काही घटना:
१) नुकतीच नगर जिल्ह्यातील एका कारखान्यत अनेक कोटींची साखर चोरी गेली. कालांतराने काही चोर पकडले. सुत्रधार अजुन मोकाट आहे.
२) एका सहकारी कारखान्याच्या संचालकाच्या खाजगी मालकीची 'सहकारी' कापुस प्रक्रिया संस्था आवारात आग लागुन पाच लाखाचा कापुस जळाला. काही दिवसापुर्वी साखर कारखान्याच्या निवडणुका होत्या.
३) नुकतेच एका आमदाराच्या 'मालकी'च्या सहकारी कारखान्याच्या गोदामात आग लागुन २० कोटी ची साखर जळाली.
४) अशा अनेक घटना पेपर मधुन वाचल्या जातात. चोरलेली साखर अन चोर कधी पकडले जात नाहीत. २४ तास सुरक्षा रक्षकांचे वेढे असलेली गोदामे अन प्रत्येकी आगीचे पाच पाच बंब असुनही कारखाना परिसरात आग ६-८ घंटे आटोक्यात येत नाही. अन साखर कोट्यावधीची चोरीला जाते.
- सर्व शेतकर्यांना या आगीचे अन त्यामागील धुराचे सुत्रधार माहीती आहेत. पण न्यायव्यवस्थेमध्ये त्यांना शिक्षा मिळु शकत नाही.