Submitted by sandeepguru on 20 March, 2008 - 00:28
हि रात्र नाहलेलि प्रनयात आसवाच्या ||ध्रु||
डोळ्यास लागलेलि ओड त्या रुपाची
शरिरास लागलेलि ओड त्या सुखाची
वेदना उरी या आज गोड भावनाच्या..... ||ध्रु||
स्पार्शात लाजनारा उत्कनठ हा प्रितिचा
शब्दात काय मावे भाव या ऊरीचा
मन त्रुप्त त्रुप्त झाले डोहात वासनाच्या......||ध्रु||
गुलमोहर:
शेअर करा
बाप रे
एका कवितेत तीन ध्रुवपदे
एकही शब्द शुद्ध लिहिलेला नाही
आणि वर कविता म्हणून हा प्रकार अत्यंत हीन आहे.
किळसवाणी कविता आहे.
ऍडमिन, गेले काही दिवस गुलमोहर म्हणजे हवा तसा गोंधळ घालायचे ठिकाण झालेले आहे
यावर कृपया काहीतरी कारवाई करा...
मला स्वतःला गुलमोहरवर लिहिणे दूर पण वाचायला पण कंटाळा येतोय.
खरच
कवितेच्या नावाखाली काहीही खरडलय!! प्लीज, असलं काहीतरी लिहू नका!!
sandeepguru साहेब
आपली कविता(?)जरा आधि आपल्या वहित लिहून बघा साहित्याची जाण असलेल्या आपल्याच चार मित्रांना वाचून दाखवा.
आणि योग्य प्रतिसाद मिळाला तरच इथे किंवा अन्य कुठल्याही साईटवर आपल्या रचना प्रसिद्ध करा.
तुम्ही इथे लिहिण्याबद्दल आमची जराही ना नाहीये. पण उगाच एखादं प्रसिद्धी माध्यम फुकटात उपलब्ध आहे, फारसे प्रयास पडत नाहीत टाईप करायला म्हणून असं काहीही लिहून या संकेतस्थळाचा अपमान करताय तुम्ही. आपल्या मायभुमीपासून लांब असलेल्या कित्येक मराठी लोकांचा विसावा आहे मायबोली म्हणजे.
या संकेतस्थळाच्या व्यवस्थापकांना पश्चाताप होइल असं लिहू नका प्लीज.
यामधे आपला अपमान करायचा जराही मानस नाही. फक्त आपल्या रचनेबद्दलच हे मत आहे.
खरोखर चांगली रचना असेल तर इथेच तुम्हाला दादही नक्कीच मिळेल.
Tanks
Dhanyawad Nandini,IT Girl n Shyamli,
Dahanyawad yaa sathi ki mazi Dhruvapadachi chuk Dakhawalya baddal actully hi kavita mazya mitrane type keli aahe
tyach barobar Nandini Kavite baddalcha tuza AJANTEPANA pahun keev yete.
Shamali tuza pratisad aawadla Marathi lihnyat jara chuk hote. pan tuhi hi kavita ek priyakarachya najretun pahavis hi VINANTI.
Nandini kontyahi lekhacha positive attituide ne vichar karat jaa DEV TUJHYAWAR KRUPA KARO
गैरसमज
एक गोष्ट लक्षात घ्या मी तुमच्या रचनेच कौतुक केलेलं नाहीये
तुम्ही एकदातरी वाचलंय का स्वत: काय खरडलंय ते?
हि रात्र नाहलेलि प्रनयात आसवाच्या <<<< हे वाक्य गद्य वाचलं तर "ही रात्र आसवांच्या प्रणयात न्हायलेली"... म्हणजे काय? आसवांचा प्रणय?
डोळ्यास लागलेलि ओड त्या रुपाची
शरिरास लागलेलि ओड त्या सुखाची<<<<
प्रणयभावना देखील नाजूक पद्धतीने व्यक्त करता येतात. इथे तुम्ही कुठल्याही माणसाच्या मनात ज्या भावना येतील त्या तशाच मांडल्या आहेत. यात कसलं काव्य? आणि असल्या शब्दांत या भावना व्यक्त करणं हे कुणालाही 'हीन'च वाटेल वाचल्यावर.
स्पार्शात लाजनारा उत्कनठ हा प्रितिचा<<<<<<
म्हणजे काय? काहीही कळत नाहीये या ओळीवरून.
मन त्रुप्त त्रुप्त झाले डोहात वासनाच्या<<<<
कविता प्रियकराच्या दृष्टीकोनातून म्हणताय तर प्रेमभावना हवी ना? वासना कशी येईल तिथे? वासनांचा डोह वगैरे शब्द कुठल्या context मध्ये वापरले जातात याची तुम्हाला कल्पना आहे का?
आता तुम्हाला प्रत्येक ओळीवर जर स्पष्टीकरण द्यायला लागलं, तर कविता जमली नाहीये हे आपोआप स्पष्ट होतं.
मुळात हे लक्षात घ्या की नुसते शब्द शब्द जोडून कविता होत नाही. आपण काहीतरी जबरी शब्द वापरले म्हणजे जबरी कविता होईल असं नसतं. तुम्ही गुलमोहर अर्काइव्ह मध्ये जाऊन लोकांच्या कविता का बघत नाही वाचून?
ह्म्म...
मी कवितेबद्दल अजाण आहे हे तुमचे मत वाचून बरे वाटले.
तुम्हाला माझी कीव येते हे पाहून आनंद झाला.
बरं एक सांगा, तुम्ही कवी आहात की लेखक?????
मी स्वतः लेखिका आहे. मायबोलीवर बरंच काही लिहिलेलं आहे. यामधे एक दीर्घ कादंबरी पण आहे.
हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच की, positive attitude ने विचार करण्यासाठी लिखाणामधे दम असावा लागतो. त्यासाठी आपण जे लिहितोय ते स्वतःलाच पटावं लागतं. शब्दाला शब्द जुळाले की कविता होत नाही.
तुम्ही जे काही लिहिलय त्याला कविता म्हणत नाहीत. मायबोलीवर कधीतरी वैभव जोशी, सारंग, दाद, प्रसाद, नचिकेत याच्या कविता आणि गझला वाचा. मायबोलीकरानी माझ्या लिखाणामधे सुधारणा होण्यासाठी खूप मार्गदर्शन केलेले आहे.
स्वतः ची कविता पुन्हा वाचा. शब्दलेखनातल्या चुका काढून वाचा. आणि त्यातल्या चुका स्वत: शोधा. स्वतःच स्वतःचे कठोर समीक्षक व्हा.
तुम्ही शामलीला म्हणताय की ती कविता प्रियकराच्या नजरेतून बघ...
डोह वासनाचा????? प्रियकराच्या नजरेत????? वासना, कामभावना, प्रेम यामधे फरक आहे. जो तुम्हाला समजलेला दिसत नाहिये. तो समजून घ्या.
काहीही मदत हवी असल्यास मायबोलीकराकडून मिळेलच.
Aabhar Pradarshan
Shyamali wa nandini mee aaj khupach Kush aahe karan tumchya rupana malaa khup changalya Samikshak milalyat.
maazi hi Kavita mee Samikshak shodhasathi ithe pathavli hoti karan mala mazya chuka janun ghyayla aawadtwe (pan Samzdaar mandlinkadunch) tumche khup aabhar ithun pudhe mazya kavita post karto Laksha asudya. fakta ek madat kara mala ithe shudha marathi typing sathi kaay karawe te sanga plz.
ctrl \
मराठी टाईप करण्यासाठी ctrl \ टाईप करा. (आता शुद्ध मराठी टाईप करायला नक्की काय करायला हवे ते तुम्हीच ठरवा :))
अरे वा!! इतके दिवस माझ्या अजाणतेपणाची कीव करता करता आता मला समीक्षक बनवलेत.. प्रगती आहे.
अशीच प्रगती कवितेत दाखवलीत तर बरे होइल.
sandeepguru, Shyamali व
sandeepguru,
Shyamali व nandini च्या प्रखर लिखानाबद्दल लोकमान्य कदाचित केसरी मध्ये असे म्हणाले असते --
"या दोघींच्या समीक्षणाबद्दल्(का टिकेबद्द्ल) जो कोणी बोलेल त्याचे(माझ्यासारखा) डोके ठिकाणावर आहे का?"
प्र.के.अत्रे मराठामधे कदाचीत असे म्हणाले असते--
"या दोघींसारखा काव्य जाणता(?) गेल्या १००० वर्षात झाला नसेल वा पुढील १००० वर्षात होणार नाही "
आपण काय थोडेच कवी आहोत या जोडीसारखे...राहवत नाही म्हणून काहीसे..
या जोडगोळीच्या वाचनाची रीतच न्यारी
कवितेची चिरफाड जणु कसायाची सुरी बरी
तुम्ही आम्ही काय बापुडे धरुया थोडी सबुरी
तुका सांगुन गेला निंदकाचे घर असावे शेजारी....
VivekTatke
VivekTatke साहेब,
मी स्वतःला समिक्षकच काय कवि सुद्धा समजत नाही. फक्त एका वाचकाच्या भुमिकेतुन मत मांडायचा प्रयत्न केला होता. दुर्दैवानी त्यातल काय घ्यायचं हे तुम्हाला समजलं नाही.
असे प्रतिसाद मिळून कदाचित कवितांबद्दल गंभीरपणे विचार करणारे लोक अस्तील तर लिखाणात प्रचंड सुधारणा होते हा इथला(मायबोलीवरचा) अनुभव आहे.
असो, इथे वाट्टेल ते लिहिण्यास तुम्ही मुखत्यार आहात.
आणि या वरच्याच कवितेविषयीच जर बोलायच झालं तर काय अर्थ असलेली ही कविता आहे? जरा सांगता येइल का तुम्हाला? असल्या घाणेरड्या भावना प्रियकर म्हणून कवि कवितेमधे मांडत असेल तर धन्य तो प्रियकर आणि धन्य ती प्रेयसी. आणि हो त्या कवितेच समर्थन करणारे तुम्ही पण महान आहात.
माफ करा, आमचीच समज कमी पडली.
आपलं चालु द्या.
श्यामली, गा
श्यामली,
गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता हे ऐकलं नव्हतंस का यापूर्वी?
बर आता आलं ना प्रत्यंतर?
उपाय एकच. एकदम अक्सीर इलाज
अनुल्लेख अनुल्लेख!
अज्जुका, गे
अज्जुका,
गेले कित्येक दिवस या विवेकसाहेबाच्या कवितेला एकही प्रतिसाद मिळालेला नाहीये. इतका अनुल्लेख करूनही ही व्यक्ती कविताचा रतीब पाडतच सुटलेय. अनुल्लेख करून काही उपयोग होत नाही म्हणून तर मी तोंड उघडलय. शेवटी मायबोलीवरती उत्साही लेखन करणारे खूप आहेत, मात्र हाती मिळालय म्हणून काहीही लिहत सुटलं, तर त्रास आपल्यालाच होतो ना...
दर्जाचा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी शुद्धलेखनाचे काय?? त्यामधे तरी कुठे सापेक्षता नसेल ना..
कमीतकमी त्याचा तरी आग्रह धरलाच जाऊ शकतो ना??
"लिखान" करणारी लोक इथे आले आहेत.
मी तुमचा
मी तुमचा प्रतिसाद वाचला.
मायबोलीवर हे माझे शेवटचे टायपिंग.
माझ्या कवितामुळे तुम्हाला जो भावनिक,मानसिक आणि बौद्धिक त्रास झाला त्याबद्दल क्षमस्व.
फक्त एकच --पु.ल. च्या भाषेत सांगावयाचे झाल्यास--
"दाढी करावी- पण जखम न होईल असी"
हा मुलभुत नियम आपण सर्वजण विसरतोय असे वाटतेय. असो.....
कळलं नाही
विवेक साहेब, मला एक कळत नाही कविता संदीप गुरुची असताना ती तुम्ही तुमची आहे असे का म्हणताय?
संदीपगुरुच्या कवितेवर चर्चा चालु असताना तुम्हाला राग का यावा (की हे दोन्ही आयडी तुमचेच आहेत?)
तुम्ही मायबोली सोडताय हे दुर्दैवच आहे म्हणायचं, यातुन असं दिसुन येतं की तुम्हाला शिकायची इच्छा अजिबात नाहीये. असा पळपुटेपणा करु नका हो. इथेच तुम्ही छान छान कविता लिहुन सगळ्यांची वाहवा पण मिळवु शकता की.
मायबोलीकर मंडळी वाईट नाहीत हो!!!
याउप्पर तुमची इच्छा!!!
Priya Vivek Aani Ajjuka.
Vivek Saheb Pratham mi tumchi MAAFI magto karan kamachya garbdit tumcha pratisaad wachnyat aala nahi to aata wachala faaar bare watle.
Aata Ajjuka tumhi kelela mhanicha aasa FALTU wapar Awadla Nahi Krupyaa ase GADHWA sarkhe likhaan thambawa.
Tumhala eethe Mr.BEEchya mjhyaach pttitlya kavita changlya watatat yaache dukha.
Aani RAJYA ha ID SANDEEPGURUchach aahe
RASIK Banare...........................
मराठी
संदीपगुरू,
तुम्ही मराठी मधून कविता करता, मग रोमन मराठी मधून का टाईप करता? आधी मराठीमधून लिहायला शिका. मग, आपण तुमच्या कविताबद्दल बोलू,
तुम्ही अज्जुकाला चक्क गाढव म्हटलेले आहे, देव तुमचं रक्षण करो.
त्यावर तुम्ही स्वतःच्या कविताची तुलना बी च्या कविताबरोबर करताय.... कशाला? तुम्हाला जे लिहायचय ते लिहा. विनाकारण अरेरावीचा सूर आणून काहीही निष्पन्न होणार नाही,
तुमच्या माहितसाठी खास सांगते, मायबोली ही फक्त कविता प्रसिद्ध करण्यासाठी नाही आहे, गेल्या १० वर्षापासून मायबोली हे फक्त मराठी लोकानी एकत्र येण्याचे ठिकाण आहे. यामधून कित्येक चांगल्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. मायबोली हे एक कुटुंब आहे. गेली कित्येक वर्षं मायबोलीकर एकमेकाच्या संपर्कात आहेत. साहित्यनिर्मितीखेरीज अनेक बाबी आहेत ज्या मायबोलीकराना बांधून आहेत.
तुम्ही, विवेक ताटके हे मायबोलीवर नवीन आहात. मायबोलीच्या या घट्ट विणीची तुम्हाला अर्थात कल्पना नाही. तुमच्या कविता फालतू आहेत हे ऐकून तुम्ही दोघे भडकला आहात. मान्य आहे, मात्र त्यामागे सुधारणेचा प्रयत्न न करता तुम्ही अत्यंत रागाने हेवे ते बरळत सुटला आहात.
तुम्ही शेवटी रसिक बनारे.. अशी हाक घातली आहे. तुमच्या दोन्ही कविता कुठल्या पद्धतीने रसिकतेचा आग्रह धरतात? तुमच्या कवितेतल्या चुका दाखवून धरल्या तरी तुम्ही "माझेच बरोबर" हा हेका का धरलाय??
विवेक ताटके साहेब.
तुम्ही मायबोलीवर लिखाण थांबवलेत त्याचा मला खरेतर आनंद झाला आहे. कारण कविता विभागामधे पडणारा कविताचा रतीब आता कमी होइल. तुमच्या इतक्या कविताना एकही प्रतिसाद न मिळाल्यामुळे बिनाजखमेची दाढी होत आहे असा आमचा समज होता. पण ते तुम्हाला न समजल्यामुळे शेवटी मायबोलीकरानी बोलायला सुरुवात केली. तरीही तुम्ही इथे येऊन आगाऊपणा करणारच असाल तर माझा नाईलाज आहे.
शेवटी एक कवी होण्यासाठी, एक लेखक होण्यासाठी मनामधे एक संवेदना असावी लागते. सतत नवीन गोष्टी समजवून घेण्यासाठी इच्छा असावी लागते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण काय म्हणु इच्छितो, ते लोकाना समजवण्याची हातोटी असावी लागते. ज्याक्षणी तुमचे साहित्य लोकाना समजत नाही, त्याक्षणी ते साहित्य बिनकामाचे.
नंदिनी, असल
नंदिनी,
असल्या फडतूस प्रवृत्ती मायबोलीवर यापूर्वीही आल्या होत्या, अधूनमधून येत असतातच. त्यांचं अस्तित्व संपूर्ण मायबोलीला व्यापून रहात नाही अथवा मायबोलीच्या नावाला त्यामुळे धक्का पोचणार नाही. मायबोली आहे आणी आपण सगळेही इथेच आहोत.
या वरच्या आयडीजनी त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे.
असल्यांच्या तोंडी लागण्यात वेळ आणि एनर्जी वाया घालवायची?
खरंतर 'बी' ने सुरूवातीच्या लिखाणावर कश्या कश्या शिव्या खाल्यात हे पण इथे दाखवलं पाहिजे. भांडणं तेव्हाही झाली पण आता त्याचं लिखाण खरंच सुधारलंय हे मला महत्वाचं वाटतं.
१०० लोकांच्यातून एखादा सुधारतो बाकीचे पालथ्या घड्यावर पाणी.. असो!
sorry.
sorry.
शांती: शाती: शाती:
गार घ्या सगळ्यांनी...
विवेक आणि संदीप, तुम्ही फारच नविन दिसता, मायबोली हे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याच सांकेतीक स्थळ आहे आणि ते तुमच्याही असेल त्यामुळे ह्या सगळ्या प्रतिक्रिया जिव्हाळ्या पोटी आहेत. फार मवाळ प्रतिक्रिया आहेत ह्या, फार कमजोर दिल दिसता तुम्ही
कुणी प्रतिक्रिया दिली तर फार वाईट वाटुन घेउ नका पण त्यावर विचार नक्की करा, मनात काही थेउ नका , ओका आणि मोकळे व्हा... अनुभव घ्या
पइथे वाचक फार चोखंदळ आहे, जाणकार आहे, परखड आहे, मग तो कोणताही विषय असो.
भांडा बिनधास्त भांडा! थोड्या दिवसानी रुळाल, जास्त रुळलाततर किसेरिया रोगाने पिछाडले जाल, अजुन बरच काही होईल चिंता करु नका लिहित रहा. करमणुक ही महत्वाची !!! शेवटची पोस्ट वगैरे बोलु नका ते तुम्हाला शक्य नाही (अनुभवातुन), जस्तच झाल तर आयडी बदलाल...
तु लिही यार, पण हळु हळु लिही तुझ टायपिंग फार फास्ट आहे, तेवध्या फास्ट वाचायला त्रास होतो भाउ, पण तु लिही. आपन वाचनार...
'दिवे घ्या' म्हणजे काय माहीत आहे का तुला?
संदीपगुरु,
संदीपगुरु, तुम्ही स्वतःच असे म्हणताय का, कि राज्या नि संदीपगुरु हा एकच आयडी आहे??? ये बात कुछ हजम नही हुई!!
तुमचे स्वतःचे किती आयडिज आहेत हे आधी नक्कि करा, मग कुठल्या आयडीने काय, कुठे पोस्ट केलंत ते लक्षात ठेवा.
असे काही पोस्ट लिहिण्यापुर्वी इथले archives वाचा नि नीट अभ्यास करा.
कोणी जर टीका करत असेल तर आत्मपरिक्षण करा नि लिखाणामधे सुधारणा करायचा प्रयत्न करा. इथे तुम्ही नवीन असल्याने कोणी तुमच्यावर वैयक्तिक टीका करण्याचा प्रश्नच येत नाही... नाही का??
बीबद्दल..
बी शी स्वतःची तुलना करून उपोअयोग नाही!! मायबोलीवर 'बी' हे एक मोठ्ठे प्रकरण आहे. सातत्याने आणि समांतरपणे अतिशय बुद्धूपणा आणि हुशारी दाखवण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नाही. सध्या त्याच्या प्रसिद्ध बुद्धऊपणाशी स्पर्धा करून किमान तितक्या पातळीवर या.. मग मैदान तुमचेच आहे!
वेळ का घालवतो आहोत?
आपण सगळे इथे आदळआपट करून वेळ का वाया घालत आहोत? कितीतरी चांगलं लेखन आपल्या अभिप्रायाविना राहिलं आहे!
ते वाचून लिहीणा-यांना प्रोत्साहित करुयात!
निखिल
आयला, हा
आयला, हा काय प्रकार आहे?
स्वतः संदीपगुरुच म्हणतोय "राज्या" हा त्याचा आयडी आहे
काय संदीपजी काय "खावुन" आलात?
राज्या आयडीचे डीटेल्स इथे पहा...
http://www.maayboli.com/user/49
आणि जर तुमच्यात (?) दम असेल तर तुमचे प्रोफाईल दाखवा बघु!!!
आणि तुमच्या माहीतीसाठी सांगतो, मी मायबोलीच्या प्रत्येक जीटीजी ला हजर असतो. त्यामुळे पुणे आणि मुंबईतले बरेच मायबोलीकर मला ओळखतात.
तुमच्या कवितेविषयी मी काय बोलणार?
आरे......... आरे
आरे.........
आरे राज्या तु काय लिहितोस याचि तुला आठवन आसते का?????
तुझ्या कमजोर स्मरनशक्तिसाठि.......
तु विवेकला म्हनाला होतास कि, दोन्हि आय. डी . एकाच व्यक्तिचे आहेत का?
याचे उत्तर म्हनुन मि तुला म्हनालो होतो, " राज्या हा संदीपगुरुचाच आय्.डी आहे" कळालं का???
आणि तुझ्या माहितिस्तव सांगतो मायबोलिवर सर्व 'दमदार' मंड्ळिच आहेत.
स्वतः केलेले लिखान वाचत जा .
प्रिय
प्रिय संदीपजी,
ही घ्या तुमच्या मुक्तफळांना उत्तरे.
तु विवेकला म्हनाला होतास कि, दोन्हि आय. डी . एकाच व्यक्तिचे आहेत का?>>>>>
मी असे म्हणलो होतो याला कारण म्हणजे ही कविता त्याची (विवेकची) आहे असे तो म्हणाला होता, तुला पटत नसेल तर याच कवितेवरील चर्चेत वाच, त्याची पोस्ट आहे. ही कविता जर तुझी असेल तर तो त्याची कविता आहे असे का म्हणाला? आहे उत्तर?
याचे उत्तर म्हनुन मि तुला म्हनालो होतो, " राज्या हा संदीपगुरुचाच आय्.डी आहे" कळालं का???>>>>>>
बरं मग??? आणि असे म्हणायला काही कारण काही पुरावा आहे का? असेल तर सिद्ध करा की
आणि तुझ्या माहितिस्तव सांगतो मायबोलिवर सर्व 'दमदार' मंड्ळिच आहेत.>>>>>>
अजुन नाही दिसला हो तुमचा दम, आणि बाकी सोड, तुझा प्रोफाईल दाखव की. तुम्ही विषयाला फाटे फार फोडता बुवा. जर तुम्ही ड्युप. आयडी नसाल तर तुमचे प्रोफाईल दाखवा की, का लाजताय कुणाला?
स्वतः केलेले लिखान वाचत जा.>>>>>>>
मी "लिखान" करत नाही, माजे लिखान (आयला माझे पण सुद्धलेखन बोंबलले की!!!) तुम्हाला कुठे आढळले असेल तर दाखवा आणि १००० रु. मिळवा. हा, चार ओळी गोळा करुन कधी कधी झुळुका लिहितो. त्यावर अजुन तरी कोणी प्रतिक्रिया दिलेली नाही. आणि माझा असा दावा पण नाही की मी फार छान झुळुका लिहितो. तुम्हाला जर माझ्या झुळुका आवडत नसतील (मला पण कधी कधी माझ्याच झुळुका आवडत नाहीत) तर तसे त्या त्या बी बी वर जाऊन लिहा की, पण व्यवस्थित कारणे द्या बुवा, म्हणजे आम्हाला पण थोडं शिकता येईल.
अजुन काय म्हणतेय काव्य साधना?
नविन कविता कधी पाडताय? आम्हाला सांगा, तेव्हढंच नव कविंना मार्गदर्शन!!!
कळावे,
लोभ असावा.