विसरू कशी मी

Submitted by VivekTatke on 19 March, 2008 - 13:06

विसरू कशी मी, तु दिलेला रुमाल निलगिरीचा
माझ्या आजारपणातील हात तुझा सोबतीचा
दवाखान्यात जाताना तू बोललेल्या हर एक शब्दाचा
तुझ्या आनंदी मुखवट्यामागचा लपलेला चेहरा काळजीचा
माझ्या आजारपणाचा विसर मला विसर करून दिल्याचा

विसरू कशी मी, तु दिलेला रुमाल निलगिरीचा
माझ्याचसाठी आणलेल्या नाजुक सायलीचा
प्राजक्ताचा,मोगर्‍याचा,गुलाबाचा,मधुमालतीचा
मला माहीत असलेल्या वा नसलेल्या फुलांचा
त्या हर एक फुलात एक वेडा प्रेमी दिसल्याचा

विसरू कशी मी, तु दिलेला रुमाल निलगिरीचा
माझ्यावर रागावल्यानंतर्,स्वतःवरच नाराज झालेल्या क्षणांचा
माझ्या अबोलपणावर अर्जव करणार्‍या तुझ्या भाष्याचा
सहवासाच्या क्षणासाठी अतुर चेहरा तुझा पहाताना मौनाचा
माझाच विचार करणार्‍या तुझ्या हर एक कृतीचा

विसरू कशी मी, तु दिलेला रुमाल निलगिरीचा
प्रगतीच्या वाटेवर माझा तु हात धरल्याचा
जणु आपल्या लेकीवर माया करणार्‍या बापाच्या ह्रुदयाचा
जणु सुखदु:खात सामील होणार्‍या बालपणीच्या मित्राचा
गुलाबाचा वास मला देत काट्यांच्या वेदना तू सोसल्याच्या

विसरू कशी मी, तु दिलेला रुमाल निलगिरीचा
ईश्वरासम माझी पुजा करणार्‍या तुझ्या भाबड्या मनाचा
आनंदात तुझ्या मला वाटेकरी करून घेणार्‍या तुझ्या वॄत्तीचा
स्वतःपेक्षा माझ्या अस्तित्वाला विश्व मानणार्‍या तुझ्या भावनेचा
क्षणाक्षणाला माझ्यावर सावली धरणार्‍या तुझ्या दयाघनाचा

गुलमोहर: 

नमस्कार विवेक, मला ही कविता नीटशी कळली नाही हो..
म्हणजे पहिली ओळ कळली की कवितेची जी नायिका आहे तिचं डोकं दुखत असतांना नायकाने तिला दिलेला रुमाल तिच्या अजुनही लक्षात आहे. त्याचप्रमाणे दुसरीही कळली, म्हणजे नायिकेला नायकाचा सोबतीचा हात लक्षात आहे. पण मग तिसर्‍या ओळीपासून कविता थोडी अगम्य होत जाते.
'दवाखान्यात जाताना तू बोललेल्या हर एक शब्दाचा'
मी या ओळीचा संदर्भ 'विसरु कशी मी' शी जोडायचा फार प्रयत्न केला.. पण नाही जमलं हो.
म्हणजे नायिका निश्चित इथे काय विसरू शकत नाहिये हेच कळत नाहिये.
विसरू कशी मी 'दवाखान्यात जाताना तू बोललेल्या हर एक शब्दाचा'? हर एक शब्दाचा अर्थ, उच्चार की अजून वेगळं काही?
चौथी ओळ कळली..
परत पाचवी ओळ?
माझ्या आजारपणाचा विसर मला विसर करून दिल्याचा??? छ्छे!!! नाहिच झेपली..

आणि हयापुढच्या प्रत्येक कडव्यात नायिका काय विसरू शकत नाही हे कळतच नाही!!!
म्हणजे प्रत्येक 'चा' नंतर काय आहे हेच कळत नाही.

आणि हो, एक सांगायच राहिलं तुम्ही यमक छान जुळवलय..

देवा...
गुलाबाचा वास मला देत काट्यांच्या वेदना तू सोसल्याच्या
>>>
इथे यमक गोंधळलय. Happy

देवा, नंदिनी चालू द्यात. :-))

विसरू कशी मी, त्रास डोकेदुखीचा?
मला नाहीच मिळाला, रुमाल निलगिरीचा. Proud
तुम्हालाही होता त्रास सर्दीचा.
टाळा लोकलचा प्रवास गर्दीचा.

या 'चा' यमकापासून मीही स्फूर्ती घेतल्येय.

आपल्या सुचना कळाल्या. आपल्याला एवढा त्रास देण्याची ईच्छा नव्हती.

तरीही तसदीबद्दल क्षमस्व.

आपण वेळेत वेळ काढून ज्या सुचना दिल्यात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.