अतुल्य! भारत - भाग ३: हिमाचल प्रदेश

Submitted by मार्को पोलो on 1 April, 2010 - 07:12

"पक्या नवा कॅमेरा घेतलाय तर टेस्ट करायला एक झक्कास ट्रिप मारुया.". मी आणि माझ्या मित्राने नविन कॅमेरे घेतल्यावर हा माझा कॉमेंट. मी आणि माझ्या मित्राने canon powershot S2 IS आणि Sony DSC H2 नविनच घेतले होते. एक नाल मिळाला म्हणून तीन नाल घेतले आणि चार नाल झाले म्हणून घोडा घेतला ह्या उक्तिप्रमाणे कुठे जायचे ह्याचा शोध सुरु झाला. त्यावेळी एप्रिल सुरु होता म्हणून हिमाचल प्रदेश चा बेत ठरविला आणि तयारी सुरु झाली. ट्रिप plan केल्यानंतर कळले की एका नालेची किंमत तीन नाल आणि घोडयापेक्षा जास्ती होती. असो...

दिवस पहिला: हैदराबाद वरून दिल्ली ची संध्याकाळची फ्लाईट पकडली. रात्रि ९ वाजता दिल्ली ला पोहोचलो. तिथुन शिमल्याला बस ने जाण्याचा विचार होता म्हणून बस स्टँड वर पोहोचलो. तोपर्यंत १० वाजले होते. तिथे कळले की शिमल्याची शेवटची बस ९ ला गेली. मग तिथुन चंडिगड ला जायचे आणी तेथुन शिमल्याला जायचे ठरले. दिल्ली ते चंडिगड ५ तास व चंडिगड ते शिमला ५ तास असा हा प्रवास आहे.

दिवस दुसरा: सकाळी ३ वाजता चंडिगड ला पोहोचलो आणि शिमल्याचे तिकिट काढले आणि शिमल्याच्या बस मध्ये जाउन बसलो. ती बस ४ ला सुटणार होति. बसल्या बसल्या गाढ झोपलो. बस कधी सुरु झाली ते कळलेच नाही. जाग आली तेव्हा उजाडले होते आणि हिमालयाच्या रांगा सुरु झाल्या होत्या. तेव्हड्यात शिमल्याची खाली येणारी toy train दिसली. पुढचाच stop धरमपुर ला उतरलो आणि तिकिट काढुन toy train ची वाट बघत बसलो. १०-१५ मिनिटांनी toy train आली. हा एक झक्कास अनुभव आहे. मी माथेरान आणि उटी च्या toy train मध्ये बसलो आहे पण हिमालयातली toy train हा एक वेगळा अनुभव आहे. एका बाजुला हिमालयाच्या उत्तुंग हिरव्यागार रांगा आणि एका बाजुला खोल हिरवी दरी असे आलटुन पालटुन येत होते. गाडी छोटि आणि गर्दी पण कमी असल्यामुळे गाडीभर हिंडता येत होते. सर्व काही enjoy करत १० वाजता शिमल्याला पोहोचलो. train बस पेक्षा थोडि हळू चढते. शिमल्याला ला hotel घेतले, fresh झालो, ब्रेकफास्ट केला आणि taxi,घेतली. हा गडी आम्हाला शिमला दाखविणार होता. अतिशय निटनेटका आणि सुसंस्कॄत माणूस होता. आधी त्याने कुफ्री ला नेले. ही जागा सिमल्यापासून २५ km वर आहे. त्याने कुफ्री च्या २ km आधी गाडी थांबविली. पुढे वर तुम्हाला पायी किंवा घोड्याने जावे लागते. सर्व खडकाळ रस्ता आहे. घोडे किंवा तट्टू पण अडखळतच चालते. घसरले किंवा खाली पडले तर कपाळमोक्षच व्हायचा. पण सुदैवाने तसे काही घडले नाही. वर छान पठार आहे. तिथुन लांबवर बर्फाच्छादित पर्वतांचे दॄश्य दिसते. एक छोटासा go karting चा track ही आहे. तिथे याक पण आहेत. पर्यटकांना पहायला आणि फोटो काढायाला म्हणून. ते पाहुन खाली परत आलो. मग सिमला university, simla valley, zoo असे सर्व काही पाहुन संध्याकाळी परत hotel वर आलो. फ्रेश होउन परत सिमल्याचा mall road पहायला बाहेर पडलो. हा रोड म्हणजे सिमल्याची बाजारपेठ. थोडी खरेदी केली, जेवण करून परत hotel वर आलो.

शिमल्याचे जंगल...

याक वरची २ गाढवे...

शिमला विद्यापीठ

सिमला शहर... रात्री...

दिवस तिसरा: आज मनाली ला जायला निघालो. हा ७ ते ८ तासांचा प्रवास आहे. हा रस्ता अतिशय सुंदर आहे. हा रस्ता बियास नदी च्या कडेने जातो. आम्ही बसने गेल्यामुळे मध्ये कुठेही थांबता आले नाही. त्यामूळे चालत्या बस मधूनच फोटो काढले. कॅमेरा नविन होता आणि तो नीट चालविता ही येत नव्हता म्हणून सर्व फोटो खराब आले. जिथे बस थांबली तेथे काही खास नव्हते. संध्याकाळी ६ वाजता मनालीला पोहोचलो.

दिवस चौथा: आज water water rafting करण्याचा बेत ठरला. कुलु जवळ rafting चालते. तिथे बियास मध्ये rafting केले. तिथे type 2 आणि type 3 चे rapids (rapids = पाण्याचे भोवरे. type 5 चे भोवरे हे सर्वात अवघड मानले जातात) आहेत. rafting ची खरी मजा येते ऋषिकेश ला. तेथे type 4 आणि type 5 चे rapids आहेत. rafting करताना तुम्हाला बोटिच्या अगदी कडेवर बसुन वल्हवावी लागते आणि तोल देखिल सांभाळावो लागतो. दोन्ही हातात वल्हे धरले असल्यामूळे फक्त पाय बोटिच्या खाचेमध्ये अडकवुन तोल सांभाळावा लागतो. त्यात वर rapids मध्ये बोट roller coaster प्रमाणे वर खाली जाते. तोल गेला तर पाण्यात. ऋषिकेश ला the wall हा एक rapid आहे. तिथे ९९ टक्के बोटी ऊलट्या होतात आणि सर्व पाण्यात पडतात. पण life jacket घातले असल्यामूळे काही होत नाही. असो. rafting करून परत येताना मनाली पहायचा बेत ठरला. गाडी घेउन नग्गार कडे निघालो. नग्गार ही मनाली ची राजधानी मानली जाते. ईथे एक लहान पण सुंदर राजवाडा आहे. राजवाडा हा लाकडाचा आणि दगडांचा बनलेला असुन त्यावर सुंदर कोरीव काम आहे. परत मनाली मध्ये येउन हिडिंबा मंदिर आणि ईतर काही मंदिरे पाहिली.

दिवस पाचवा: आज रोहतांग पास ला जाण्याचा बेत ठरला. पण चौकशी केल्यावर असे कळले की रोहतांग पास ला जाण्याचा रस्ता बर्फामूळे बंद आहे. हा रस्ता मे १५ पर्यंत ऊघडतो. पण तुम्हाला मढी येथे बर्फ मिळेल. मग मढी ला गेलो. आयुष्यात प्रथमच बर्फ बघत होतो. खुप मजा आली. खुप खेळलो. थोडेफार skiing शिकलो. येताना सोलांग व्हॅली ला गेलो. येथे छान नैसर्गिक लॉन आहे. ईथे विविध प्रकरचे खेळ चालतात. मी पॅराग्लायडिंग करायचे ठरविले. तिकिट घेतले आणि तिथला गाईड म्हणाला चला टेकडिवर. टेकडि चढू लागलो आणि माझ्याबरोबर तो गाईड एक भली मोठी पॅरॅशूट ची बॅग पाठीवर टाकुन चढू लागला. एव्हढा रोजचा व्यायाम करुन सुद्धा मला अर्ध्यावर दम लागला. तो म्हणाला की तुम्ही या सावकाश, मी तुमची वर वाट बघतो आहे. मी वर पोहोचल्यावर सगळे माझीच वाट पहाट होते. त्यांनी मला व त्या पॅरॅशूट कंट्रोल करणार्या पायलट ला एकत्र पट्ट्यांनी बांधले. पायलट म्हणाला की, तुम्ही पुढे पळायचे आणि मी तुमच्या बरोबर पळणार. मागुन दोघे जण पॅरॅशूट उघडून पळणार. तुम्ही थांबलात तर आपण दोघेही पडू. असेच पळत पळत कड्यावरुन खाली ऊडी मारायची... च्यायला, म्हणले तुझ्या नानाची टांग. तुझ्या तिर्थरूपांचे चे काय जाते "पळत पळत कड्यावरुन खाली ऊडी मारायची" म्हणायला. तुला रोजची सवय आहे. खाली ऊडी मारा काय? मी खाली ऊडी मारली आणि तु "कशी मज्जा केली एका माणसाची" म्हणून आला नाही तर? ते पॅरॅशूट नेमके माझ्याच वेळेला उघडले नाही तर? एखाद्या पक्षाने येउन उघडलेल्या पॅरॅशूट ला चोच मारली तर? असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले. अचानक मला माझे जीवन अतिशय मोलाचे वाटू लागले. ईंग्रजीत "I found a new respect for life" असे काहिसे म्हणतात ते हेच असावे. असो. पण मग मनाचा हिय्या केला. जे व्हायचे ते होऊन जाउ दे. एव्हड्या लोकांना काही होत नाही तर आपल्याला काय होणार आहे. पळत जाउन ऊडी मारली आणि माझ्या का त्याच्या नशिबाने पॅरॅशूट उघडले. आणि नंतर चा अनुभव अविस्मरणिय होता. कल्पना करा, तुम्ही ऊडता आहात आणि तुमच्या पायाखाली आणि ३६० अंशांमध्ये मोकळे आकाश आहे. खरोखर "Bird's eye view". त्या अनुभवाची पुरेपूर मजा लूटत, तरंगत अलगद खाली उतरलो. संध्याकाळी मनाली ला परत आलो.

मनाली

नग्गार चा राजवाडा

हिडिंबा मंदिर

बियास नदी

मढी

हा बियास नदी चा ऊगम मानला जातो. ह्याला""बियास नाला" असे म्हणतात.

मढी पॅनोरमा

सोलांग व्हॅली

दिवस सहावा: आज धरमशाला कडे प्रयाण केले. धरमशाला ला सदगुरू दलाई लामा यांचा मोठा आश्रम (मोनास्टरी) आहे. दलाई लामा जेव्हा भारतामध्ये असतात तेव्हा त्यांचे वास्तव्य धरमशाला येथे असते. मनाली ते धरमशाला हा ६ ते ८ तासांचा प्रवास आहे. संध्याकाळी धरमशाला ला पोहोचलो.

दिवस सातवा: धरमशाला मध्ये दलाई लामांची मोनास्टरी पाहिली. अतिशय शांत, स्वच्छ, प्रसन्न आणि सुंदर जागा आहे ही. ईथुन दौलाधर पर्वत रांगांची बर्फाच्छादित शिखरे दिसतात. ते पाहुन जंगलातल्या वाटेने वर गेलो. थोडेफार जंगलामध्ये भटकलो. हे सर्व पाहुन खाली गावात आलो. गावात एक सुंदर तळे देखिल आहे. धरमशाला मध्ये बरेचसे तिबेटियन संस्कॄती असल्यामूळे बीड, टॉरक्वॉईज यांच्या सुंदर माळा, ब्रेसलेट ईत्यादि मिळतात. अशा काही गोष्टि भेटवस्तु म्हणून घेतल्या व डलहौसी कडे कूच केले.

धरमशाला चे जंगल

मोनास्टरी

दौलाधर पर्वतरांगा

सुर्यास्त

दिवस आठवा: रात्री ऊशिरा डलहौसी ला पोहोचलो, hotel बघितले आणि ताणुन दिली. सकाळी ऊठलो आणि बाहेरचा view बघुन थक्कच झालो. hotel एका दरी च्या किनारी होते. समोर डलहौसी ची व्हॅली आणि नजर जाईल तिथवर हिमालयाच्या पर्वतरांगा होत्या. आवरून site seeing साठी बाहेर पडलो आणि कार केली. आज डलहौसी, खज्जियार आणि चंबा असा बेत होता. डलहौसी शहर फिरून आम्ही डलहौसी मध्यल्या सर्वात ऊंच "कालाटॉप" ह्या ठिकाणी आलो. ईथुन सरळ पाहीले तर समोर काश्मिर च्या पिरपांजाल ह्या पर्वतरांगा दिसतात. खाली खज्जियार चे मैदान आहे आणि पाठिमागे डलहौसी चे जंगल आहे. तिथुन खज्जियार ला आलो. खज्जियार ला भारताचे स्विट्झरलँड म्हणतात. ईथे छान नैसर्गिक लॉन आहे. मध्ये तळे आहे आणि समोर मोठा डोंगर आणि जंगल आहे. ईथे मैदानात बरेच खेळ आणि घोडे वाले होते. तिथे थोडा वेळ थांबलो, आराम केला, जेवण केले आणि चंबा कडे कूच केले. चंबा गाव रावी नदी च्या किनारी वसले आहे. ईथे ४ देवळांचा एक समुह आहे. त्यातिल एक मंदिर "लक्ष्मी नारायण मंदिर" १० व्या शतकातिल आहे. मंदिरांवर सुंदर कोरीव काम आहे. दर्शन घेऊन रावी नदी किनारी आलो. अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशी ही नदी आहे. तिथे थोडा वेळ थांबुन परत डलहौसी कडे निघालो. येताना चमेरा धरण बघितले. ईथे "कोई मिल गया" ह्या चित्रपटाचे चित्रिकरण झाले आहे.

डलहौसी व्हॅली

कालाटॉप वरून दिसणारे खज्जियार

कालाटॉप वरून दिसणार्या काश्मिर च्या पिर पांजाल पर्वतरांगा

पिर पांजाल पॅनोरामा

खज्जियार चे मैदान

चंबा ची मंदिरे

रावी नदी

दिवस नववा: सर्व आवरून पठाणकोट गाठले. पठाणकोट डलहौसी पासुन ५ तासांवर आहे. पठाणकोट - दिल्ली - हैदराबाद असे परत आलो.

------------------------------------------
केलाँगः
दिवस पहिला: केलाँग ची ट्रिप आम्ही लडाख वरुन परत येताना केली होती. लडाख - मनाली ह्या high way वर केलाँग लागते. केलाँग हे आम्हाला मनाली पेक्षाही जास्त आवडले कारण ईथे मनाली सारखे Commercialization झाले नव्हते. एका दिवसात आम्ही केलाँग च्या आसपास चा प्रदेश पाहिला. ईथे एक सुंदर ५००० वर्षांपूर्वीचे पांडवांचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर एक शिळा आहे. तिचे वजन साधारणः पणे १२५ kg आहे. अशी आख्यायिका सांगतात कि भिम रोज ह्या शिळेच्या वजनाएव्हडे जेवण घ्यायचा. तिथेच बाहेर हिडिंबेच्या पाऊलखूणा देखिल आहेत. केलाँग मधून भागा नदी वाहते.

भागा नदी

भागा नदी

५००० वर्षांपूर्वीचे पांडवांचे मंदिर...

भिम रोज ह्या शिळेएव्हडे जेवण घ्यायचा अशी आख्यायिका सांगतात..

हिडिंबेच्या पाऊलखुणा

दिवस दुसरा: आज आम्हि मनाली ला प्रयाण केले. हा ६ ते ८ तासांचा प्रवास आहे. ऑगस्ट महिना होता तरी लडाख पासून केलाँग पर्यंत आम्हाला पाऊस लागला नव्हता. पण केलाँग सोडले आणि तुफान पाऊस सुरु झाला. आम्ही पाऊसातुन हिमालय पार करत होतो. हिमालय तसा जगातल्या ईतर पर्वतांच्या मानाने तरुण असल्यामूळे ह्याची अजुनही वाढ होते आहे. ईथे नेहमी भूकंप होतात आणि दरडी कोसळतात. आमच्या समोर रस्त्यावर डोंगरावरून छोटे छोटे दगड निखळून पडत होते. आम्ही प्रार्थना करत होतो कि फक्त हे दगड मोठे नसावेत. काही ठिकाणी रस्ता च्या काही भाग खचला होता. आमचा driver कुशलतेने गाडि चालवत होता. पठ्ठ्या मोठा रसिक होता. त्याने गाडिमध्ये गझलांची कॅसेट लावली होती. कल्पना करा, तुम्ही हिमालयातुन सफर करता आहात, बाहेर रप रप पाऊस पडतो आहे, गारवा आहे, वाफाळती कॉफी आहे आणी सोबतिला बडे गुलाम अली खाँ, तलत अझीझ, रशिद खाँ, जगजित सिंह... अशी मंडळी. आयुष्यातल्या काही मोजक्या अविस्मरणीय प्रवासांमधला ते एक प्रवास होता. रोहतांग पास पार करुन संध्याकाळी आम्ही मनाली ला पोहोचलो. दुसर्या दिवशी दिल्ली ला प्रयाण केले.

हिमालय, पावसाळ्यातला

गारठलेल्या शेळ्या...

रोहतांग पास, पावसाळ्यात..

मढी, पावसाळ्यात...

अतुल्य! भारत. क्रमशः

आगामी आकर्षणः पंजाब

मागील प्रकाशित भाग पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 

फारच सुरेख फोटो, एकदा हिमालयात जाउन आलो की पुन्हा पुन्हा जायची ओढ असतेच आणि त्यात असे फोटो पाहिले की अगदीच राहवेनासे होते.

सुन्दर .................................

Hello Chandan,

Good to see the post/pictures, Specially manali, I had been there 10 years back and could remember places but not name, with your post it was easy to relate!

Thanks for adopting the combination of text and picture.

Other problem, I could not find your second post about kashmir. I dont know how to search for it,. I was continuously looking for only home page, but in vain

So request is - can you please post links for all your post at the beginning or end of every post? so its good to refer other parts quickly. I want to pass your post links to all my friends but now cant Find URL of previous posts.

I would appritiate if you update this post with all old parts link.

Thanks and keep writing!

kamalina,
thanks for the suggestion.

>>>So request is - can you please post links for all your post at the beginning or end of every post?

I will work on it. All the photos that r displayed here are linked to Picasa. The problem is, Picasa keeps changing the links. I will update the photograph links in my old posts. I will give links of my olds sequels as well whenever I publish my next sequel.

अतुल्य भारत !
चंदन.. तु जी काय सफर घडवुन आणतो आहेस त्याबद्दल कित्तीही धन्यवाद मानले तरी कमीच ... असेच चालु राहु द्या.. मज्जा येतेय.. नि अभिमान वाटतोय.. भारतातील सौंदर्य बघताना..

चंदन,
मित्रा, तू मला किती मोठी देणगी दिली आहेस याची तुला कदाचित कल्प्ना नसेल. मी १९७४ मध्ये म्हणजे ३५ वर्षापूर्वी, चंबा, खज्जियार, धरमसाला ह्या ठिकाणी trekking ला गेलो होतो. त्या वेळेस आमच्याकडे रंगीत कॅमेरे नव्ह्ते. त्या वेळचे सगळे हिरवे रंग मी आठवणींच्या कोशातच जपले होते. आज तू ते कागदावर उतरवलेस!!
खज्जियारची हिरवळ, तळे, झोपडीवजा घर वगैरे आहे तसेच होते. अतिशय निसर्गरमय!! ह्जारों हिरवे रंग आणि वर स्वछ निळ्या आकाशात कपसांसारखे पिंजलेले पांढरे शुभ्र ढग.

फक्त, ३५ वर्षापूर्वी आम्हां सात-आठ जणांखेरीज त्या जागेवर अगदी कोणीही नव्ह्तं. पण खरी उणीव भासली ती बालकवींच्या फुलराणीची!! हिरव्या तलम गालिच्यांवर फक्त निर्सगच पहुडला होता.

आज तुझ्या चित्रांनी मी खरोखरच खज्जियारला परत गेल्यासारखं वाटतंय.

अनेक धन्यवाद आणि हार्दिक शुभेछा!!

दादूमिया.

dadumia, Yo. Rocks आणि समस्त मायबोलीकर ,
तुमच्या सुंदर आणि ऊस्फुर्त प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
असाच लोभ असू ध्यावा...

समस्त मायबोलीकर,
खाली दिलेल्या दूव्यावर आता तुम्ही "अतुल्य! भारत" ह्या मालीकेचे आतापर्यंत प्रदर्शित झालेले सर्व भाग एकत्र पाहू शकता -
http://www.maayboli.com/node/15407

हा दूवा "मायबोली - लेखमालिका" ह्या सदराखाली येतो.

टिप : पिकासा ने लिंक्स बदलल्यामूळे "लडाख" ह्या भागाचे फोटोज सध्या दिसत नाहीयेत. मी ते update करत आहे.

खुप मस्त. मी पण हिमाचल प्रवास केला आहे पण मला अस वर्णन नाहि जमणार

फोटो मस्त आहेत अगदि अप्रतिम.

मस्त फोटोज. मला एकदम माझा ट्रेक आठवला. आम्ही YHA (Youth Hostel Of India) तर्फे कुलु-मनालीला ट्रेकला गेलो होतो.
बियाज नदी, रायसनचा बेस कँप. आणि पुढचा खौली पास पर्यन्तचा ट्रेक. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.

मस्त फोटोज आहेत.
तुम्ही तुमच्या भारत भ्रमणाचे रितसर पुस्तक छापा ना, अधिकाअधिक वाचकांना लाभ घेता येईल.

वर्षा,
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. Happy
पुस्तक वगैरे लिहीण्याएवढे अजुन तरी काही मोठे काम मी केलेले नाहिये...

Pages