Submitted by ट्यागो on 3 June, 2010 - 08:54
'बरिस्ता',
आपलं भेटण्याचं ठिकाण,
टमरेल भरून कॉफी पिण्याचं...
माफक हसणं, माफक बोलणं...
तेही इंग्राळलेलं.
मग तुझ्या माफक डोळ्यांवर असलेल्या
महागड्या गॉगलवर बाष्प...
कॉफीचं, पैश्याचं.
अन् माझ्या मनावर ताण...
ह्या अतिशिष्ट जगण्याचा.
तुला ड्रॉप केलं की,
नाक्यावरच्या टपरीतून घेतो
एक कटिंग, सोबत मोठा फोर स्क्वेअर...
मग कुठे भेटतो मी मला.
तुझ्या बरिस्तापेक्षा टपरीच बरी म्हणत,
क्षितीजाकडे बघणंही टाळतो!!!
मयूरेश चव्हाण, मुंबई.
२६.०५.१०, ०९.३६.
गुलमोहर:
शेअर करा
आवडली टमरेल ऐवजी टंपर पण
आवडली
टमरेल ऐवजी टंपर पण चालेल की.
बरिस्ता', आपलं भेटण्याचं
बरिस्ता',
आपलं भेटण्याचं ठिकाण,
मग्ज भरून कॉफी पिण्याचं...
असंही चाललं असतं म्हणा, पण पण त्यातही एक खोचकपणा दडलाय.
तो व्यक्त छान झालाय तरीही ते 'टमरेल' खटंकतंच.
पण मेख अशीही आहे, दुसरा शब्द कोणता?
मयुरेश काय ते बघ बाबा, पण टमरेल काढ तिथनं.
सार्यांचा मनापासुन आभारी
सार्यांचा मनापासुन आभारी आहे!
ग्रेट .
ग्रेट .
मुग्धा, बरोबर आहे. ते भांडे
मुग्धा, बरोबर आहे. ते भांडे भारतात नव्हे महाराष्ट्रात भलत्याच कामाला वापरले गेल्यामुळे त्याचा भाव कमी झाला. अद्याप टमरेल हा मिलिट्रीत चांगल्या अर्थाने वापरायचा शब्द आहे.
इकडे चेन्नईत कॉफी प्यायला
इकडे चेन्नईत कॉफी प्यायला ..टंबलर वापरतात..इथल्या वास्तव्याच्या सुरुवातीला मला कोणी "ते टंबलर आण" असं म्हंटलं तर गोंधळल्यासारखं होत असे...(कारण महाराष्ट्रात भलत्या ठिकाणी होणारा वापर
)
thanks for every one!
thanks for every one!
छानच आहे बरिस्ता!
छानच आहे बरिस्ता!
टमरेलच बरोबर आहे. कसं....
टमरेलच बरोबर आहे.
कसं....
तुझ्यासोबत बरीस्तामध्ये बसून,
कॉफी पिताना,
माझ्या मनावर साठायचा तुझ्या अतिशिष्ट्पणाचा मळ,
तुझ्या गॉगलवरच्या बाष्पाने आणि व्हायचा आणखीच घट्ट.
म्हणून मग धुवून टाकायचो तो मळ,
टमरेलभर उष्ण कॉफी पिउन झटकन;
आणि बाईक चालवताना माझ्या डोळ्यात यायची घाण,
मलविसर्जन झालं, जरा हलकं वाटतंय आता.
आभार!
आभार!
तुझ्या बरिस्तापेक्षा टपरीच
तुझ्या बरिस्तापेक्षा टपरीच बरी म्हणत,
क्षितीजाकडे बघणंही टाळतो!!! .......... एकदम झकास....
महागड्या गॉगलवर
महागड्या गॉगलवर बाष्प...
कॉफीचं, पैश्याचं.
अन् माझ्या मनावर ताण...
ह्या अतिशिष्ट जगण्याचा.
व्वा मयुरेश........ मस्त कविता...
;;;;;;........फोडतय
धनेशजी धन्यवाद!
धनेशजी धन्यवाद!
तुझ्या बरिस्तापेक्षा टपरीच
तुझ्या बरिस्तापेक्षा टपरीच बरी म्हणत,
क्षितीजाकडे बघणंही टाळतो!!!
वाह!!!
"टमरेल" चांगला वापरलाय...
आनंदयात्रीजी, मनापासुन आभारी
आनंदयात्रीजी,
मनापासुन आभारी आहे.
....
....
"मग कुठे भेटतो मी मला" हे
"मग कुठे भेटतो मी मला" हे अगदी पटले. आवडली.
आभार!
आभार!
वा मस्तच... योग्य ठिकाणी जरा
वा मस्तच...
योग्य ठिकाणी जरा लाईन ब्रेक दिलात तर जास्त effective होइल ...
सह्हीच!
सह्हीच!
Pages