PMP/ITIL/PRINCE2 चा फायदा होतो का?

Submitted by हर्ट on 14 June, 2010 - 21:51

मित्रांनो, हल्ली बरेच जण PMP करत आहेत. करुन झाल्यानंतर त्यांना त्याचा उपयोग झाला असे माझ्या पहाण्यात नाही आले. आजच्या स्पर्धेच्या युगात PMP चा किती उपयोग होतो? MBA केल्यानंतरही PMP करणारे आहेत. या विषयावर कृपया माहिती लिहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

PMP करण्याची योग्य वेळ कोणती... म्हणजे certification मिळालयं पण फक्त फ्रेम करुन भिंतींवर लावण्यापुरतच अस व्हायला नको म्हणुन विचारतोय... :).

येस! मलाही हाच प्रश्न पडलाय.सध्या सपोर्टचा जॉब करतेय ३ वर्शे झाली. आता योग्य आहे का PMP\Prince2 साठी कि डेव्हलमेंट, प्रोजेक्ट मॅनेज्मेंटचा अनुभव असेल तरच करावे?

मला कालच एका भारतीय ट्रेनिंग कम प्लेसमेंट इन उसगाव वाल्यांकडुन फोन आला होता.. पीएमपी नि असोसिअट मॅनेजरच ट्रेनिंग करा नि तुमचा जॉब सर्च आम्ही अर्धं ट्रेनिंग पुर्ण केलं की सुरु करु..
मला ६ वर्षांचा अनुभव आहे टेस्टिंग मधे
सेम प्रश्न आहे .. कधी करावे?

Management साठी personally फायदा नक्की होतो. नवीनच मॅनेजर झाल्यास/होउ घातल्यास हे सर्ट नक्की करावे.
चनस, testing related cert. केल्यास जास्त फायदा होइल जॉबच्या दृष्टीने. एकदा सिनियर लाईन पकडली की मग PMP चा विचार करणे.

चिन्नु.. हो अजुन तरी मला मॅनेजमेंट मधे जायच नाहीयं.. काल असाच फोन आला मग डोक्यात परत कन्फ्युजन सुरु Sad

चनस, मग confuse होउ नका. ISTQB foundation दिलीत का? नसेल तर विचार करून बघा. जर Testing line सोडायची नसेल तर CSTE, CSQA आणि ISTQB चा विचार नक्की करणे.
svalekar, वर लिहील्याप्रमाणे personal skill improvement नक्की असते. जर management मध्ये जाणार असाल तर PMP उपयोगी आहे असे मला वाटते. बाकी तुम्ही तुमच्या core skill improve आणि त्यातच specialization केलेले केव्हाही चांगले. जॉबच्या दृष्टीने किंवा personal improvement साठीसुद्धा.

कोणताही रितसर अभ्यास / प्रशिक्षण चांगलेच. PMP च्या ट्रेनींगचा भर हा परीक्षा पास कशी व्हावी यासाठी असेल, तरीही मुळात PMPअंतर्गत जो अभ्यासक्रम आहे तो व्यवस्थित अभ्यासल्यावर त्याचा चांगला परिणाम अप्रत्यक्षरित्या कामावर होईलच. त्या त्या कंपनीतल्या वहिवाटीनुसार PMPचा आदर्शवाद जिथे तिथे वापरता येतीलच असे नाही पण निदान आदर्शवादापासून आपण किती फारकत घेतोय याची नोंद मेंदूच्या एका थरात ठेवली जाईल. त्यातून आपण कितपत धोक्याच्या वाटेवर मार्गक्रमणा करतोय हे समजेल.

is PMP useful for civil engineers? what is eligibility criteria? completed diploma in civil engineering & working as senior engineer from last 5 years.

PMP is useful for civil engineers and for people working in Oil & Gas / power Sector

पीएमपी चे ज्ञान व सर्टिफिकेशन हे इंडस्ट्रीनिरपेक्ष आहे. तुम्ही 'प्रोजेक्ट' स्वरूपाचे काम करत असाल तर नक्कीच उपयुक्त आहे. तुम्ही 'ऑपरेशन्स' स्वरूपाचे काम करत असाल तर तेवढे उपयुक्त नाही.

Oil & Gas / power Sector आणि civil या दोन्ही क्षेत्रात अमेरिका व युरोपमध्ये तरी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सर्टिफिकेशन उपयुक्त आहे.

Pages