गोड गाणे! (तिळगुळ घ्या गोड गोड बोला)
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
6
तुझे गोड गाणे
मना वेड लावी तुझे गोड गाणे
खळाळून वाही तुझे गोड गाणे
कितीदा क्षणांन्ना विस्मरून जावे
मन्तरून जाई तुझे गोड गाणे
कुणा पारव्याची घुमे शीळ रानी
तरंगे मनाशी तुझे गोड गाणे
कुठे शांत माझे अबोले उसासे
गन्धाळून देही तुझे गोड गाणे
उदासीन होते किनारे दिलाचे
कशी ओढ लावी तुझे गोड गाणे
कळीबंद स्वप्ने, धुके आर्जवी ती
जशी गोड चोरी - तुझे गोड गाणे!!
प्रभुनामाइतके गोड काहीच नाही. सर्व मायबोलीकरांना संक्रांतीची ही गोड भेट!
तिळगुळ घ्या नी गोड बोला
विषय:
प्रकार:
शेअर करा
खरेच... प्रभुनामाइतके गोड
खरेच... प्रभुनामाइतके गोड काहीच नाही.
आणि प्रभुनामाचा गोडवा गाणारी गाणीही गोडच.
अगदी गोड आहे.
अगदी गोड आहे.
चिन्नु भेट छान आहे , सर्व
चिन्नु भेट छान आहे ,

सर्व माबोकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ही माझ्यातर्फे भेट ,
मंजुताई, गंगाधरजी आणि श्री
मंजुताई, गंगाधरजी आणि श्री धन्यवाद!
श्री, भेट एकदम सही
छानच. गोड गाणे.
छानच. गोड गाणे.
धन्यवाद किशोर
धन्यवाद किशोर