"तू बदललास मित्रा,
हल्ली पुर्वीसारखं अलवार लिहीत नाहीस.
त्या प्रीतीच्या गझला, त्या चंद्र चांदण्याच्या कविता,
त्या भावनांच्या चारोळ्या.... काही.... काहीच लिहीत नाहीस."
तो हसला......
"अरे, पुर्वी मी माझ्याच जगात वावरायचो.
आता मात्र वास्तवाची जाणिव झालीय.
शब्द फक्त रद्दी वाढवतात बघ.
भूक भागवत नाहीत की
जखमांवर फुंकर घालत नाहीत.
अंधार पुसत नाहीत की
कोसळलेलं घर उभारत नाहीत....
आता मी शब्दांचा रतीब घालणं बंद केलय.
आता निव्वळ प्रयत्न करतोय....
एखाद्या उपाश्याला एक वेळ जेवू घालण्याचा...
एखादी ओली जखम पुसून बँडेज बांधण्याचा...
अंधाराला दिवा दाखवण्याचा.....
नव्याने एखादं छप्पर उभारण्याचा.....
इतिहासात होणार नाही माझ्या नावावर कुठेही माझ्या साहित्यिक कर्तॄत्वाची नोंद...
पण मरताना काहीतरी केल्याचा जो आनंद माझ्या चेहर्यावर असेल,
तीच माझी शेवटची कविता....
एक दिवस तू नक्कीच वाचशील." तो बोलता-बोलता थांबला आणि....
.... मी त्या कवितेची पहिली ओळ तेव्हाच वाचली.
पहिली ओळ
Submitted by कौतुक शिरोडकर on 19 April, 2010 - 13:08
गुलमोहर:
शेअर करा
क्लास !!
क्लास !!
वा, आवडली कविता !
वा, आवडली कविता !
खूप छान
फारंच सुरेख लिहिलियेस
फारंच सुरेख लिहिलियेस कविता...

आयुष्य उमगण्याचा क्षण नेमका टिपलायंस आणि मांडलास.
वाचली.
वाचली.
दक्षिणाला अनुमोदन
दक्षिणाला अनुमोदन
प्रचंड वेड्यागत लिहिलंस !!
प्रचंड वेड्यागत लिहिलंस !! अप्रतीम बॉस !!!
छान!
छान!
एकदम छान!!
एकदम छान!!
एकदम सुपर्ब कविता आहे!!! काय
एकदम सुपर्ब कविता आहे!!! काय लिहु यावर सुचत नाहीये.
शब्द फक्त रद्दी वाढवतात बघ >>तुमच्याच ओळीचा विचार करतीये
मला तुझ्या कवितेची पहीली ओळ
मला तुझ्या कवितेची पहीली ओळ वाचायचा मोह कधी होइल

जोक्स अपार्ट...
खासच रे कौतुका, तू कधी कधी असं काही लिहून जातोस आणि मग माझ्या मनात उगाचच मत्सर निर्माण व्हायला लागतो. मला कधी लिहिता येइल याच्यासारखं?
मस्त! विशाल तू 'लिल' आमी
मस्त!
विशाल तू 'लिल' आमी वालतो
कौतुक, जबरदस्त कविता.
कौतुक,
जबरदस्त कविता. चंद्र्-चांदण्या,इ.इ. पासून एकदम हटके..
मस्तच!
मस्तच!
अप्रतिम....
अप्रतिम....
सही
सही
मस्त कविता, आवडली
मस्त कविता, आवडली
मस्त कविता. पटली.
मस्त कविता. पटली.
निहायत ही सही!!!!!!!!!!!!
निहायत ही सही!!!!!!!!!!!! मित्रा, हेलावून टाकलंस मन....... जीओ दोस्त!!!
मनातलं, मनापासुन, एकदम
मनातलं, मनापासुन, एकदम मनभावन...
काय म्हणणार ह्याला?
बस, खाली "सलाम"
सु-रे-ख! आवडलि
सु-रे-ख!
आवडलि
शब्द फक्त रद्दी वाढवतात
शब्द फक्त रद्दी वाढवतात बघ.
भूक भागवत नाहीत की
जखमांवर फुंकर घालत नाहीत.
अंधार पुसत नाहीत की
कोसळलेलं घर उभारत नाहीत..
अप्रतिम....प्रत्येक कवी... लेखकाची होणारी अवस्था....
व्वा !! अतिव सुन्दर भेदून
व्वा !!
अतिव सुन्दर
भेदून गेलास --भिडलास
काळजाला
सुंदर...शेवट फारच छान..
सुंदर...शेवट फारच छान..
एकदम छान, झकास...
एकदम छान, झकास...
ग्रेट.
ग्रेट.
पहिल्या ओळीपासून
पहिल्या ओळीपासून शेवटपर्यंत
अप्रतिम..........
वा!!
वा!!
तुमच्या नावपासुन जे सुरु झालय
तुमच्या नावपासुन जे सुरु झालय (कौतुक) ते कसे काय थांबवता येयील...........????
"नाव रखलत !" ....तसे ते आपणास नवे नाही........
पण चांगल्या गोश्तिचे कौतुक न करणे ... ते हि जमत नाही.........:)
वास्तववादी
वास्तववादी
Pages