Submitted by मंदार-जोशी on 10 February, 2010 - 03:12
मित्रांनो, ह्या मध्ये आपण सेफ्टी डोअर, इतर घरगुती उपकरणे, घरच्या माहितीची गुप्तता, घरात कामाला येणारे व बिल घ्यायला येणारे यांच्याशी कसे वागावे, वाहन असेल तर त्याची सुरक्षितता इत्यादी बद्दल चर्चा करूया. सिक्युरिटी गार्ड किंवा एजन्सी वगैरे इथे अपेक्षित नाही. आणि घर म्हणजे अगदी सदनिकेपासून ते बंगल्यापर्यंत अभिप्रेत आहे. चला कुणीतरी सुरवात करा बरं
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येथिकल ह्याकिन्ग' चा कोर्स मी
येथिकल ह्याकिन्ग' चा कोर्स मी केला नाही ..
आय सपोर्ट इट ! 
शिकवणी नक्की घेईन ... कारण माझा अनुभव असा आहे की दुसर्याला शिकवताना आपणच भरपूर काही शिकतो.
मध्ये आपण सेफ्टी डोअर, इतर
मध्ये आपण सेफ्टी डोअर, इतर घरगुती उपकरणे, घरच्या माहितीची गुप्तता
चांगल्या उपयुक्त सूचना.
चांगल्या उपयुक्त सूचना.
परगावी जाताना घरातून निघुन
परगावी जाताना घरातून निघुन ऑटो/टॅक्सीत बसल्यावर,बस स्टॉप / रेल्वे स्टेशन / एअरपोर्टवर निरोप घेताना "एकटीच आहेस, काळजी घे हां" असे बोलु नये.
तसेच अति हुशारी करून, आम्ही गावाला जात असलो तरी घरात कुणी एकटेच थोडी राहणार आहेत, बरीच माणसं असणार आहेत असे भासवायचा प्रयत्नही करू नये.
आमची आई असे करायची आणि ती मुद्दाम तसे भासवतेय हे लहान पोरांच्याही लक्षात यायचं, मग मुरलेल्या नजर/कान ठेवणाऱ्यांचे काय.
दुसरे म्हणजे बाहेर क्वचित जाणाऱ्या/नव्या गावी गेल्यावर स्टेशन/बस स्टॉपवर उतरल्यावर कोणी आपल्याला लुबाडू नये म्हणुन रिक्षा ठरवताना "हम कोई नये नही है यहा / हम को क्या नये समझ रहे हो क्या?"असे सारखे म्हणत बाजूच्या सगळ्यांना आपण इथे नवे आहोत आणि त्याची आपल्या मनात भीती आहे याची जाणीव करून द्यायची. तसे करू नये.
>>>>>> हे लहान पोरांच्याही
>>>>>> हे लहान पोरांच्याही लक्षात यायचं
हाहाहा
Pages