हा धागा उघडलाय ते अमेरिकन किंवा बीबीसी टीव्हीवरच्या आपल्या आवडत्या मालिकांबद्दल गप्पा मारायला, एपिसोडबद्द्ल माहिती द्यायला.
सध्या माझी अत्यंत आवडती मालिका आहे 'Big bang theory'. शेल्डन, लेनर्ड, राज आणि हॉवर्ड (हावर्ड) ही चार नर्डी मुलं आणि त्यातल्या दोघांची रूपसुंदरी शेजारीण पेनी ह्यांच्या आयुष्यातल्या मजेदार प्रसंगांवर आधारित ही मालिका जबरजस्त धमाल आहे.
आणखी काही लाडक्या (जुन्या) मालिका म्हणजे एव्हरीबडी लव्ज्स रेमंड, स्टिल स्टँडींग, किंग ऑफ क्वीन्स, एव्हरीबडी हेट्स क्रिस, होम इंप्रुव्ह्मेंट, कॉजबी शो. फ्रेंड्स, साइनफील्ड (आणि वय झाल्याचं लक्षण म्हणून की काय पण गोल्डन गर्ल्स) ह्या देखिल अश्याच काही मस्त विनोदी मालिका.
नंबर्स ही डिटेक्टीव्ह मालिका आणि त्यातला गणिताच्या आधारे गुन्ह्यातले क्लु शोधून काढणारा सुपिक डोक्याचा गणितज्ञ पण झकास आहे. साइक, मंक ह्या पण डिटेक्टिव्ह वर्गात मोडणार्या मस्त मालिका.
बीबीसी वरच्या जुन्या आर यु बिईंग सर्व्ह्ड, कीपींग अप अपिअरन्सेस, येस मिनिस्टर ह्या पण ऑल टाइम फेवरिट!
तर मंडळी, ह्या आणि अश्या तुमच्या लाडक्या मालिका, त्यातले आवडते एपिसोड्स, आवडती पात्र ह्यांबद्दल पोस्टी येऊ द्या!
हा धागा उघडल्याबद्दल धन्यवाद.
हा धागा उघडल्याबद्दल धन्यवाद. (फक्त सभासदांसाठी झालाय, कृपया सर्वांसाठी खुला करावा)
आमची आवडती मालिका पहा, शेवटच्या सीझनची सुरुवात - उद्या दिनांक २ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता ABC वर!
लाल्वक्का, धन्यवाद! धागा
लाल्वक्का, धन्यवाद! धागा सार्वजनिक केला आहे.
आला का हा बाफ वर एकदाचा
आला का हा बाफ वर एकदाचा माझं मत रेमन्ड ला! अजून रीरन्स बघते मी नियमित . परवा तो "कॅनिस्टर" वाला एपिसोड लागला होता. महान आहे तो! मरीचा कॅनिस्टर डेब्राच्या हातून हरवतो तो. पुन्हा पाहताना तेवढीच हसले
"WOW ! the Mary barone apology , I had only heard about it b4"
"its like those horror movies , u think the movie is over and A HAND COMES OUT !!"
एक से एक डायलोग्ज आहेत यात!
मै, रेमन्ड, हो. एवरीबडी
मै, रेमन्ड, हो. एवरीबडी लव्हज..
सध्याचे "२४" पहाताय की नाही? अनिल कपूर आहे त्यात.
माझ्या आवडत्या AFV, रेमंड,
माझ्या आवडत्या AFV, रेमंड, फ्रेंड्स, किंग ऑफ क्वीन्स, लॉ अँड ऑर्डर, what not to wear (अशीच एक How do I look यायची), अॅनिमल प्लॅनेटवर Extreme Series बघायला आवडतात. फूड नेटवर्कवर काय चालु असेल ते बघायला आवडते पण त्यातल्या त्यात आयर्न शेफ, एस ऑफ केक्स, रेचल, Diners Drive-ins and Dives, Dinner Impossible, एमरिल हे आवडतात.
ड्रीम टीम, बिग ब्रदर, सिम्प्सन्स ह्या लंडन मधे असताना इतर काही पर्याय नाही म्हणुन बघायला सुरुवात केली आणि नंतर चटक लागली
ह्यातले फारसे काहीच बघायला वेळ होत नाही आजकाल
मी HGTV पण पहाते बर्याच
मी HGTV पण पहाते बर्याच वेळा. मस्त असतात त्यांचे शो. हाउस हंटर्स, वेग वेगळ्या रूम्स चे मेक ओव्हर्स वगैरे. लाइफ वर फॅशन डिझायनर्स चा रिअॅलिटी शो आहे, प्रोजेक्ट रनवे की काहीतरी नाव आहे तो पण कधी तरी पहाते. पोटेटो सॅक्स पासून इव्हिनिंग गाउन बनवणे वगैरे अचाट आयडिया असतात त्यात! २४ नाही पाहिले कधी. अनिल कपूर ??
छान धागा. वाचते आहे. यातले
छान धागा. वाचते आहे.
यातले फक्त फ्रेंड्स आणि येस मिनिस्टर माहिती आहेत.
मै, HGTV मी पण बघते. मला हाऊस
मै, HGTV मी पण बघते. मला हाऊस मेक ओव्हर्स फार आवडतात.
सेक्स अँड द सिटी, सिक्स फीट
सेक्स अँड द सिटी, सिक्स फीट अंडर आणि सोपरॅनो पण सही सिरियल्स होत्या.
आयर्न शेफ, अमेरिकाज वर्स्ट कुक्स, एस ऑफ केक्स ह्या पण आवडतात.
ए ल रे मधला कोणता बरं तो एपिसोड? रेमंडाला कुठल्यातरी सुपरबॉल प्लेयरचा इन्टरव्ह्यु घ्यायचा असतो. अॅली आणि जुळ्यातलं एक आजारी, डेब्रा पण आजारी म्हणून ह्याला लेकीला आणि मुलाला घेऊन डॉक्टारकडे जावं लागतं. जुळ्यातलं चुकीचं पोर घेऊन हा डॉक्टरकडे येतो. त्या खेळाडूला पण तिथेच बोलवतो. पेडीच्या ऑफिसात बदकांवर बसून प्रश्नोत्तरं! शेवटी रेमंड म्हणतो , " My people will contact your people." मग आपल्या पोरांकडे वळून म्हणतो, "Who am I kidding, you are the only people I have got!"
लाइफटाइम (चॅनेल) नाही का पहात
लाइफटाइम (चॅनेल) नाही का पहात कोणी.
माझे फेवरेट कुक - बॉबी फ्ले, पोला डिन, रेचल रे अजुनही बरेच पण सध्या आठ्वत नाहीत.
जेरी साइनफिल्ड. त्याचा आम्ही इथे लाइव शो (स्टँड अप) बघितला होता. मस्त होता.
वरच्या सगळ्या मालिका आणि
वरच्या सगळ्या मालिका आणि बर्नी मॅक शो,हाऊस,गेल्या वर्षी झालेला डोनाल्ड ट्रम्पचा रियालिटी शो (नाव लक्षात नाही),कॉमेडी सेंट्रल वरची स्टँड अप कॉमेडी.
कॉमेडी सेंट्रल वरची स्टँड अप
कॉमेडी सेंट्रल वरची स्टँड अप कॉमेडी >> माझी पण ही आवडती त्याचबरोबर तो बिल मेहरचा शो पण छान असायचा
सेक्स अँड द सिटी विसरायलाच
सेक्स अँड द सिटी विसरायलाच झाली इतक्या दिवसात बघितली नाही. टीबीएस वर येते का अजून ? मंगळ/बुधवारी ११ वा. यायची ना ?
डेस्परेट हाऊसवाईव्स पण
डेस्परेट हाऊसवाईव्स पण आवडायची मला.
सेक्स अँड द सिटीचे रीरन्स
सेक्स अँड द सिटीचे रीरन्स सुरू आहेत. नेमके कुठल्या चॅनलवर ते ठाउक नाही.
पीबीएस्वरचे कार्यक्रम आवडतात अधुनमधून बघायला. तिथे येणारी बीबीसी ची 'फॉल्टी टॉवर्स' अशीच एक धमाल मालिका.
गेम शो चॅनलवर एक 1 vs 100 गेम येतो. कधीमधी बघते. आवडतो.
फॉक्स्वरचा आर यु स्मार्टर दॅन अ फिफ्थ ग्रेडर पण छानच.
२४ चा एक एपिसोड बघितला.
२४ चा एक एपिसोड बघितला. चांगली वाटत आहे मालिका.अनिल कपूरने चांगलं केल आहे काम.त्याची बायको दाखवली आहे ती पण देशीच आहे का?
माझे पण रेमंड, किंग ऑफ
माझे पण रेमंड, किंग ऑफ क्वीन्स, फ्रेंड्स, AFV आवडते आहेत. बीबीसी वरच्या वर्ल्ड न्यूज तेवढ्या बघते मी आणि त्याला ही मी नाव दिलंय इराण-इराक-अफगाणिस्थान न्यूज. बाकी HGTV, Food Network वरचे आणि वर दिलेले almost सगळेच प्रोग्राम्स बघते आणि मला एव्हरिडे ईटालियन आणि बेअरफूट काँटेसा पण आवडतं. मला मंक पण फार आवडायचं.
रेमंड, फ्रेंडस, टू अँड हाफ
रेमंड, फ्रेंडस, टू अँड हाफ मेन.. ऑल टाईम फेव.
पूर्वी ते होम मेकओव्हर्स वगैरे मलाही आवडायचे पण हल्ली बघणं होत नाही, पण तरीही 'फ्लीप दॅट हाऊस' सगळ्यात आवडतं.
२४ चे पहिले काही सीझन मस्त
२४ चे पहिले काही सीझन मस्त होते. आत्ताचे मी कालपासून बघायला सुरुवात केली. आधीचे ऑनलाईन पाहता येतील
इथे पहा मै- http://www.fox.com/24/bios/season-8/anil-kapoor.htm
आज "लॉस्ट" फायनल सीझन सुरु होणार!
अमेरिकन आयडॉल (नंतर वेगळा धागा उघडू वाटल्यास :फिदी:)
सॅटर्डे नाईट लाईव्ह
जे लेनो
मॅड मेन (AMC)
बिग बँग थिअरी
डान्सिन्ग..
काही जुन्या-
रेमन्ड
साइनफेल्ड
थर्ड रॉक
CSI (ओरिजनल, व्हेगस मधले)
लॉ अॅन्ड ऑर्डर
प्रॅक्टिस
इतर कार्यक्रम-
२०/२०
६० minutes
Meet the press
Anderson 360
This Week With George Stephanopoulos (abc)
Fareed Zakaria GPS (CNN)
डान्सिन्ग विथ स्टार्स का ?
डान्सिन्ग विथ स्टार्स का ? मला आवडते ती पण मला ती माय बॉइज फार बोर वाटते.
TV अत्यंत कमी बघितला जातो.
TV अत्यंत कमी बघितला जातो. पण जेव्हा बघते तेव्हा बहुदा यातले शो चालु असतात.
मी पण HGTV ची फॅन आहे. Divine Design (candice Olson ), डिझाईन स्टार आणि सध्याचा
The outdoor Room With JAMIE DURIE आवडतात बघायला.
फुड नेटवर्क वरच"Chopper " आवडत. Barefoott Contessa आणि Everyday Italian हे ऑलटाईम फेव्हरेट.
आयडॉल ,Seinfield , Oprah , Everybody .....,SNL हे नेहमीचे.
Ray चा एक नविन शो आलाय "Men of a certain Age" बघितला का कोणी?
CNN वरचा ३६० अॅन्डरसन कुपर मोस्टली बघितला जातो.
ELR माझी अगदी प्रचंड आवडीची
ELR माझी अगदी प्रचंड आवडीची मालिका. कितीही वेळा बघितलेला एपिसोड असेल तरी परत बघताना हसु येतच. तसच फ्रेंड्स.
सिंपसन मी पण बघायचे मागे. पण त्या मानाने फॅमिली गाय अगदीच अ. अ. असत.
खूप पुर्वी जुन्या मालिका पण पाहिल्यात. सही आवडायच्या त्या.
फ्रेश प्रिन्स ऑफ बेल एअर, स्टेप बाय स्टेप, कॉस्बी शो. अजुन पण बर्याच होत्या पण नाव नाही आठवत.
डिझनी वरची विझर्डस ओफ वेवरली प्लेस, झॅक अँड कोडी जुई बरोबर बघायला आवडतात.
मी पण डिस्नी च्या बर्याच
मी पण डिस्नी च्या बर्याच बघते! पेन्ग्विन्स ऑफ मादागस्कर आणि फिनिअस अँड फर्ब मला भयंकर आवडतात बघायला
स्वीट लाइफ ऑफ झॅक अँड कोडी पण
स्वीट लाइफ ऑफ झॅक अँड कोडी पण आवडते.
हाऊस एम डी - फॉक्स, सोमवार,
हाऊस एम डी - फॉक्स, सोमवार, ८.०० EST
मेंटलिस्ट - CBS, गुरवार, १०.०० EST
क्लोसर - TNT, सोमवार, ९.०० EST
आता व्हाईट कॉलर बघायला सुरवात करणार आहे, खुप ऐकलय. डेक्स्टर ही बघायचय पण डी वी डी मागवाव्या लागतील एच बी ओ वर असल्या मुळे.
टीव्ही अजिबात आवडत नसून वरचे
टीव्ही अजिबात आवडत नसून वरचे बरेचसे शोज मी पाह्ते.
एचजीटीव्ही, फुड नेटवर्क, रेमंड, साईनफेल्ड इत्यादी तर अगदी कधीही!
रेमंड माझेपण अतिआवडते सिरिअल
रेमंड माझेपण अतिआवडते सिरिअल आहे... एक नंबर आहे ते! त्यानंतर मग फ्रेंड्स आणि साइनफेल्ड. फ्रेश प्रिन्स ऑफ बेलेअर हे विल स्मिथचे सिरिअल पण आवडायचे. डॉ बेकर पण आवडायचे.
भारतात असताना मी डिस्कवरी चॅनलचा अगदी फॅन होतो. त्यावरचं एक्स्ट्रीम मशिन्स, फ्युचर पर्फेक्ट आणि विंग्ज हे मी न चुकता बघायचो. आत्ताही भारतात गेल्यावर टीव्ही बघितला तर डिस्कवरीच पहात बसायचो.
रेमंड मी कधीही कुठेही पाहू शकतो, कितीही वेळा एपिसोड बघितले असले तरीही..
फ्रेज्यर पण अशीच एक मस्त
फ्रेज्यर पण अशीच एक मस्त सिरियल.
मैत्रेयी, येस्स. पेंग्विन्स
मैत्रेयी, येस्स. पेंग्विन्स ऑफ मादागस्कर आणि फिनियस मस्तय. मला झॅक अँड कोडीही बघून बघून आवडायला लागलंय. कार्लीही बघते कधी मधी. आता ते 'फॅनबॉय अँड चमचम' आलंय ते ही टीपी आहे.
एव्हरीबडी लव्ज्स रेमंड,
एव्हरीबडी लव्ज्स रेमंड, फ्रेंड्स, अगदी जुन्या मालिकांमध्ये बेविच्ड (सिझन फोर पर्यंत), स्मॉल बंडर
बीबीसी वर मध्यंतरी शनिवारी संध्याकाळी लागणारी 'मर्लिन' (सिझन १ आवडला - सिझन दोन पीळ .. lets see सिझन थ्री कसा असेल) -- aired only in UK - available on you tube.
Pages