लकस-फ़कस : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 31 January, 2010 - 09:10

लकस-फ़कस : नागपुरी तडका

काहून बाप्पा रंगराव, लकस-फ़कस चालता
खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालता....!!

’सहकारात’ होते तेंव्हा, काय तोरा व्हता
कौलारू खोपडं पाडून, इमले बांधत व्हता
कशी कमाई होते बाप्पा, भगवंताची माया
देवधरम सोडून जनता, पडे तुमच्या पाया
पद गेल्याच्यानं आता, गोमाश्या हाकलता....!!

म्हणा काही रंगराव, गणित तुमचं चुकलं
विरोधात बसले म्हून, खिसे भरणं हुकलं
बाकीच्यायनं थातुरमातूर, टोपीपालट केली
दोन पिढ्या बघा कशी, गरीबी हटून गेली
पब्लीकच्या भावनेसंगं, चेंडूवाणी खेलता ....!!

होयनोय उठसूठ, विमान वार्‍या करता
खुर्चीच्या लोभापायी, दिल्लीत पाणी भरता
जनतेचे प्रश्न जरा, "अभय"पणे मांडा
मनका टाईट ठेवूनशान, खमठोकपणे भांडा
हायकमांडच्या गुरकावणीले थरथर हालता ...!!

.....गंगाधर मुटे..
................................................................
ढोबळमानाने शब्दार्थ:
लकस-फ़कस = बेडौल
मांजरपाठ = स्वस्त व जाड धोतर
................................................................
२) बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका
................................................................

गुलमोहर: 

मागण्यासाठी उठसुठ, येसट्या बंद करता
दुकानं-बाजार बंद पाडून जनता वेठीस धरता
======================
मनत्लं बोल्लात की राव ...
======================

पब्लीकच्या भावनेसंगं, चेंडूवाणी खेलता ....!! >>>
======================
बात जो दिल को छू गई ... (सरिता फेम)

काय जबरी लिहीलय.

मांजरपाट हा शब्द आवडला. मुळ नाव "मँचेस्टर क्लॉथ" असा होता. पुर्वी रेशन कार्डावर वर्षाला
दोन जोड्या मिळायच्या. आता माहीत नाही.

-हरीश दांगट

मांजरपाट हा शब्द आवडला. मुळ नाव "मँचेस्टर क्लॉथ" असा होता. पुर्वी रेशन कार्डावर वर्षाला
दोन जोड्या मिळायच्या. आता माहीत नाही. >>> रेशन कार्डवर धोतर Happy पण तसं असेल तर ही पार्शलिटी झाली , सहावारी / नऊवारी का नको Proud

रेशन कार्डवर धोतर -
पॉलीवस्त्र आले तेंव्हापासून कापडाच्या किंमतीच कमी झाल्या Happy
मांजरपाठ फक्त शेतकर्‍यांच्या घरातच दिसतो.
बदलत्या पिढ्यांसोबत धोतर-लुगडी वापरणे बंद झाल्यानंतर कापुस पिकावर वाईट दिवस येण्याची शक्यता.

या नागपुरी तडका या नावाने जे काही लिखाण चालू आहे ना ते अप्रतिम आहे. आधी बिपाशाले लुगडं आणि आता हे, मस्त, मस्त, मस्त (महेश मांजरेकर फेम) Happy

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार......!!
नागपुरी तडका हा प्रकार आवडत आहे याचा खुपच आणंद होतोय.
आणि प्रेरणा पण मिळते..

>>रेशन कार्डवर धोतर पण तसं असेल तर ही पार्शलिटी झाली , सहावारी / नऊवारी का नको >>
सरकारी कचेरीत आजही सर्व कागदपत्रे मंजरपाट कपड्यातच बांधतात तिथे एवढ्या एकाच बाबतीत पार्शलिटी होत नाही.
मुटेजी,
ठसकेबाज नागपुरी तडका छान जमलाय.