Submitted by हर्ट on 16 May, 2010 - 05:33
मी जेंव्हा केंव्हा भारतात परत जायचा विचार करतो तेंव्हा आणि तेंव्हा मला हाच प्रश्न भेडसावतो की नक्की आपण कुठे स्थित व्हायचे. कारण छोट्या शहरात नोकर्या मिळत नाही. आपल्याला हवी असलेली जीवनशैली लाभत नाही, आपल्या भविष्याचा विकास होत नाही, आपण मेहनतीने घेतलेल्या शिक्षणाचे चीज होत नाही! मग प्रश्न पडतो --- आपण मुंबईत की पुण्यात की दिल्लीत की बंगलोर की आणखी कुठल्या तरी मोठ्या शहरात स्तित व्हावे. मला इथे लहान शहरातून पुढे आलेल्या मुलामुलांची मते वाचायला आवडतील की त्यांना भविष्यात कुठे स्थिर व्हायचा आवडेल? आणि का? त्यांच्याचं शहरात का नाही... म्हणजे जेथून ती आलेली आहेत? धन्यवाद!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बी, मेहनतीने घेतलेल्या
बी,
मेहनतीने घेतलेल्या शिक्षणाचं चीज अगदी घरबसल्याही करता येतं, कसं ते तू "संयुक्ता सर्वे रिपोर्ट: नोकरी" वरच्या लोकांना विचार ( मी लिंक पाठवली होती नं..)
त्यामुळे कुठे रहावे हा काही इतका मोठा प्रश्न उरत नाही
माझ्यापुरतं विचारशील तर मला आणी नवर्यालाही नागपूरलाच सेटल व्हायची फार इच्छा आहे. पण सध्यातरी नोकरीत हव्या तशा संधी नसल्याने आणी घरात बसणे पटत व परवडत नसल्याने जगाच्या पाठीवर कुठेही (जिथे दोघांनाही हव्या तश्या संधी व lifestyle मिळतील) तिथे जाणार.
मुम्बइला हवामान बेक्कार, त्यात ट्रफिक, पोल्युशन, लोकल, कार चालवणे कठीण, अंतरं फार, घरांच्या किमती/भाडे प्रचंड.. असल्या कटकटी आम्हा अस्सल नागपूरी लोकांना वैताग आणतात पण opportunities are unlimited!! कुठल्याही क्षेत्रात!! त्यामुळे जर वरील गोश्टी सहन होत असतील तर मुंबै बेस्ट!
दिल्ली असुरक्षित म्हणतात. अनुभव नाही.
कोलकाता..आहा..कसली ती घामट चिकचिक, कसल्या त्या ट्राम्स, सगळीकडे माशांचा नि मोहरीच्या तेलाचा वास पसरलेला, प्रचंड आणि अव्यवस्थित ट्राफिक (२ किमी जायला कधीकधी ममतादिंच्या/प्रोनोबबाबुंच्या समर्थकांमुळे २ तास ही लागू शकतात) आणी प्रचंड अंतरे.. बास्स झालं कोलकाता आता!! संधी ही त्यामानाने कमी!
आणी चेन्नै हे तर मुंबैचाच त्रास त्यात वर भाषेचा आणि पाण्याचा प्रश्न!! पाणी नाही बर्याच भागात!
सो, माझ्या elimination process ने राहिलेले पर्याय म्हणजे पुणे, हैद्राबाद, बंगलोर, त्रिवेंद्रम (फार सुंदर)!! मला तरी सगळेच सधारण एक्सारखे वाटतात., संधी आणि lifestyle च्या बाबतीत.त्रिवेंद्रम मस्त आहे, पण अजून सगळ्या कंपन्या नाहीत तिथे
गर्दी मुळे मुंबई - पुणे
गर्दी मुळे मुंबई - पुणे टाळेलच. आपल्या ४ डोक्यांचा मर्यादित सुविधांवर ताण कशाला ? भारतात ४ महा-महानगरांवर प्रमाणा पेक्षा जास्त ताण पडलेलाच आहे. मला स्वत: ला लहान गावात जायला आवडेल.