विडंबनाची हुक्की

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

बी च्या ह्या कवितेचं विडंबन केलंय पार्ल्यातल्या काल-परवा चाललेल्या TP मधून,

तो प्रकार नक्की काय होता ते तिलाही आता स्मरत नाही

guacamole म्हणालं तूला नाद होता माझ्या हिरव्या लोणीमय दिसण्याचा
pad thai म्हणालं तूला नाद होता माझ्यातल्या बीन स्प्राऊटस् च्या crunch चा
lasagna म्हणालं तूला नाद होता माझ्यातल्या cheesy taste चा

ताटात उरलेला शेवटचा घास तोंडात कोंबत
स्वतःला कसेबसे सावरत ती म्हणाली
मला नाद आहे ... मला नाद आहे ... मला नाद आहे
वेगवेगळ्या cuisins चा
त्यांच्या अतृप्त चवीचा
या खाण्यात बुडून जाण्याचा

तिचे हे उत्तर ऐकून
guacamole, pad thai आणि lasagna
निघून गेले अन्
त्यांच्या पाठोपाठ गेला
तिचा आपला xxxx

टीप : इथे xxxx च्या जागी काहिही घालता येईल जसं डोसा, सामोसा, गोलगप्पा .. मी इथे मुद्दामच generic ठेवलंय ..

विषय: 
प्रकार: