चापलूस चमचा : नागपुरी तडका
हलक्या-पतल्याचा जमाना, राह्यलाच नाही
श्याम्यासारखा इब्लिस, म्या पाह्यलाच नाही…
पोम्याले म्हणे तुनं, शरम काहून विकली
मिशी पकून गेली तरी, अक्कल नाही पिकली
मुकरदमच्या चपला, चक्क डोक्यावर घेते
एवढा कसा लाचार, त्यायचे धोतरं धूते
असा चापलूस चमचा, म्हणे झालाच नाही …
चारचौघात गेला तं, अक्कल तारे तोडते
शोकसभेत बोलंण तं, जम्मून भाषण झोडते
असे गुण गावते, जे मयतात असण-नसण
याचं भाषण आयकून, थो मुर्दा हासत असण
देवळामंधी हार कधी, वाह्यलाच नाही….
थेटरमंधी जाईन तं, सुदा नाय बसणार
समोरची खुर्ची भेदून, याची तंगडी घुसणार
तमाशातल्या बाईवर, नोटा-बंडल लुटते
दमडीसाठी भिकार्याले, अक्कल सांगत सुटते
जिंदगीचा डाव “अभय”, हारलाच नाही …
गंगाधर मुटे
…………………………………………
३) लकस-फ़कस : नागपुरी तडका
........................................................
नेहमीप्रमाणेच मस्त ! हे
नेहमीप्रमाणेच मस्त ! हे बागवेनी राहुल गांधीच्या उचलेल्या जोड्यांविषयी होतं का ?
<नेहमीप्रमाणेच मस्त ! हे
<नेहमीप्रमाणेच मस्त ! हे बागवेनी राहुल गांधीच्या उचलेल्या जोड्यांविषयी होतं का ?>
मला पिटवायचा बेत दिसतो तुमचा.:स्मित:
बागवे प्रकरण मी कानाने ऐकलय, पण डोळ्यानी पाहीले नाही.
पण मी माझ्या डोळ्यानी पाहील्याची शेकडो प्रकरणे आहेत.
मस्त .
मस्त .
झ्याक जमला तडका.
झ्याक जमला तडका.
मस्त
मस्त
मस्त आहे.
मस्त आहे.
छान नेहमीप्रमाणे.
छान नेहमीप्रमाणे.
शरद
शरद
मस्त
मस्त
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार ..!!
काय हे!
काय हे!
काय हे! हे तेच ... जे आहे
काय हे!
हे तेच ... जे आहे ते.
अप्रतिम तडका!
अप्रतिम तडका!
चमचेगिरीची
चमचेगिरीची खिल्ली...........
मुटेसर ग्रेट............
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे.