मसाल्यासाठी-
अ.
१ वाटी सुकं खोबरं
१ इंच दालचिनीचा तुकडा
४-५ लवंगा
५-६ मीरी दाणे
एक चमचा जीरे
ब.
२ वाटी कोथिंबीर
आलं-लसुण पेस्ट १ ते ११/२ चमचा
एक मध्यम कांदा भाजलेला
१/२ वाटी तेल
१ मध्यम कांदा बारीक चिरुन
१ चमचा गरम मसाला
तिखट, मीठ आवडीनुसार
तेजपान २-३
२ ते २१/२ वाटी पाणी
अर्धा छोटा फणस चिरुन
फणस चिरणे जरा अवघड काम असते. विळी आणि हाताला तेल लावतात, पण मला इथे मिळालेला फणस बिलकुल चिकट नव्हता. बिया असतिल तर त्याचं कव्हर काढुन टाकायचं.
हा चिरलेला फणस
क्रमांक 'अ' मधील गोष्टी भाजुन घ्याव्यात आणि गार झाल्यावर मिक्सरमधुन बारीक करुन घ्याव्यात. आता त्याच भांड्यात 'ब' मधील जिन्नस टाकुन बारीक पेस्ट शक्यतो पाण्याशिवाय करुन घ्यावी.
आता कुकरमधे तेल तापऊन त्यात तेजपान, कांदा परतुन घ्यावा. कांदा ब्राऊन झाला की त्यात पेस्ट परतुन घ्यावी, तिखट, मीठ, हळद घालावी. तेल सुटले पाहिजे.
आता त्यात चिरलेला फणस चांगला परतुन घ्यावा, गरम मसाला घालावा आणि पाणी घालावा.
२ शिट्ट्या करुन घ्याव्या. भाजी तयार.
ह्याची ग्रेव्ही ब्राऊन होते. हिरवी पाहिजे असल्यास तिखटाएवजी हि.मिरची घालणे आणि कोथिंबीर अजुन जरा जास्त. ग्रेव्ही लाल भडक पाहिजे असल्यास कोथिंबीर न घालता धने घालणे. शिट्ट्या जास्त झाल्यास जास्त शिजलेली भाजी चांगली लागत नाही. टीनधला फणस पण वापरता येईल पण परत मग कुकरमधे शिजवायची गरज नाही.
पाणी सुटले तोंडाला मस्त
पाणी सुटले तोंडाला
मस्त रेसिपी प्रीति.
मस्त वाटते आहे रेसिपी. अशी
मस्त वाटते आहे रेसिपी. अशी करून पाहिली पाहिजे. (तेल मात्र बरंच दिसतंय शेवटच्या फोटोत.)
एरवी मी अगदी साधी तिखट/मीठ/गूळ/गोडा मसाला घालून करते.
धन्यवाद, अगो आणि
धन्यवाद, अगो आणि स्वाती.
टिनमधला फणस वापरायचा तरी पाणी न घालता २-३ शिट्ट्या काढाव्या लागतात.>> मला वाटलं छोल्यांसारखं हे पण शिजलेलच असेल, मी वापरलं नाही कधी.
ह्यात तेल बरचं असतं
मस्तं.. एकदम चिकन करी सारखी
मस्तं.. एकदम चिकन करी सारखी दिसतेय दिसायला
प्रीती, तुम्ही भाजीच कुकरमधे
प्रीती, तुम्ही भाजीच कुकरमधे शिजवताय त्यामुळे मग आधी निराळा शिजवून नाही घेतला तरी चालेल टिनमधला फणस. नाहीतर मात्र उकडून घ्यायला लागतो.
पुण्याला देसाई बंधू
पुण्याला देसाई बंधू आंबेवाल्यांकडे मिळतो तो फणस शिजवावा लागत नाही.. शिजवलेलाच असतो.. )
आंबेवाल्यांकडे फणस ऐ ते न च
आंबेवाल्यांकडे फणस ऐ ते न च (तरीच फॉल-पिकोवाल्यांकडे आंबे मिळतात)
प्रीति, भारीच दिसतेय भाजी. मला सायोची रेसिपी पण करुन बघायचीय. ही पण रांगेत.
फोटो एकदम जबरी आला आहे. मस्त
फोटो एकदम जबरी आला आहे. मस्त आहे रेसिपी.
छान आहे...
प्रीति, भाजी प्रचंड चमचमीत
प्रीति, भाजी प्रचंड चमचमीत दिसत्ये.
अगदी आत्ता ताव मारायला पुढ्यात येइल अस वाट्टय
प्रीती खल्लास फोटु आहेत.
प्रीती खल्लास फोटु आहेत.
(No subject)
:: खरच मस्त झाली आहे भाजी
::): खरच मस्त झाली आहे भाजी
मस्त होते ही भाजी! (मी इतकं
मस्त होते ही भाजी!
(मी इतकं तेल नाही घातलं अर्थात.)
धन्यवाद मंडळी!! स्वाती मी
धन्यवाद मंडळी!!
पण पाहुण्यांना खाऊ घालते 
स्वाती मी इतकं तेल नेहमी नाही घालत गं
मी आजच केली ही भाजी. कमी
मी आजच केली ही भाजी. कमी तेलातच केली. झकास होते एकदम!
छान
छान