संगणक प्रकाशनने नुकतेच 1 मे रोजी 'संगणकावरील मराठी आणि युनिकोड' हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक माधव शिरवळकर यांनी सोप्या मराठी भाषेमध्ये लिहिलेले आहे. ह्यामध्ये एकूणच युनिकोड फाँट म्हणजे काय? त्याचा इतिहास, तो संगणकावर कसा बघाल, संगणकावर इन्स्टॉल कसा कराल?, मराठीमधून इमेल कशी पाठवाल, ब्लॉगवर मराठी लेखन कसे कराल, वेबसाईटवर मराठी कसे टाइप कराल अथवा मराठी सर्च कसा देऊ शकाल अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरे त्या पुस्तकात लेखकाने सचित्र उदाहरणासह स्पष्ट दाखविलेली आहेत. पुस्तकाची एकूण 208 पाने असून त्याची किंमत फक्त रू. 225 (पोस्टेजसहित) ठेवलेली आहे. त्याबद्दल अधिक माहिती खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
http://www.unicode-book.sanganak.in
अधिक माहितीसाठी संपर्क :
संगणक प्रकाशन
यु-128, पुजासॉफ्ट हाऊस,
दुर्गा माता मंदिराजवळ,
सेक्टर-4, ऐरोली, नवी मुंबई-400708
फोन : 022-27790123 / 9987642793/98/99
माहितीसाठी धन्यवाद
माहितीसाठी धन्यवाद
नेट वर गरज असलेली माहिती अशी
नेट वर गरज असलेली माहिती अशी अवचित मिळाली कि कोण आनंद होतो ....
मनापासून धन्यवाद !!