ऐ बाबा ऐक ना जरा..

Submitted by suryakiran on 30 April, 2010 - 04:50

नको रे बाबा मला,
तो चांदण्यांचा झुला,
तो निंबोणीच्या झाडामागचा,
चंद्रच आणून दे ना मला..

नको रे हा असला कापूस ओला,
तो काळा काळा ढंग हवाय रे मला,
कारंज्याचा फवारा काय सारखा सारखा,
तो पाऊस ओलाच आवडतोयं ना मला..

नको रे ती इंजिनाची आगगाडी,
हरणाच्याच गाडीत फिरव ना रे मला,
नको थाट झगमग दुनियेचा असला,
वेली-फुलांच्या देशात घेवून चल ना मला..

नको रे मला हे ब्रेड बटर नी जाम,
साखरेचीच पोळी दे ना रे मला,
रोजचं देतो फ्लाईंग किस ,
आज मात्र गालावर साखरपप्पी दे ना मला...

नको रे तो आयपॉड निजताना,
छानंस गाणंच ऐकव ना मला,
रोजचं निजते तुझ्यापासूनी दुर,
आज कुशीत घेवूनी कुरवाळ ना मला...

--- सुर्यकिरण ..

( माझा ब्लॉग :- गहिरे अंतरंग.. http://gahireantarang.blogspot.com )

गुलमोहर: 

मस्तच...संदिप खरेची "दमलेल्या बाबाची कहाणी" लेकराच्या दृष्टिकोनातून लिहिल्यासारखी वाटली...

हा अजून एक टायपो...
शिर्षकात "बाबा ऐक ना जरा.." ऐवजी " बाबा ऐक ना जरा.." असं हवं...