कविता होताना!
"कविता येत्ये, बाहेर काढ तिला" मैत्रिणीने फर्मान सोडलं.
मला कविता होतेय आणि मलाच माहीत नाही हे कसं काय घडलं बुवा आणि हिला कुठून समजलं हे?
खरंतर खूप खूप दिवस वाट बघत होते काहीतरी बरं लिहिलं जाईल हातून याची पण 'क्रिएटिव्हिटीच्या भुताला' शिव्या घालण्यापलिकडे काही घडत नव्हतं...
मग मैत्रिणीने कोडंच घातलं...
"परवापासून बघत्ये; नुस्त्याच ओळी ओळी....
कधी पूर्ण होणार कवितेची रांगोळी?"
असं आहे होय.. अतीव कंटाळलेल्या घामट आणि सरभरीत अवस्थेत फेबुवर माझा संचार चालू होता. अचानक काहीतरी चुकीच्या टिचक्या पडल्या बहुतेक आणि सगळं काही एकाखाली एक दिसायला लागलं. जामच वैतागले. मी एकटीच का वैतागायचं पण लोकांनाही पकवू असं म्हणून जे झालं ते स्टेटसमधे टाकलं ते असं
"अचानक इथे हे असे काय झाले
रेखीले पान माझे विखरून गेले.....
माझा फेबु डिस्प्ले गंडलाय अचानक...."
लोकांना वाटणार मी कविता पाडतेय. लोक वाचणार आणि शेवटची ओळ वाचून त्यांचा पचका होणार. फालतू जोक म्हणून लोक चरफडणार इत्यादी इत्यादी वाटून मला जामच मजा आली. कसलं काय.. कोणी ढुंकून सुद्धा पाह्यलं नाही माझ्या स्टेटसाकडे. माझ्या विनोदाची फुलं अशी पार चुरगळली गेली... (इथे कमालीचे नाटकी हुंदके!)
पण तसं नव्हतं. मैत्रिणीला तरी वाटलं होतं मला कविता होतेय म्हणून. म्हणून तर हे फर्मान.
मला तर काडीचं काही सुचत नव्हतं. पण बेटी सांगायची ते आठवलं.
"शब्दखेळ करत रहा. त्यातूनच येईल एखादी भली कविता."
म्हणलं चला खेळून बघू शब्दखेळ. लगे हाथो मैत्रिणीच्या फर्मानाला मान पण दिल्यासारखं होईल..
गप्पा पाऊस आणि ढगाच्याच चालू होत्या. केला शब्दखेळ...
"कसला ढग न कसलं काय...
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय! "
मैत्रिण हसली आणि बहुतेक मला मनातल्या मनात कोपरापासून हात जोडून गप्प बसली.
इथे माझ्या डोक्याला किल्ली बसली होती ना पण. शब्दखेळ पुढे सुरू केला.
जळमट धूळ जिकडे तिकडे
पसार्यात कायच सापडत नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!
काम पडलीत, धामं अडलीत
लक्ष मुळी लागतच नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!
भूक नाही, झोपही नाही
कंटाळ्याने पसरले पाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!
रडणं राह्यलं, हसणं वाह्यलं
शून्याचा पाढा घोकत जाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!
कोपरा न कोपरा लख्ख केला
डोक्यामध्धे कायच नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!
असं काहीतरी निघालं डोक्यातून बाहेर. भली अशी नाही पण कविता तर झाली. बांध तर फुटला. तुम्हीही पकलात. सध्या मला इतकंच पुरे आहे..
कधीतरी बरं लिहिण्याचं पण मनावर घेईन म्हणते...
-नी
निवडक १० मधे नोंदवलं.
निवडक १० मधे नोंदवलं.
(No subject)
भले आता मी पाठ थोपटून घेऊ का
भले
आता मी पाठ थोपटून घेऊ का ? कोपरापासून नमस्कार करु?

जे काय आलंय ते सहिये
मी पण निवडक १० मधे
मी पण निवडक १० मधे नोंदवलं......फालतू, बंडल, चीप ललित
श्यामले, आता पकली असशील तर
श्यामले,
आता पकली असशील तर कोपरापासून नमस्कार कर स्वतःलाच, आवडलं असेल तर पाठ थोपटून घे... ये तेराही कियाधरा है!!
अरे तिच्या... झक्कसच कि. मस्त
अरे तिच्या...
झक्कसच कि.
मस्त एकदम.
>>फालतू, बंडल, चीप ललित अहो
>>फालतू, बंडल, चीप ललित
अहो नाही काही.... ते अतिशय दर्जेदार आणि वैविध्यपुर्ण आहे
bumrang
bumrang
नी दत्तू, तुम्हीही निवडक १०
नी
दत्तू, तुम्हीही निवडक १० मध्ये आता..
किरूजी
किरूजी
सगले कंपुवाले... पाठ-खाजवे...
सगले कंपुवाले... पाठ-खाजवे... मस्कालावे..... चला पटापटा रिस्पोन्सेस टाकून लेख अजरामर करा बर
अनुल्लेख केला तर लेख मरतो.
अनुल्लेख केला तर लेख मरतो. शिव्या घातल्या वा ओव्या गायल्या काही केलं तरी लेख वरतीच दिसत रहातो हे तंत्र लक्षात घ्या.
कधीतरी बरं लिहिण्याचं पण
कधीतरी बरं लिहिण्याचं पण मनावर घेईन म्हणते..<<<<:अओ:
म्हणजे चांगलं लिहिणं बंद करणार की काय??
कवितेवरचा राग आतातरी सोडागं
कवितेवरचा राग
आतातरी सोडागं माय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!
अक्षर कोलाजः जळमट धूळ जिकडे
अक्षर कोलाजः
जळमट धूळ जिकडे तिकडे
पसार्यात कायच सापडत नाय
काम पडलीत, धामं अडलीत
लक्ष मुळी लागतच नाय
लक्ष मुळी लागतच नाय (पण)
ताल कध्धी चुकतच नाय...
भूक नाही, झोपही नाही
कंटाळ्याने पसरले पाय
रडणं राह्यलं, हसणं वाह्यलं
शून्याचा पाढा घोकत जाय
शून्याचा पाढा घोकत जाय
ताल कध्धी चुकतच नाय...
पसार्यात कायच सापडत नाय
डोक्यामध्धे कायच नाय
कोपरा न कोपरा लख्ख केला
उनच्चुन घामच्च्घाम
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय...
भले ! पेशव्यांचं अक्षर कोलाज
भले !
पेशव्यांचं अक्षर कोलाज मस्त !
पेशवे छान.. कविता आवडली.
पेशवे छान.. कविता आवडली.
नीदी, सध्या उद्योग कमी आहेत
नीदी,
सध्या उद्योग कमी आहेत वाटतं..
तरी मी सान्गत अस्तो,
तरी मी सान्गत अस्तो, उन्हातानात उघड्या डोक्याने फिरू नये म्हणून!
आता झाला ना परिणाम?
जया मस्त रे!! मुटे, राग बिग
जया मस्त रे!!
मुटे, राग बिग नाही वो... जमायला तर पायजे ना. दरवेळेला ह्या असल्या शब्दखेळापलिकडे काय घडत नाही.
दक्षे, नको इतके उद्योग आहेत त्यामुळे काहीच सुधरत नाहीये...
लिंब्या,
>>आता झाला ना परिणाम? <<
अजून? शक्यच नाही. माझ्या डोक्यावर परिणाम होऊन होऊन ते पार न्यूट्रल झालेय. आता काय परिणाम होणार डोंबल!!
नी मस्तच.
नी मस्तच.:)
'कायच्या काय ललित' असा एक नवा
'कायच्या काय ललित' असा एक नवा सेक्शन सुरु झालाय का?
नी, प्रत्येक प्रतिक्रियेनंतर, एक 'धन्यवाद' टाकत रहा!
आगावा चालेल. त्याने मी
आगावा
चालेल. त्याने मी अजरामर होईन की लेख?
मज्जा आली वाचताना. कधीतरी बरं
मज्जा आली वाचताना.
कधीतरी बरं लिहिण्याचं पण मनावर घेईन म्हणते... >>> असा apologetic सूर कशासाठी?
(No subject)
(No subject)
बुमर्यांग >>>अहो नाही
बुमर्यांग
>>>अहो नाही काही.... ते अतिशय दर्जेदार आणि वैविध्यपुर्ण आहे >>>>>>
हे असं का टोमणे मारयच्या भाशेत लिहलय... ? आवडालं तर आवडलं म्हना आणि नाही तर सोडुन द्या, हवं तर टीका करा पन हि भाषा कशासाठी ? तुम्हाला चालेल का असं ?
नी, फेबु वर वावरुन माणसाचं
नी, फेबु वर वावरुन माणसाचं असं होतं???? बरं झालं, मी फेबु वर नाहीये ते... नाहीतर ऑलरेडी परिणाम झालेलं माझं डोकं परत परिणाम होऊन सिधं व्हायचं आणि मग इथे माबोवर वाट्टेल तशी जीभ सैल सोडता यायची नाही.
(No subject)
मंजे.... डो वर पर्णाम हे काय
मंजे.... डो वर पर्णाम हे काय मायनस मायनस नाहीये क्यान्सल व्हायला. ते चक्रवाढव्याजाप्रमाणे वाढतं...
तस्मात फेबु वर यंट्री मारच.
Pages