बांधकाम पुर्ण होण्याआधी घरात करून घ्यावयाचे बदल..

Submitted by दक्षिणा on 5 May, 2010 - 06:28

माझं घर सध्या under construction आहे. पण स्लॅब्स पुर्ण होण्याआधी घरात आधीच कोणते बदल करून घ्यावेत या विषयी मदत हवी आहे. म्हणजे त्याप्रमाणे करून घेईन.
उदा. एकीने सांगितलं की बाल्कनीच्या दरवाज्याला आतून ३ पट्ट्या अगोदरंच बसवून घे, कारण नंतर डासाची जाळी लावायची असेल आणि पट्ट्या २ च असतील तर पंचाईत होते.

तुम्हाला तुमच्या घरात कोणत्या फॅसिलिटीज आधीच करून घेतल्या असत्या तर बरं
झालं असतं असं वाटतं ते सुचवा कृपया..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉशिंग मशीन साठी नळाची सोय, अ‍ॅक्वागार्ड साठी नळाची सोय
किचनला ट्रॉलीज करणार असशील तर त्या दृष्टीने सोय.
आणि अजून तुला ज्या काही गोष्टी तुझ्या घरात हव्या वाटतायत त्या दृष्टीने सोयींचा विचार करून घे.
काही प्रत्यक्ष मदत हवी असल्यास सांग.

दक्षे स्लॅब्स पुर्ण झाल्यावर करायच्या काही गोष्टी आहेत ह्या..
एकतर किचनचा ओटा. तुला कसा हवाय म्हणजे L शेप किंवा सरळ एकाच ओळीत.
टॉयलेट, बाथरुममध्ये काही चेंजेस किंवा काही अ‍ॅडिशन्स. जसं बाथरुममध्ये एका कोपर्‍यात छोटासा कडप्पा लावुन घे. म्हणजे साबण, शॅम्पु सगळं त्यावरच राहील. जसं जसं आठवत जाईल तसं लिहीनच. Happy

मस्त केले हा धागा काठला ते.. मला हवीच होती माहिती Happy

ओटा : तुम्हाला हव्या त्या आकाराचा साइझचा आधीच करुन घ्यावा. जर लवकरच ट्रॉली करणार असाल तर खालील कडप्पा लावायला सांगु नये.

बाथरुम : हवे असल्यास बाथरुमच्या कॉर्नरला कड्डाप्पा / मार्बल (सामान ठेवायला उपयोगी पडते)

टाइल्स : वॉश बेसीनच्या खाली जमिनी पर्यंत , ओट्याच्या वर ( आपल्या आवडीप्रमाने)

दक्षे, अभिनन्दन Happy
बायदिवे, (माझ्यासारख्या) तज्ञ वास्तुविशारदाला प्लॅन दाखवला आहे का? नसेल तर दाखव!
(आता यावरुन अंनिस वाल्याची पेटापेटी होणार! Proud )

किचनमध्ये वरती ३ फुट जागा सोडुन कडप्पा लावुन घे, म्हणजे स्टोरेज करायला मोठे डबे वापरणार असशील तर ते तिथे ठेवता येतील.

दक्षे,टॉयलेट्सच्या दरवाज्यांच्या फ्रेम्स मार्बल किंवा ग्रॅनाईटच्या करुन घे. बिल्डर देतो त्या लाकडाच्या फ्रेम्स पाण्यामुळे लवकर खराब होतात. टॉयलेटसचे दरवाजे सुद्धा फायबर ग्लासचे करुन घे.

किचनला ट्रॉलीज करणार असशील तर त्या दृष्टीने सोय.
>>>> करणार असाल तर आत्ताच interior designer ला विचारा. पुढ्ची आखणी सोप्पी जाईल.

लिंब्या बरं झालं सापडलास, मी शोधतंच होते कुणितरी वास्तु शास्त्रज्ञ. कधी येऊ ते सांग.. Proud प्लॅन कधीचा येऊन पडलाय घरात.

आशु फायबर ग्लास चे दरवाजे महाग असतात का खूप?

आधीच असलेल्या ओट्याची मापं घेऊन त्याप्रमाणे >> हो माझ्याकडे तशाच केल्या आहेत Happy

टॉयलेटसचे दरवाजे सुद्धा फायबर ग्लासचे करुन घे. >>> अगदी अगदी

अजुन एक महत्वाचे म्हणजे इलेक्ट्रिकल पॉईटस चे प्लॅनिंग नाहितर नंतर घरात वायरचे जाळे दिसते Happy

किचनला लागून बाल्कनी आहे का? असेल तर तिथे एक नळ बसवून घे. तुझी वॊशिंग मशिन तिथे शिफ़्ट करून घरातली स्पेस वाचवता/वाढवता येइल. Happy

नंतर इन्व्हरटर बसवनार असशील तर त्यासाठी तयारी... माझ्याकडे बसवायचा म्हटले तर खुप वायर इकडुन तिकडे न्याव्या लागतील म्हणे Sad

फायबर ग्लास चे दरवाजे महाग असतात का खूप?<<<<<<<<<थोडेसे महाग असले तरी बरीच वर्ष टिकतात त्यामुळे दर २-३ वर्षांनी लाकडी दरवाजे खराब होउन बदलावे लागतात त्याप्रमाणे फायबरचे बदलावे लागत नाहीत.

अग म्हणजे हल्ली सगळे कन्सिल्ड(भिंतीत) वायरिंग असते ना केपिंग केसिंग नसते...बाहेरुन वायरी दिसत नाहित..त्यामुळे आधिच कुठला पॉईट कुठे हे ठरवलेले चांगले नाहितर नंतर परत भिंतीवर वायरी दिसतात...कळाले का.. Happy

इन्व्हर्टर साठी , बॅटारीसाठी अशी जागा लागते. तु इन्व्हर्टर विकणार्‍यांना एकदा विचारुन घे.

वॉशींग मशीन्साठी ड्राय बाल्कनी असेल ना Uhoh

इन्व्हर्टर साठी जागा किती लागते? आणि तयारी म्हणजे नक्की काय करून घेऊ?<<<<<<एकूण किती लाईट्स आणि फॅन्स इन्व्हर्टरला कनेक्ट करुन घेणारेस त्याप्रमाणे बॅटरी (कारचीच) लागेल,त्या बॅटरीसाठी आणि इन्व्हर्टरसाठी जागा लागेल आणि बॅटरी चार्जिंगसाठी ईलेक्ट्रक पॉईंट लागेल.

जर पाण्याची कमतरता भासणार असेल तर पाण्याची टाकी. नंतर खुप तोडफोड होते. आणि टाकी लावणारच असाल तर
१] स्वच्छ करता यायला हवी
२] अ‍ॅटोमॅटीक नळ बंद व्हायला हवा

अजुन एक महत्वाचे म्हणजे इलेक्ट्रिकल पॉईटस चे प्लॅनिंग नाहितर नंतर घरात वायरचे जाळे दिसते >> अनुमोदन.
तुझ्या फ्लॅट मध्ये कन्सील्ड वायरिंग असेल असं गॄहित धरून (कारण आता सगळेच तसं वायरिन्ग देतात):
ओट्यावर मायक्रोवेव्हसाठी एक पॉवर पॉईंट, मिक्सर साठी एक पॉईंट, अ‍ॅक्वागार्ड साठी एक पॉईंट (वरच्या बाजूला). झालंच तर पुढे मागे गॅस साठी चिमणी घेतलीस तर (नंतर का होईना पण घेच) त्यासाठी पण एक पॉईंट लागेल तोही आत्ताच करून घे.
हॉल मध्ये टीव्ही पॉईंट जवळ म्युझिक सिस्टीम साठीचा एक पॉईंट अन् स्पीकर्स वर कोपर्‍यात लावणार असशील तर त्यासाठी वेगळी कन्सील्ड वायरिंग करून घे.
माझ्या ओळखीचा एक किचन ट्रॉलिवाला आहे. तो ओट्याची मापे घेऊन ट्रॉलीज करून देतो. आणखी माहीती हवी असेल तर मला सांग. बेडरूम मध्ये कोणकोणते पॉईंट्स देत आहेत ते बघ. एखाद दुसरा जास्तीचा पॉईंट करून घे हवं तर. बाथरूम मध्ये इलेक्ट्रीक गीझर साठी पण एक पॉवर पॉईंट लागेल. करून घे आत्ताच. देवघराची जागा नक्की कर. तिथे एक पॉईंट लागेल.
पंख्यांसाठी हूक्स लावलेत का बघ. तसंच बाल्कनीत लावून घेता येतो का बघ.
फर्निचर कोणतं करायचं त्याची यादी कर. त्यातले महत्वाचं काय आहे ते ठरव. एक दोन जणांकडून मेजरमेंट घेऊन. त्याचं एस्टिमेट घे. यावरून तुला खर्चाचा अंदाज येईल.
सुरक्षेसाठी समोरचा लोखंडी दरवाजा, टेरेसला सरकता लोखंडी दरवाजा इ. चा ही विचार कर.
सध्या इतकंच. काही आठवलं की लिहीन इथे.

दक्षे बाथरुमच्या वर टाकी बसवशीलच पण किचन मधे शक्य असल्यास वेगळी छोटी टाकी बसवुन घे. बोअरच कनेक्शन असेल तर ते किचन मधेही फिरवता येईल का ते विचारुन घे. नंतर करायच झाल तर सोसायटीच ना हरकत वगैरे बर्‍याच भानगडी येतात मधे

बायदिवे, (माझ्यासारख्या) तज्ञ वास्तुविशारदाला प्लॅन दाखवला आहे का? नसेल तर दाखव!

>>
लिम्ब्याला वास्तुशास्त्रज्ञ म्हणायचे असेल. वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट.तो प्रत्येक बिल्डरने पाळलेला असतोच.

वास्तुशास्त्रज्ञ म्हनजे हे इशान्य कोपर्यात यम असतो. वायव्य कोपर्‍यात भूत असते वगैरे जे सांगत असतात आणि त्यासाठी हे तोडा ते तोडा सांगून तोडण्याचे कंत्राटही ते अथवा त्यांची माणसे घेतात ते !

कोणत्याही वास्तुशास्त्रज्ञाला प्लॅन दाखवू नकोस. किम्बहुना तू घर घेतले आहे अथवा तुला घर आहे हेदेखील सांगू नकोस. त्यांची दुकानदारी लगेच चालू होईल आणि तुझाच काय आजूबाजूचे दहापाच फ्लॅट पाडायला तुला सांगतील.

gas geyser Happy

टॉयलेटच्या सिलिंगला, ओट्याच्या खाली, लॉफ्टवर पण टाईल्स लावून घे. साध्या पण चालतील, जळमटं होत नाहीत आणि अश्या अडचणीच्या जागा स्वच्छ राहतात.

> अ‍ॅक्वागार्ड साठी नळाची वेगळी सोय करावी लागते का? ती कसली?
नाही लागत. एकच इन्लेट असेल तर एल्बो जॉईंट वापरून एका बाजूला aquaguard चे कनेक्शन व एका बाजूला रोजचा नळ असे करता येते.
बिल्डर जर चांगला व्यावसायिक असेल तर घरात काय किती कसे बदल करता येतील याचे ब्रोशर देतो शिवाय त्याचीच माणसे बदल करून देतात (अधिक किमतीत). शिवात घराचा प्लॅन, electirc, plumbing points काय दिले आहेत त्यानुसार तुम्हाला बदल करावे लागतील. बाकी ईतर बदल संबंधात वेळ मिळेल तेव्हा पोस्टतो.

१.ओट्यावर सिंकपाशी पाण्याचे पिंप/ माठ ठेवायला अन खाली खरकटी भांडी ठेवायला दोन वेगळे कडाप्पे लावून घेतले तर बरे पडते.
२.हल्ली उंबरठे उंचीला फार लहान बसवले जातात. पण त्यामुळे पावसाळ्यात पाणी घरात येते. तेही बघ.
३.झाडांची आवड असेल तर जिथे झाडं लावणार आहेस तेथे पाण्याचा नळ घेऊन ठेव.
४. घराच्या बाहेर थोड जागा असेल तर चपला ठेवण्यासाठी लॉक करता येणारे स्टँड मिळतात ते बघ. त्यामुळे चपलांचा हॉलमधला पसारा गायबतो:)
५. टाईल्स शक्यतो मोठ्या आकाराच्या लाव, गेट-अप चांगला येतो. अन पूर्ण घराला मोठ्या लावल्या की एकसंधपण येतो अन घर खुप मोठेही येते, (खर्च सारखाच येतो)
६. ओट्याखालच्या ट्रॉलीज मध्ये ठेवण्यासाठी चौकोनी डबे घे जागा खुप वाचते.
७. फर्निचरच्या जागा नक्की करून त्याप्रमाणे लाईट, नळ यांच्या जागा ठरवणे सोपे जाते.
८. वॉशिंगमशीन जर पॅसेज्/दायनिंग एरिया अशा जागी ठेवणार असशील तर त्याला बाजूने थोडा उंबरठा करून घेणे .
आता पुरे Happy
आणि हो मस्त एन्जॉय कर " घर पहावे बांधून " Happy अभिनंदन !

Pages