Submitted by suryakiran on 30 April, 2010 - 04:50
नको रे बाबा मला,
तो चांदण्यांचा झुला,
तो निंबोणीच्या झाडामागचा,
चंद्रच आणून दे ना मला..
नको रे हा असला कापूस ओला,
तो काळा काळा ढंग हवाय रे मला,
कारंज्याचा फवारा काय सारखा सारखा,
तो पाऊस ओलाच आवडतोयं ना मला..
नको रे ती इंजिनाची आगगाडी,
हरणाच्याच गाडीत फिरव ना रे मला,
नको थाट झगमग दुनियेचा असला,
वेली-फुलांच्या देशात घेवून चल ना मला..
नको रे मला हे ब्रेड बटर नी जाम,
साखरेचीच पोळी दे ना रे मला,
रोजचं देतो फ्लाईंग किस ,
आज मात्र गालावर साखरपप्पी दे ना मला...
नको रे तो आयपॉड निजताना,
छानंस गाणंच ऐकव ना मला,
रोजचं निजते तुझ्यापासूनी दुर,
आज कुशीत घेवूनी कुरवाळ ना मला...
--- सुर्यकिरण ..
( माझा ब्लॉग :- गहिरे अंतरंग.. http://gahireantarang.blogspot.com )
गुलमोहर:
शेअर करा
गो>>ड
गो>>ड
सही रे सही !
सही रे सही !
अरे वा !! खुप छान !!! अमोल
अरे वा !!
खुप छान !!!
अमोल केळकर
------------------------------------------------------------------------------
काही बालकविता इथे पहा
मस्त
मस्त
नव्या उपकरणांची कवितेतील
नव्या उपकरणांची कवितेतील शब्दांशी घातलेली सांगड उत्तम.............
गोड गोड कविता............
ब्रेड बट नी जाम,>>>तो टायपो
ब्रेड बट नी जाम,>>>तो टायपो तेव्हढा सुधार
मस्त आहे बडबडगीत
मस्तच...संदिप खरेची "दमलेल्या
मस्तच...संदिप खरेची "दमलेल्या बाबाची कहाणी" लेकराच्या दृष्टिकोनातून लिहिल्यासारखी वाटली...
हा अजून एक टायपो...
शिर्षकात "ऐ बाबा ऐक ना जरा.." ऐवजी "ए बाबा ऐक ना जरा.." असं हवं...
धन्यवाद तुमच्या
धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्दल.
मस्त !
मस्त !
छान आहे कविता.
छान आहे कविता.
मस्तच जमलिये रे ही बालकविता
मस्तच जमलिये रे ही बालकविता