Submitted by तुष्कीनागपुरी on 14 April, 2010 - 12:59
बायको म्हणजे
एक सावली
उन्हाला शांत करणारी
बायको असते
पावलोपावली
घराला घरपण देणारी
बायको म्हणजे
निश्चिंतता
घर सुरळीत चालेल याची
बायको म्हणजे
नेमकी जाणीव
गृहस्थाला कर्तव्याची
बायको म्हणजे
ओले केस
न्हाल्यानंतर भुलवणारे
बायको म्हणजे
सुगंधाचेच
कारण जीवनात दरवळणारे
बायको म्हणजे
गोड कारण
घरी लवकर जाण्यासाठी
बायको म्हणजे
प्रेमळ घास
हसत हसत खाण्यासाठी
बायको म्हणजे
प्रेमळ काळजी
हवीहवीशी वाटणारी
बायको म्हणजे
अधिर ओढ
अस्तित्वाला व्यापणारी
बायको म्हणजे
सावध विवेक
सगळीकडे जाणवणारा
बायको म्हणजे
नेमका आवेग
सुरळीत गाडा चालवणारा
बायको म्हणजे
संपूर्णता
गृहस्थाच्या जगण्याची
बायको म्हणजे
समर्थता
माणसाला यश पचवण्याची
तुषार जोशी, नागपूर
गुलमोहर:
शेअर करा
अगदी खर .कविता आवडली .
अगदी खर .कविता आवडली .
अप्रतिम कविता, बायको म्हणजे
अप्रतिम कविता,
बायको म्हणजे सारं काही,
तिच्यावाचून संसाराला अर्थ नाही...
फारच छान !
फारच छान !
खरंच, अप्रतिम कविता पण
खरंच, अप्रतिम कविता
पण जाचवाल्यांची परवानगी घेतलीत का हो?

आवडली कविता
आवडली कविता
तुषार, खुप दिवसांनी आगमन.. पण
तुषार, खुप दिवसांनी आगमन.. पण छान कविता घेवुन आलास..
खुप आवडली पु.ले.शु.
खुप आवडली
पु.ले.शु.
तुषार, तुमचे लग्न झाले आहे
तुषार, तुमचे लग्न झाले आहे का? असेल तर, किती वर्ष झाली आहेत लग्नाला???
एनीवे, छान कविता
छान कविता... पण जाचवाल्यांची
छान कविता...

पण जाचवाल्यांची परवानगी घेतलीत का हो?
मस्त ! कविता ! बायको म्हणजे
मस्त ! कविता !
बायको म्हणजे ...जगण्याचे कारण ..सुर्यकिरण !
बायको म्हणजे ...कोरे पान ..कोरी पाटी !
मस्त आवडली...
मस्त आवडली...:स्मित:
कविता आवडली
कविता आवडली
खूप सरळ कविता आहे ..
खूप सरळ कविता आहे ..
बाजुला बायको तर नाहि ना उभी ?
बाजुला बायको तर नाहि ना उभी ?
सुंदर कविता.
सुंदर कविता.
कवितेच्या मुख्य विषयाला
कवितेच्या मुख्य विषयाला 'कविकल्पना' का म्हंतात त्ये समजले...
(हलकेच घ्या हो..)
आगदी खर...
आगदी खर...
अरे वा............ सही रे !!
अरे वा............ सही रे !! सीमाला पूर्ण मार्क्स दिलेस
माझ्या या कवितेला मिळालेला
माझ्या या कवितेला मिळालेला प्रतिसाद पाहता हा विषय फार जवळचा होता हे कळ्ते. कवतुक केल्याबद्दल धन्यवाद मंडळी.
<< हा विषय फार जवळचा होता हे
<< हा विषय फार जवळचा होता हे कळ्ते. >>
अहो साहेब, हा विषय जवळचाच नव्हता तर अनोखाही होता बरका.
प्रेयसीची बायको झाली की तिचं कौतुकच संपतं.
"बायको" ची उपेक्षाच झाली हो साहीत्यात.
खास! खूप आवडली.
खास! खूप आवडली.
सह्हीये कवि कल्पना
सह्हीये कवि कल्पना
बायकोचं नेमकं महत्त्व जाणलेलं
बायकोचं नेमकं महत्त्व जाणलेलं दिसतंय..... आवडली कविता! पु.ले.शु.
पु. ल. शु.... (पुढील लग्नास
पु. ल. शु....
(पुढील लग्नास शुभेच्छा)
पुढील लग्नास >>>?
पुढील लग्नास >>>?

ज्यानी बायकोचं नेमकं महत्त्व
ज्यानी बायकोचं नेमकं महत्त्व जाणलेलं त्याना पु. ल. शु...ची गरज नाही पडणार...
छान
छान
छान कविता!
छान कविता!
सहीच!! सायंकाळी जाऊन कधी एकदा
सहीच!!
सायंकाळी जाऊन कधी एकदा बायकोला पाहतो असं झालय...
बायकोला किती समजून घेतलंत.
बायकोला किती समजून घेतलंत. आवडलं.
Pages