Submitted by मेघना भुस्कुटे on 19 February, 2010 - 06:53
मला सकाळी सव्वाआठच्या सुमारास घराबाहेर पडावं लागतं. बाहेर पडण्याआधी काहीतरी खाऊन बाहेर पडलं तर दिवस एकंदर बरा जातो (http://www.maayboli.com/node/14081)! पण रोज तेच पोहे / उपमा / पोहे खाऊन कंटाळा येतो. रोज नवीन काय करायचं (आणि त्यातला न्याहारीकरता आदर्श असा कॅलरी काउण्ट + घटकपदार्थांचा समतोल कसा राखायचा) असा प्रश्न पडतो. तर -
१) ब्रेकफास्टला आदर्श असे पदार्थ (किंवा पदार्थांची कॉम्बिनेशन्स)
२) त्यांच्या कृती
३) इतर सूचना - जसं की अॅसिडिटीचा त्रास असल्यास सकाळी सकाळी आंबट संत्रे खाऊ नये
इथे सुचवता येतील काय?
(@अॅडमिनः असाच धागा आधीच अस्तित्वात असल्यास हा धागा त्यात जरूर विलीन करावा. शिवाय मलाही त्या धाग्याची लिंक द्यावी! :))
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी
अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सांगितलेली त्यांची पोटभरीच्या ब्रेकफास्ट्ची रेसिपी.
पंचामृताचे पानगे.
३/४ वाटी दूध, ४ चमचे दही, ४ चमचे मध, ४ च्.खडीसाखरेची वेलचीसोबत केलेली पूड, १ च्.तूप यात १ वाटी कणीक नीट ढवळून घ्यावी. थोड्या जास्त तुपावर याचे पानगे घालावेत.
यात तुम्हाला फळे किंवा ड्राय फ्रुटसचे filling करता येईल.
sweeT tooth asel तरच करा.
अर्चना दिक्षीत, तुमची रवा
अर्चना दिक्षीत,
तुमची रवा उतप्पा पाकक्रुती टाका ना क्रुपया....
माझा आईची प्रवासासाठीचा
माझा आईची प्रवासासाठीचा उपम्याची रेसिपी मी आजकाल न्याहरीसाठी वापरते.
यामध्ये रवा भाजून घ्यायचा. कांदा, हिरव्या मिरचा असे ओलसर पदार्था ऐवजी लाल मिरचा, उडदाची डाळ, कडिपत्ता घालून फोड्णी करुन घ्यावी आणि त्यात भाजलेला रवा घालून नेहमीचा उपम्या प्रमाणे परतून घ्यावा, मीठ घालून एकत्र करावे. हे मिश्रण गार करुन, डब्यात भरुन फ्रीज मध्ये ठेवावे. ते १५/२० दिवस अगदि छान रहाते.
गडबडीचा वेळी फक्त मिश्रणात उकळते पाणी घालून किंवा थोडा पाणी घालून मायक्रोवेव्ह ला ठेवल्यास मस्त गरम उपमा तयार होतो. ह्यामध्ये मटार, गाजर इ. भाज्या ऐनवेळी घालता येतील.
मूग डाळीची खिचडी सुध्दा अशीच तयार करुन ठेवता येते.
अॅसिडिटिवाल्या लोकांना
अॅसिडिटिवाल्या लोकांना ब्रेकफास्ट काळजीपूर्वक निवडावा लागतो. पण तो टाळून चालत नाही.
मी ताजी किंवा शिळी पोळी/भाकरी दूधाबरोबर खाते. ती चक्क मिक्सर मधून बारिक करून घ्यायची.
फोडणीची पोळी सुद्धा झटपट होते आणि छान लागते.
आंबवलेले पदार्थ म्हणजे शत्रूच. ते अजिबात टाळावे.
सकाळी चहासुद्धा घेण्यापूर्वी एखादे फळ खाऊन दिवसाची सुरुवात करावी. (आंबट नको.). ( अॅन्टीऑक्सिडन्ट्साठी) दूध आणि फळ एकत्र खाऊ नये.
मला स्वतःला पोळी-भाजी किंवा काहितरि पोळी चा पदार्थ ब्रेकफास्ट्ला सुट होतो. मग दिवस चांगला जातो.
नाच्णीची खीर, ओटमिल , मुस्ली, फ्लेक्स, दूध -पोहे , थालीपीठ , हे सगळे निश्पाप पदार्थ आहेत.
अॅसिडिटि वाढलेली असताना दूध जास्त घेऊ नये. त्याने थोड्या वेळानंतर ती अधिकच वाढते.
ब्रेकफ़ास्टसाठी, हा एक प्रकार
ब्रेकफ़ास्टसाठी, हा एक प्रकार बघा.
एक अवाकाडो, सोलून चौकोनी तूकडे करुन. तेवढेच पिकलेल्या पपईचे तूकडे,
त्यात अर्ध्या लिंबाचा रस, चिंमूटभर मीठ, आणि थोडे चिली फ़्लेक्स.
(साखर शक्यतो नकोच ) हा प्रकार दिसायलाही छान आणि चवीलाही.
फ़ारश्या कॅलरीज नाहीत.
असाच प्रकार पिकलेले केळे आणि पॅशन फ़्रुट वापरून करता येतो.
(त्यात उपलब्ध असतील तर स्ट्रॉबेरीज घालायच्या )
अवाकाडो आणि पॅशन फ़्रूट आपल्याकडे क्वचितच बाजारात दिसते.
अवाकाडोची झाडे मी गोव्याला खूप बघितली होती. पण तिथेही
बाजारात ती नसत. या फ़ळाची मोठी बी सहज रुजते. झाडाची
पानगळ होत नाही, त्यामूळे सावलीसाठीही हे झाड उत्तम, फ़ळे
पण भरपूर लागतात. पण ही फ़ळे झाडावर पिकत नाहीत.
हिरवी जून फ़ळे काढून, ब्राऊनपेपरमधे गुंडाळून ठेवली कि
पिकतात. (यालाच बटरफ़्रुट पण म्हणतात.)
पॅशन फ़्रूट चा वेल पण मी पनवेलपासून सातार्यापर्यंत
सगळीकडे बघितला. त्यालाही भरपुर फ़ळे लागतात.
काहि खास फ़ळविक्रेत्यांकडे, आणि तेही क्वचितच
बघितले मी हे. याचा चवदार ज्य़ूस पण बाजारात दिसत नाही.
हे फ़ळ कधी खराब होत नाही, सुकले तरी वापरता येते.
याच्याही बिया सहज रुजतात. पण उशीराने उगवण होते.
पहिली पाने साधी व नंतरची, त्रिशूळासारखी असतात.
पॅसिफ़्लोरा कूळातले असल्याने (म्हणजेच कृष्णकमळाच्या
कूळातले) फ़ूलही देखणे असते.
बापरे ही लिस्ट बघुन भयंकर
बापरे ही लिस्ट बघुन भयंकर complex येतोय मला..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मी वीकडेला दुध +cereals + मध खाते आणि वीकेन्ड ला पोहे/उपमा/ईडली अस काहीतरी. रोज एक फळ मस्ट.
चिंगी मला ही असं वाटायचं
चिंगी मला ही असं वाटायचं पहिल्यांदा, पण आता नाही वाटत. ब्रेकफास्ट तयार करायला खरंतर १० मिनिटांपेक्षा जास्ती वेळ नाही लागत. आपल्या मनातंच भिती असते फक्त.
मला एक मदत हवेय.. शुगर टेस्ट
मला एक मदत हवेय.. शुगर टेस्ट ला जायचय आणि फक्त प्रोटीन्स असलेला ब्रेक्फास्ट करायचाय्..मी अंडी नाही खात आणि थोडं उशीरा जात असल्याने काहीतरी खाल्याशिवाय जाऊ नाही शकणार्...कार्बस आणि फळं दोन्ही नाही खायचय काय खाऊ?
मूग (किंवा कुठलंही आवडणारं
मूग (किंवा कुठलंही आवडणारं कडधान्य) मोड आणून उकडून (चालत असेल तर मीठ घालून) लिंबू पिळून खाऊ शकतेस.
डाळीचं सूप चालेल.
शुगर टेस्ट्ला ब्रेकफास्ट
शुगर टेस्ट्ला ब्रेकफास्ट केलेला चालतो?
फक्त प्रोटीन म्हणजे,टोफू चालेल कदाचीत.
मूग, मसूर, मटकी, चवळी अशा
मूग, मसूर, मटकी, चवळी अशा एखाद्या कडधान्याची उसळ, गूळ न घालता. ओट्स्चा उपमा, ओटमीलचं थालीपीठ?
बाकी डाळी अन कडधान्यांमधे
बाकी डाळी अन कडधान्यांमधे कार्ब्स असतीलच की पण.
मुग किंवा कुठलहि मोड आलेल
मुग किंवा कुठलहि मोड आलेल कडधान्य चालणार नाहि कारण त्यात प्रचंड प्रमाणात कार्ब्स असतात. बदाम किंवा अजुन कुठले नट्स चालु शकतिल कदाचित (ह्यातहि कार्ब्स असतात पण एकुण फॅट्स आणि प्रोटिन्स च्या तुलनेत फार कमि) डॉ ला विचारुन खात्रि केलेलि उत्तम. भुक भागलि नाहि तरि अनलिमिटेड अमाउंट मध्ये काकड्या खालेल्ल्या चालतिल.
वाव किती पटकन मदत केलीत्. हे
वाव किती पटकन मदत केलीत्. हे मला का सुचलं नाही माहीत नाही...कडधान्य खाऊ का ते विचारते. धन्स सगळ्यांना... हो ना कार्बज शिवाय चं वेजिटेरिअन काहीच सापडत नाही...स्नेहा मला जेस्टेशनल डायबिटीस ची टेस्ट करायला जायचय्..कदाचित नेहेमीपेक्षा वेगळी करत असावेत?? कालच डॉ. ने ब्रेकफास्ट नक्की कर म्हणून सांगितलय...
वरदा, ही लिन्क
वरदा, ही लिन्क बघ..टोफूबद्दल्..
http://www.nutritiondata.com/facts/legumes-and-legume-products/4393/2
मी पण अंडे खात नाही,त्याच्याऐवजी टोफूच खाते..
वरदा, ही पण लिंक बघ. (अगदी
वरदा, ही पण लिंक बघ. (अगदी तळाशी डीटेल्ड ब्रेक अप दिलाय.)
रमा म्हणतायत ते बरोबर आहे. डाळी/कडधान्यांत कार्ब्ज बरेच आहेत!
gestational diabetes साठी,
gestational diabetes साठी, फक्त प्रोटीन breakfast हे नविनच एइकतिये. तुझी १ तासाची screening test आहे की ३ तासांची diagnostic? जर १ तासाची असेल तर normal breakfast recommended आहे. कारण diet restrict केल्यामुळे false negetive येऊ शकते. जर ३ तासांची असेल तर ८ तास fasting करायचे असते. आणि fasting test घेतल्यानंतर तेच glucose drink देतात.
http://www.mayoclinic.com/health/glucose-tolerance-test/MY00145
मधुरा मी पुन्हा कन्फर्म करेन
मधुरा मी पुन्हा कन्फर्म करेन पण काल डॉ. ने फक्त प्रोटीन्स, एग्ज किंवा चीज खा असं सांगितलय. १ तासाची टेस्ट आहे आणि शुगर ड्रींक पण दिलय. सकाळी लवकर टेस्ट करणं शक्य नाहीये म्हणून तिने कदाचित असं सांगितलं असावं It's important to eat and drink normally in the days leading up to the glucose tolerance test. असं दिसतय त्या साईट वर. म्हणजे आधिच्या दिवसापर्यंत नॉर्मल जेवण चालणारे पण त्या दिवशी नाही..पण मी पुन्हा चेक करेन एकदा..
टोफु कसा खायचा गं स्नेहा..एखादी क्रु. सांग ना...
काकड्यांची आयडीया चांगली आहे रमा.. टेस्ट होईपर्यंत काहीतरी खाल्याचं समाधान मिळेल अगदी भुकेलं रहावं लागणार नाही...थोडसं चीज खाईन की झालं...
साध्या अंडा भुर्जीसारखा करता
साध्या अंडा भुर्जीसारखा करता येइल ब्रेकफास्ट साठी,पण त्याच्यातील कांदे,टोमॅटो चालतील का माहीत नाही..जिथे पनीर वापरतात अशा रेसिपीमधे पनीरच्या जागी.
मी तरी सरळ तेलावर कांदा,टोमॅटो परतून त्याच्यावर स्क्रॅम्बल केलेले टोफू घालते,वर तिखट मीठ, कोथिंबीर, की झाले तयार.
नो प्रॉब्लेम वरदा, तुला जर
नो प्रॉब्लेम वरदा,
तुला जर चीज चालणार असेल तर रिकोटा चीज आणि काकडि खाता येइल, स्टर फ्राय व्हेजिटेबल्स बरोबर फर्म टोफु पण टाकायचा पण त्या भाजित कॉर्न फ्लोअर अजिबात घालायच नाहि. मधुरा म्हणतेय तस मलाहि प्रोटिन्स खाउन जी डी चे टेस्ट जरा विचित्र वाटलि ऐकायला पण डॉ. ना जास्त माहिति अस्सत आपल्यापेक्षा सो काळजि करु नकोस.
एक गोष्ट तुला आवर्जुन सांगाविशि वाटतेय कि समजा जी डी डिटेक्ट झाला तर अजिबात काळजि करु नकोस पुर्ण शाकाहारि असुनहि मी योग्य आहार आणि चालण्याने माझा डायबेटिस अगदि शेवटच्या दिवसापर्यंत व्यवस्थित कंट्रोल केला होता, मला अजीबात इन्सुलिन घ्यायचि गरज पडलि नाहि. हे शक्य आहे आणि आपल्या बाळांसाठि आपण आवर्जुन ते करतोहि फक्त घाबरुन जायच नाहि आणि काळजी करायचि नाहि. बेस्ट लक!
रमा खूप आधार वाटला गं.. तसा
रमा खूप आधार वाटला गं.. तसा अजून वेळ आहे टेस्ट ला पण भिती वाटतेच आहे...
मला वाट्टं थोडा कांदा टॉमेटो थोड्या भाज्या ओके होईल.. मी टोफू ची डीश आधी एकदा बनवून पाहीन या विकेंडला...खूप खूप थॅन्क्स.
वरदा, आधी लिहायचं राहिलं -
वरदा, आधी लिहायचं राहिलं - अभिनंदन आणि शुभेच्छा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्याकडून पण शुभेच्छा..
माझ्याकडून पण शुभेच्छा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वरदा जीडी चे अजिबात टेन्शन
वरदा जीडी चे अजिबात टेन्शन घेऊ नकोस. टेस्ट च्या आधी आठवडाभर भरपूर गोड्/शुगर खायचे टाळ. बाकी नॉर्मल जेवण घे.
शुभेच्छा !!
थॅन्क्स स्नेहा, स्वाती आणि
थॅन्क्स स्नेहा, स्वाती आणि सायली. सायली मी लक्षात ठेवेन नक्की...
धिरड्याचा एक प्रकार सांगते. १
धिरड्याचा एक प्रकार सांगते. १ किलो जाडे तांदूळ, २०० ग्रॅम उडीद डाळ, १ भांडे जाडे पोहे, १ भांडे गहू, १ भांडे चणा डाळ, १ भांडे तूर डाळ, ४ चहाचे चमचे मेथी, ४ चहाचे चमचे जिरे हे सगळे कोरडेच एकत्र करुन जाडसर दळून आणणे. जेव्हा धिरडी करायची असतील तेव्हा पीठात आवडीप्रमाणे तिखट, मीठ, हिंग, घालून सरसरीत भिजवावे. लगेच धिरडी घालता येतात. कोणत्याही कोरड्या चटणी बरोबर छान लागतात.
मिनू, माझी आई अगदी असच पिठ
मिनू, माझी आई अगदी असच पिठ दळून आणते (गहू नाही टाकत बहुतेक हा..)
धिरडी करताना कधी त्यात पालक, कधी मेथी (पालेभाजी) चिरुन टाकते, कधी लसूण ठेचून, कधी कांदा-टॉमेटो, कधी दुधी....असं प्रत्येकवेळी वेगवेगळी चव येते मग धिरड्यांना...सही प्रकार आहे हा.
हो खरंच छान होतात ही धिरडी.
हो खरंच छान होतात ही धिरडी. मी तर ह्यावेळी देशातून येताना हे पण आणलं भाजणीच्या जोडीला. लहान मुलांसाठी पण खूप पौष्टिक. आवडीने खातात मुलं.
नाचणी सत्व दुधात बनवून खाता
नाचणी सत्व दुधात बनवून खाता येते. (काही जणांना हे लहान मुलांचे खाणे वाटेल. पण ते छान लागते.)
तसेच कोणत्याही लाह्यांचे पीठ दुधात भिजवून साखर घालून खाल्ले तरीही पोटभर होते. मी असेही वाचले होते की दुधात आवडत नसेल तर लाह्यांचे पीठ ताकात भिजवुन त्यात थोडे मीठ, हिरवी मिरची, जीरे पूड टाकून खाता येते. मी करून पाहिले नाही.
मिती: खर आहे. मी सुद्धा
मिती: खर आहे. मी सुद्धा नेहेमी असच करते. कधी पालक, मेथी, कोथींबीर, कांदा, टॉमेटो यातल काहीही एक चिरुन घालायच. पटकन आणि पौष्टिक. तसेच लहान मुलांनासुध्धा पोटभरीच खाण म्हणून देता येत.
Pages