ! आता पुढे काय झाले असेल ते मी सांगायला हवे का? मंदार ची ती तेलाची बाटली संपे पर्यंत त्या डिपार्टमेंट ची काय अवस्था झाली असेल त्याची तर कल्पनाच करवत नाही.

आता ही मंदारची स्टोरी याने की "हम तो सिर्फ सुंघ के बताते है ।" ची आताच का आठवण झाली ? याचा ज्योतिषाशास्त्राशी काय संबंध ?

सांगतू, समदे बैजवार सांगतू, पाव्हनं जरा बगू ती गाय छाप ची पुडी... आरे ये xxxच्या, ह्यो चुना वाळ्ळा की रं बेन्या , पानी कुनी घालून ठिवायचे रे ऑ.. येक काम धड करायला नको xxx ना, नुस्तं खायाचं, प्यायाचं, उंडारायचे आन वरतुन xxवर करून पडायचं मुड्द्यावानी..!

तर मी काय म्हनून रायलो होतो.. हा त्ये आपलं मंदार ची स्टुरी आन ह्ये ज्योतिष चा काय संबंध येऊन रायला ..बराबर ना?

आता त्ये वाचायचं आसल तर पाव्हनं, तर या इस्टुरीचा भाग 2 वाचाया , यकडाव आमच्या ब्लॉगाला http://suhasgokhale.wordpress.com/ भ्येट देयाला पायजे जनु , थितेच लिवूनशान ठिवलयां की पुढचं समदं , आन बर्का , त्ये वाचल्यालं सांगाया हिथे याच पुन्यांदा, कसं ?"

सुहास

MY Name is Minakshee

Date of Birth 06/12/1975 timing 5:45 am

Place: Ratnagiri

Now stay at Miraroad Thane

Not getting good job and present job is good but salary is not satisfactory

Daughter not studying well

Not Own house

Kindly guide

‘काल निर्णय- भाग - १ '

'काल निर्णय’ हा ज्योतिषशास्त्रातला अपरिहार्य घटक आहे. पण तो तितकाच अवघड ही आहे, ज्योतिर्विदाची बाजारातली सगळी ‘पत’ या एकट्या ‘कालनिर्णय’ करण्याच्या क्षमते वर व त्याच्या अचूकते वर अवलंबून असते असे म्हणले तर काही वावगे ठरणार नाही.

पण ‘काल निर्णय’ म्हणजेच ज्योतिष असा फार मोठा गैर समज निदान आपल्या भारतात तरी आहे ....

संपूर्ण लेख माझ्या ब्लॉग वर http://suhasgokhale.wordpress.com/ उपलब्ध आहे, आपला अभिप्राय कळवा.

ही एक मोठी लेखमाला असणार आहे त्यातला हा पहिला भाग आहे...

सुहास

श्री सुहासजी,

अमेरीकेत बसलेला मुलगा आपले लग्न करण्यासाठी भारतात येणार असतो. त्याला उपलब्ध् वेळेत लग्न ठरेल आणि घडेल याची शाश्वती कोण देणार ? मग ज्योतिषी जर अचुक कालनिर्णय देणार असेल तर त्या मुलाला एक दिलासा असतो की ह्या सुट्टीत लग्न होईल आणि जाण्या येण्याचा खर्च आणि मह्तप्रयासाने आपले प्रोजेक्ट मागे पुढे करुन शोधलेला वेळ वाया जाणार नाही.

सर्वांसाठीच खुप अचुकतेने ( महिना/ तारीख ) असा कालनिर्णय आवश्यक असेलच असे नाही. भारतातल्या मुलांसाठी फार अचुकता नकोही असेल पण हे घडेल का ? आणि घडले तर कधी हे मनाला दिलासा देण्यासाठी का होईना आवश्यकच असतेच.

सबब कालनिर्णय हा आवश्यक आहे. अचुकता किती हवी हा ज्या त्या जातकाचा प्रश्न असेल.

श्री. नितिनचंद्र्जी,

आपण माझ्या लिखाणाचा चुकीचा अर्थ घेतला की काय अशी शंका आली म्हणून हे लिहीत आहे कृपया गैरसमज करुन घेऊ नका

माझे पहिलेच वाक्य " 'काल निर्णय’ हा ज्योतिषशास्त्रातला अपरिहार्य घटक आहे." हे आहे, त्यामुळे 'कालनिर्णय अनावश्यक' आहे असे मी म्हणालोच नाही. लक्षात घ्या , कालनिर्णय अनावश्यक आहे असे माझे मत असते तर मी केवळ 'कालनिर्णय' या विषयावर अंदाजे १२ भागांची ले़ख माला लिहायचा घाट घातलाच नसता , त्यात किमान आठ प्रकारच्या 'काल्निर्णय ' पद्धतीं चा उहापोह करणार आहे! (पहिला भाग प्रसिद्ध केलाय , पुढचे भाग येतीलच ) सबब काहीतरी चुकीचा अर्थ काढू नये ही विनंती.

पण ‘काल निर्णय’ म्हणजेच ज्योतिष असा फार मोठा गैर समज निदान आपल्या भारतात तरी आहे .... असे मी जे म्हणालो आहे त्यामागेही बराच अर्थ आहे , विचार आहे .. खूप जबाबदारीने ते वाक्य लिहले आहे , आणि मी हे असे का म्हणत आहे हे माझ्या पुढील लेखात सोदाहरण स्पष्ट करणार आहेच !

बाकी "अचुकता किती हवी हा ज्या त्या जातकाचा प्रश्न असेल"असे आपण लिहले आहे , आपला तसा अनुभव असेल पण माझा तरी तसा अनुभव नाही , प्रत्येकाला अगदी १००% अचूक लागते सर्व.. . थोड्या जातकांना ज्योतिष शास्त्राच्या मर्यादा समजू शकतात..आणि ज्योतिषशास्त्राचा खरा उपयोग काय आहे हे समजणारे तर त्याहुनही कमी .

माझी लेखमाला त्यासाठीच तर आहे !

कालनिर्णय हा ज्योतिषशास्त्रातील अपरिहार्य व महत्वाचा घटक आहे असे म्हटले तर कोणालाच अडचण नसावी

सामान्य ग्रहमान घेऊन आलेल्या व्यक्तिंनी काय करायचं ?त्यांचा उत्कर्ष कधी होणारच नाही त्यांचे समाधान कसं करणार ?त्यांचे त्यांना एक दिवशी कळतंच की इतके दिवस होणार होणार अशी आशा धरून राहिलो आता सारं संपलंय कालनिर्णय आपल्या भिंतीवर झळकलंच नाही.ज्योतिषशास्त्र अगोदरच त्याला जागं करते. अरे बाबा तुझ्या नशिबात नाही. तू कोळशानेच भिंतीवर चौकडी काढ आणि तारीख, वार, महिना लिहून ठेव.

यस आर डी:

"तू कोळशानेच भिंतीवर चौकडी काढ आणि तारीख, वार, महिना लिहून ठेव." हे वाचून आठवले , आमच्या गल्लीत एक 'बटेश' नावाची व्यक्ती राहायची 'मटक्या' चा भारी नाद, रोज काय 'आकडा' फुटला ते असेच भिंतीवर कोळशाने चवकटी मांडून त्यात लिहून ठेवायचा , त्यावर आधारित एक ठोकताळ्यांचे शास्त्र ही त्याने बनवले होते, आणि खरेच त्याला अगदी नियमीत मटका लागायचा देखिल, इतका की गावातले बुकी त्याचे बेटींग घेत नसत मग तो जवळच्या गावात जाऊन खेळायचा . त्या पैशावर त्याने दोन रिक्षा घेऊन त्या चालवायला दिल्या होत्या , खासगी सावकारी ही करायचा ! पण त्याचे हे गुप्त शास्त्र तो कोणाला सांगायचा नाही , मी ही बराच प्रयत्न केला पण त्याने ताकास तूर लागून दिला नाही. शेवटी दारुच्या व्यसनाने त्याचा जो घात व्हायचा तो झालाच. त्याची ती गुप्त विद्या त्याच्या बरोबरच लयास गेली. , ती विद्या जाता जाता मला देऊन गेला असता तर!

'बटेश पद्धती' (काय डेंजर शब्द वापरला नै) जरी लुप्त झाली तरी तसलेच एक पाश्चात्य ज्योतिषावर आधारित असलेले शिक्रेट डॉक्युमेंट मला प्राप्त झाले आहे , एक अमेरिकन बाईंचे हे संशोधन (?) आहे . मूळ चोपडे 100 पानांचे होते म्हणे आता त्यातली 40 एक पाने फक्त उपलब्ध आहेत., त्यां बाईंना तर म्हणे 'वेगास' च्या माफियांनी ... (नाही पुढ्चे काही लिहीत नाही ... समजून घ्या)
पण ही शिक्रेट पद्धती मी वापरणार नाही / देणार नाही कारण ती शापित आहे (करस्ड) .मला ती देणार्‍याने हीच अट घालून दिली होती... पण मला त्यामागचे टेक्निक चांगले कळले आहे .... जाऊदे ... आपण आपले..

"मेहेनत अपनी हाथ की रेखा मेहेनत से क्या डरना , कल गैरोंकी खातिर करली , आज अपनी खातिर करना" म्हणूया झालं !

प्रकाशजी,,

<<<< कालनिर्णय हा ज्योतिषशास्त्रातील अपरिहार्य व महत्वाचा घटक आहे असे म्हटले तर कोणालाच अडचण नसावी >>

कालनिर्णय हा ज्योतिषशास्त्रातील अपरिहार्य घटक आहे / अंग आहे हे मान्य , त्यात कोणताही संदेह नाही. माझ्या मते ही अपरिहार्यता 'ग्राहकाला जो माल आवड्तो तोच विकायला ठेवायचा ' ह्या व्यापारी सुत्रातून आला आहे , त्यामुळेच आपल्या कडे कालनिर्णयाला अवाजवी महत्व दिले जात आहे, 'काल निर्णय' हा ज्योतिषाचा खरा उपयोग नाही, ज्योतिष शास्त्राद्वारे त्याहून ही अधिक दूरगामी लाभ मिळवता येतात . कालनिर्णयाच्या अतिरेकी हव्यासात (ह्याला के.पी. मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे) , ह्या महत्वाच्या बाबी क्डे दुर्लक्ष होत आहे असे माझे मत आहे,

कालनिर्णय म्हणजेच गोचरी. एखाद्याच्या आयुष्यात उलथापालथ(चांगली आणि वाईटही) आहे ती नक्की केव्हा तो काल वर्तवणे. मोठे नेते, कारखानदार याच करता वारंवार येतात.
बटेश पध्दत (गंमत). असो. परंतू कोळशाने भिंतीवर लिहिणे यातून जातकाला हेच सुचवू इच्छितो की बाबारे तुझे प्राक्तन कष्टसाध्य आहे हात काळे केल्याशिवाय पर्याय नाही. हीच गोष्ट त्रिकालज्ञानी संतमंडळी जप कर या सूचक पध्दतीने गळी उतरवतात.
जातकाने ज्योतिष/भविष्य जाणून घेण्याबरोबरच आपला भूतकाळपण पाहावा. त्याने एकप्रकारची दिशा मिळते.

यस आर डी आणि प्रकाशभाऊ

आज इथे लिहताना मला अचानक 'बटेश' आठ्वला , काय योग असतात बघा !!

मी वर जे लिहले आहे ति 'बटेश' ची ओझरती ओळख होती समजा. आज संध्याकाळी कॉफी घेता घेता ' बटेश' माझ्या डोळ्या समोर नाचून गेला अगदी त्याच्या 'बटेश पद्धती' सह ! वाटले एक छान लेख तयार होईल यावर , अगदी 'बटेश पद्धती' नेमकी काय होती या सहीत , अर्थात मला 'बटेश पद्धती' पूर्ण माहीती नाही पण 'बटेश' काय करायचा (आकडा कसा ठरवायचा ) ते आठवतेय , लिहून काढतो जसा वेळ मिळेल..कोणास ठाऊक त्यातून कुणाला काही क्लू मिलाले तर ! ब्लागावर ड्कवतो.. आणि मग इथे येऊन आवतण देतो , कसे?

मी कोणत्याही प्रकारच्या जुगाराचे समर्थन करत नाही.

बटेश पद्धती ! (भाग - 1)

बोलता बोलता अल्ताफ कडून कळले की बटेश आता एक नंबर चा पंटर झाला आहे, म्हणजे मटका खेळण्यात एकदम एक्स्स्पर्ट . तो जो आकडा लावतोय तो येतोय ..शेवटि काहीतरी झोल आहे म्हणून अल्ताफच्या अब्बूं नी त्याच्या कडून बेटिंग घ्यायचेच बंद केले होते. त्यामुळे बटेश आता कराड, तासगाव, आष्टा ,इस्लामपूर ,मिरज, जयसिंगपूर, अगदी कोल्हापूर पर्यंत जाऊन आकडा खेळतोय , बटेश ने स्कूटर त्यासाठीच तर घेतली होती. अल्ताफ च्या म्हणण्यानुसार बटेश काय झोल करायचा माहीती नाही पण हप्त्यात तीन तरी विन आहेतच , बटेशला हे कसे काय जमते अल्ला जाने , काहीतरी जादूटोणा असणार !

बापरे! एका हप्त्यात तीन तीन विन्स? बटेश नेमके काय करत असावा? पण बटेशला हे विचारायचे कसे, हा असला माणुस ! नसती आफत यायची म्हणून मी गप्प बसलो. पण दैववशात , बटेश नेमके काय करतो हे एके दिवशी मला कळणारच होते!

संपूर्ण स्टूरी (अर्थात भाग -1 ) माझ्या ब्लॉग वर http://suhasgokhale.wordpress.com/ उपलब्ध आहे.

सुहास

OPEN FOR FORUM
PATRIKA PATHU KA
MY LIFE IS VERY STRANGE ONE I CAME TO THE CONCLUSION THAT YOUR DESTINY IS YOUR MASTER OF LIFE.
SO ONE MUST ACCEPT LIFE AS IT COMES.YOU HAVE NO OTHER WAY
JUST I WANT TO KNOW WHY THIS HAPPENED TO ME WHICH GRUHA OR OTHER FACTORS HAVE INFLUENCED MY LIFE.
AS A AABHYASK I THINK YOU WILL BE INTERESTED TO STUDY IT. IF YOU PERMIT I WILL SEND IT TO YOU ALONG WITH MY DETAILS
ANY RESPONCE

घरात जवळच्या अविवाहित व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला असेल तर
नात्यातील मुलींच्या लग्नामध्ये अडथळे येऊ शकतात का ?

पुरणपोळी चा किस्सा !

गोष्ट तशी जुनी म्हणजे 50-55 च्या आसपासची. ‘उमा’चे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले, बाकी देशपांड्यांनी मात्र मोठा बार उडवून दिला, लाडाकोडात वाढलेली पोर सासरी जाताना कशी लक्ष्मीच्या पावलाने गेली पाहिजे ना, खर्चाला काही कसर ठेवली नाही, मागितले त्याच्या दसपटीने देऊन देशपांड्यांनी उमाच्या सासुरवाडीला नावे ठेवायला जागाच ठेवली नाही!

वैशाखात लग्न झाले, बघता बघता श्रावण येऊन ठेपला, सण वार , व्रत वैकल्याची धामधूम सुरू झाली, उमा तशी येऊन गेली एक दोनदा माहेरी पण एक गिरकी मारून परत सासरी, ती तरी काय करणार इकडे माहेरची ओढ तर तिकडे पतीचा विरह ! आपली गुणाची पोर सासरी सुखात नांदतेय पाहून उमाचे माता पिता मात्र धन्य धन्य झाले.

उमाच्या सासूबाई एकदम साध्या , उमाला तर सख्ख्या आई पेक्षा माया लावणार्‍या, दिवाळी आली, उमेचा पहिला दिवाळसण माहेरी मोठ्या दणक्यात साजरा झाला, जेवणा नंतर दोन्ही विहीणबाई जरा निवांत बोलत बसल्या होत्या.

...............

संपूर्ण लेख माझ्या ब्लॉग वर http://suhasgokhale.wordpress.com/ येथे उपलब्ध आहे...

सुहास

सध्या माझ्यापुढे एक यक्ष प्रश्न पडला आहे !

माझ्या ब्लॉग http://suhasgokhale.wordpress.com/ वरची नवीन पोष्ट. जरुर वाचा , त्यात एका समस्ये बद्दल आपले सर्वांचे मत मला जाणून घ्यायचे आहे, हा एक प्रकारचा 'पोल Poll' आहे असेच समजाना. आपले मत जरुर व्यक्त करा अर्थातच पोष्ट माझ्या ब्लॉग वर असल्याने आपली मतें तिथेच नो^दवावीत , मायबोली वर नव्हे..

..

सुहास जी ... तुमच्या ब्लॉगची तुम्ही जनरल लिंक देताय... तिथे जावून पार्ट २ वगैरे कुठे मिळणार... तुम्ही complete लिंक द्यावे हि विनंती ... याप्रमाणे ... http://suhasgokhale.wordpress.com/2014/12/

Suhasg your blog says mofat bhavishyasathi sampark karu naka. Same applies to you. Aapan bhavishyat kay karave hyacha salla mofat magu naye ase vatat nahi ka tumhala?

Pages