आजचे राशी चक्र
(मायबोलीकरांचे भविष्य कथन करण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे. चू भू द्या घ्या)
मेष आज आठवड्याचा पहिला दिवस. आज तूम्हाला महत्वाची कामे पूर्णत्वास न्यायची आहेत. आज कधी नाही ते बॉस ची बोलणी खावी लागणार नाहीत. कारण तो आज सुट्टीवर आहे.
शुभ बी बी: कुठेही कडमडलात तरी चालेल . काय फरक पडतो ?
वृषभ दिवसाची सूरूवात छान होईल. (त्याचा कालच्या भांगेशी काही संबंध नाही). मन प्रसन्न ठेवा. जमल्यास काम करण्याचा प्रयत्न करा. महिलांना आजचा दिवस चांगला जाइल. पाकक्रियेत नवीन दृष्टांत लाभेल. त्याचा प्रयोग जोडीदारावर करण्यास कचरू नका.
शुभ बी बी: आहारशास्त्र आणि पाककृती/ उपयूक्त माहीती. (पूरूष मंडळी हाच अनूभव स्वयंपाकाचे पूरूषी अनूभव वर टाकू शकतील)
मिथून आजचा दिवस खर्चाचा. आप्तस्वकीय आणि नातेवाइक यांना आत्तापर्यंत टाळलेली ट्रीट द्यावी लागेल. आज नेहेमीचे यशस्वी 'बहाणे' अयशस्वी ठरतील. खर्च टाळण्यासाठी क्रूपया घरी लपून राहू नका. जोडीदारापासून अधिक खर्च योग संभवतो.
शुभ बी बी: काही तरी काटेरी अनूभव
कर्क आज निव्वळ योगा योगाच्या गोष्टी घडतील. आज तूमच्या कामाची कदर होईल. सहकार्यांशी खेळी मेळीचे संबंध ठेवा. हित शत्रूंपासून सावध रहा. आज मायबोलीवर तूमच्या खर्या आय डी ने लिहा. यश तूमचेच आहे.
शुभ बी बी: माझ्या हातून झालेला चूका
सिंह आज तूम्हाला पूर्ण दिवस मायबोली वर बागडता येइल. सर्वत्र मूक्त संचार करा. स्वतःचे अस्तीत्व/ आय डी जाणवू द्या.
शुभ बी बी: सगळी माय बोली पिंजून काढा, जमल्यास 'स्वतंत्र मी मूक्त मी' असा नवीन बी बी सूरू करा.
कन्या आजचा दिवस शुभ आहे. आज एखाद्या शुभ कार्याला जाणे होईल. राहीलेले जी टी जी उरकून टाका. टांगारूंना क्षमा करा. ते तूमच्या राशीचे (शब्दशः घेऊ नका) असतील कश्यावरून.
शुभ बी बी: जी टी जी चा व्रूत्तांत टाका. जी टी जी ला उपस्थीत संख्यागणात आणि केलेल्या धमालीत तूम्ही योग्य ते 'पाणी' टाकालच.
तूळ आज तूमच्या आयुष्यात गमतीशीर घटना घडतील. आज तूमचा त्रैमासिक पास संपलेला असेल. तरीही तीकीट तपासनिस तूम्हाला पकडणार नाही. (परतीच्या प्रवासात तिकीट अवश्य काढा) कोणीतरी सहप्रवासी तूम्हाला आपणहून जागा देईल (बसण्यास . रहाण्यास नव्हे). ऑफीस मधली फटाकडी पोरगी आज तूमच्या कडे बघून स्मीत हास्य करेल. कॉलेज कूमारांसाठी आज प्रेम योग संभवतो. पण त्यासाठी कॉलेजला अवश्य जा.
शुभ बी बी: पूरूष जन्मा ही तूझी कहाणी/ पून्हा पूरूष जन्मा तूझी कहाणी (या पैकी जो चालू असेल तो). महिला हाच अनूभव समानतेवर लिहू शकतात.
वृश्चिक आज तूमच्या हातून मोठे कार्य घडेल. आज तूमच्या हातून काहीतरी विशेष लिखाण संभवते. तूमच्या मायबोली सहकार्यांना त्यापासून वंचित ठेवू नका. पूढल्या विवंचने पासून परमेश्वर त्यांच रक्षण करो. आमेन
शुभ बी बी: आज फक्त गूलमोहर गाजवा.
धनू आज धनयोग संभवतो. आज कँटीन मधल्या चहा चे पैसे तूमचे सहकारी भरतील. लक्षात ठेवा 'पैसे वाचवणे म्हणजेच पैसे कमावणे' पान विडी, सिनेमा आणी हॉटेल सोडून इतर वायफळ खर्च टाळा.
शुभ बी बी: आज रोमातच रहा.स्वतः आराम करा.इतरांनाही करू द्या.
मकर आजचा दिवस छान असेल. आज हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाइल. पण त्यासाठी मुद्दाम काम करण्याची गरज नाही. वरीष्ठांची मर्जी सांभाळा. कनिष्ठांना सांभाळून घ्या. थोडक्यात रोजच्या सारखेच वागा.
शुभ बी बी: नौकरी एक लाचारी ?
कुंभ आज तब्येतीच्या क्षूल्लक तक्रारी जाणवतील. पण त्याने घाबरून जाऊ नका. अभक्ष भक्षण आणि अपेय पान टाळा.केल्यास परीणामांची तमा बाळगू नका. येणार्या 'बूधवार' ची आतूरतेने वाट पहा.
शुभ बी बी: तणाव मूक्ती आणि व्यसन
मीन आज वाद विवाद टाळू नका. दिव्यांचा वापर सढळ हस्ताने करा. शक्यतो गूंतागूंतीची मते मांडा म्हणजे त्यातून पळवाट काढणे सोप्पे जाइल. तूम्ही कूशल राजकारणी आहातच. त्याची अनूभूती घ्या.
शुभ बी बी: वाद विवाद आणि चर्चा
छान,एकदम खुसखुशीत झालय भविष्य!
केदार,
तुझी रास कुठली यातली?
शुभ बी बी ची कल्पना एकदमच भन्नाट आहे.
ए. खरच भा.प. ९ च राशी का लिहिल्या, उरलेल्या ३ पण लिही.
लीहील्या आत्ता
बाकीच्या ३ आत्ता टाकल्या. काल ९ राशी टाकल्यावर बापू आला आणि माझ भविष्य (उद्याचे कार्यक्रम) सांगून गेला.
काय बर असेल ' बापूची' रास ?
अगदी श्री शरद उपाध्ये स्टाइल मध्ये जाहीरात बर :))
दिव्यांचा वापर सढळ हस्ताने करा......
खुप प्रयत्न केला पण इथे दिवेच नाही देत आले.
असो. खुप आवडले भविष्य.
मस्त!
एकदम मस्त लिहिलं आहेस केदार.. खुशखुशीत विनोद
नवीन बीबींची नावं भन्नाट आहेत.. सुरु करायचा मोह होतोय 
झ्याक झालेय
सही लिहीलेय एकदम
शुभ बीबी
केदार,
केदार, बीबी बीबी असा धोशा लावलाहेस हां तू!! तिथे किनार्याला एकदम 'हम' वगैरे!! काय, नक्की काय चाललय रे???

सध्या
सध्या त्याला कापो चे वेध लागल्याची लक्षणे आहेत गं!!

हीहीही
हीहीही स्वा

का बर
का बर तूम्ही गरीब बिच्चार्या मूलाची मस्करी करून राहीले हो
गरीब
गरीब बिच्चार्या मुलाची मस्करी करणं सोप्पं असतं म्हणून!!
केदार
छानच लिहीले आहेस.
मजा आला.
मस्त !!!
राशि भविष्य आवडले...
छान मायबोली राशीचक्र सुरु झालं
केदार सही !! लगे रहो.
विनोदी अन खुसखुशीत..
चांगले लिहिलेस केदार..
खूप खूप
खूप खूप धन्यवाद मंडळी
मजा आली
मजा आली केदार...
टांगारूंना क्षमा करा !१ ('टांगारू' शब्द आवडला
)
मस्त जमलय
मस्त जमलय रे !
धन्यवाद
धन्यवाद संदीप आणि सव्यसाची
छान
छान लिहिलेस केदार..
धन्यवाद
धन्यवाद दिपूर्झा
केदार, नवीन
केदार,
नवीन business चांगला आहे, राशीचक्रकार शरद उपाध्येंच मार्केट डाऊन करायचा विचार आहे वाटतं !!
दिवे घ्या !!
सन्दिप.
संदिप
संदिप
अहो पुढच्या आठवड्या साठी पुढच्या राशीचे भविष्य आपल म्हणून वाचायच. हाय काय नी नाय काय 

मंदार
थोडक्यात एक एक रास पुढे सरकून घ्यायची
केदार... तुम
केदार...
तुम्ही हे रोज नाही देत का? आणि क्रुपया देताना दिनांक घालुन द्या
मला अगदी
मला अगदी ते झी मराठी वर सकाळी लागतं ना...तेच पाहत असल्याचा भास झाला

भारी !! मजा आली केदार!
खर्च टाळण्यासाठी क्रूपया घरी लपून राहू नका. जोडीदारापासून अधिक खर्च योग संभवतो. >>
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
सहि रे!!!!!
सहि रे!!!!!
सही रे
सही रे केदार.
धन्यवाद
धन्यवाद आशू, चिन्या आणि के पी
मस्त.................
मस्त.......................
किती हुशार ....
मस्तच -------------
मस्तच
------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
धन्यवाद
धन्यवाद गणेश ,अनघा आणि अथक
Pages