Submitted by मृण्मयी on 17 May, 2010 - 12:07
रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तत्सम शाखांमधे होत असलेल्या संशोधनाविषयीच्या बातम्या, माहिती आणि त्या अनुषंगाने चर्चा करण्याची इच्छा असलेल्या मायबोलीकरांसाठी हा धागा उघडल्या जातो आहे.
उदा: 'दोन तोंडांचं आणि सव्वा पाच पायांचं वासरू जन्माला आलं' वर्तमानपत्रातल्या अशा बातम्यांपेक्षा असं वासरू जन्माला येण्यामागचं शास्त्रीय कारण सांगणारा लेख असेल तर त्याचा दुवा दिलेला जास्त योग्य.
http://www.plos.org/oa/index.php हा एक दुवा. इथे open access तत्त्वावर (फुकटात) peer reviewed journal papers वाचायला मिळतील.
ह्याच दुव्यावर चिकन गुनिया वर हे एक आर्टिकल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुव्याकरता धन्यवाद! तिथलं ए क
दुव्याकरता धन्यवाद!
तिथलं ए क अ क्ष र क ळे ल त र श प थ!
कृपया मायबोली मेन्सा मटेरियल सदस्यांना विचारा. तुम्हाला कळलं की आम्हाला ( मी + माझ्यासारखे इतर) सांगा.
Venus crossing the face of
Venus crossing the face of the Sun on June 5–6, 2012 ..... Don't miss next week's chance to see this, because you'll never have another chance in your lifetime.
उद्या रात्री Higgs सापडल्याची
उद्या रात्री Higgs सापडल्याची बातमी येणार का?
तुम्हाला कळलं की आम्हाला ( मी
तुम्हाला कळलं की आम्हाला ( मी + माझ्यासारखे इतर) सांगा.
+१
आपल्या डोक्याबाहेरच्या
आपल्या डोक्याबाहेरच्या गोष्टीत लक्ष घालु नये
येवढ्या भारी धाग्यावर दोन
येवढ्या भारी धाग्यावर दोन वर्षात फक्त ३५ पोस्ट्स?
अरे कुठे गेले ते विज्ञानप्रेमी अन्निसवाले? एरवी जिकडेतिकडे नाके खुपसत चालु धाग्याची वाट लावत अस्तात! इथे काय होते जरा भरीव सायन्सचे लिखाण करायला?
आता ना मी ना, या धाग्याची लिन्क सेव्ह करुन ठेवणार, अन अन्य धार्मिक वगैरे धाग्यावर कोणी अन्निसवाला येऊन उटपटान्ग लिहू लागला तर त्याला इकडे पाठवणार, जा म्हणाव, इकडे लिही काय लिहायचे विज्ञानवादी ते! नै का?
असो.
चान्गला धागा आहे.
सापडला हिग्ज बोझॉन एकदाचा!
सापडला हिग्ज बोझॉन एकदाचा!
बोझॉन आहे पण हिग्ज बोझॉन नाही
बोझॉन आहे पण हिग्ज बोझॉन नाही ना?
Search for Higgs boson at Large Hadron Collider reveals new particle:
http://www.fnal.gov/pub/presspass/press_releases/2012/Higgs-Search-LHC-2...
आशिष आणि इतर, कृपया समजावून सांगा.
उपलब्ध पुराव्यानुसार तो
उपलब्ध पुराव्यानुसार तो हिग्जच आहे असं वाटतय. १००% खात्री नाही कारण हा बोसॉन थेट न दिसता त्याच्या डिके प्रोसेसेस द्वारा दिसतो (थोडेफार रेडिओअॅक्टीव्हिटीमधे होते त्याप्रमाणे कमी वजनाच्या कणांमधे रुपांतर). डिके चॅनल्स अनेक आहेत. त्यातील नॉन-युनिफॉर्मिटी व हेवी बॉसॉन्सच्या थोड्याफार विचीत्र वागणुकीमुळे शोधण्याकरता अजुन बरेच उरले आहे हे लक्षात येते. थोडक्यात काय तर नवीन कण योग्य मास रेंज मधे आहे, आणि डिके पार्टीकल्स स्टँडर्ड मॉडेलच्या थेरीप्रमाणे सुयोग्य आहेत. पुरावा तंतोतंत जुळत नसल्यानेच कालची अनौंसमेण्ट 'हा घ्या हिग्ज, द्या आम्हाला नोबेल' अशी नव्हती.
>>हा घ्या हिग्ज, द्या आम्हाला
>>हा घ्या हिग्ज, द्या आम्हाला नोबेल'
येईल लौकरच.
http://www.openculture.com/20
http://www.openculture.com/2012/07/the_higgs_boson_and_its_discovery_exp...
It is a Higgs Boson but not
It is a Higgs Boson but not 'the' Higgs Boson!
पदार्थाला (कणांना) वस्तुमान
पदार्थाला (कणांना) वस्तुमान हिग्ज फिल्डने प्राप्त होते ना? बर्याच लेखात हिग्ज बोसॉनमुळे वस्तुमान मिळते असे वाचले. नक्की काय खरे आहे?
फिल्डमुळे वस्तुमान मिळते हे समजू शकते - जसे ग्रॅव्हिटेशनल फिल्डमुळे वजन मिळते तसेच. पण कणामुळे वस्तुमान कसे मिळू शकेल? का इथे पण फिल्ड आणि कण यांच्यामधली काही स्ट्रींग थेअरी आहे?
मस्त चर्चा आहे.
मस्त चर्चा आहे.
डार्क मॅटरकडेही थोडे लक्ष
डार्क मॅटरकडेही थोडे लक्ष द्या:
http://www.bostonherald.com/news/national/general/view/20120705dark_matt...
चिन्मय देवधरचा एक नवीन
चिन्मय देवधरचा एक नवीन शोध
http://epaper.dnaindia.com/epapermain.aspx?pgNo=4&edcode=820040&eddate=2...
'नासा' मराठवाड्यात, जगातील
'नासा' मराठवाड्यात, जगातील तिसरी लॅब हिंगोलीमध्ये
http://abpmajha.abplive.in/world/nasa-to-open-third-lab-in-hingoli-to-st...
बातमी खूपच गमतीदार आहे -
बातमी खूपच गमतीदार आहे - त्यात अनेक गोष्टींची खिचडी केली आहे.
अरे वा! असा धागा आहे हेच
अरे वा! असा धागा आहे हेच विसरले होते. आता काही वाचनात आलं तर इथेच चिकटवेन.
अॅडमिन, आता तुम्ही विज्ञान नावाचा ग्रूप तयार केला आहे तर हा धागा हलवणं योग्य ठरेल बहुतेक.
http://www.livemint.com/Polit
http://www.livemint.com/Politics/DGxBwHtZNKfslufGJJlXYJ/Scientists-impla...
स्वीडनमधल्या शास्त्रज्ञांनी वनस्पतीतील झायलेम चॅनेलमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट बसवून वनस्पतीतील केमिकल रिॲक्शनशी सांगड घालत वनस्पतींची वाढ अभ्यासण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. ह्या शास्त्रज्ञांनी हे तंत्र वापरून इलेक्ट्रॉनिक गुलाब निर्माण केला आहे.
हा एक माहितीपूर्ण व्हिडिओ
हा एक माहितीपूर्ण व्हिडिओ बघितला. भारतासारख्या देशात जिथे मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध आहे पण जागेची वानवा आहे त्यावर हा उपाय शोधला गेला आहे.
India's Solar Canals. Lateral thinking at its finest! : https://www.youtube.com/watch?v=Ix9LNZIbTpc
Pages