अन्याय

Submitted by coolKetan on 4 March, 2008 - 04:22

ह्याची त्याची तुझी माझी अशी
प्रत्येकाने एक जमवायची गोष्ट
मग सोयीस्कर पणे चुकून चुकवून
किंवा वाटून, वाटवून घ्यायची तीच गोष्ट

एकेक कोपरा पुरतो प्रत्येकाला मग
जेवढे कोपरे तेवढेच धागे का तेवढेच पैलू (?)
नको त्रिमिती नको फक्त वर्तमानात जग
उरलाच वेळ तर ईच्छा आणि बनाव यावरही सविस्तर बोलू

आता पुन्हा गोष्ट म्हटली की
ती संपतेच पण तरिही असेच
आलेले, गेलेले,सोडलेले,जोडलेले,साचलेले,मोडलेले
ते सारे सारे क्षण आता सारं सारं विसरून
एक एक धागा बनून जवळ आले आहेत

का म्हणे तर त्यांच्यावर अन्याय झाला

कोणी केला तर म्हणे "मी"

कसं म्हणे तर मी जगलोच नाही त्या प्रत्येक क्षणी
-केतन

गुलमोहर: