फ्रेंड्स !

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

'फ्रेंड्स' ही एक अमेरिकन टीव्ही सिरीयल होती. अमेरिकेत ती १० वर्षे चालली. ती खुप लोकप्रिय होती/आहे! असे सांगतात कि जी तेंव्हा टीव्ही वर दाखवली जाई तेंव्हा निम्मी अमेरिका टीव्ही समोर असे! खरे खोटे सॅमंकल जाणो!

त्यात सहा मित्र शाळा/कॉलेज/नोकरी अन एकुणात त्यांचे जीवन एकत्र जगताना दाखवले आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक बर्‍या वाईट घटना त्यात आहेत. सर्व सहा कलाकार अफलातुन आहेत! एकाला झाकावा अन दुसर्याला काढावा असा काहीसा प्रकार!

मला असे मित्रांसोबत रहायला जाम आवडले असते, पण राहता आले नाही! मी जेंव्हा स्पेन ला होतो, तेंव्हा माझी एक सहकारी मैत्रीण फ्रेंड्स ची फॅन होती. तिच्या कडे सर्व १० वर्षांच्या (सिझन) डिव्हीडीज होत्या. जेंव्हा बोअर होत असु तेंव्हा आम्ही फ्रेंड्स बघत बसत असु. त्यातुनच मला ही सिरियल आवडायला लागली! अन आता मला ती जिथे पहायला मिळते तिथे मी ती बघतो!

नुकतेच मला सिझन ९ अन १० च्या डीव्हीडीज इथल्या सिटी लायब्ररीमध्ये मिळाल्या. (सिंचे बाकीचे ८ सिझन कॅसेट च्या रुपात आहेत, अन माझेकडे व्हीसीआर नाही.) मी लगेच पारायण सुरु केले! उलटे पालटे कसे ही पाहिले तरी सिक्वेंस तुटत नाही, कारण एकदम पाठ झालेले आहेत!

असो. अन शेवटी, फ्रेंड्स मध्ये जेनिफर अ‍ॅनिस्टोन ने काम केले आहे! ती मला जाआआआआआआआआआआआआआअम आवडते! Happy

अधिक माहिती: http://en.wikipedia.org/wiki/Friends

प्रकार: 

सीझन ८: वन विथ द स्ट्रिपर मध्ये रेचेल तिच्या वडिलांना प्रेग्नंट असल्याचे सांगते तो एपिसोड धमाल आहे.
वडिल रॉसच्या घरी येतात आणि मोनासामोर त्याला झापायला चालू करतात.

https://youtu.be/sVsx2IBAZuA
हे पण बघा youtube वर
friends चे bloopers म्हणजे मेकिंग दाखवले आहे
छान आहे
बाय द वे लिंक कशी बनवायची

काल अखेर शेवटचा एपिसोड बघून पारायण संपवलं!
नवव्या / दहाव्या सिझन मधले काही एपिसोड्स आधी पाहिले नव्हते असं लक्षात आलं.
शेवटच्या एपिसोडमध्ये मोनिका आणि चँडलर आपल्या किल्ल्या तिथे ठेऊन देतात आणि मग बाकी सगळेपण आपल्या जवळच्या किल्ल्या तिथे ठेऊन देतात. भारी होतं ते. Happy
शेवटच्या सिझनमध्ये सगळ्यांना सेटल केलं. मला वाटलं जोईलापण हॉलिवूड मुव्ही वगैरे देतील.
नंतर उगीच विकीवर सगळी माहिती वाचली तर त्यात लिहिलय सगळं शुटींग कॅलिफोर्नियात झालं म्हणे! (म्हणजे सगळं खरच मॅनहॅटनमध्येच शुट झालं असेल अशी अपेक्षा नव्हती. पण तरी गंमत वाटली. Happy )

आता काय बघावं बरं ?

आता काय बघावं बरं ? >>>> फार वेळ हाताशी नसेल तर मी फ्रेंड्स बघते पुन्हा पहिल्यापासून सुरू करून.

नेटफ्लिक्सवर 'युध' नामक सिरियल आहे ती बघ.

मी चालू केलंय युध बघायला.
पराग, पर्सन ऑफ इंटरेस्ट आवडतंय का बघ. मला पहिला सिझन आवडला.

फ्रेन्ड चा ग्लॅडिस वाला एपिसोड पाहिला का? त्यात रेचेल ची आणि जोई ची अ‍ॅक्टिंग भारी आहे.
रेचेल ची अ‍ॅक्टिंग सीझन्स पुढे गेले तशी सुधारत गेली, किंवा बाकी कलाकारांबरोबर केमिस्ट्री जमल्याने तिला सूर गवसला.. रॉस मात्र पहिल्या सीझन पासून भारीच आहे.

अर्रे वाह!
सगळा बाफ आताच वाचून काढला.

मी गेल्या दिवाळीत १० दिवसात बिन्ज केलेलं फ्रेंड्स सिरियलच. पहिले चार सीझन फार आवडले.

मोनिका आणि चँडलर सगळ्यात जास्त प्रिय होते तेव्हा. पण पाचव्या सीझनपासून मात्र मोनिका डोक्यात जायला लागली. पुढचे सीझन चढत्या क्रमाने बोअर होऊ लागले.

रेचल कधीच आवडली नाही. तिची आणि रॉसची प्रेमकहाणीतर अगदीच बेकार आहे. फिबी आणि जोई grow on you. जितके जास्त बघू तेवढे जास्त आवडू लागतात ते. ९ आणि १० वा सीझन तर इतका बोअर झाला तेव्हा या दोघांचाच सहारा होता.
चँडलर आणि जोईचे नातेपण छान दाखवले आहे.

अजूनेक निरीक्षण म्हणजे या सहाजनांपेक्षा ते ज्यांना डेट करतात ते पाहुणे कलाकार नेहमीच जास्त हॉट दाखवले आहेत. आणि एक प्रकारचा पॅटर्न फिक्स झालेला याच्या कथानकाचा. नवीन कोणीतरी येतं, त्याची बाकीचे ५ जण टर उडवतात, आधी जोडीच सगळं छानछान चालू असतं मग अचानकच तो नविन व्यक्ती सायको/ whimsical निघतो....

एकदाची फ्रेंड्स बघायला घेतली! दहा वर्षांनी का होईना! काही वर्षांपूर्वी एक नोकरी संपली आणि पुढे काही मार्ग दिसत नव्हता तेव्हा लायब्ररीत जाऊन DVD आणल्या पण अगदी दुसऱ्या दिवशी आधी कधीतरी पेरून ठेवलेल्या interview चा result आला आणि मी परत बिझी झाले त्यामुळे तेव्हा बघायचे राहून गेले.
आता नेटफलिक्स वर बघते आहे. मला पण खूप आवडली आहे ही सिरीयल! आता सीजन 4 सुरू आहे. रोज 2-4 एपिसोड बघते.
इथल्या 2010 मधल्या पोस्ट्स वाचून मजा आली! Dvd, youtube वर एपिसोडस ते एका क्लिकवर हवे तेव्हा हवा तो एपिसोड बघण्याचे सुख (?) World has come a long way!

सगळे सीझन्स बघून मगच रयुनिवन बघणार!

या धाग्यासाठी धन्यवाद चंपक!

मी अजून ही चँडलर च्या (मॅथ्यु पेरी) च्या मृत्यु सदम्यातून बाहेर नाही आलेय..
चँडलर मोनिका साठी जे जे काय काय करतो, प्रोपोस करतो, तिच्या एक्स कडे जाऊन मीच भारी आहे, तू ट्राय पण करू नकोस हे स्टाईल मधे सांगतो , तिला इम्प्रेस्स करायला घर पण साफ करतो, ते पण मोनिका च्या स्टँडर्ड नुसार वगैरे ते मला फार फार भारी वाटतं. Sad आय मिस हिम.. इन रियल लाईफ टू! जेंव्हा सिचुएशन्स घडतात, तो काय बोलला असता त्याच्या सर्कास्टिक स्टाईल मधे ते इमॅजिन करायला आवडतं.

हा बाफ मला समहाऊ आठवत नाही. पूर्वी लिहीलेही असेल, लक्षात नाही.

आता सलग फार बघत नाही कारण सीन्स आणि संवाद पाठ झालेत पण अधूनमधून चालूच असते.

मध्यंतरी फ्रेण्ड्स आणि इतर आवडणार्‍या सिरीज मधले कॉमन कलाकार शोधायचा बराच प्रयत्न केला होता - .

वेस्ट विंग मधे ७-८ तरी आहेत - मॅथ्यू पेरीचा ३-४ भागांत गेस्ट रोल आहे. ब्रेकिंग बॅड व बेटर कॉल सॉल मधे किमान ३-४ आहेत. द ऑफिस मधेही किमान एक आहे.

Pages