Submitted by विनायक on 28 February, 2010 - 11:11
या वर्षीच्या हॉकी वर्ल्ड कप स्पर्धांना भारतात सुरुवात झालीये...त्या बद्दल चर्चा करण्या साठी हा बिबी.....सर्व प्रथम ह्या वर्ल्ड कप साठीची स्वतंत्र वेब साईट आहे का? असल्यास काय आहे?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारताने पाकला समालीला ४-१
भारताने पाकला समालीला ४-१ हरवले ना? डिटेल्स वाचले नाही अजून..
सन्दीप सिन्गने त्याच्याकडून
सन्दीप सिन्गने त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या. २ गोल्स ऑन पेनल्ती कॉर्नर
चला सुरूवात तर चांगली झाली..
चला सुरूवात तर चांगली झाली.. पण अजुन बराच पल्ला गाठायचा आहे..
बेष्टच सुरुवात.. संदीप सिंग
बेष्टच सुरुवात.. संदीप सिंग सुरेख खेळला.. पण विक्रम पिल्लेचे विशेष अभिनंदन.. पठ्ठ्या मस्त खेळी रचत होता.. हॉकीमध्ये मधली फळी अतिशय महत्वाची असते.. तिकडे ऑस्ट्रेलियाला इंग्लंडने दणका दिला.. डच टीमच जिंकेल असे वाटते हा विश्वचषक..
डच टीमच जिंकेल असे वाटते हा
डच टीमच जिंकेल असे वाटते हा विश्वचषक....>>>>
टण्या,स्पेनची टिम पण चांगली आहे रे..
ही आहे वेबसाईट.
ही आहे वेबसाईट. www.worldhockey.org/worldcup
आज भारत ऑस्ट्रेलिया सामना आहे.
आज भारत ऑस्ट्रेलिया सामना
आज भारत ऑस्ट्रेलिया सामना आहे>>> आणि त्यात शिवेंद्र सिंगला बाहेर बसावे लागणार आहे...
टण्या इतक्या लवकर काहीच सांगता येणार नाही... जगातल्या टॉप टीम्स खेळत आहेत.. पाच पैकी एक मॅच हरल्यामुळे फार काही विषेश होईल असे नाही.. पुढच्या सगळ्या मॅचेस कशा होतात त्यावर ते अवलंबून आहे...
ऑस्ट्रेलियाकडून जोरदारच हार
ऑस्ट्रेलियाकडून जोरदारच हार पत्करायला लागली. मी सामना बघितला नाही पण ऑस्ट्रेलियाने खूपच वेगवान खेळ केला असे वाचले. म्हणजे आपला बचाव जामच बोंबलला असणार.. तिकडे पाकिस्तान पण जिंकले.. इंग्लंड पुढच्या फेरीत जाते की काय? दोन्ही सामने जिंकले त्यांनी..
टण्या.. मी बघितली रे मॅच
टण्या.. मी बघितली रे मॅच दुसर्या हाफ मध्ये... फारच वाईट खेळ झाला... एकतर ऑसीज नी सुरुवातीलाच दोन जबरदस्त गोल मारले आणि हवाच काढून टाकली आपल्या खेळातील.. आणि बचाव फळी खूपच विस्कळीत होती.. संदीप सिंगची अवस्था फारच वाईट होती.. अजिबातच जमत नव्हते त्याला खेळायला.. अॅड्रियन डिसूझानी काही गोल आडवले (एक पेनल्टी स्ट्रोक पण आडवला) म्हणून निदान एवढाच मार खाल्ला नाहीतर अजूनच वाट लागली असती..
आता आज बघायचे स्पेन विरुद्ध काय करतात ते...
कालचे सामने पण भारी झाले.. विशेषतः कोरियाचा... शेवटच्या काही मिनिटांत त्यांनी सामना फिरवला...
स्पेन विरुद्ध जिन्कतील
स्पेन विरुद्ध जिन्कतील वाटते...(नाही तर आपण बाहेर..)
ऑसीजनी द.आफ्रिकेचा धुव्वा
ऑसीजनी द.आफ्रिकेचा धुव्वा उडवला.. १२ - ०
http://209.20.80.25/vsite/vco
http://209.20.80.25/vsite/vcontent/content/transnews/0,10869,5234-200654...
हे वाचा... फारच महान बातमी आहे...
ईंग्लंड ने पाकीस्तानला ५-२ ने
ईंग्लंड ने पाकीस्तानला ५-२ ने हरवलं.
जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया
जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुवर्णपदकासाठी सामना होणार आहे. त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे भारत ७/८ नंबरसाठी खेळणार आहे. अगदीच तळाला नाही.
त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट
त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे भारत ७/८ नंबरसाठी खेळणार आहे.>> ह्याचे श्रेय पाकिस्तानला द्यावे लागेल... ते जर द.आफ्रिके विरुद्ध जिंकले असते तर ते ७/८ साठी खेळले असते आणि आपल्याला ९/१० साठी खेळावे लागले असते....
काल जर्मनीनी इंग्लंडच्या खेळतली हवाच काढून टाकली आणि तशीच परिस्थिती ऑस्ट्रेलियानी हॉलंडची केली.. आणि कॅनडानी पाकिस्तानला हरवून ११ वा नंबर पण मिळवला...
जर्मनीच जिंकेल हाही वर्ल्डकप
जर्मनीच जिंकेल हाही वर्ल्डकप असं कालच्या त्यांच्या खेळावरून वाटतय.. काल जबरीच खेळले ते..
अखेर भारत ८ व्या
अखेर भारत ८ व्या क्रमांकावर...
अर्जेंटिनाकडून ४ - २ असा पराभव.. ज्यातले ५ गोल दुसर्या हाफ मधे झाले आणि तेही फक्त ८ मिनिटांच्या अंतरानी...
न्यूझीलंडनी द आफ्रिकेचा पेनल्टी स्ट्रोकवर ५-४ असा पराभव केला आणि त्यांना ९ वा नंबर मिळाला..