धकव रं श्यामराव - नागपुरी फ़टका

Submitted by अभय आर्वीकर on 17 February, 2010 - 23:19

धकव रं श्यामराव - नागपुरी फ़टका

धकव रं श्यामराव झोल नको खावू
नशीबाची गाथा नको कोणापाशी गावू....!

रगताचं पाणी करून रान शिंपलं बावा
गारपिटानं कहर केला निसर्गानं कावा
कंबरछाती गहू होता पुरा झोपून गेला
उंबईचा फ़ुलोरा खड्डून झाडून नेला
दोघाचबी गर्‍हाणं सारखच हाय भाऊ ...!

मार्केटात गेलो तर उलटे झाले गिर्‍हे
खरीददार म्हणे ह्या गहू होय का जिरे?
आजकाल म्हणे याले कोंबडी खात नाही
घेवून जा वापस नायतर धडगत नाही
नशीब धुवासाठी मी कोणत्या गंगेत न्हावू?....!

पदवीची पुंगी घेवून पोरगं वणवण फ़िरते
डोनेशनबिगर कुठं नोकरीपाणी मिळते?
चपराशाचा भाव सध्या सात लाख सांगते
मास्तरसाठी अभयानं बारा लाख मांगते
"नोकरीले मार गोली" म्हणलं खेतीवाडीच पाहू....!

गंगाधर मुटे
......................................................
ढोबळमानाने शब्दार्थ.
झोल खाणे = कच खाणे.माघार घेणे.
उंबई = ओंबी, गिर्‍हे = ग्रह
......................................................
४) चापलूस चमचा : नागपुरी तडका

गुलमोहर: 

व्वा एकदम झकास , खरी परिस्थीती मांडलीस.

देविदास सोटेंची ...
येनं र श्यामराव घेनं र खांड , तुही गेली बांड अन माही गेली बांड ..
कविता आठवली.

सही....!!

खरच चटका लावणारं लिहिलत.
शेवटचा भाग तर जास्तच परिणामकारक.
अस वाटत स्वराज्य मिळाल, पण सुराज्य नाही. Sad

आत्ता डोळ्या समोर आल्या .. वाचत आहे .. आवडल्या..

रमेश ठाकरेचा वर्‍हाडी झटका आठवला..... >> ही गाणी कुठे भेटेल का नेटवर मला ? खुप दिवस झाले मी शोधत आहे ...

Pages