१९ फेब्रुवारी १६३० साली,
जागा होती किल्ला शिवनेरी
जन्म झाला एका महापुरुषाचा...
जो बदलणार होता इतिहास भारताचा
त्या महापुरुषाला प्रिय होती त्याची
मराठी मायभूमी..
त्या महापुरुषाचे नाव होते श्री छत्रपती शिवाजी महाराज...
जय मराठी,जय शिवाजी...
वयाच्या १५व्या वर्षी,
त्याने शपथ घेतली की,
तो निर्माण करेल एक राज्य मराठी..
जय मराठी,जय शिवाजी...
शिवछत्रपती व त्यांचे हातभर माळवे गडी,
आपल्या माय मराठीसाठी लढी,
त्यांना आशिर्वाद देणारी होती माता भवानी..
आपला जीव द्यायला तयार ते,
आपल्या राजासाठी...
जय मराठी,जय शिवाजी...
छत्रपती कब्जा करत गेले किल्ल्यावर किल्ला,
त्यामुळे चिडुन उठला आदिलशाह...
त्यांनी मराठी माणसे एकत्र केली
आणि त्यांच्या शत्रूंची मिरवणूक नेली
त्यांना पाठिंबा होता त्यांच्या गडींचा काही,
जसे तानाजी,मुरारबाजी,बाजी...
जय मराठी,जय शिवाजी...
शिवाजी महाराज आग्र्यात औरंगझेबाच्या तावडीत फसले
पण तेथूनही चतुराईने पळून निघाले
त्यांनी सामना केला शाईस्तेखान,अफझलखानचा
पण नाही खाली पडू दिला मान मराठ्यांचा.
तेव्हा एकच नारा होता जागी जागी...
जय मराठी,जय शिवाजी...
एक कटा आला,सगळे सुरळीत चालु असताना
नाव मिरझाराजे जयसिंह,एक राजपूत
त्याने लढाई केली मराठ्यांशी,
सर्वत्र रक्त बम्बाळ,गोळे बारूद
सगळे असूनही त्यांनी सावरली,
आपली माय मराठी...
जय मराठी,जय शिवाजी...
नंतर होता एक सोहळा,
शिवरायांच्या राज्याभिषेकचा,
शिवाजी झाले छत्रपती,
सर्वत्र हेच शब्द होते मराठ्यांच्या ओठी...
जय मराठी,जय शिवाजी...
काही वर्षांनी,
२० एप्रिल १६८० रोजी,
गेला तो महापुरुष देवाघरी,
तेव्हा होते दु:खात,असणारच
शिवछत्रपतींचे राज्य मराठी,
अजूनही लोक हेच म्हणतात...
जय मराठी,जय शिवाजी...
-शंतनु श.घारपुरे