Submitted by केदार on 20 April, 2010 - 10:01
यंदाचा आयसीसी टि२० विश्वचषक वेस्ट इंडिज मध्ये ३० एप्रिल ते १६ मे दरम्यान खेळला जाणार आहे.
भारतासोबत क ग्रूप मध्ये अफगाणीस्थान व साउथ अफ्रिका हे देश आहेत.
टीम मध्ये दुखापतीमुळे सेहवाग नसणार अशी बातमी वाचली. त्याऐवजी मुरली विजय खेळत आहे.
वर्ल्डकप विषयीचे मत व त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेस्ट इंडिज च्या खेळपट्ट्या
वेस्ट इंडिज च्या खेळपट्ट्या गेल्या काही वर्षांत बदलल्या आहेत काय? १०-१५ वर्षे फक्त 'स्लो अॅण्ड लो बाउन्स' वाल्याच वाटतात. द्रविड, सचिन वगैंरे चे एक दोन डाव सोडले तर आपले खेळाडू तेथे फार यशस्वी झालेले नाहीत. संघ जिंकला आहे आणि ते महत्त्वाचे आहेच. माझ्या मते लंकेच्या खेळपट्ट्या तशाच असल्याने ते चांगले खेळतात तेथे.
अर्थात हे कसोटी आणि वन डे बद्दल झाले. २०/२० मधे किती फरक पडेल कल्पना नाही.
त्या तश्याच असाव्यात
त्या तश्याच असाव्यात अजुनही.
वेगवान धावपट्यांवर शॉर्ट पिच मुळे आपली वाट लागेल असे मला वाटते. पण त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे सध्या नेहरा एकदम चांगले शॉर्ट बॉल टाकत आहे. (बरेचदा कॅच उडतोय त्या बॉलवर) कदाचित त्याचा भरपुर फायदा होईल.
आपल्या टीमचा काही भरवसा वाटत नाहीये, खासकरुन धोणी, युवी फॉर्म मध्ये नाहीत. सेहवाग नाही, रैनावर एकदम भरवसा आहे माझा. झहिर, नेहरा, प्रविण कुमार व चावला हे चालतील असे वाटत आहे.
रैना, रोहित शर्मा, गंभीर,
रैना, रोहित शर्मा, गंभीर, विजय चांगल्या फॉर्मात दिसताहेत...
संघात भज्जी असताना त्याला डावलून चावला ला कितपत संधी मिळते देव जाणे... विंडीजच्या पेस ट्रॅक्स वर दोन स्पिनर्स खेळवणे फारच धाडसे ठरेल... प्रवीणकुमार, झहिर बरे वाटतात, नेहरा एकदम बेभरवशी... कोणत्या कारणानी दुखापतग्रस्त होईल सांगता येत नाही...
सेहवाग ची कमी जाणवणारच... (२००९ मधेही जाणवली होती)...
टी-२० बद्दल काहीही छातीठोकपणे
टी-२० बद्दल काहीही छातीठोकपणे न बोलणंच बरं. तरीही, खूपच सुधारलेलं क्षेत्ररक्षण, आयपीएलचा ताजा अनुभव व धोनीचं परिपक्व नेतॄत्व यामुळे भारतीय संघाकडून चांगल्याच अपेक्षा बाळगायला हरकत नसावी.[ आणि हो , इथल्या मिडीया व राजकारण्यांची प्रत्यक्ष लुडबुड नसणं, हाही आपल्या संघाला वेस्ट इंडीजमध्ये मोठा 'अॅडव्हांटेज' आहेच !].
मुरली विजय हा भारतासाठी आदर्शवत नवोदीत सलामीचा फलंदाज ठरणार असं वाटतंय. पण, त्याच्या आयपीएलमधील काही भन्नाट खेळी पाहूनसुद्धा, आत्ताच्या टी-२० विश्वचषकासाठी सध्याचा फॉर्म, अनुभव व मुख्यतः पुनरागमनासाठी जिद्दीने ज्या धडाडीने उथप्पा खेळतो आहे, त्याचा समावेश होणं अधिक लाभदायी ठरलं असतं असंही वाटतं.
अँकी मी विंडीज मधे गेल्या
अँकी मी विंडीज मधे गेल्या काही सिरीज मधे वेगवान खेळपट्ट्या पाहिल्या नाहीत. उलट संथ असतात खूप. आपल्या बर्याच लोकांना क्रिकेट च्या परिभाषेत 'बॅटवर येणारे' बॉल असले - म्हणजे तसे पिच असले की चांगले खेळता येते.
तसेच बोलर्स मधे स्पिनर्स पेक्षाही चिकट बोलिंग करणारे धावा रोखणारे जास्त उपयुक्त ठरतात. पण २०-२० मधे यातील काय लागू आहे कोणास ठाउक?
मला वाटतं "बाउन्सी" खेळपट्या
मला वाटतं "बाउन्सी" खेळपट्या सोडूनै इतर वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्यांवर खेळण्याचा अनुभव
भारतासारखा इतर कोणत्याही देशात मिळणे कठीण. वेस्ट ईंडीजमधील खेळपट्ट्यांशी जुळवून घेणं आपल्या खेळाडूना [फलंदाज व गोलंदाज ,दोघानाही] जड जाणार नाही , निदान जाऊ नये , असं वाटतं.
उथप्पा टीममधे का नाहिये??
उथप्पा टीममधे का नाहिये?? आयपीएलमधे छान खेळलाय तो.
सेहवागला भर चौकात उभे करून फटके मारायला हवेत. दुखापत होउनसुद्धा तो आयपीएलमधे खेळत राहिला आणि वर्ल्ड कपसाठी अनफिट ठरला. त्यात परत धोणी युवराज अजून फॉर्म शोधताहेत. अनुभवी खेळाडूची कमी जाणवेल असं दिसतय.
भाऊ.. तुमचा फारच गोड गैरसमज
भाऊ.. तुमचा फारच गोड गैरसमज झालाय...
वेस्ट इंडीज मध्ये भारताची वाट लागते... तिथल्या विकेट्स इतक्या विकेड आहेत की त्यांना भेगा पडतात आणि त्यात बॅट आडकून पण आपले फलंदाज आऊट होतात...
नंदे.. आयपील मध्ये छान खेळून काहीच होत नाही बहुतेक.. आणि उथप्पाचे बहुतेक बोर्डाबरोबर वाजलेले असावे... त्यामुळेच त्याला बाहेर ठेवलाय...
उथप्पाचे बहुतेक बोर्डाबरोबर
उथप्पाचे बहुतेक बोर्डाबरोबर वाजलेले असावे... >> धोनीबरोबर पण वाजलं असावं.. इरफानचं पण असंच काहीतरी झाल्यासारखं वाटतंय..
वेस्ट ईंडीजमधील खेळपट्ट्यांशी जुळवून घेणं आपल्या खेळाडूना [फलंदाज व गोलंदाज ,दोघानाही] जड जाणार नाही , निदान जाऊ नये , असं वाटतं. >> जड तर नक्कीच जाणार आहे. आयपीएल नंतर ५च दिवसांत विश्वचषक चालू होतोय आणि आपला एकही सराव सामना नाहिये. नशीबाने आपल्या गटात अफगाणिस्तान आहे. ती तरी जिंकूच...![laughing.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u438/laughing.gif)
हिम्सकूल, आपण केवळ वेस्टइंडीज
हिम्सकूल,
आपण केवळ वेस्टइंडीज वि. भारत सामन्यांबद्दल बोलत नसून विश्व चषकाबद्दल बोलतोय. ज्या खेळपट्ट्यांवर सर्वच संघाना खेळावं लागणार आहे तिथं तौलनिक दॄष्ट्या खेळपट्ट्यांशी जुळवून घेणं आपल्या खेळाडूना कां सोपं जाईल, हा माझा कयास मांडला होता. दुसरं, हा विश्वचषक डबघाईला आलेल्या वेस्ट इंडीज क्रिकेटसाठी एक सोनेरी संधी आहे. खेळपट्ट्यांच्या दर्जाबाबत
कुचराई करणं ह्यावेळी त्याना अजिबात परवडणारं नाही , हेंही लक्षात घ्यायला हवं. कदाचित, हाही माझा भाबडेपणा असेल, नाही असं नाही !
बाय द वे.... लॉटस कसे पडलेत
बाय द वे....
लॉटस कसे पडलेत यावेळी?
आयपील ३ मध्ये खेळलेल्या सर्व
आयपील ३ मध्ये खेळलेल्या सर्व खेळांडुंना यंदाचा टि२० वल्डकप अतिशय फायद्याचा राहिल. कारण त्यांचा आयपील ३ मुळे प्रचंड सराव झाला आहे. तसेच आयपील ३ मुळे प्रत्येक खेळाडुची कमकुवत बाजु समोर आली आहे. प्रत्येकाचे प्लस पॉईंट किंवा मायनस पॉईंट समोर आली आहे. त्याचा फायदा टि२० वल्डकपमध्ये होईल.
टी २० आहेत का यु ट्युब वर ?
टी २० आहेत का यु ट्युब वर ?
उंगली क्रिकेट जास्त खेळल्याने
उंगली क्रिकेट जास्त खेळल्याने सेहवागचे अंगठे दुखतायत. पण ही इष्टापत्तीच आहे. मुरली विजय सध्या त्याच्यापेक्षा १० पट बरा खेळतोय. गंभीर पण फोन उचलू की नको, धाव गेहू की नको, फटका मारू की नको या संभ्रमात आहे.
रैनाला ही संधी आहे, भारताबाहेर पण त्याला खेळता येते हे दाखवायची.
या स्पर्धेचा पॅटर्न विचित्र
या स्पर्धेचा पॅटर्न विचित्र आहे सुपर एटमधे कोण जाणार हे सरळच आहे तर अफगाणीस्तान आणि बार्बाडॉस सारख्यांना घेउन वेळ कशाला वाया घालवतायत? या सगळ्या चिल्यापिल्यांचा वेगळा वर्ल्डकप का घेत नाही?
रच्याकने वॉर्मअप गेम्समधे झिंबाब्वेने ऑसिजना हरवले!
या कच्च्या लिंबूपैकी कोणीतरी
या कच्च्या लिंबूपैकी कोणीतरी अपसेट करावे म्हणून. गेल्या २०-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलिया असेच सुपर ८ मधे जायच्या आधीच उडाले. आणि विंडीज मधल्याच विश्वचषकात भारत, पाकिस्तान
या विश्वचषकात भारत,
या विश्वचषकात भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड व पाकिस्तान च्या गोलंदाजांची पोलार्ड जबरदस्त धुलाई करेल असे वाटते.
का हो गुरुजी फक्त ह्याच
का हो गुरुजी फक्त ह्याच देशाच्या गोलंदाजांची धुलाई का?
ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिकेची
ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिकेची गोलंदाजी खूपच चांगली आहे. ते पोलार्डला बरोबर जाळ्यात पकडतील.
पोलार्ड हा T20 साठी उत्कृष्ट
पोलार्ड हा T20 साठी उत्कृष्ट खेळाडु आहे. तो प्रचंड ताकदीने खेळणारा खेळाडु वाटतो. तो कोणत्याही बॉलरची धुलाई करु शकतो.
April 30 New Zealand vs Sri
April 30 New Zealand vs Sri Lanka Guyana 2230 IST![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
May 1 West Indies vs Ireland Guyana 0230 IST
May 1 Afghanistan vs India St Lucia 1900 IST
May 1 Bangladesh vs Pakistan St Lucia 2300 IST
May 2 India vs South Africa St Lucia 1900 IST
May 2 Australia vs Pakistan St Lucia 2300 IST
अफगाणिस्तानही ?
जावाय बापूंची गाठ पडणार म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना चकवून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"जावाय बापूंची गाठ पडणार
"जावाय बापूंची गाठ पडणार म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना चकवून "
कळले नाही.
अफगाणिस्तान क्वालिफाय करून आलाय आणि त्यांच्या एका खेळाडूला काबुलचा
सेहवाग असे नाव भारतातच मिळाले कुठल्यातरी स्थानिक स्पर्धेत खेळताना.
http://cricket.yahoo.com/cricket/news/article?id=item/2.0/-/story/cricke...
शोएब मलिक ...
शोएब मलिक ...
आज NZ v SL. मला वाटत लंका
आज NZ v SL.
मला वाटत लंका जिंकेल.
पोलार्डची भिती बाळगायचे काही कारण नाही, त्याला आपले बोलर अन कॅप्टन गंडवणार.
फार तर तो १५ रन्सचे डॅमेज करेल असे वाटते. पण ख्रिस गेल आणि प्लेचर पासून मात्र धोका आहे.
>>> शोएब मलिक
>>> शोएब मलिक ...
जावायबापूंवर १२ महिन्यांची बंदी आहे. अधिकमासाचे वाण सोडून ते कशाला वेस्ट इंडिजला जातील?
अमोल तुझे बरोबर आहे. अतिशय
अमोल तुझे बरोबर आहे. अतिशय स्लो पिच आहे गयाना मधली. आणि प्रचंड फास्ट आउटफिल्ड. स्पिनर्स चालणार असे दिसतेय. जयवर्धने मस्त खेळतोय. दिलशान १९ बॉल मध्ये ३ रन. खेळ रे असाच खेळ. भारताबरोबर असाच फॉर्म ठेव.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विश्वचषक T-20 सामने ओनलाईन
विश्वचषक T-20 सामने ओनलाईन + चकट्फु पाहण्यासाठी कोणती वेब साईट आहे का?
जिंकले की एन.झेड !
जिंकले की एन.झेड !
भाऊड्यांनो, विलो टिव्ही वर
भाऊड्यांनो, विलो टिव्ही वर कोणी बघतय का मॅची? कितीला आहे पॅकेज ह्या वेळी? आणि मॅची यु एस टाइम प्रमाणे दिवसाच असणार आहेत का?
६० डॉ आहे
६० डॉ आहे यावेळेस.
http://www.willow.tv/EventMgmt/UserMgmt/Packages.asp?eid=147&dclip=false
Pages