Submitted by योडी on 25 March, 2010 - 23:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
पोहे १ वाटी
सुकं खोबरं १ वाटी
२ सुक्या मिरच्या
मीठ चवीनुसार
क्रमवार पाककृती:
पोहे आणि सुकं खोबरं वेगवेगळं ५ मिनीटं भाजुन घ्यावं.
थंड झालं की दोन्ही एकत्र, सोबत २ सुक्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ घालुन मिक्सरला लावावं.
अगदी बारीक पण नाही आणि जाडही नाही इतपत बारीक करावं.
एकदम सुकी होते ही चटणी.
वाढणी/प्रमाण:
वरील प्रमाणाने जवळपास ३-४ दिवस पुरेल इतकी होते, पण झाल्यावर कोण किती खातंय ह्यावर अवलंबुन.
माहितीचा स्रोत:
आई.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यो, मस्त पाकृ. नक्की
यो, मस्त पाकृ. नक्की करणार.
यत थोडी लसुण टाकली तर??????
योडे पुढच्या गटगला घेऊन ये ही
योडे पुढच्या गटगला घेऊन ये ही चटणी (किती पाकृ टाकता रे सगळे. विकांताला करायची यादी वाढतच जाते ना अशाने :P)
यत थोडी लसुण टाकली
यत थोडी लसुण टाकली तर??????
>>
थोडी ओलसर होईल चटणी. आईने तरी टाकली नाहीय.
त्यापेक्षा किंचीत तेलावर
त्यापेक्षा किंचीत तेलावर कढीपत्ता कुरकुरीत करुन घेवून चटणी सोबत वाटला तर !
आणि त्याबरोबर थोडा तीळकूट आणि
आणि त्याबरोबर थोडा तीळकूट आणि मीरपूड वाटून लावली तर!!!
धन्यवाद योडे!
किंवा जिरं पण चालेल ... ट्रेक
किंवा जिरं पण चालेल ... ट्रेक ला न्यायला चांगली आहे, रश्यात पाणी जास्त झाले [ओतले] तर घट्ट्पणा येण्या साठी घालता येईल.
ट्रेक ला न्यायला चांगली आहे,
ट्रेक ला न्यायला चांगली आहे, >> योडी.. मग पार्सल पाठवुन दे लगेच
छानच आहे रेसिपी. तेल घालून
छानच आहे रेसिपी. तेल घालून दोशाबरोबरपण मस्त लागेल.
पोहे भाजुन घेउ शकतो कि॑वा कडक
पोहे भाजुन घेउ शकतो कि॑वा कडक उन्हात वाळवुन घेउ शकतो.
चटणीत दही टाकले तर, चटणीला ओलसर पणा येइल आणि चव पण छान लागेल.
मस्तय योडे, पोहे पातळ घेतेस
मस्तय
योडे, पोहे पातळ घेतेस की जाडे की मध्यम की चिवड्याचे??
पोहे कोणतेही घे. तसेही
पोहे कोणतेही घे. तसेही मिक्सरलाच लावायचेत.
>>>पोहे कोणतेही घे. तसेही
>>>पोहे कोणतेही घे. तसेही मिक्सरलाच लावायचेत.
हे पहा मी गुळवणी बोलतोय.. पोहे मिक्सरलाच लावायचेत तर तुम्ही कोणता गोंद वापरता? फेव्हिकॉल चालेल का?
तुम्ही कोणता गोंद वापरता?
तुम्ही कोणता गोंद वापरता? फेव्हिकॉल चालेल का? >>>> मिक्सरला आतून चिकटवणार की बाहेरुन हे नाही विचारलेस शँकी? त्या प्रमाणेच adhesive वापरावे लागेल ना?
आता ह्यापुढे योगे चटणीची
आता ह्यापुढे योगे चटणीची रेसिपी लिहिताना फक्त कशाची चटणी ते लिही. त्यात काय टाकायचे ते बाकिचे सांगतील वरच्याप्रमाणे.