थोड्या आठवणी...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

हितगुजवर वाद हे नेहमीचेच. विशेषतः गुलमोहरवरील साहित्याचा दर्जा हा खास आवडीचा विषय... तिथल्या नुसत्याच साहित्याचाच नव्हे, तर तिथल्या अभिप्रायांचा दर्जा हा तर अधिकच जिव्हाळ्याचा (आणि जिव्हारीचा) विषय. त्यावर झालेल्या दोन जुन्या मोठ्या चर्चा अजूनही उपलब्ध आहेत. परवा तो विषय परत निघाला, मला परत त्या जुन्या चर्चा आठवल्या, वाचल्या, त्या निमित्ताने हे स्मृतीकांड.

मला जुने हितगुज, गुलमोहर आठवले म्हणजे ८-९ वर्षांपूर्वीचे. मी मायबोलीवर यायला लागलो ते मुख्यतः गुलमोहरमुळेच. तेव्हा कॉलेजात असल्याने कलेजा हा विषय जवळचा होता आतापेक्षाही, त्यामुळे कविता वाचण्याचा जास्त उत्साह असायचा मला. शिवाय माझा असा अंदाज आहे की गुलमोहर बहुधा सर्वात व्यस्त बाफ होता तेव्हा... निदान मीतरी बहुतेकवेळा गुलमोहरवरच यायचो वाचायला.

तेव्हा हितगुजवर, विशेषतः गुलमोहरवर नेमाने येणारे म्हणजे नेमाने लिहीणारे काही लोक नेहमीच आठवत राहतील. बेटी होती तेव्हा... मला आठवतय, तिच्या कविता वाचल्यावेळीच भावल्या होत्या... आवडल्या असं म्हणण्यापेक्षाही भावल्या असं म्हणेन. त्यात 'भिडण्याचा' भाव जास्त आहे. हळूहळू तिचं जबरदस्त वाचन, शब्दवैभव आणि एकंदरीतच झेप हे लक्षात आलं. ते एक वेगळंच रसायन होतं. ती कुठे गेली बरं ? जे लोक लिहीणं बंद झाल्याने माझं नुकसान झालं असं मला मनापासून वाटतं अशा लोकांमध्ये तिचा नंबर वरचा लागेल. पेशवा यायचा बर्‍यापैकी वेळा गुलमोहरवर. त्याच्या कविता आकळल्या कधीच नाहीत, पण त्यासुद्धा 'भावल्या' कॅटेगरीतल्या. तो लिहीतो का अजून ? बर्‍याच दिवसात त्याचं (साहित्य) काही वाचलं नाही... म्हणजे त्याने टाकलेही असेल गुलमोहरवर, मीच गेलो नाहीये खूप खूप दिवस. त्याची कविता आली की 'श्रीमंत, कळली नाही, पण मुजरा !!' अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया असायच्या. मग त्याचा आणि बेटीचा संवाद व्हायचा.... कविता जाऊच दे, तो संवादही मला कळायचा नाही. परागकण यायचा वाहत वाहत बर्‍याच वेळा... त्याच्या संकेतस्थळावर जाऊन त्याच्या कविता वाचायचो अधूनमधून. तो मात्र येतो अजूनही असं दिसतं... मध्यंतरी असच एकदा गुलमोहरवर गेलो होतो तेव्हा दिसला होता तिथे. त्याच्या कविता मला नैसर्गिक वाटतात, त्याच्या नावासारख्याच.

जबरदस्त अभ्यास असलेले आशिष चासकर, श्रीनि आठवतात. त्यांच्यामध्ये असलेली वैचारिक सुस्पष्टता आणि सुसुत्रता मी थोड्याच ठिकाणी पाहिली आहे. आशिषची समीक्षा/विश्लेषण असायचं... ते एक जबरदस्त काम होतं. त्याची विधाने चांगली टोकदार असायची कधीकधी. श्रीनि तेव्हा मायबोलीचा स्थायी झेनगुरू होता (zen master in residence). त्याच्या कथा उपलब्ध आहेत का अजून ? त्याने त्या बाफला लिहीलेली प्रस्तावना सुंदर होती... माझी झेन कोआनशी तिथेच ओळख झाली. खरच त्या बाफबद्दल विचारलं पाहिजे ऍडमिनना. अंतिम सत्याचा साक्षात्कार काय असो नसो, त्या कोआन मात्र आवडायच्या. तो दिसतो अजूनही, पण त्याला भन्ते कोणी म्हणत नाही आणि म्हणले तरी तो संदर्भ बहुतेकांना कळणारही नाही कदाचित. शिवाय असामी, मिलिंदा, शिल्पा, शमा, रार, rmd असायच्या... त्यांची खेचाखेची सुरू असायची नेहमी. शमा कविता करायची अस आठवतं. एक रानाजाधव म्हणूनही असायचे. तेही दिसत नाहीत आता. अज्जुका लिहायची कधीतरी सठीसहामाशी... मग तिने लिहील्यावर 'माते...' अशी साद घालत प्रतिक्रिया देणारा कोण बरं? बहुतेक मिलिंदा, असामी यांपैकी कोणीतरी. मग त्याला 'वत्सा, तुजप्रद कल्याण असो...' वगैरे आशीर्वादही मिळायचा अज्जुकाकडून. अरे हो... त्या 'कळत नकळत' मध्ये एकजण त्याच्या आईला 'माते' अशी हाक मारतो, ते पहिल्यांदा पाहून मला हेच आठवलं होतं. प्रसाद शिरगावकरच्या सुंदर गझला... भटांच्या 'रंग माझा वेगळा'च्या शेवटी गझलनियम सविस्तर दिले आहेत, ते एकदा समोर ठेऊन ते गुलमोहरवरच्या गझलांना तुंबड्यांसारखे लावून बघितलेलंही स्मरतय आता.

मायबोलीवर आल्यापासूनच ऍडमिनबद्दल तीव्र उत्सुकता होती. कोण आहेत, काय करतात इ.इ. कुतूहल. पण एक तर मी नवीनच होतो अन् ते कुतूहल भोचकपणाकडे झुकतय असं वाटत होतं, त्यामुळे कोणाला कसे विचारावे हेही कळत नव्हते. मग एकदा कुठल्यातरी पोस्टात त्यांच्या नावाचा उल्लेख होता, तिथून आणखी थोडी इ-भोचकगिरी करत त्यांच्याबद्दल माहिती काढली. फोटोही बघायला मिळाला... ते, त्यांच्या ऍडमिन आणि काही लोक भारतीय बैठकीत बसून कुठल्यातरी सांगितिक कार्यक्रमाची तयारी करत आहेत असा फोटो होता... सरवटे, किल्लेदार तेव्हा लिखित स्वरूपात दिसायचे. तांत्रिक प्रश्न आला की अनिलभाईंकडे धाव ठरलेली असायची. शिवाय बी, चंपक, वेल्डी वेलदोडा, वाकड्या, कलंदर, झक्की नागपुरी हेही असायचे नेहमी. त्यांचा एक gtp चालला असायचा... झक्की हे तेव्हाही आतासारखेच झक्की होते, वाकड्या म्हणजे नाव सार्थ करत असायचा. बीच्या कलेच्या पातळीला गेलेल्या malapropism ची सवय व्हायला वेळ लागला होता मला. तो वेल्डीही (एक सुगंधी नमुना) कुठे गायबला कोण जाणे ! यातले काहीजण नाही दिसत (वाकड्याचे काय झाले असावे याचा एक अंदाज आहे) किंवा ते ज्या बाफवर येत असतील तिथे माझे जाणे होत नाही असेही असेल. मध्यंतरी भाल्याला विचारलं की अरे तू एकदम गायबलास इथून... त्याच्याशी बोलल्यावर असं जाणवलं की इथे येणे हा एक विरंगुळा होय, पण हळूहळू विरंगुळ्याचे स्वरूप बदलू शकते. काही जणांसाठी हे स्वरूप बदलतं, काहींसाठी नाही. खासकरून संसारी व्याप मागे लागल्यावर हे जास्त लवकर होतं असं दिसतय. तेव्हा मला ऍडमिन आणि टीमची खरोखर कमाल वाटते. इतकी वर्षे हे काम स्वयंसेवक म्हणून सांभाळणे चेष्टा नाही.

यातल्या बहुतेकांना मी प्रत्यक्ष भेटलो नाहीये, प्रत्यक्ष तर दूरच राहिले, त्यांना माझे इ-मित्र म्हणण्याइतपतही माझा त्यांचा संपर्क नाही. जे काय दिसले, पाहिले ते इथे आणि फक्त इथेच. तरीपण लक्षात राहिले. इथे आलो तेव्हा दिसले की काही एक कारणाने आपल्याला पटेल, रुचेल अशा संवेदनशीलतेचे लोक इथे गोळा झाले आहेत. मतमतांतरे असणारच... त्या सगळ्याच्याही वर, नव्हे, त्या सगळ्याचा सामायिक छेद असलेली संवेदनशीलता मला इथे आकृष्ट करते. त्या सामायिकतेची खात्री असल्यामुळेच की काय, मला इथे भेटलेले लोक फक्त इथेच भेटत असले तरी पुरेसे भेटतात.

विषय: 
प्रकार: 

बी विषय भरकटतोय. आता थांबवा. जेंव्हा कुणि एखादे साहित्य त्यांच्या़कडे आहे असे म्हणतो तेंव्हा ती व्यक्ती, मागणार्‍या प्रत्येकाला द्यायला बांधील नाही. ज्या अर्थी तुम्ही मागूनही तुम्हाला हवे ते मिळत नाही याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मनात तुम्ही विश्वास संपादन केलेला नाही. आणि ज्या पद्धतीने तुम्ही जाहीर वाद घालत आहात त्यावरून तुमच्याबद्दल अजून चांगला विश्वास असणारेही लांब पळाले तर त्यात नवल नाही.

पुन्हा slarti यांच्या मूळ विषयाच्या प्रतिक्रियेकडे वळा.

आणि ज्या पद्धतीने तुम्ही जाहीर वाद घालत आहात त्यावरून तुमच्याबद्दल अजून चांगला विश्वास असणारेही लांब पळाले तर त्यात नवल नाही.>> महोदय, माझा विरोध फक्त ह्यालाच आहे की जर कुणाला नसेल साहित्य द्यायचे तर इथे जगभर हे सांगत बसू नका का की आमच्याकडे हे आहे नि ते आहे. जी लोकं इथे काड्या टाकता त्यांना तुम्ही का नाही बोलतं. आणि इथे मायबोलीवर आपण मान्यवर कविच्या कविता लिहितो ते अयोग्य की योग्य ज्याचाही कृपया खुलासा करा. म्हणजे पुढे भविष्यात ह्या विषयावर परत वाद होणार नाहीत.

अभिराम अंतरकर उर्फ सामुराई पुर्वी यायचे. येताना एक तरी कविता आणायचे. खूप सुंदर कविता करणार्‍यापैकी ते एक होते.
Catchme च्या कविता पण मला खूप आवडायच्यात.
ग्रेसच्या बीबीवर मुग्धाराणी आणि रॉबीनहूड ह्यांचे फार मोठे योगदान आहे.
किरु एक फार मोठी पुस्तकंप्रेमी व्यक्ती होती.
अनुदोन पण छाय लिहायची, खास करून पुस्तक परिक्षणावर.
डॉक्टर आशुतोष गद्य आणि पद्य बीबीवर छान लिहीत असतं. त्यांच्या कविता देखील वेगळ्या वळणाच्या असतं.
तिरकसची विडंबणे मला फार आवडायची. पण कुणी म्हणत असे ती व्यक्ती डुप्लिकेट आयडी आहे. काहीही असो, पण लिखाण छान करायचा तो. येताना तो नेहमी निळ्या अक्षरात इटालियन फोण्ट मधे लिहायचा.
दर्दी, वाटसरू पण चांगले साहित्यीक लिहायचे.
महेश वेलणकर शब्द्दार्थांच्या बीबीवर चांगले लिहायचे.
भ्म, विव्ज आणि कमेन्ट्सवर किती आणि किती लिहायचा. पण त्याचे विचार पटायचेत.
समस आणि समक दोघी जणी अजून आठवणीत आहे.
ऐमव्हीलंका अजून आठवणीत आहेत.

असो.. स्लार्टी तुमच्या स्फुटाची ही भरपाई म्हणून नामावली लिहिली आहे...

मला मायबोली माहीत पडली, तेव्हा देवनागरीत लिहिणे फारसे रुळले नव्हते (किंवा देवनागरीत लिहायची सोय तेव्हा होती की नाही ते आठवत नाही). पण तेव्हा, सायबर कॅफेच्या त्या एक-दोन तासासाठी भाड्याने आंतरजाल वापरायच्या काळात, आणि तिथल्या त्या विशिष्ट माहोलात मायबोलीवर रोमन लिपीत लिहिलेलं मराठी साहित्य, आणि विविध प्रकारच्या गप्पा वाचताना वेगळीच मजा यायची. कविता वगैरे मी फारशा वाचायचो नाही, पण हह चे रोमन लिपीतले कुजबुज, कारटा यांच्या रोमन लिपीतल्या कथा वाचायला फार छान वाटायचं. तेव्हा झक्की, दीप्ती वानखेडे, एस एम के, वगैरे मंडळी असायची.

ईथे एवढी गडबड झाली असेल असे मला स्व्पानातही वाटले नव्ह्ते मी फक्त तुझी सुरुवात वाचली आणी मला वाट्ले की माझ्याकडे इथे टाकण्यासारखे बरेच काही आहे म्हणून मी तुला हा बी बी पुन्हा उघडायला सांगीतला
tyaa baddal sorry, pan tuzya hya bb mule baryach junya athavani jagya zalya mee tyaweles fakt gulmohor madhil kavita hach bb jast wachyacho ani maayboli mulech mala kavitecha wachnache jast ved lagle hote tyatyala tyat peshwychya kavita ani hawa hawai che vinodi lekhan he khup bhari watyachya peshwycha tar kahi kavita mala itkya awdalya hotya kee tya apoaap tond path zalya hotya.
hawa hawai ne ekda eka lagna tharlelya mulicha ani tichya honarya bhavi paticha phone war kai sanwad hou shakto hyche likhan kele hote te mala etke bhari wattle hote kee mee tyachi print out kadhun mazhya mitrana wachun dakhwali hoti tya weles ani tyanna hi te titkech awdle hote.
RMD Beti,shama,peshwa,paragkan,satyajit ani ajun barech june member hanchya kahi awadlelya kavita mazhyakade hotya pan tyatylya kahi harwalya kahinchi mee cd banwun thevli hoti tee cd mee ethe lihinyasathi tin char diwas shodhli ani nantar baghitla tar bb cha band athavani hya mungyanchya warusaarkhya astata tyatun ek mungi baher padli kee apaop bakichya mungya tya mungichya mage rangeni baher padtatat so let it be
tyatlya tyat peshwychya baryacha sundar kavitanpaiki mala awadleli kavita ethe post kartoy hope so navin maaybolikarana nakkich awdel tasech बी , beti chya hi kahi kavita mazhyakade hotya tya bhetlya tar mee nakkich ethe post karel…. ....!
वेदाळलेल्या ओल्या फुलांचे
कसे सिंचलेस हे दिव्य प्रांगण
पदराआड घेतलेस निशब्द
ते आपुले गहीरे भांडण
.
नीरव संधीतही तमाचा
कोवळा श्वास फुलतोसा
डोळ्यामधला कवडसा दिव्यांचा
तुझ्या काजळाशी अड्खळतो का ?
.
तुझ्या अनाव्रुत शॅलीस
अर्पीले मी माझे तराणे
वादळाने गर्भतेच्या सावल्यांचे
तुझ्या उध्वस्त केले शामीयाने
.
कापराची नीज गेली
कोयन्ड्याची लाज
खोल देही तुझ्या द्रर्पणास
माझी भंगलेली काच
.
इथे ढीग करून गेली
शिशीर भरली जुनी शाळा
पावलात झगडा उगवता
मावळतीस फुटल्या वाटा
.
तुझ्या अंगणी चाफा
तुझी नागवेल पुराणी
कुठेतरी काळजात जाणतो मी
भटकणारी कसलीशी कहाणी

.
. . पेशवा
. . .

BETI URF SWATI KELKAR he nakki kaai rasayan hote he tichya khalil aoliwarun navin maaybolikarana nakkich lakshat aeil
.
bahyajagaatoon parat firataa yet nahee,
antaratmyaat shirataa yet nahee
.
Adhunik chakrawyuh
.
rat-racechee exothermic reaction
yasha-apayashache pungent buDabuDe
.
...mANoospaNAchA precipitate

मीही बेटीच्या कवितेचा एक मोठा पंखा आहे त्यामुळे नवीन मायबोलीकरांसाठी बेटीची एक नितांत सुंदर कवीता...!
.
हिशेब
.
निरवानिरवीच्या या पर्वात,
आपल्या नात्याचा ताळेबंद मांडून
सर्वांचे देणे मी चुकते केले....
.
तुझ्या वेगाशी जुळवून घेत,
फरफटताना, चुकून
पायदळी आलेल्या रानफुलाचे;
.
तुझ्या डोळ्यांत रात्र सजवताना
माझ्यासाठी निष्ठेने
तिष्ठ्णारया तारयांचे;
.
तुझ्यासोब्त बेभान भटकताना
उशीर्-रात्री आईच्या डोळ्यात
दाटलेल्या ढगांचे...
.
तुझ्या वग्बाणांपे़क्षा माझ्या
काळजीने विध्द जालेल्या
पहाडी काळजाचे...
.
तुझ्या भरवश्यावर
हसत हसत ठोकरलेल्या
माझ्या दुनियेचे...
.
विसंवादी सुर टाळताना
वाकून झुकून मोडलेल्या
माझ्या ताठ कण्याचे...
.
सगळ्या-सगळ्यांचे...
.
फक्त देवदाराच्या सा़क्षीने
आपण पाहीलेल्या स्वप्नांखेरीज...
.
त्याचे संदर्भ आता त्या
देवदाराकडेही नाहीत...
म्हणाला, " पहिल्याच पानगळीत
झडून गेले ते "
.
आता त्यांना तारण ठेवलेल्या
अवघ्या जन्माचे काय करावे,
हा खरा यक्ष-प्रश्न आहे ...
.
. . बेटी
. . .

मी पण २००१/२००२ च्या सुमारास "मैत्रेयी" या नावाने यायचे माय्बोली वर. तेव्हा मे अमेरिकेत होते. पण भारतात आल्यावर माझं येणं कमी होत होत बन्द झालं. आता मी अनघव्हीएन या नावाने येते. माझे तेव्हाचे प्रतिसाद्,लेख वगैरे बघायला मिळतिल का?
अनघा

अनघा, माझ्याकडे तरी जुना कुठलाच दस्तावेज नाही. या बाबतीत बहुधा ऍडमिन तुम्हाला मदत करू शकतील.

  • *** Intaxication: Euphoria after getting an income tax refund, which lasts until you realize that it was your money in the first place. ***

अहाहा, बेटीची काय सुंदर कविता दिलीय ही. धन्यवाद, मनातल्या उन्हात.
-प्रिन्सेस...

स्लार्टी, धन्यवाद! Happy

एकंदर पाहता जुन्या मायबोलीकरांनी ज्या काही थोड्या कविता / आठवणी इथं मांडल्या आहेत ते पहाता एकीकडे वाटत की मी फार मोठ्या साहित्यास मुकलो, पण जे काही जुनं थोडसं ह्या आठवणींतुन मिळालं ते ही काही कमी नव्हे!
ता. क.

स्लार्टी> तुम्ही ( की तु??) रागावलात का? प्रतिक्रिया नाही म्हणुन म्हणतोय! राग धरु नये! (ही खरी खुरी विनंती - Not in Puneri isstyle!)

दीपक
"You came into the world with nothing- anything you get after that is sheer profit."

I think this is the perfect one liner at this moment! Happy

कुलदीप, सर्व प्रतिक्रियांबद्दल इथेच एकगठ्ठा आभार मानतो Happy मी आताच सर्व प्रतिक्रिया पाहिल्या. बाकी, तुम्ही/तू यातले जे तुला सोयीचे वाटते ते Happy

    ***
    असेच काही द्यावे घ्यावे
    दिला एकदा ताजा मरवा
    देता घेता त्यात मिसळला
    गंध मनातील त्याहून हिरवा
    - इंदिरा

    इथे बेटीचा विषय निघालाय म्हणून सांगतो.. काही वर्षांपूर्वी आम्ही दुर्गाबाई भागवतांवर एक लघुपट तयार केला होता. आणि तेव्हा बेटीने आम्हाला भरघोस आर्थिक मदत केली होती. माझ्याच प्रयोगशाळेत पूर्वी त्या संशोधन करायच्या.. दोनेक वर्षांपूर्वीपर्यंत याहूवर आमचा संपर्क होता.. कदाचित बी काही मदत करू शकेल.. त्या अजूनही सिंगापूरात आहेत...

    स्लार्ती : मस्तच एकदम... परत एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिलास...

      असाच एक लेख मी मायबोलीच्या २००६ च्या स्पर्धेसाठी लिहिला होता.. त्याची आठवण झाली.

        ================
        आज झालो तुझी मी वदंता नवी
        कालची बातमी काल होती खरी

          शेवटी शेवटी खूप आल्या सरी

            -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

            वाह... जुन्या आठवणी ताज्या झाल्या... मलाही मायबोलीची ओऴख होवुन आता ८ वर्षे झाली .. टाइम् पास साठी सुरवात होवुन नाद कधि जडला कळलेच नाही...!! शिल्पा, मेधा, समीर, परागकन, असामी, ह ह, मिल्या, रन्गि, दीप्ति, अजुक्का, स्वप्णा..विकास्.. आसाम्या, माय्अबोलिवर किति जोड्या पण जमल्या रे ? Happy ...

            अरे, हे पाहीलंच नव्हतं अजून. मस्त आहे, आता मायबोलीवर उशीरा आल्याची चुटपुट लागेल. 'बेटी' यांच्या कवितांबद्दल वाचून खूपच उत्सुकता वाटत आहे त्या वाचायची.

            आयला.. हे मी वाचलच नव्हत... खरो खर जुने दिवस त्यत बेटी आणि पेशव्याच्या कविता.. कोणाकोणाची नाव घ्यावीत.. भारावलेले दिवस होते ते .. कीती दंगा मस्ती, आठवणी नुसत्या आठवणी 'एका लग्नाची गोष्ट ' वाचता वाचता माझी जिवनसखी देखिल मला मायबोलीनेच दीली. किती मित्र दिले... आय्रलंड मधील एका छोट्याश्या गावात जवळच कोणी नसताना मायबोलीवर आलो आणि मित्र भेटले, संवाद होउ लागला, भांडण तंटे, जी.टी.पी.. काय विचरु नका. फार जवळचे मित्र झाले. जी.टी.पी वर मझ्या किबोर्डचा f5 येवढ्या वेळा आदळला असेल.. माझ्याच काय कित्येकांच्या किबोर्डचा.. शेवटी जी.टी.पी ने श्वास सोडला आणि एक वादळ क्षमल... पण मनात ते सांर तसच आहे अगदी तो हितगुजचा उ.आय.... डोळे बंद केले की एका वेगळ्याच विश्वात घेउन जातो..
            हे सार वाचताना आठवताना सार अंग शहारुन गेल...

            उगाच भांडु नका रे... भांडायला बाकीच बी बी आहेतच की...
            त्यावेळी वेळी लिहिलेल्या कित्येक कविता आणि चारोळ्या तर माझ्या संघ्रही सुद्धा नाही आहेत.. त्या मिळु शकतात का?

            त्या सगळ्य जुन्या नव्या मित्रानां शोधुने एक मैफील जमायलाच हवी... नाही का...? स्लार्टी एक नविन विभाग उघडुया... एक स्नेहसंमेलन व्हायलाच हव...

            स्लार्टी, मिल्या, महेश खुप खुप आभार...

            आज पार्ल्यात मायबोली सोडण्याविषयि चर्चा चाल्ली होती. त्या अनुषंगाने मला आठवलेले

            कार्ट्याने मायबोलीवर पहिली कादंबरी लिहिली होती ( अन शिवाय बर्‍याच गोष्टी देखील )
            जगनबुवा कविता करायचे मस्त . त्यांनी चांगदेव चतुष्टय चा टण्यापेक्षा जास्ती प्रचार केला असेल .
            आर एम डी कविता करायची अन शब्दार्थ / व्युत्पत्ती बीबी एकटीने चालवत असे

            काकासोंनी कितीतरी कविता पोस्टल्या होत्या - अगदी शुद्ध. शिवाजी किंवा डेव२ टॅग वापरून शुध्द मराठी लिहिणं किती किचकट हे ज्यांनी लिहिलंय त्यांनाच माहिती ! ( प्रीव्ह्यु विंडो च्याही आधीची गोष्ट बरंका . प्रीव्ह्यू मला वाटतं २००१-२००२ पासुन आहे.

            इथले कोणी जर यांना ओळखत असाल तर कानाला धरुन घेउन या परत...

            मी इतकी वर्षे झोपा काढत होते का असा प्रश्न मला हा लेख आणि त्या खालच्या प्रतिक्रिया वाचून पडला.
            पण मायबोली इतकी जुनी आहे. फार तर पाच वर्ष आधी येऊ शकले असते मी. त्या आधी शक्य वाटत नाही. बेटी च्या कविता वाचायची खूप म्हणजे खूप उत्सुकता वाटतेय. आणि बर्‍याच लोकांचं अजून बरंच काही .... खूप काही निसटून गेल्याची जाणीव अस्वस्थ करतेय.
            You can't step into the same river twice ... आणि इथे तर वाहतं पाणी एव्हाना समुद्रालाही मिळालंय.

            सुरेख माहिती, चर्चा, कविता, आठवणी...... हे जुनं साहित्य संग्रही असेल तर ते पुन्हा नव्या मायबोलीकरांना वाचायला नक्की आवडेल! माझी अ‍ॅडमिनना ह्याबाबतीत विनंती! Happy

            Pages