२०१० हॉकी वर्ल्ड कप

Submitted by विनायक on 28 February, 2010 - 11:11

या वर्षीच्या हॉकी वर्ल्ड कप स्पर्धांना भारतात सुरुवात झालीये...त्या बद्दल चर्चा करण्या साठी हा बिबी.....सर्व प्रथम ह्या वर्ल्ड कप साठीची स्वतंत्र वेब साईट आहे का? असल्यास काय आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेष्टच सुरुवात.. संदीप सिंग सुरेख खेळला.. पण विक्रम पिल्लेचे विशेष अभिनंदन.. पठ्ठ्या मस्त खेळी रचत होता.. हॉकीमध्ये मधली फळी अतिशय महत्वाची असते.. तिकडे ऑस्ट्रेलियाला इंग्लंडने दणका दिला.. डच टीमच जिंकेल असे वाटते हा विश्वचषक..

आज भारत ऑस्ट्रेलिया सामना आहे>>> आणि त्यात शिवेंद्र सिंगला बाहेर बसावे लागणार आहे...

टण्या इतक्या लवकर काहीच सांगता येणार नाही... जगातल्या टॉप टीम्स खेळत आहेत.. पाच पैकी एक मॅच हरल्यामुळे फार काही विषेश होईल असे नाही.. पुढच्या सगळ्या मॅचेस कशा होतात त्यावर ते अवलंबून आहे...

ऑस्ट्रेलियाकडून जोरदारच हार पत्करायला लागली. मी सामना बघितला नाही पण ऑस्ट्रेलियाने खूपच वेगवान खेळ केला असे वाचले. म्हणजे आपला बचाव जामच बोंबलला असणार.. तिकडे पाकिस्तान पण जिंकले.. इंग्लंड पुढच्या फेरीत जाते की काय? दोन्ही सामने जिंकले त्यांनी..

टण्या.. मी बघितली रे मॅच दुसर्‍या हाफ मध्ये... फारच वाईट खेळ झाला... एकतर ऑसीज नी सुरुवातीलाच दोन जबरदस्त गोल मारले आणि हवाच काढून टाकली आपल्या खेळातील.. आणि बचाव फळी खूपच विस्कळीत होती.. संदीप सिंगची अवस्था फारच वाईट होती.. अजिबातच जमत नव्हते त्याला खेळायला.. अ‍ॅड्रियन डिसूझानी काही गोल आडवले (एक पेनल्टी स्ट्रोक पण आडवला) म्हणून निदान एवढाच मार खाल्ला नाहीतर अजूनच वाट लागली असती..

आता आज बघायचे स्पेन विरुद्ध काय करतात ते...

कालचे सामने पण भारी झाले.. विशेषतः कोरियाचा... शेवटच्या काही मिनिटांत त्यांनी सामना फिरवला...

जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुवर्णपदकासाठी सामना होणार आहे. त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे भारत ७/८ नंबरसाठी खेळणार आहे. Happy अगदीच तळाला नाही.

त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे भारत ७/८ नंबरसाठी खेळणार आहे.>> ह्याचे श्रेय पाकिस्तानला द्यावे लागेल... ते जर द.आफ्रिके विरुद्ध जिंकले असते तर ते ७/८ साठी खेळले असते आणि आपल्याला ९/१० साठी खेळावे लागले असते....

काल जर्मनीनी इंग्लंडच्या खेळतली हवाच काढून टाकली आणि तशीच परिस्थिती ऑस्ट्रेलियानी हॉलंडची केली.. आणि कॅनडानी पाकिस्तानला हरवून ११ वा नंबर पण मिळवला...

अखेर भारत ८ व्या क्रमांकावर...
अर्जेंटिनाकडून ४ - २ असा पराभव.. ज्यातले ५ गोल दुसर्‍या हाफ मधे झाले आणि तेही फक्त ८ मिनिटांच्या अंतरानी...

न्यूझीलंडनी द आफ्रिकेचा पेनल्टी स्ट्रोकवर ५-४ असा पराभव केला आणि त्यांना ९ वा नंबर मिळाला..