परवा मला चेहरा दिसला, ओळ्खीचा म्हणून नमस्कार केला,
वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला
त्याच्या पोराने त्याला डॅडी म्हणून हाक मारल्याने
त्याला मी 'हाऊ आर यु' असा सवाल केला
हाय्,हॅलो ने सुरवात करत आमचा हिंदीत संवाद झाला
वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला
स्वदेश,संस्कार,संस्कृतीचा कळवळा
आम्ही दोघांनी दिवेलागणीला
बीयर घेत घेत इंग्रजी शब्दात व्यक्त केला
वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला
आमच्या बालपणी असं नव्हत ते
आजच्या तरूणांना माणुसकीची जाण नाही
या विचाराचा धुर आम्ही दोघांनी सिगारेटबरोबर हवेत सोडला
वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला
अनाथासाठी आपण काहीतरी कराव ते
समाजाच्या ऋणातून आपण सुटाव
असा विचारच फक्त आमच्या डोक्यात आला
वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला
परदेशात कसं शिस्तीत चालतं ते
प्रत्येकजण कसा नियमाच पालन करतो
याचा उहापोह आम्ही दोघांनी रस्त्यावरील सिग्नल तोडत केला
वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला
पाणी जिरवा-पाणी वाचवा ते
अन्नधान्याची नासाडी थांबवली पाहीजे
याचा वाद आम्ही मॅक्-डोनाल्ड चा बर्गर अर्धा तसाच ठेवत घातला
वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला
देशात सामान्याचेच हाल होतात ते
भ्रष्टाचाराला आपण संपवले पाहीजे
याच्यावर एक विचार आम्ही तिकीटे ब्लॅक ने घेत केला
वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला
संभाषणाच्या शेवटी चालताना ठेच लागताच
"आईग" असं तो आणि "च्यायला" असं मी
म्हणताच-- दोघेजण मराठीच आहोत याचा शोध आम्हाला लागला
वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला
हिंमत
माझी आता प्रतिसाद द्यायची पण हिंमत होत नाहिये.
भयाण,... भयाण परिस्थिती झालिये गुलमोहरची.
हा कौतुक
हा कौतुक आहे का टोमणा?
कारण यात भयाण काय आहे हे माझ्या बाल/बालीश बुद्धीला समजु शकेल का?
यातील भयावहता कमी करण्याचा प्रयत्न करू.
माझ्या
माझ्या बालबुद्धीला जरा तुमची कविता समजावून सांगाल का?
काहीच समजलेलं नाहिये.
प्रयत्न स्त्युत्य हे
>>>> वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला
हे धृवपद अस्थानी होत नसून पदाची निवड चूकीची हे! त्यामूळे मुळ कवितेच्या गाभ्याला जाम धक्का पोहोचतो हे!
तुम्हाला पुढील गोष्टी सान्गायच्या हेत
तो आणी तुम्ही शेजारी हात
हे कळले ते देखिल एक वर्षाने
इथेच "एक वर्षाचा" सम्वन्ध सम्पतो
तुम्ही एक्मेकान्शी इन्ग्रजी आणी हिन्दित बोललात
कारण त्याचा मुलगा त्याला "डॅडी" म्हणुन हाक मारतो
तुम्ही पुढील सर्वच कडव्यात उपहास वापरायचा "प्रयत्न" करीत इतर परिस्थिती रेखाटायचा प्रयत्न केला हे, त्याची पुनरुक्ती टाळतो, पण तिथे कुठेही "एक वर्षाचा" सम्बन्ध येत नाही, सबब "धृवपद" वेगळे हवे, ते सुधारुन पुन्हा लेखन करा!
अन्यथा विषय चान्गला निवडला हे!
प्रयत्न करीत रहा, माझ्या सारख्या अशा प्रतिक्रियान्नी नाऊमेद होऊ नका! पण डायरेक्ट इथे टाकण्या ऐवजी जर जुन्या मायबोलीवर "शहरान्"मध्ये कविता टाकली तर सुधारणेसन्दर्भात आधीच सुचना मिळून इथे गुलमोहरात उत्कृष्ट तेच तुमच्या नावावर टाकले जाईल असे वाटते, बघा बोवा काय करायचे ते, तो काही नियम नाहीये!
एक प्रयत्न
परवा मला चेहरा दिसला, ओळ्खीचा म्हणून नमस्कार केला,
वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला>>> हं तर मला असं कळल की "परवा कुणीतरी दिसलं तो चेहरा ओळखीचा वाटला आणि तो माझ्या (म्हणजे रचनाकाराच्या) शेजारचा फ़्लॅटवाला निघाला"
(इथे रचनाकाराला बहुतेक असं म्हणायच असावं की आपण आपल्या शेजा-यांनापण ओळखत नस्तो.)
परवा मला चेहरा दिसला, ओळ्खीचा म्हणून नमस्कार केला,
वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला
त्याच्या पोराने त्याला डॅडी म्हणून हाक मारल्याने
त्याला मी 'हाऊ आर यु' असा सवाल केला
हाय्,हॅलो ने सुरवात करत आमचा हिंदीत संवाद झाला
वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला >>>>इथे काय म्हणायचंय ते अजिबात नाही कळलं हां
आता पोरानी डॆडी म्हणल्यावर प्रश्न करायच काय कारण आणि त्यानंतरचा हिंदीमधे झालेला संवाद.
(म्हणजे बहुतेक आपण हल्ली बोलायची सुरवात इंग्रजीमधे करतो आणि नंतर हिंदीमधे संवाद घडतो, म्हणजे आपण मायबोलीला कसे विसरत चाललोय? असं सांगायचं असावं)
स्वदेश,संस्कार,संस्कृतीचा कळवळा
आम्ही दोघांनी दिवेलागणीला
बीयर घेत घेत इंग्रजी शब्दात व्यक्त केला
वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला>>>इथेही संस्कृती रक्षणाचा प्रयत्न दिसतोय.पण ते करताना आपण काय कर्तो ते मांडलय .
हुश्श्य दमले.....
पुढच सांगा रे कोणीतरी.
अनुमोदन
वरच्या एलटीच्या पोस्टला अनुमोदन...
काही सांगावस वाटतय म्हणून हा पोस्ट प्रपंच
१) कवितेला गम्मत म्हणून् घेउ नका
२) इथे सगळेच जणं कविता ही गोष्ट अतिशय गंभिरपणे वाचतो.
३) तेंव्हा उगाच चार यमकं जुळवली म्हणजे कविता झाली, एखाद्या सामाजिक विषयावर २-४ वाक्य लिहिली म्हणजे कविता झाली, असं नसत.
४) तुम्हाला लिहायची आवड आहे(च) अस दिसतय, मग आधि खूप वाचन करा, निरनिराळ्या कविंच्या कविता, गझल संग्रह वाचत रहा. इथेच नेटवरच तुम्हाला पुष्कळ कविता वाचायला मिळतील.
आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे आलेल्या प्रतिसादांमधून काहीतरी बोध घेउन सुधारणेचा प्रयत्न करा.
शुभेच्छा
सर्वांचे
सर्वांचे मनापासुन आभार.
सुचना कळाल्या.
जमल तर सुधारणा करू अन्यथा लिखान थांबवू.
आणि हे विधान मनापासून, त्यात कोणताही उपहास/उपरोध नाही
धन्यवाद