Submitted by Geetanjalee on 14 January, 2010 - 01:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
रात्रीच्या उरलेल्या १-२ चपाती, २ मोठे चमचे तान्दलाचे पीठ, १ छोटा चमचा बेसन, तिखट, मीठ , जिरे-धने पावडर, चवीप्रमाणे, तेल.
क्रमवार पाककृती:
१)चपातीचा मिक्सरवर एकदम बारीक चुरा करून घ्यावा.
२) त्यात तान्दलाचे पीठ,बेसन, हळद, तिखट, मीठ, जिरे-धने पावडर घालून थोडस पाणी घालून एकजीव करून घ्यावे.
३) आवडत असल्यास ओवा पण घालावा.
४) नेहमीप्रमाणे शेवग्याने चकल्या कराव्या. ब्राउन कलर वर तळून घ्याव्यात.
वाढणी/प्रमाण:
७-८
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Group content visibility:
Private - accessible only to group members
शेअर करा