Submitted by चंपक on 12 January, 2010 - 16:56
आजच श्री सदानंद देशमुख लिखीत 'बारोमास' कादंबरी वाचली.
दिनेशदादांनी अगोदरच सांगितल्या प्रमाणे डिस्टर्ब झालो. हे सगळं अगदी माझ्या अवती भवती घडतेय असे वाटले..माझ्या ही गावात काही घतना झाल्याच होत्या... ती कुटुंब पुन्हा डोळ्यासमोर आली..
संवेदनशील माणसानं कधीही वाचु नये अशी ही कथा!
इडा पिडा टळो
बळी चे राज्य येओ!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे बारोमास.शासनाचा
छान आहे बारोमास.शासनाचा पुरस्कार देखिल मिळाला.पुस्तकाच्या प्रतिही खुप खपल्यात.
शेतकर्यांचे दु:ख विकुन राजदरबारात मानसन्मान आणि पुस्तकाच्या भरमसाठ प्रती विकुन कमाई करु इच्छिणार्या होतकरु नवोदितांसाठी हे आदर्श उदाहरण ठरावे....
दिनेशदादांनी अगोदरच सांगितल्या प्रमाणे तुम्ही डिस्टर्ब झाले. कथा वाचणारे डिस्टर्ब होतातच. कथा लिहिणारे मात्र डिस्टर्ब होतांना दिसत नाही.ते कायम हारतुर्याच्या आणि आत्मगौरवाच्या शोधात असतात.
.........................................................
शेतकर्यांच्या ललाटरेषा न बदलण्यामागे थोड्याफार प्रमाणात का होईना पण साहित्य आणि साहित्यीक हेही एक कारण असावे.(कदाचित?)
विदर्भातील एक थोर कवी शेतकर्यांच्या लाल रक्ताच्या कविता करुन नावारुपास आले.
पुढे मायबाप सरकारने या शेतकरी पुत्राला हाताशी धरले.मानसन्मान दिला,शासकिय जबाबदारी दिली.
आणि या शेतकरी पुत्राचे हिरवे स्वप्न पुर्णत्वास गेले.
.........................................................
आंबे पिकलेल्या झाडाखाली ढोल बडवणारे शेतकरी पुत्र कवींचेही तेच.
.........................................................
.
शेतकर्यांचे दु:ख होलसेल भावाने विकुन व्यावसायीक लाभ मिळण्यापुरतेच असते काहो यांचे शेतकरीप्रेम..?.....??........???.......????......?????......??????.....???????..........................?.
ना. धो.?
ना. धो.?
नाही. मी कुनाकडे
नाही. मी कुनाकडे अंगुलीनिर्देश करुन नसता वाद उभा करु इच्छित नाही.
कारण अशा वादातुन काहीच निष्पन्न होत नाही.
एक मात्र खरं की निखालस शेतकरी समाजासाठी अंतीम क्षणापर्यंत जिवाभावाने साहित्याच्या माध्यमातुन लढणारा साहित्यिक कोण? या प्रश्नाचे माझ्याजवळचे उतर नकारार्थीच आहे.
वाटल्यास या विषयावर कोणी माझे प्रबोधन केले तर मी त्यांचा ऋणी राहील.
पण मुटे, जर शेती प्रश्नाला
पण मुटे, जर शेती प्रश्नाला पुस्तकातून मांडले अन ते गाजले तर काय वाईट? असं समजलं की ते त्यांनी मुद्दामहुन मांडले आहे पण ते इतके निट उतरले आहे की वाचल्यावर माणूस हतबल होतो. शेवटी लिखान म्हणजे तरी काय. पात्राशी एकरुप होणेच ना? मग सदानंद तिथे झालेत. त्यातल्या एकनाथाचा दु:खात अजाणता वाचक सहभागी होतोच.
मलाही बारोमास खूप आवडले.
बरोबर केदारजी, अशा कलाकृतीचा
बरोबर केदारजी,
अशा कलाकृतीचा साहित्य म्हणुन दर्जा वादातीत असतो.ती कलाही श्रेष्ठ आणि कलाकारही श्रेष्ठच. त्याबद्दल दुमत नाहीच.
पण आता पुढे बघा....
"असं समजलं की ते त्यांनी मुद्दामहुन मांडले आहे " आणि माझा मुद्दा नेमका येथुनच सुरु होतो.
मुद्दामहुन कशासाठी मांडले आहे ? ते दु:ख निवारण्यासाठी प्रयत्नच करायचे नाही,कोणी प्रयत्न करीत असेल तर त्याला सहकार्यही करायचे नाही, या दु:खाला यदाकदाचित शासनव्यवस्थाच जर जबाबदार असेल त्या शासनव्यवस्थेला ठणकावुन सांगण्याचे धाडसही दाखवायचे नाही. एवढे सगळे करणारच नसाल तर "शेतकर्यांचे दु:ख विकुन राजदरबारात मानसन्मान आणि पुस्तकाच्या भरमसाठ प्रती विकुन कमाई करण्यापलीकडे दुसरा उद्देशच उरत नाही" या माझ्या वाक्याला आपोआपच बळकटी प्राप्त होते.
आणि पेशंटचे दु:ख पाहुन त्यावर इलाज करायचे सोडुन नुसतच आपणही बोम्बलायचे आणि लोकांनाही बोंबलायला लावणार्या डॉक्टरला कोणत्या श्रेणीत टाकायचे हा तसा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
मुटेसाहेब केदारशी सहमत
मुटेसाहेब केदारशी सहमत आहे.
कोणा ना कोणाची दु:ख "विकुनच" साहित्य/ किंवा इतर कलाकृती निर्माण होते आणि पांढरपेशा जगाला त्याची ओळख होते. साहित्य नाहीतरी बोलाचीच कढी आहे. बोलणारे आणि करणारे वेगळे असणारच.
मी ही हे वाचले आहे पण पूर्ण
मी ही हे वाचले आहे पण पूर्ण वाचू शकलो नाही. एक भयाण वातावरण जबरदस्त उभे केले आहे.
श्री सदानंद देशमुख यांचे
श्री सदानंद देशमुख यांचे आजपर्यंत एकुन किती पुस्तके प्रकाशीत झाली याविषयी कोणी माहीती देऊ शकेल.
यात भालचंद्र नेमादेंची
यात भालचंद्र नेमादेंची प्रतिक्रिया वाचुण त्या माणसाची चीड येतेय!
ते म्हणतात- शेती करणे का मुर्ख लोकांचा धंदा आहे, हे पटवुन देणार्या पुस्तकांत बारोमास अग्रस्थानी आहे! वा नेमाडे वा!