पुन्हा एकदा प्रश्न

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

बरेच दिवस करीन करीन म्हणताना घरातल्या सीडी अन कॅसेट वरची गाणी डिजिटल कॉपी करायचं काम सुरु तरी केलंय आज. नेमकी सगळ्यात वरची सीडी विश्व विनायक ची निघाली त्यामुळे कसली विघ्नं न येता हे काम पुरं होईल अशी आशा आहे Happy

त्या पाठोपाठ भूपाळी अन पहाटेची भक्तिगीते अशा दोन सीड्या निघाल्या. त्यातली गाणी फ्रीडीबी वर सापडली नाहीत म्हणून प्रत्येक गाण्याची पहिली ओळ ऐकून ट्रॅक्स ची नावं लिहित होते. सगळी गाणी सूर्य, राम , गणपती, कृष्ण, पांडुरंग यांना उद्देशून.

महालक्ष्मी, तुळजा भवानी, अंबाबाई, रेणूका , गौरी अशा देवींना उद्देशून भूपाळी आहेत का ? असतील तर प्लीज इथे लिहा, नसतील तर का नसतात ह्याचं कारण माहित असेल तर लिहा. गोंधळ सोडल्यास देवीसाठी कुठल्या प्रकारची भजनं/ गाणी असतात ?

( त टी, वादासाठी लिहिलेलं नाही, मला खरंच जाणून घ्यायची इच्छा आहे. )

विषय: 
प्रकार: 

सध्या लगेच आठवतायत ती ही गाणी ,गोंधळ नाही पण भुपाळीपण नाहीये... देवीच्या भुपाळ्या पण नक्की असतील आठवल्या की लिहिते.

माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई.

गीतः सुधीर मोघे
संगीतः मीना खडीकर
स्वरः लता मंगेशकर
चित्रपट: शाबास सुनबाई

पाहुणी आली माझ्या घरी
अंबीका माया जगदीश्वरी

गीतः ग.दि.माड्गूळकर
संगीतः वसंत पवार
स्वरः सुमन कल्याणपूर
चित्रपटः मल्हारी मार्तंड

जय शारदे वागेश्वरी
गीतः शांता शेळके
संगीतःश्रीधर फडके
स्वरःआशा भोसले

अजून एक आठवतय पण नुसतीच दुसरी ओळ आहे...

ओटी आईची मोत्याने भरु ....

मागचं पुढच काहीच आठवत नाहीये. Uhoh

माझा काहि या क्षेत्रातला अभास नाही, पण मला वाटते ते लिहितोय.
आपल्याकडे देवी, हि कायम मातेच्या रुपात पूजली जाते. (कन्याकुमारी आपल्याकडे नाही. )
गौर जरी माहेरवाशीण म्हणून येत असली, तरी ती गणपतिची आईच आहे.
तर आईला झोपेतून उठवायचे, हि कल्पनाच आपण करु शकत नाही. आई सदा जागृत असते. मुलासांठी जागत असते. मुलांच्यावर नजर ठेवून असते. त्याच्या अडल्या नडल्याला, दुखण्याखुपण्याला धावत जाते.
त्यामूळे ती कधी झोपत असेल, अशी कल्पनाच नसावी. कदाचित देवळात काकड आरती म्हणत असतील, पण शक्यतो देवीच्या आरत्या आणि स्त्रोत्रेच ऐकली आहेत.
अनेकवेळा, पहाटे पाच वाजता, कोल्हापूरच्या आंबाबाईच्या देवळात हजेरी लावली आहे, पण देवी जागीच असते.
नाही म्हणायला सोलापूरच्या भवानी मातेच्या देवळात, काहि दिवस, देवीला जागेवरुन हलवून, शय्येवर झोपवलेले असते. त्यावेळी तिचे दर्शन, फक्त आरश्यात घेता येते. कदाचित त्या देवीची भूपाळी असेल.

पावनेर गं मायेला करू, ओटी मायेची मोत्याने भरु
असे लताचे गाणे आहे, बहुदा शांता शेळके यानी लिहिलेले आहे.

रुणुझुणूत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा

असे पण लताचे गाणे आहे.

दार उघड बये, दार उघड हे लोकगीत देवीला आळवण्यासाठी करतात.

शोनू, माझ्याकडे ५०० जीबीची हार्ड डिस्क आहे त्यात अनेक अनेक उत्तम उत्तम हिन्दी, मराठी, शास्त्र्यिय संगीतातील गाणी आहेत. इतकी गाणी आहेत की इतर कुठल्या साधनाची गरज भासत नाही मला. सगळी गाणी एकाच हार्डडिस्कमधे सापडतात. माझा एक मित्र आहे इथे शैलेश नावाचा तो अफाट संगीतप्रेमी आहे त्यानी दिलीत त्याच्याकडच्या संग्रहातील गाणी मला.