नमस्कार मायबोलीकर,
८ मार्च. 'जागतिक महिला दिन'.
या निमित्त 'संयुक्ता' तर्फे गरजू संस्थांना देणगी देण्यात यावी अशी कल्पना मांडली गेली. हे काम 'सुपंथ' तर्फे करता येऊ शकेल का अशी विचारणा केल्यावर 'सुपंथ' चे काम पहाणार्या सदस्यांनी तशी तयारी दर्शवली. (त्या बद्दल त्यांचे मनापासुन आभार).
३१ मार्च २०१० पर्यंत देणगी गोळा करुन ती काही संस्थांना देण्याची योजना आहे. ही देणगी रोख रक्कम किंवा संस्थेला उपयुक्त अशा भेटवस्तुच्या स्वरुपात देण्याचा विचार आहे. संयुक्ताच्या काही सदस्यांनी काही संस्थांना भेटी दिल्या व त्यानुसार सध्या पुण्यातील कोथरुड येथील अंध मुलींची शाळा, पाषाण शाळा, सुमती बालवन अश्या काही संस्था देणगीसाठी विचारात घेतल्या गेल्या आहेत. ह्या पैकी एक ते दोन संस्थांना तरी मदत करता येईल अशी आशा आहे.
ही योजना सर्वांकरता खुली केली तर जास्त रक्कम जमा होईल या हेतूने सर्व मायबोलीकरांना मदतीचे आवाहन करत आहोत. ३१ मार्चपर्यंत तुम्ही देणगीची रक्कम पाठवू शकता.
पैसे पाठवण्याबाबत माहिती-
रुपयांत रक्कम कृपया सुपंथ च्या बँक खात्याला पाठवा. त्यावर मेमो मधे 'महिला दिन' असे लिहावे. खाते क्रमांक वगैरे बद्दलची माहिती खाली आहे.
Account holder name : Kedar Joshi
Bank : ICICI
Branch : Shivajinagar, Pune
Account number : 003901032042
जर डॉलर्स मधे रक्कम पाठवणार असाल तर कृपया केदार जोशी (मायबोली नाव 'केदार') ह्यांना ईमेल करावे व त्यांच्याकडुन त्यांचा घरचा पत्ता घेऊन तिथे डॉलर्स मधे चेक पाठवावा. केदार ते पैसे सुपंथ च्या खात्यावर जमा करतील. त्यावर पण 'महिला दिन' असे लिहावे.
सुपंथ बद्दलची ही लिंक पहावी - http://www.maayboli.com/node/13486
अधिक माहितीसाठी इथे प्रश्न विचारले तरी चालतील.
धन्यवाद!!!
-संयुक्ता.
माझी ?
माझी ?
मी आताच पैसे ट्रान्स्फर
मी आताच पैसे ट्रान्स्फर केलेत. पण मी महिलादिन अस लिहायला विसरलेय. प्लीज तेवढं नोट करून मला पोच द्याल का?
केदार, चेक काल पाठवला. मिळाला
केदार, चेक काल पाठवला. मिळाला की कृपया पोच दे.
अजय चेक मिळाला. रेशीम कॅश
अजय चेक मिळाला.
रेशीम कॅश मध्ये टाकले का? ते जमा झाले आहेत.
मो हो देईल.
सर्व देणगीदार आणि 'सुपंथ' चे
सर्व देणगीदार आणि 'सुपंथ' चे आभार.
'महिला दिन' उपक्रमांतर्गत आज पैसे पाठवायचा शेवटचा दिवस आहे. अजून कोणाला पाठवायचे असतील तर अजून पाठवू शकता.
धन्यवाद.
मायबोलीकरहो, एकुण जमा झालेला
मायबोलीकरहो,
एकुण जमा झालेला निधी रुपये ५४२९५ इतका आहे.
त्या पैकी निम्मे अंधशाळेला व निम्मे सुमती बालवनाला देण्याचे ठरत आहे. तोवर अजुनही कोणाला इच्छा असेल तर पाठवु शकता.
ज्या सभासदांनी ह्याकरता मदत केली त्या सर्वांचे मनापासुन आभार. अशा गोष्टी आपल्या मदतीशिवाय पुर्ण होउच शकत नाहीत.
सुमती बालवनाबद्दल इथे वाचता येईल.
- अंधशाळेच्या मुलींना अत्यावश्यक अशा गोष्टी काही महिन्यासाठी व उरले तर काही रोख असे देण्याचे ठरत आहे.
- सुमती बालवनातील मुलांसाठी बसायला १० चटया (वा तत्सम) आणि सामान ठेवायला मुलांसाठी कपाटे हे वस्तु रुपात व उरलेले रक्कम रोख असे ठरत आहे जी त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडेल.
वस्तु आणि रोख रक्कम असे दोन्ही असल्याने मीनु ने जबाबदारी उचलली आहे. (मीनु त्या साठी तुला मनापासुन धन्यवाद).
सविस्तर माहिती काही दिवसात मिळेल व ती इथेच लिहिली जाईल.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
सुनिधी, बालवनाची लिंक दे ना.
सुनिधी, बालवनाची लिंक दे ना.
थोडी मोजण्यात चूक झाली आहे.
थोडी मोजण्यात चूक झाली आहे. एकुण जमा झालेला निधी रुपये ५४२९५ नसून ५३३८८ आहे.
सुमती बालवनची माहीती या लिंकवर पहा http://docs.google.com/leaf?id=0B8xypsyFo-QoNmRkMDk5YjAtNmRiNy00YzU2LWI5...
ऑर्कुटवरही Sumati Balwan कम्युनिटी आहे.
काल अंधशाळेला रुपये दहा
काल अंधशाळेला रुपये दहा हजारचा चेक दिला. या विकेंडला उरलेली कामे पूर्ण होतील.
कालच अंधशाळेसाठी जी वस्तू
कालच अंधशाळेसाठी जी वस्तू स्वरुपात मदत द्यायची आहे त्याची ऑर्डर दिली. शनिवारपर्यंत अंधशाळेत ही मदत पोहोचेल. रक्कम रुपये ९६०० झाली.
छान बातम्या मीनू
छान बातम्या मीनू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रुपये २६६९४ / - सुमति
रुपये २६६९४ / - सुमति बालवनच्या खात्यावर जमा केले. ही रक्कम आपण मुलांसाठी चटया आणि निवासी मुलांना लागणार्या कपाटांसाठी दिली आहे. त्यांनी दहा चटया आणल्या आहेत.
आता रुपये ७०९४ माझ्याकडे शिल्लक आहेत जे अंधशाळेला द्यायचे आहेत. त्याचा चेक मी जेव्हा वस्तूस्वरुपातल्या मदतीची पावती आणायला जाईन तेव्हा मी देणार आहे. तेवढं झालं की या उपक्रमांतर्गत आपण जे ठरवलेले काम आहे ते पूर्ण होईल.
सुमति बालवनकडून त्यांनी या मदतीतून केलेल्या कामाचे फोटो मिळतील तेव्हा मी ते इथे टाकेनच.
पावत्या सगळ्या आल्या की त्यांची फोटोकॉपी इथे टाकू शकेन. संयुक्ता registered नसल्याने पावत्या कुणाच्या नावाने घेऊ असा एक प्रश्न आहे ? की माझ्याच नावाने घेऊन टाकू. पहील्या १०००० ची पावती देणगी देणारास हवी होती त्याप्रमाणे ती घेतली. उरलेल्या बद्दलच प्रश्न आहे. मायबोली inc च्या नावाने त्या हव्या आहेत का?
धन्यवाद मीनू. हे सगळे करण्यात
धन्यवाद मीनू. हे सगळे करण्यात पुढाकर घेऊन काम तडीस नेल्याबद्दल
खरंच कौतुक तुझं मीनू
खरंच कौतुक तुझं मीनू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages