कोकणकडा रॅपलिंग करणार का ??

Submitted by Yo.Rocks on 22 February, 2010 - 02:13
ठिकाण/पत्ता: 
हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड म्हटले की कोकणकडा आलाच ! खास कोकणकड्यासाठी हरिश्चंद्रगडाला भेट देणारेसुद्धा तुम्हाला भरपुर आढळतील.. या कड्याची उंची एकंदर ३००० फुट (२००० फुट सरळ खाली नि १००० फूट घसरणीची खोली पायथ्यालगत).. अशा कोकणकड्यावरुन रॅपलिंगकरणे म्हणजे स्वप्नवत..

माझीही इच्छा होती पण काहि कारणास्तव जमणार नाहीये.. Sad
पण ज्यांना हा अनुभव घ्यायचा असेल वा इच्छा असेल त्यांच्यासाठी मी खास या "ट्रेक मेटस - शालोम एडवेन्चर्स आयोजित कोकणकडा रॅपलिंग" या कार्यक्रमाची माहिती खाली देत आहे.. (त्यांच्या कार्यक्रम मी मराठीत अनुवादीत करत आहे..) Happy

कोकणकडा centre rappelling १८०० फूट -:

स्थळ: हरिश्चंद्रगड (उंची: ४५०० फूट)
रॅपलिंग उंची: १८०० फूट (चार टप्पे)
पातळी : मध्यम
ग्रुप साईज: एका बॅचला ३० जण.

अनुभवाची गरज नाही.

रॅपलिंगविषयी -:
Rappelling, also known as abseiling is an act of descending a mountain face by sliding down a rope, which is attached to a body harness and fastened to an overhead projection, with sufficient friction provided as to make the speed of the descend controllable. (मराठीत अनुवाद करणे जमले नाही :P)

कार्यक्रमाचे वेळापत्रकः
१ ला दिवस :
संध्या. ७ वाजता : स्वामी नारायण देउळ, दादर (पू).
संध्या. ७.१५ वाजता : दादरहुन प्रायवेट बसने प्रयाण.
रात्री ११.०० वाजता : खिरेश्वर या पायथ्याशी असलेल्या गावी.
रात्री ११.१५ वाजता : रात्रीचे जेवण.
रात्री ११.४५ वाजता : ट्रेकला सुरवात.

२ रा दिवस :
सकाळी ६ वाजता : सुप्रभात
सकाळी ६.३० वाजता : चहापाणी.
सकाळी ७ वाजता : रॅपलिंगला सुरवात (अर्थातच एकेक करुन )
तिथुनच मग बैलपाडा या गावापर्यंत ट्रेक.
दुपारी १ वाजता (अंदाजे): दुपारचे जेवण.
दुपारी ४ वाजता : चहापाणी
रात्री ८.३० वाजता : पायथ्याशी विसावलेल्या गावात जेवण

३ रा दिवसः
रात्रीच परतीचा प्रवास. सकाळी ६.३० च्या सुमारास मुंबईत.

कार्यक्रमाची तारीख :
एकावेळी ३० जण..
१ली बॅच : २६-२७-२८ फेब्रु. २०१०
२री बॅच : २७-२८-१ मार्च २०१०
३री बॅच : २८-१-२ मार्च २०१०
४थी बॅच : १-२-३ मार्च २०१०
५वी बॅच : २-३-४ मार्च २०१०

खर्च : २८००/- रुपये फक्त.
त्यात खालील बाबींचा समावेश -:
१. जेवण- न्याहारी २. मुंबई ते मुंबई बसप्रवास ३. इन्शुरन्स
नि रॅपलिंगचार्जेस. (रॅपलिंगची साधन नि रॅपलिंग मार्गदर्शन)

पैसे भरण्याबाबत :
बुकींग करण्यासाठी १५००/- रुपये आगाउ (वा संपुर्ण रक्कम) भरणे आवश्यक..

आपल्याबरोबर खालील गोष्टी आणणे :
पाण्याची बॉटल (१.५ ते २ लिटर)
टॉर्च ( अतिरिक्त बॅटरीसकट ) , मेणबत्ती.
चमचा,ताट नि ग्लास.
दोनतीन वृत्तपत्र नि झोपण्यासाठी अंथरूण.
नि दिवसभरात चरण्यासाठी खाद्यपदार्थ (तुमच्या सोयीनुसार)
सगळे सामान राहील नि दोन्ही हात मोकळे राहतील अशी पाठीवरची सॅक. (झोळी वा पिशवीची बॅग असु नये )

इच्छुकांनी वा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

निलेश पाटील : ९९६७४३६२११
प्रिती पटेल : ९८६९५२४२६०
विक्रमसिंग : ९९८७७५७६६५

तेव्हा ज्यांना असे सुरक्षित धाडस करण्याची हौस असेल.. इच्छा असेल.. नि तारखा जमत असतील तर त्यांनी जरुर या संधीचा लाभ घ्यावा.. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील हा थरार एकदातरी अनुभवा.. Happy

माहितीचा स्रोत: 
कोकणकडा
विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users