एक किलो कैरीच्या फ़ोडी, हळद आणि मीठ लावून ठेवाव्यात. त्याला पाणी सुटेल
ते निथळून, फ़ोडी सूकवून घ्याव्यात.
पाव वाटी मोहरिची डाळ, पाव वाटी धण्याची डाळ, दोन टेबलस्पून मेथीचा रवा,
एक टेबलस्पून बडीशेप (थोडी पुड करुन), दोन तीन लवंगा आणि एक इंच दालचिनी
यांचे बारिक तूकडे, दोन टिस्पून हळद, पाव वाटी लाल तिखट, अर्धी वाटी मीठ, अर्धा
चमचा मोहरी. लागेल तसे तेल.
तेल तापवून त्यात मोहरी व हिंग घालावा. मग मेथीची पूड घालून जरा परतावे, मग मोहरी
डाळ घालावी. बाकिचे जिन्नस घालून आच बंद करावी. हे सगळे थंड झाले कि त्यात कैरीच्या
सुकवलेल्या फ़ोडी मिसळून घ्याव्यात. मग हे बरणीत भरावे. फ़ोडी बूडतील इतके तेल गरम
करून घ्यावे, आणि ते पूर्ण थंड झाले कि बरणीत ओतावे. सतत फ़ोडींवरती तेल राहील असे पहावे.
या मसाल्याचे प्रमाण,आणि घटकही बेन आणि भाभी प्रमाणे बदलत राहतात.
पण मला यापेक्षा बंगाली पद्धतीचे, ओमेर कासुंदी हे लोणचे जास्त आवडते. बहुतेक मी लिहिले
आहे.
धन्यवाद दिनेशदा.... हे तर
धन्यवाद दिनेशदा.... हे तर करीनच. पण गूळ आणि बडिशेप घातलेले लोणचे माहिती आहे का?
कुणालाही!
की यातच गूळ घालायचा? काय
की यातच गूळ घालायचा? काय प्रमाण?
गुळाचे ते वेगळे लिहिले होते.
गुळाचे ते वेगळे लिहिले होते. हे लोणचे जरा तिखटच असते, पण यात गूळ घातला तरी चालेल. अर्धी वाटी ते पाऊण वाटी गूळ लागेल.
दिनेशदा, धन्यवाद !
दिनेशदा,
धन्यवाद !
ओमेर कासुंदी शोधले पण मिळाले
ओमेर कासुंदी शोधले पण मिळाले नाही, दिनेशदा, रेसिपी सांगाल का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/16847
इथे परत लिहिले आहे आता.