प्रेमाचा हिशोब

Submitted by सुमेधा आदवडे on 5 March, 2008 - 00:26

कधी ऐक जरा फुलपाखराचा फुलासंगे झालेला संवाद
त्याच्या छान ताज्या द्रवमिश्रीत रंगांचा अल्हाद
मग कळेल तुला माझ्या मनाला लागलेला नाद

कधी पहा जरा क्षितीजावरचे लाल-केशरी आकाश
जमिनीत विरणार्‍या सुर्याचा तेजोमय लख्ख प्रकाश
मग कळेल तुला प्रेमाला कधी नसतो अवकाश

कधी रातराणीचा मंद सुवास सामावुन घे स्वत।त
पसरुदे त्याला तुझ्या मनाच्या कप्प्या-कप्प्यात
मग रित्या मनाची पोकळी तुझ्या येईल ध्यानात

कधी अळव्यावरल्या टपोर्‍या थेंबाला बघ स्पर्श करुन
बोटावरुन घसरुन कसा येतो खाली उतरुन
मग कळेल मनाचा हळवेपणा जरी असले शांत वरुन

कधी एकटेपणी जरा माझा विचार करुन बघ
पळभरासाठी जनरीत जरा बाजुला सारुन बघ
मापदंड नसलेल्या माझ्या प्रेमाचा हिशोब कळेल मग....

गुलमोहर: 

आवडली..भिडली फक्त आता एवढं सगळं सांगितल्यावर हिशेब नको वाटतो...

आवडली कविता मस्तय,
जरा १-२ ठिकाणी टायपो आहे बहुतेक तेवढे काढ ना प्लीज