जळ्ळं मेलं लक्षण ते..
माझी एक खुप जुनी कविता परत एकदा नविन मायबोलीवर..
Thursday, March 01, 2001 - 02:12 pm
जळ्ळं मेलं लक्षण ते..
चकाट्या पिटण्यात मित्रांबरोबर
तुमचं जिवन सार्थकी लागते
चला जरा माझ्याबरोबर म्हंटल
तर नाक ते लगेच चढते
असेल लागत वेळ थोडा
साड्या बघण्यात, मी म्हणते
जळ्ळं मेलं लक्षण ते..
कसलही खाणं बाहेरच
स्वादिष्ट म्हणून घशात जाते
मर मरुन मी जेवण करते
खोड्या काढायला लगेच जमते
असं काय वाईट झालय
जेवण हे, मी म्हणते
जळ्ळं मेलं लक्षण ते..
दोन गोड शब्द माझ्याकडे
बोलायला जिभ तुमची जड होते
शेजारणीकडे बोलताना मात्र
कशी अगदी मिठास बनते
असं काय बघितलत तुम्ही
त्या सटवीत, मी म्हणते
जळ्ळं मेलं लक्षण ते..
जाते निघुन माहेरी मी म्हंटल
की तब्बेत तुमची खुश होते
नेहमीच करता दुर्लक्ष
जवळ करता गरजेपुरते
लग्नंच तरी कशाला केलत
तुम्ही माझ्याशी, मी म्हणते
जळ्ळं मेलं लक्षण ते..
- अनिलभाई
भाई, शोभत
भाई, शोभत नाही हो तुम्हाला अशा कविता लिहायला
बरें ७ वर्षाच्या काळात, जर ही एकमेव कविता नसेल, तर इतर कविताही इथे लिहा. तुमची प्रतिभा आम्हालाही बघू द्या.
अनिलभाई, ह.
अनिलभाई,

ह. ह. पु. वा.
जळ्ळं मेलं
जळ्ळं मेलं लक्षण ते,
या ओळीचा
चुलीत घातलं नं काय,
असा पुढचा भाग आहे, प्रत्येकवेळी मनात वाचला, आणि आणखीनच मजा आली.
काय हे
काय हे अनिलभाई. लोक हापिसातून वाचतात. तेंव्हा वर वॉर्नीग टाकायची ना. जवळजवळ पडले मी खुर्चीतून. :)))
व्वा! व्वा!
व्वा! व्वा! अनिलभाऊ ७ वर्षांनंतरही यात काही बदल नाही झाला आणि शेकडो वर्ष गेली तरी होणारही नाही. पुन्हा पुन्हा वाचावी अशी कविता.
आई ग हहमे...
आई ग
भाई मस्तच. तुम्हीच लिहिलीय की भाभींनी? 
हहमे... म्हणजे हसुन हसुन मेले
-प्रिन्सेस...
अनिलभाई, कम
अनिलभाई,
कमाल केलीत. हे गाणे अजरामर होणार. गेल्या शंभर वर्षांपासून ते पुढील दोनशे वर्षे हे गाणे सर्व विवाहित स्त्रियांनी म्हणावे असे आहे. जरा लग्नाला दोन चर वर्षे झाली की विवाहित स्त्रियांना हे गाणे मनापासून आवडेल.
अशीच मराठीची सेवा करत रहा. नि संत एकनाथांप्रमाणे श्रीमंत सावकार बना. आज अमेरिकेला तुमच्यासारख्या सावकारांची खूप गरज आहे.
अनिलभाई,
अनिलभाई, आवडलीच.
****असेल लागत वेळ थोडा
साड्या बघण्यात, मी म्हणते ****
किती सहज... नक्की खरोखरीचं घडलं असणार
अनिलभाई,
अनिलभाई, मानलं तुम्हाला !
तुम्ही वपुंचं वाक्य दाखवून दिलंत -- 'The more and more you write personal, the more and more it becomes universal'
हहपुवा !
व्वा !
व्वा ! झक्कास
हहपूवा !! <<<
हहपूवा !!
<<< असेल लागत वेळ थोडा
साड्या बघण्यात, मी म्हणते >>> हे फारच आवडलं
मस्तंय
मस्तंय भाई!
छानच
छानच
अनिल
अनिल भाई
जबरदस्त. ह.ह.पु.वा. आजुबाजुचे विचित्र नजेरेने बघत होते हापिसात.
लई भारी....
लई भारी.... अनिलभाई
व्वा लय
व्वा लय भारी
वा!...छानच...
वा!...छानच...
असेल लागत
असेल लागत वेळ थोडा
साड्या बघण्यात, मी म्हणते >>> मस्तच
टू मच....
टू मच....
समस्त पुरुषवर्गाचा हाच अनुभव
समस्त पुरुषवर्गाचा हाच अनुभव अन तक्रारही
<< कसलही खाणं
<< कसलही खाणं बाहेरच
स्वादिष्ट म्हणून घशात जाते
मर मरुन मी जेवण करते
खोड्या काढायला लगेच जमते
असं काय वाईट झालय
जेवण हे, मी म्हणते
जळ्ळं मेलं लक्षण ते.. >>
प्रचंड अनुमोदन.
सौ ला ही असंच वाटतं, कि ती मर मरुन स्वयंपाक करते आणि मी त्याला नाव ठेवतो आणि वर ऐकायला लागतं, "तुम्हाला ना, कौतुकच नाही, बायकोचं"
<<'The more and more you write personal, the more and more it becomes universal' >> प्रचंड अनुमोदन.
मस्त मस्त
मस्त मस्त
हे हे हे .... मस्त
हे हे हे .... मस्त अनिलभाई....