(मागच्या वर्षी सहजच कर्नाळ्याला भटकायला गेलो होतो... तेव्हा लिंगोबा पाहून भारावलो आणि वेड लागल्यागत त्यावर चढून गेलो... तेव्हाचा माझा अनुभव... इतर काही websites वर हा अनुभव तेव्हाच सांगीतला होता... आज मायबोलीवर सांगत आहे...)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गो.नी.दां. च्या दुर्ग भ्रमण गाथेत कर्नाळ्या बद्दल वाचल्या पासुन मला तीथं जायच होतं. नंतर जैत रे जैत बघीतल्या पासुन तर कधी एकदा लिंगोबाला (कर्नाळा) जातोय असं झालं होतं. अलीबाग हून पनवेल ला जाताना S.T. च्या खिडकीतून कर्नाळा बऱ्याचदा बघीतला होता, पण जाणं काही जमलं नव्हतं.
एका weekend ला यशदीप आमच्या घरी आला होता. तेंव्हा आम्हां तिघांचा (मी, मझा भाऊ प्रसाद आणि यशदीप ) कर्नाळ्याला जायचा प्लान ठरला. पनवेल पर्यंत बस आणि मग पनवेल हून कर्नाळ्याला जायला टम-टम मधे बसलो. पनवेल हून पेणच्या दिशेने ५-६ km पुढे गेलो की रस्ता कर्नाळ्याच्या जंगलातूनच जातो आणि झाडीतून लिंगोबा डोकावताना दिसतो.
मी टम-टम वाल्या काकां सोबत गप्पा मारायला लागलो.....
मी: गेलाय का कधी कर्नाळ्याला?
काका: हां...तर....
मी: त्या सुळक्या वर चढतात का लोकं?...
काका: हां... तो काय वरती झेंडा.... पण दोर लावून चढतात... मी नाय कधी चढलो....
मी: दोर न लावता नाही का चढता येत....
काका: आता... चढायचच असेल तर काय.... पण कशाला विषाची परीक्षा घ्यायची?....
मी: खरं आहे... (पण मी एक तरी try मारणार....)
बोलता-बोलता कर्नाळ्याला पोचलो आणि प्रत्येकी २० रुपयाच तिकीट काढून अभयारण्यात घुसलो. पक्ष्यांचा चिवचीवाट आणि दाट झाडी, यामुळं निवांत वाटलं. आत घुसल्या-घुसल्या लगेचच वाटेच्या दोन्ही बाजूला bird trails सुरु होतात. आम्ही bird trails वर न जाता सरळ जाऊन डाव्या हाताला कर्नाळा किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटेला लागलो. पायवाट मस्त मळलेली असल्यामुळं वाट चुकायची भीती अजिबात नव्हती. पावसाळा संपून एक महीना झाला तरी ओढ्यांमधे पाणी होतं. वर चढताना सारखं, जैत रे जैत मधलं "वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी...." हे गाणं डोक्यात वाजत होतं. अर्धा तास चढून गेल्यावर डाव्या हाताला प्रबळगड आणि कलावंतीणीचा सुळका दीसू लागला, त्याच्या मागे माथेरानचा दोंगर पण जाणवत होता. "लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला...हा ठाकर गडी तिथं कधी नाय गेला....".हे गाणं गुणगुणत आम्ही पुढे सरकत होतो आणि एकदमच लिंगोबाच दर्शन झालं.
"ह्या दोंगरान आपलं बोट कश्यापाई उचील्लं?..." असा प्रश्न मलापण पडला (जैत रे जैत मधल्या नाग्या सारखाच). मग जैत रे जैत मधले dialogues आणि scenes आठवत किल्यात प्रवेश केला. आत घुसल्यावर समोरच किल्लेदाराचा वाडा आणि त्याच्या मागं आभाळात घुसलेला टेंबा दिसला. टेंबा न्याहाळतच त्याच्या पायथ्याशी पोचलो. टेंब्याच्या पोटात बरीच पाण्याची टाकी आहेत, एका टाक्या जवळ बसून, आणलेलं थोडफार खाऊन घेतलं. मग.........
मी: मला जमेल का रे टेंब्यावर चढायला?
यशदीप: तू चढशील आरामात...
मी: चला...जरा जमतय का ते बघू....
प्रसाद: उगी हीरोगीरी नको करु.... आपटशील तोंडावर...
मी: थोडं चढतो...मग बघूत...
सुळक्याच्या पोटात असलेल्या एका झाडाच्या मदतीनं मी पहिला टप्पा पार केला. मग दगडात कोरलेल्या खोबण्यांच्या मदतीनं थोडं चढलो. आता ३-४ माणूस उंच rock-patch होता आणि थोडा overhang पण होता. overhang पर्यंतचा भाग आरामात चढलो, पण आता उजव्या पायाला काहीच grip मिळत नव्हती. उजवा हात खोबणीत मस्त चिकटला होता आणि डावा पाय पण खोबणीत होता. आता डाव्या हातानं push hold घेऊन सरपटच तो overhang चढलो (उतरताना वाट लागणार ह्याची जाणीव झाली...).
(मी चढताना दिसतोय ह्या फोटोत)
डाव्या बाजूनं जरा वर गेलो आणि मग चारजण बसतील एवढी जागा होती, तीथं थोडावेळ बसलो. आता ६ फुट उंच पायरी सारखा टप्पा पार करायचा होता... दोन्ही हात पायरीच्या वर ठेवले, पायानं जोरात push केलं आणि हातावर शरीर balance करत पायरीच्या वर पोचलो. आता पुढची वाट तशी सोपी होती. पण प्रचंड exposure आणि बऱ्यापैकी scree होती. जरा जपुन हा ट्प्पा पार केला आणि सुळक्याच्या डोक्यावर पाय ठेवला. कसला खुष होतो मी... पहील्यांदा कोणतातरी सुळका चढलो होतो...आणि ते पण एकटा... रोप चा वापर न करता.....अजून काय पाहीजे?....लय भारी. वरुन आजूबाजूचा केवढा परीसर दिसत होता!एखाद्या घारीनं उडत खालचा परीसर न्याहाळावा....तसच क्षणभर मला वाटून गेलं....
थोडा वेळ बसुन उतरायला सुरुवात केली. नजर एकदम प्रचंड खोल दरीतच उतरत होती. जराजरी चुक झाली की एकदम पाताळातच पोचणार होतो. solid concentration नं exposure आणि scree असलेला टप्पा उतरलो. मग ६ फुट उंच पायरी आरामात उतरलो आणि झाडा-झुडपांच्या मदतीनं बराचसा भाग उतरुन overhang च्या ट्प्प्याच्या वर पोचलो. इतक्या वेळ टेंब्याकडं पाठ करुन निवांत उतरत होतो, पण आता मला टेंब्याकडं तोंड करुन उतरावं लागणार होतं. वळलो, पण पाय कुठे ठेवायचे हेच दिसत नव्हतं आणि blindly उतरावं म्हंटल तर फक्त एकाच हाताला grip होती. थोडा वेळ प्रयत्न करुन पाहीले पण खाली काही उतरता येईना, मग परत जरा वर जावून बसलो.
खालून...
यशदीप: काय रे.... जमतयं ना?..
मी: अरे... एका हाताला grip नाही रे...
यशदीप: वर चढताना कसा गेलास मग?....
मी: चढतानाच जाणवलं होतं की उतरताना लागणार आहे ते... पण चढायचच होतं.... आता जरा बोंब आहे...थांब जरा...
प्रसाद: नडलं ना आता... म्हणत होतो....
मी: थांब रे.... grip सापडते का बघतो.....
मग मी बसलो होतो तीथलं आसपासच गवत उपटून, दगडात एखादी खोबण सापडते का ते शोधायला सुरुवात केली. luckily हाताला एक खोबण लागली.
आता दोन्ही हातांना मस्त grip होती...मग दोन्ही हातांनी लोंबकाळत, पायांनी चाचपडत, पाय ठेवायला कुठं खाच सापडते का ते शोधू लागलो. डावा पाय ठेवायला खाच सापडली; पण उजवा पाय अजून हवेतच होता. उजव्या पायाला काही आधार मिळाल्या शिवाय मी खाली सरकू शकणार नव्हतो. जाम टरकली होती आता माझी. भर दुपारची वेळ, घसा कोरडा पडला होता, सर्वांगाला घाम फुटला होता आणि आता बराच वेळ लोंबकळल्या मुळं हात एकदम निर्जीव झाले होते. मग परत वर गेलो आणि थोडा वेळ शांत बसलो.
खालून...
प्रसाद: मी जरा वर येऊन guide करु का?
मी: नको रे.... जमेल मला.... (आणि मदत घेऊन काय खाली उतरायचं...)
हातात परत जरा जीव आल्या सारखं वाटल्यावर, मी पुन्हा लोंबकळत उजव्या पाया साठी खाच शोधू लागलो. पण काही केल्या उजवा पाय ठेवायला काहीच सापडत नव्हतं. जास्त वेळ लोंबकाळण्याच्या स्थितीत नसल्या मुळं, मी डावा हात सोडला (डाव्या हात उजव्या हाता पेक्षा वर होता) आणि अंग जरा खाली सरकवलं तर उजवा पाय मस्तपैकी एका खोबणीत अडकला. आता दोन्ही पायांवर वजन टाकल्या मुळं हातांना जरा आराम मिळाला. डावा हात overhang च्या खालच्या फटीत अडकवून, उरलेला टप्पा उतरलो. हुशशशश्य्.....जरा जिवात जीव आला... मग, थोडा वेळ बसता येईल अश्या जागी पोचलो आणि ओरडून.....
मी: आता झालं.... उतरतो आता आरामात.... (भन्नाट आनंद झाला होता.... फार अंगावर आलं होतं नसतं धाडस...)
मग उरलेला टप्पा निवांतपणे उतरुन, टेंब्यावरुन झाडावर ऊडी घेतली आणि शेवटी खाली पोचलो. लगेचच पाण्याची बाटली तोंडाला लावली आणि पोटभर पाणी प्यायलो. जाम थकलो होतो, पण तेवढाच खुष होतो. मनातल्या मनात देवाचे फार आभार मानले.
यशदीप: पश्या... नको करत जावू असलं काही... अवघड वाटलं तर नाही चढायचं... अश्या जागी, अश्या वेळी काही झालं तर काय करणार होतो आम्ही दोघं?....
मी: हो... नाही करणार परत असं...
माझं डोकं एकदम हलकं झालं होतं. कसलेच विचार येत नव्हते. खूप खूप स्वतंत्र असल्या सारखं वाटत होतं. मग त्याच आनंदात संपूर्ण किल्ला भटकलो.
पण अजून सुद्धा असलं काही आव्हान समोर आलं तर मला अजिबात control होत नाही...आणि मग...वनी आनंद...भूवनी आनंद...आनंदी आनंद वनभूवनी....
मस्त लिहीलय. खरच, पूर्ण
मस्त लिहीलय.
खरच, पूर्ण तयारीनिशी जात जा ट्रेकला. मोठा ग्रूप असेल तर ठीक पण एकटे-दुकटे असाल तेव्हा काळजी घेतलेली बरी.
मस्त वर्णन..! पण फोटो अजुन
मस्त वर्णन..! पण फोटो अजुन टाकायला हवे होते!! बादवे 'टेंबा' म्हणजे काय?
<<<वरुन आजूबाजूचा केवढा परीसर दिसत होता!एखाद्या घारीनं उडत खालचा परीसर न्याहाळावा....तसच क्षणभर मला वाटून गेलं....<< इथल्या फोटोची उत्सुकता आहे!
<<नजर एकदम प्रचंड खोल दरीतच उतरत होती.<<< हा ही फोटो टाकला तर मस्तच!
मित्रा.. वर्णन मस्तं.. नि लै
मित्रा.. वर्णन मस्तं.. नि लै डेंजर धाडस.. आमचे कोहोजला असे गैरसमजुतीने धाडस झाले होते.. नशिबाने वेळीच 'उतरताना वाट लागणार' याची कल्पना आली नि बचावलो !
पण एकटे-दुकटे असाल तेव्हा काळजी घेतलेली बरी.
>> अगदी खरेय नि अनुमोदन.. पण जेव्हा एकटे दुकटे असतो तेव्हाच असले भलते सलते धाडस करण्याची लहर येते.. दुर्बुद्धी होते !
बाकी मलाही ह्या सुळक्यावर जायचेय ! बघु कधी जमतय ते
टेंबा म्हणजे सुळका...
टेंबा म्हणजे सुळका...
मस्त. पण माझंही रुनी पॉटरला
मस्त. पण माझंही रुनी पॉटरला अनुमोदन.
सही वर्णन... पण सांभाळून
सही वर्णन... पण सांभाळून रे!
--- There's a time for daring and there's a time for caution, and a wise man understands which is called for.
------- "Dead Poets Society"
जबरी रे!! पण सांभाळून रे
जबरी रे!! पण सांभाळून रे बाबा..
सही आहेस तू. पण जरा जपून.
सही आहेस तू. पण जरा जपून. म्हणजे कुठेही चढायला हरकत नाही, पण जवळ दोर ठेवलेला बरा.
खुदही को कर बुलंद इतना
छू ले ऐसे उंचाइईयोंको
के खुदा अपने बंदेसे पूछे
बता अब उतरेगा कैसे...
असे नको व्हायला
मस्त लिहितो आहेस आणि तसेच
मस्त लिहितो आहेस आणि तसेच जबरी फोटोही टाकत आहेस! हेवा वाटतो तुझा! किरु, जीएस म्हणतात तसे काळजी घेऊन धाडस करणे
>>के खुदा अपने बंदेसे पूछे, बता अब उतरेगा कैसे.. >>
लै ग्रेट मित्रा !!! मि जाउन
लै ग्रेट मित्रा !!!
मि जाउन आलोय कर्नाळ्याला , डेंजर आहे तो सुळका , पण रोप असेल तर सहज जमेल असे वाटल होत .
( मी प्रयत्न नाही केला , माझ्या बरोबर आलेला मित्र डोन्गर चढायला सुरवात करतो ना, तिथे एक ओढा आहे बघ , तिथे झोपुन राहिला होता . पुढ मी एकताच जाउन आलो .)
बाकी जन्गल मस्त आहे , रहायला गेल पाहिजे तिथे ! लै भन्नाट पक्षी आहेत तिथे !!!
अरे हो... रोप असेल तर सहज
अरे हो... रोप असेल तर सहज जमेल... पण रोप नसताना उतरताना वाट लागते... एक चुक आणि खल्लास... एका ठिकाणी तर जरा overhang आहे... तिथे तर खपलोच होतो मी...
बाकी जंगल तर छानच...
@विमुक्त महान आहात तुम्ही....
@विमुक्त महान आहात तुम्ही.... ईथुनच स्विकार करावा