आयफोन अ‍ॅप्स

Submitted by नात्या on 19 January, 2010 - 15:02

आयफोनवर वापरता येणार्‍या वेगवेगळ्या अ‍ॅप्सबद्दल चर्चा करायला हा धागा उघडत आहे. मी मला आवडणार्‍या अ‍ॅप्सबद्दल लवकरच लिहीन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'मराठी editor' Ipad साठी नाहीये का?
Ipad वरून मराठी मध्ये कसं टाईप करतात ?

जसं नॉर्मली करतो तसं!
पण एक अडचण येते... एकदाजरी 'बॅकस्पेस' वापरली टाईप केलेलं अक्शर खोडायला तर नंतरच टाईप व्यवस्थित होत नाही...

ऊपाय-
प्रत्येक वेळी 'बॅकस्पेस' वापरल्यावर, [अक्शर खोडायल] एकदा . द्यावा, तो खोडावा आणि पुढे टायपिंग सुरु ठेवावं.
(मी हे आयपॅड वरूनच टाईपलयं Happy )

नवा फोन घ्यायचा आहे. माझ्याकडे सध्या ब्लॅकबेरी आहे आणि त्यावर स्कूलमॉम्सचा बीबीएम ग्रुप ही एक जीवनावश्यक गोष्ट आहे.

समजा मी यावेळी ब्लॅकबेरी न घेता आयफोन घेतला तर whatapp वापरून या बीबीएम ग्रुपमध्ये राहू शकते का? असं करता येतं का?

केदार, म्हणजे ब्लॅकबेरीवरून बीबीएमवर असणं आणि आयफोनवरून बीबीएमवर असणं यामुळे काही फरक पडत नाही? आतासारखाच मला पूर्ण अ‍ॅक्सेस असेल? फोटो/कॉन्टॅक्ट्स पाठवणे, रीसिव्ह करणे, मेसेजिंग इ कशातही काहीच फरक पडणार नाही?

ग्रूप चॅटिंग सुविधा >> नुसती गृप चॅटिंग सुविधा नाही. मला त्या स्कूलमॉम्सच्या गृपमध्ये रहायचं आहे. सगळ्या ब्लॅकबेरी वापरत आहेत. मी ही इतके दिवस ब्लॅकबेरीच वापरत होते. पण आता नविन फोन घ्यायचा आहे तर आयफोन घ्यावा का असा विचार करत आहे.

थोडक्यात, whatapps (किंवा इतर कुठले अ‍ॅप वापरून) आयफोनवरून बीबीएम ग्रुप जॉईन करता येतो का?

जर आयफोन घेतल्यामुळे त्या गृपमध्ये राहता येणार नसेल तर आयफोनचा विचार कॅन्सल!

मामी, मला वाटतं/मी जे वाचले त्यावरून असे दिसतंय, की व्हॉट्सअ‍ॅप हे बीबीएमसारखे वापरता येते. व्हॉट्सअ‍ॅप वापरून बीबीएम ग्रुपात सामील होणे मला तरी शक्य वाटत नाहीये. गुगल केलेत का तुम्ही? काही लोक्स अ‍ॅप काढायचे म्हणत आहेत..

मी व्हॉट्सअ‍ॅप वापरते, मला त्यात बीबीएम गृप अ‍ॅड करा इत्यादी ऑप्शन दिसलेला नाहीये.

मामी,
whatsapp हे चॅट अ‍ॅप्लिकेशन असून अँड्रॉइड, आयफोन, नोकिया इ. सर्व प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध आहे. ग्रूप whatsapp वर आहे, तुम्ही व्हॉट्स्अ‍ॅप कसा वापरता हे दुय्यम आहे.
बिन्धास्त अँड्रॉईड किंवा आयफोन घ्या.
नोकियावाले whatsapp डालो करायला पैसे घेतात. (अ‍ॅप फुकट आहे तरीही १०० रु. गेले भारतात. नोकियावाले बोगस आहेत.)

बस्कू, धन्स गं. ब्लॅकबेरीच घ्यावा लागणार म्हणजे...

इब्लिस, माझा प्रश्न जरा वेगळा आहे. Happy

मामी, तुमचा ग्रूप व्हॉट्सअ‍ॅप वर आहे. की ब्लॅकबेरीचे वेगळे अ‍ॅप आहे? मला वाटते तो व्हॉट्सअ‍ॅपचा ग्रूप आहे.
असो.
गरज नसताना मधे बोललो, क्षमस्व!

बीबीएमवर आहे असं लिहिलं आहे मी. इथे बघा :

स्कूलमॉम्सचा बीबीएम ग्रुप / whatapp वापरून या बीबीएम ग्रुपमध्ये राहू शकते का? / whatapps (किंवा इतर कुठले अ‍ॅप वापरून) आयफोनवरून बीबीएम ग्रुप जॉईन करता येतो का? /
>>> या माझ्या शंका.

आणि त्यांना
व्हॉट्सअ‍ॅप वापरून बीबीएम ग्रुपात सामील होणे मला तरी शक्य वाटत नाहीये. >>> हे बस्केचं सरळसरळ उत्तर.

मामला खतम. आणि ते क्षमस्व वगैरे कशाला? Happy

क्षमस्व वगैरे कशाला?
<<
अरे, चुक्लं ना भो. मग स्वारी म्हनायला हवं की नै? लोकांना मराठीतून स्वारी म्हट्लं की जड जातंय Wink
मला चुकलं, की क्षमा मागायला लाज वाटत नाही.
धन्यवाद!

इब्लिस, Happy

स्टार वॉक म्हणुन एक मस्त अ‍ॅप मिळाले. नाद खुळा. सध्या नक्षत्र आणि राशी समजुन घ्यायचा आणि त्या लोकेट करायचा छंद लागलाय. Happy ट्राय करुन बघा.

App of the day नावाचे अॅप आहे. रोज एक पेड अॅप फ्री असते. काल Whatsapp फ्री होते. नोटीफिकेशन सुरू असेल तर रोज कोणते अॅप फ्री आहे ते अॅप न उघडता समजते.

गेला महिनाभर ग्रॉकर (grokr) आयफोन वर वापरत आहे. अ‍ॅप एकदम फंडु आहे; प्रेडिक्टीव्ह अ‍ॅनिलिटीक्स, अ‍ॅक्क्षनेबल रिझल्ट्सचं उत्तम उदाहरण. सध्यातरी या अ‍ॅपने माझ्या फोनवरील वेदर चॅनेल, बीट द ट्रॅफिक, अर्बनस्पून, येल्प, फँडँगो इ. ची जागा घेतली आहे. पुढे इतर डोमेन (ट्रॅव्हल, फायनान्स) मध्ये फुटप्रिंट वाढायची शक्यता भरपुर आहे. कंपनीचा फाउंडर आहे एक भारतीय - श्रीवत्स संपत (मॅकाफी फेम)

मी काल कालनिर्णय घेतलंय पण ते अ‍ॅप रन होत नाहीये. इनिशिअल स्क्रीन वर येतं आणि मग बंद!
सगळे प्रकार करून झालेत, रिईंन्सटॉल, आयट्यून्सवरून ईंन्सटॉल वगैरे!

काय प्रॉब्लेम असावा?
आयफोन ३जीएस आणि आयपॅड २ दोन्हीकडे सारखाच इश्यू Sad
दोन्ही डिवाईसेस वर लेटेस्ट आयओस आहे ६.०.१...

काय रेकॉर्ड करायचे आहे? आवाज रेकॉर्ड करण्यासाठी आयफोन बरोबर येणारा रेकॉर्डर चांगला आहे. 'व्हॉईस मेमोज' मधला..

कालनिर्णय चे अ‍ॅप आयफोन ४ आणी ४एसवर व्यवस्थित चालत आहे.

Evernote आणि Cozi ही दोन अ‍ॅप प्रचंड प्रमाणात वापरली जातात आमची. दोन्ही free apps आहेत फक्त तुमचा अकाऊंट तयार करायचा. एव्हरनोट मध्ये दोन प्रकारच्या notebooks मध्ये नोट्स लिहिता येतात - एक प्रायव्हेट आणि दुसरे shared. कुणाबरोबर शेअर करायचं ते तुम्हाला ठरवता येतं. माझ्या नोट्स म्हणजे वाचायच्या पुस्तकांच्या याद्या - लेखकानुसार, वीणकामाचे नमुने (यात चित्रही टाकता येते), औषधे सध्या कोणती घेते आहे त्याची यादी, अ‍ॅलर्जी असलेल्या औषधांची यादी... जी पुस्तके आम्ही दोघेही वाचतो त्या याद्या शेअर केलेल्या असतात.

कोझी तर फारच उपयोगाची गोष्ट आहे. आम्ही दोघे मिळून एकच अकाऊंट वापरतो - कुटुंब म्हणून - त्यात आमची दोघांची नावे आहेत. कोझीमध्ये वेगेवेगळ्या प्रकारच्या shopping list करता येतात, त्यामुळे American Grocery Shopping, Indian Grocery Shoppig, Miscellaneous, अश्या वेगवेगळ्या लिस्ट बनवून ठेवता येतात. सगळ्यांत चांगला भाग म्हणजे यादीतले आयटेम चेक्बॉक्ससारखे राहतात. घायचे असले तर uncheck करायचे. घेऊन झाले की check करायचे म्हणजे item strike-through केल्यासारखा दिसतो. आता ग्रोसरीच्या एव्हाना मास्टर लिस्ट झाल्या आहेत. तसेच त्यात कॅलेंडरही आहे. When you create an appointment, you can specify who it is for since the calendar is shared if your account is family account. So you just create the entry for one person of the family or as you need. Free version lets you set up only one alert. If you give your cell phone number, you can request for a text message or you specify email address for all members of the family and email alert will be sent at the time you set to respective family membrs.

The best thing is, both the apps work on both, iPhone and iPad and they are free on both. I don't know what we would do without Evernote and Cozi.

For chatting on iPad, I have found an app called "imo" extremely useful. You can log into your gmail, yahoo, skype, facebook, twitter and I think aol accounts - all or whatever you want to sign into. Once you log in, even if you move away from the app and are doing something else and you receive a message, it pops up on the screen.

Pages