बांधकाम पुर्ण होण्याआधी घरात करून घ्यावयाचे बदल..

Submitted by दक्षिणा on 5 May, 2010 - 06:28

माझं घर सध्या under construction आहे. पण स्लॅब्स पुर्ण होण्याआधी घरात आधीच कोणते बदल करून घ्यावेत या विषयी मदत हवी आहे. म्हणजे त्याप्रमाणे करून घेईन.
उदा. एकीने सांगितलं की बाल्कनीच्या दरवाज्याला आतून ३ पट्ट्या अगोदरंच बसवून घे, कारण नंतर डासाची जाळी लावायची असेल आणि पट्ट्या २ च असतील तर पंचाईत होते.

तुम्हाला तुमच्या घरात कोणत्या फॅसिलिटीज आधीच करून घेतल्या असत्या तर बरं
झालं असतं असं वाटतं ते सुचवा कृपया..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुख्य म्हणजे बिल्डरने दिलेल्या स्पेसिफिकेशन्स्पेक्षा तो बदल करून देतो का? नाही. नाही बहुतेक. त्यामुळे जे गोष्ती मूळ ऑफर्ड स्पेसिफिकेशनपेक्षा वेगळ्या /जादा आह्ते त्याता खर्च स्वतंत्र करावा लागेल. उदा . लाकडी दरवाजांऐवजी फायबर दरवाजे करताना फायबर दरवाजांचा खर्च सगळा स्वतःला करावा लागेल. त्यात वजावट काही नाही. जास्तीचे नळ, टाक्या, विजेचे पॉइन्ट्स हे बिल्डर देत नाहीत एक तर ते खाजगी रीत्या करावे लागतात. ज्यात मूल स्ट्रक्चर अथवा प्लॅन मध्ये बदल होतो त्याचे बदल मनपाकडून अ‍ॅप्रूव्ह करून घ्यावे लागतात. (भिन्ती सरकवने वगैरे...)

त्यामुळे वरील प्रत्येक सूचना म्हनजे स्वखर्चाचा स्वतंत्र आयटेम आहे हे लक्षात ठेव आणि लिम्ब्याला प्लान दाखवू नकोस.. Proud

छान माहिती जमा होतेय.
अजुन एक्..प्रत्येक खोलीत,विशेषतः बेडरूम मध्ये सामान कसे ठेवणार याचा साधारण अंदाज घेऊन मग लाइट्-फॅन ची जागा ठरव. नाहीतर कपाटाला लागुन असलेल्या भिंतीवर लाइट (म्हणजे खोलीत अंधुक प्रकाश, वाचणे शक्य नाही) , झोपल्यावर आपल्या डोक्यावर फिरायच्या ऐवजी एका कोपर्यात फिरणारा पंखा इ. फार वैताग देतात. आणि नंतर बदलताही येत नाहीत.
एसी /कुलर/इन्वर्टर/गॅलरीतील रोषणाई साठी पण जागा ठरवून त्याप्रमाणे पॉवर पॉइंट बसवून घेणे.यासाठी गॅलरीत पॉइंट असणे उपयोगी पडते.
शिवाय लिविंग रूम मध्ये टिवी, केबल्/टाटा स्काय, इंटरनेट व लॅपटॉप (ऑप्शनल) इतके तरी पॉइंट्स लागतातच.

प्लॅटफॉर्म >> स्कर्टींग म्हणायचे आहे का Uhoh

मला तरी वाटते फर्नीचर जमिनीला चिटकुन नसावे.. माझे सध्याचे चिटकुन आहे.. खाली कचरा जातो बारीक फटीतुन . आणि महत्वाचे म्हणजे फर्शी बदलायची असेल ( फुटली / खराब दिसते) तर प्रॉबलेम Sad

कुनाला असे जमीनीपासुन ठोडे अंतर ठेउन फर्नीचरचा अनुभव असेल तर प्लीज लिहा ना Happy

>>> लिम्ब्याला वास्तुशास्त्रज्ञ म्हणायचे असेल. <<<<<
होच मुळी, पण पुन्हा शास्त्र/सायन्स की नाही वगैरे वाद सुरू व्हायचे
म्हणून मी आपल होराविशारद सारख वास्तुविशारद अस ठरवुन टाकल! काय बिघडल? Wink

अन तू जितक्या जास्त वेळेस सान्गशिल की लिम्ब्याला प्लॅन दाखवु नकोस, तितक्याच जास्त तीव्रतेने प्लॅन दाखविण्याची इच्छा तिच्या (तिच्याच का? कोणाच्याही) मनात तयार होईल हे निश्चित! Proud
बायदिवे, तू कधी बान्धणार घर? Wink

इलेक्ट्रिकल पॉईन्ट्स सगळ्या खोल्यांनधून भरपूर करून घ्यावेत - पलंगापाशी झोपताना दिवा पंखा बंद करायची सोय हवी. बेडरूम मधे सुद्धा टी व्ही / डी व्हीडी साठी पॉईन्ट्स करुन घ्यावेत. सगळी विजेची उपकरणे मोजून त्यापेक्षा ४-८ जास्त पॉईन्ट्स घ्यावेत. सेल फोनचा चार्जर , डीएस चा चार्जर ,वी चा चार्जर अश्या गोष्टी वाढत जातात.

किचन मधे गॅस, सिन्क अन फ्रीज हे एका त्रिकोणात हवेत ( अन मधे काही नको ) .

घराला सेक्युरिटी दरवाजा असावाच.

दक्षे बर केलस हा धागा उघडलास ते.
तु जात्यात आहेस तर आम्ही सुपात.
आम्हीही शहाणे होइन (कदाचित ?)

आधी बिल्डरने काय देण्याच फिक्स केलय ते बघ.
जनरली बिल्डर वॉशिंग मशिनसाठी पाण्याचे इन आणि आउट देतो. (बाथरुम आणि टॉयलेटच्या जवळ कुठेतरी)
तुला वेगळीकडे हवे असतील आणि त्यासाठी वेगळी पाइप (प्लंबिंग() टाकावी लागणार असेल तर त्याचा खर्च तो तुझ्याकडुन घेइल.
एलिक्ट्रिकल पाँइंटस बिल्डरने आधीच ठरवलेल्या ठिकाणी देइल. वेगळ्या ठिकाणी अजुन काही पॉइंट्स हवे असतील तर आधीच सांगाव लागेल. (ह्याची गरज लागेलच अस नाही. पण वॉशिंग मशीन आणि इलेक्ट्रिकल पॉइंट्स हे आधीच बघुन कन्फर्म कर. नंतर हे काम करण्याची झंझट जास्त आहे.)
किचनमध्ये वर लिन्टेन (लॅन्टेन) बिल्डर बाय डिफॉल्ट देणार आहे का बघ. तो हवा असेल तर त्याचे चार्जेस बिल्डर लावेल. (माझ्या मित्राने त्या लिंटेनचे चार्जेस जास्त पडत होते म्हणुन फर्निचर करतानाच वर कपाट टाइप बनवुन घेतलय. त्यात त्याचे बरेच पैसे वाचले. लोड कॅरींग कपॅसिटी ५०० किलो साधारण)
किचन कट्टा बिल्डर एका टाइअपचा देणार असतोच. त्यालाच यु करुन हवा असेल तर बिल्डरला चार्जेस देवुन अ‍ॅड करावा लागेल.

घरातील एका जागी किंवा बेडरूम मधील कोपर्‍यात, जिथे फोन असणार तिथे होम ऑफिस सारखी सोय करावी. लॅप्टॉप, फोन, छोटा प्रिंटर आय्पॉड डॉक वगैरे बसवावे. व त्यासाठीचे इले. पॉइंट बसवावेत. रूटर असल्याने सारे घर वाय्फाय झोन होते. ते लै बरे पड्ते.
किचन मध्ये मायक्रोवेव व मिक्सर साठी दोन वेगळे पॉइंट असावेत.
देवघर कुठे ठेवायचे ते नीट विचारून कर. पण कर. घराच्या मेन एंटरन्सच्या वर आत घरात बघेल अशी गणेशाची टाइल बसवावी. म्हणजे बाप्पाचे सर्व ठिकाणी लक्ष राहते.
टीवी साठी बल्की कॅबिनेट घेऊ नको त्याने जागा अड्ते. पतला मॉनिटर साइज चा टीवी असला तर तो भिंतीवर नीट बसतो.

घराच्या सुरक्षिततेचा नीट विचार करावा म्हण्जे पीपिन्ग आय, ती चेन , चांगले लॉक वगैरे असावे.
जुन्या प्रकारचे फ्युज घेऊ नको एम्पीएस बी का काय ते नवे घे. बाल्कनीत झूला लावायला हुक बसवून
घेता येइल. तसेच कुंड्या टांगायला हूक्स व सोय करता येईल.

आणी झूला आणी तो टांगायचा हुक चांगला भक्कम घे... Proud
जोक्स अपार्ट.. सर्व जण तुला खूप छान आणी उपयोगी गोष्टी सुचवतायत इथे..
आय म सो हॅप्पी फॉर यू ..मलाही तुझं घर पाहायची उत्सुकता लागून राहिलीये..
if possible ओळखीच्या इंटिरियर डेकोरेटर ला दाखव घर..म्हणजे तो काही सुचवू शकेल जे तुला मला कदाचित नाही सुचणार.. शक्यतो खोदाखोदीची कामं बांधकाम पूर्ण व्ह्यायच्या आतच कर..मागाहून प्रचंड त्रासाचं आणी खर्चिक काम आहे हे.. बाथरूम मधे जर टॉयलेट सीट आणी शॉवर च्या मधे जरा उंच पार्टिशन केलस आणी वरून खालपर्यंत शॉवर कर्टन्स सोडले तर शॉवर घेतांना संपूर्ण बाथरूम ओलं होत नाही. नाहीतर आजकाल रेडीमेड shower enclosure मिळतात. ते चेक कर. तसेच रेडीमेड किचन्स ही तयार मिळतात.. जागेप्रमाणे फिट होणारी डिझाइन्स असतात. बहुतेक भारतात पण ही कॉन्सेप्ट आलीये

स्लॅबच्या आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे टॉयलेट्स मधले पाईप्स आणि ईलेक्ट्रीकल कनेक्शन्स...
कारण त्यात बदल करायला नंतर लई कटकट होते... टॉयलेट मधे टब/ शॉवर, बेसिन आणि कमोड ह्यांची जागा तसेच दार कुठे हवय हे आधी पक्क ठरवून त्याप्रमाणे सुचना देणं बरं पडतं.. त्यासाठी प्लॅन आधी एखाद्या ओळखीच्या डेकोरेटरला वगैरे प्लॅन दाखवून त्याच्याकडून इनपुट्स घ्यावे.. खूप मदत होते.
टिव्ही/केबल, फोन ह्यांच्या संभाव्य जागा ठरवून त्यानुसार काही बदल करायचे आहेत का ते पण पहावं..

दक्शे हे सगळे तुझं दिवाळं काढण्याच्या मागे आहेत.दिगदर्शक जसे निर्मात्याच्या पैशावर प्रयोग करतो आणि त्याला गाळात घालतो तसे चालले आहे हे सगळे....

दक्शे हे सगळे तुझं दिवाळं काढण्याच्या मागे आहेत.>> हे सगळे सुचवतायत फक्त!

जे हवं ते तू निवडू शकतेस दक्ष राहून. Happy

कार्पेट एरिया किती आहे? त्यानुसार सोई सुविधा सुचवता येतील.

१) भारतीय बैठक करायची असेल तर ..गॅलरीत / दुस र्‍या कुठल्याही मोकळ्या जागी लादी -सिंमेटची बैठक करून घेऊ शकतेस.

२)पार्किंगची सोय आहे की नाही?

घर बांधून वास्तु शांती होईपर्यंत नात्यातल्या किंवा ओळखीतल्या एकाही हौशी वास्तु वाल्याला खबर लागू देऊ नकोस. माझे घर बांधताना चुलत बहिणिच्या भावी पतीराजांनी बरीच पाडापाडी केली. भिडस्त स्वभावामुळे बाबा काही बोलु शकले नाहीत.

>>जागी लादी -सिंमेटची बैठक करून घेऊ शकतेस.
नको करूस... ती तुला तशीही बॉक्स गादी आणि त्याखाली १ लाकडी प्लॅटफॉर्म घेऊन करता येते... फिक्स असलेले केले की नंतर पंचाईत होते...

>>बरीच पाडापाडी
ते आपल्यावर असायला हवे ना... तसेही सध्या मी ऐकले आहे की पाडापाडी न करताही करता येते म्हणे.. जाऊ दे तो विषय वेगळा आहे.. स्वत:ला पटेल तसे करावे

>>विशाल ने सांगितल्याप्रमाणे वॉशिंग मशीन साठी काहीतरी सोय कर.. बाथरूम समोरच्या जागेत ठेवला तर सहसा अडचण होते नंतर.. [अर्थात समोर किती जागा आहे त्यावर]

गॅस गिझर साठी सोय आहे का पहा नसेल तर कर...

मॉड्यूलर किचन नंतर पण करता येते..
कोणीतरी लिहल्याप्रमाणे इलेक्ट्रीक पॉईंट्स नीट प्लॅन करून ठरव...
जसे हॉल मध्ये टिव्ही, vcr/dvd player, few extra points for utility like charger etc आणि हे सगळे हवे तर २ ठिकाणी कर.. in case TV etc ची जागा नंतर चेंज करायची असेल तर

किचन मध्ये, refrigerator, microwave, grinder/food processor and some extra utility points..

steel/iron safety doors देणार आहे का पहा बिल्डर..ते नंतरही करता येतील म्हणा...

>> नंतर डासाची जाळी लावायची असेल
तुझा बिल्डर सगळ्या खिडक्याना ३ स्लॉट्स देतो आहे का? नसेल तर तसली जाळी सगळ्या खिडक्याना पण कर...

दक्षे, कपडे वाळत घालायची सोय काय आहे?
नसेल तर ग्यालरीत वर दोरे टान्गते ठेवायची सोय अस्ते, ती प्रत्येक दोर स्वतत्न्र अशी घे, एकदम चार किन्वा पाच दोरान्ची फ्रेम टान्गतात, पण ती खाली उतरवणे-चढवणे यात वजनाने चाके बाद होतात, शिवाय पाची दोर एकाच फ्रेमला असल्याने अन्तर जास्त अस्ते दोन दोरातील, ऐवजी, एकेक दोर चढवणे उतरवने असे केले तर जवळ जवळ लावता येतात, एखादी पुली खराब झाली तरी बाकी दोर शिल्लक अस्तात! Happy

स्टोअरेजची काय सोय आहे? जास्तीची भांडी, गाद्या प्रवासाच्या ब्यागा खेळणी वगैरे ठेवण्यासाठी माळ्यावर वगैरे
बंद स्टोअरेजची सोय करून घे.
तसेच काचेची भांडी/ ग्लासेस डिनर सेट साठी एक शोकेस कम सर्विन्ग काउंटर असे डायनिन्ग स्पेस च्या जवळ असले तर बरे पड्ते.

सगळ्यांना मनापासून धन्यवाद.. Happy
खरंच खूप उपयोगी माहीती दिलीत सर्वांनी.
माझं घर १०व्या मजल्यावर आहे आणि एकदम छोटंसं आहे. आत्ताशी ७व्या स्लॅबचे काम सुरू होणार आहे, त्यामुळे काही चिंता नाही. जे जे बदल हवेत त्याची लिस्ट करून बिल्डरला देईन आणि खर्च किती येईल ते ही विचारून घेईन. फार खर्च होत असेल तर सेकंड प्रायॉरिटीच्या गोष्टी रद्द कराव्या लागतील, पण किचन आणि इलेक्ट्रिकल गोष्टींमध्ये
कॉम्प्रमाई़ज करून चालणारच नाही.

डीजायनर लाईट्स लावणार असाल तर त्याप्रमाणे लाईटचे पॉईंट्स आताच करुन घ्या. नंतर फारच कटकट होते.. प्लस, बेडरुम मध्ये लाईट व फॅनचा टु वे स्विच साठी एक्स्ट्रा वायरिंग.

वा मस्त धागा आहे....
प्रकाश योजना कशी आहे...
नुसत्या लाइट्स का फॉल्स सिलींग मध्ये स्पेशल अशा पण लावता येतात...
कधीतरे संध्याकाळी लावता येतात.. मस्त फिल येतो...
Happy

एकदम छोटसं ? सगळ्यांच्या सूचना तर लालूचे घर असावे एव्ढ्या होत्या. किमान ४ बी एच के इतक्या तरी सूचना असाव्यात.

यावरून एक आठवले आमच्या एका फटकळ मित्राने घर बांधले. बघायला माणसे आली की काहीतरी अशाच सूचना करीत. उदा:- भिंतीला स्कर्टिंग करायला पाहिजे . सुन्दर दिसते ते. त्यावर . मित्र हो ना मला ते कळत नाही म्हणून केलेले नव्ह्ते . त्याला १०० रु.रनिंग फूट खर्च येतो. दीड लाख रु. ठेवा आत्ताच्या आत्ता. उद्या सकाळीच काम सुरू करतो. असे प्रत्येक सूचनेच्या बाबतीत चाले Proud

ए गप्पे tonagyaa! तू तसाच अन तुझा मित्रही तसाच! Proud Lol
बायदिवे, मला लिम्बीच्या शेतात एक झोपड उभ करायच आहे, काही अनुभवसिद्ध सूचना?

दक्षे, अभिनंदन Happy
मी आधी बघितलाच नव्हता हा धागा.
सगळ्यांच्या आगाऊ (अ‍ॅडव्हान्स Proud ) सुचना उत्तम आहेत.
याशिवाय काही गोष्टी...
- जमल्यास किचनसिंक खाली टाईल्स लाऊन घे आणि बंधारा घालुन घे. आणि एक ड्रेन ची जाळी (पाणी वाहुन जायला) लावुन घे. यामुळे कधी सिंक तुंबले, पाणी साचले तर साफ करणे सोप्पे जाते.
- किचनमधे कचरापेटी कुठे ठेवणार आहेस ते आधीच ठरवुन ठेव. ऑट्याखाली ठेवणार असशिल तर त्या जागी दरवाज्याला जाळी लावुन घे. यामुळे आत उबट्/कुबट वास रहात नाही.
- किचनमधे शक्य असेल तर एक छोटा वॉटर गिझर्/बोयलर आणि त्याला कनेच्टेड एक्स्ट्रा नळ (शक्य असेल तर मिक्सर टॅप) लावुन घे. ओशट भांडी वगैरे धुवयला हे गरम पाणी वापरता येते. खुप उपयोग होतो.
- शक्य असेल तर सोलर वॉटर हिटर लावुन घे.
- बेडरुम, लिव्हिंगरुम मधे एसी/स्प्लिट युनिट लावणार असशिल तर त्याची सोय अत्ताच करुन ठेव. पॉवर पॉईंट्स, इन्स्टॉलेशन साठी काय लागत असेल तर चौकशी करुन ठेव.
- किचन मधे सिंक, फ्रिज आणि गॅस यांच्या जागा अश्या असाव्यात की जेवण करताना काही हवे असल्यास पटकन इकडुन तिकडे घेता,ठेवता यायला पाहिजे. वर कोणीतरी म्हंटलय त्याप्रमाणे त्रिकोण असावा पण जागा नसेल तर या गोष्ती निदान हाताच्या अंतरांवर असाव्यात.

अजुन आठवेल तसे लिहीनच.

ऑल द बेस्ट.

माझं घर १०व्या मजल्यावर आहे आणि एकदम छोटंसं आहे. >> एवढ्या उंचीवर डास शक्यतो होत नाहीत. त्यामुळं डासाची जाळी वगैरे लावावी लागणार नाही.
बांधकाम पूर्ण व्हायच्या आधी करायच्या बदलात फ्लोअरिंग, किचन कट्टा, बाथरूम आणि इलेक्ट्रीक पॉइंट्स या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. बाथरूम मध्ये वॉल माउंटेड कमोड बसवायचा असेल आणि बिल्डर फ्लोअर माउंटेड देत असेल तर त्याला आधीच सांगा. शॉवर पॅनेल बसवायचे असेल तरीपण आधी सांगावे लागेल.
घरातील खिडक्या जर अ‍ॅल्युमिनिअमच्या असतील तर त्या पाउडर कोटेड करून घ्या.
माझ्या मते घराच्या स्ट्रक्चर मध्ये फारसे बदल करून घेउ नयेत (भिंत कमी जास्त करणे, बाल्कनी आत घेणे, टेरेस वर धुणं-भांडी साठी सोय करून घेणे इ.). बिल्डर आणि आर्किटेक्टनं काही विचार करून घराचे डिझाइन बनवलेले असते त्यात फार बदल करून घेतले तर नंतर त्रास व्हायची शक्यता असते. मी घरात बांधकामाच्यावेळी काही बदल करून घेतले होते पण आता फर्निचर करताना लक्षात आले की बिल्डरने जे दिले होते तेच बरोबर होते. त्यामुळे ते बदल अजून खर्च करून रोलबॅक करावे लागले.

कपडे वाळत घालायची पुली, किचन ट्रॉलीज, किचन मधले शो केस या गोष्टी बिल्डर कडून करून घेण्यापेक्षा नंतर फर्निचर करताना करून घेता येतात (बिल्डर फर्निचर देत नाहिये असं गॄहित धरून). शिवाय या गोष्टी बांधकामानंतर येतात. Happy

Pages