चर्चेदरम्यान एक प्रश्न आला आहे.
आधी अंडे की आधी कोंबडी ?
याला पण उत्तर आहे काय? असा प्रश्न विचारला आहे.
हा प्रश्न राहुनच गेला. काय आले असेल आधी.... आधी अंडे की आधी कोंबडी ?
माझ्याजवळ पण याविषयी एक तर्क आहे.
जाणकारांनी याबाबत उत्तरे किंवा तर्क द्यावेत.
(या संदर्भात शेवटचे प्रतिसाद वाचावेत.)
...................................................................................
कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन
आधी काय निर्माण झाले असावे.?
कोंबडी की अंडी ?
अनेकदा अशा तर्हेच्या प्रश्नामध्ये आपण पुरते गुरफटुन जात असतो.
उत्तर मिळविण्याच्या प्रयत्नात उत्तर मिळण्याऐवजी नव्याने नवेनवे प्रश्नच निर्माण होत जातात.
गुंता सुटण्याऐवजी गुंतागुंत वाढतच जाते.वैताग येतो.आणि जाऊ दे, काय करायचे आपल्याला असे म्हणुन विषय सोडुन देतो.
.............
प्रश्नांची उकल करणे खरेच कठीन असते ?.
ज्याला उत्तर नाही असा प्रश्न असु शकतो ?
'आधी कोंबडी की आधी अंडी' या प्रश्नाचेच बघा.
विचार करता करता थोडा शास्त्रिय आधार घेतला की निर्विवाद आणि बिनतोड उत्तर मिळुन जाते.कळुन चुकते की पृथ्वीतलावर आधी अंडीचे आगमन झाले नंतर अंडीपासुन कोंबडी जन्माला आली. गुंतागुंत दुर होते आणि लक्षात येते की महाकठीन वाटणारे उत्तर एवढे सोपे होते?
.........................
आज हा विषय चघळण्याचे कारण ?
२६ जानेवारी - गणराज्य-प्रजासत्ताक दिन येतोय.
या निमित्ताने देशभर चर्चेला पाय फुटणार. स्वातंत्र्योत्तर काळात
'काय मिळवले काय गमविले'
'देश जगात महाशक्ती म्हणुन उदयास येणार की नाही'.
'देशाला प्रगतीपथावर नेण्यास कोणी किती योगदान दिल्रे'.
त्यासोबतच दबक्या आवाजात का होईना पण हाही एक विषय चर्चिला जाणार.
देशाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?
राजा की प्रजा ? नेते मंडळी की जनता जनार्दन ?
अर्थातच कोंबडी की अंडी ?
नुसतीच चर्चा...... उत्तर नसलेली.
उत्तर शोधायचा प्रामाणिक प्रयत्न न झालेली.
२७ तारिख उजाडली की आमची नित्याची दिनचर्या सुरु.
हे असे रहाटगाडगे...........पुन्हा त्या चर्चेला एक वर्षाची विश्रांती.....!!
याला म्हणायचे प्रजासत्ताक.....!!
जोरसे बोलो....
प्रजासत्ताक दिन चिरायु होवो....!!!!!!!!!!!!!!!
..
गंगाधर मुटे
संदर्भ : -
संदर्भ : - http://www.maayboli.com/node/13200
'देश जगात महाशक्ती म्हणुन
'देश जगात महाशक्ती म्हणुन उदयास येणार की नाही'.
नक्कीच येणार.
देशाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?
राजा की प्रजा ?
अर्थात् प्रजा. लोकशाहीत राजा नाही, राज्यकर्ते प्रजेच्या जोरावर निवडून येणार, किंवा नाही. प्रजेच्या मताप्रमाणे कायदे करणार. प्रजा झोपली, निष्काळजी झाली की वाईट प्रवृत्तीच्या लोकांचे फावते. ते लायकी नसताना राज्यकर्ते बनतात. मग त्यांच्याकडून काय अपेक्षा? निवडून आलेल सरकार सुद्धा पाडता येते. भारतात मागे एकदा तसे झाले होते म्हणे.
तर मग वाट कसची बघताय्? काय हवे ते करा!
केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे.
अतिविचार हा नाकर्तेपणास कारणीभूत असतो.
सुरुवातीला होतील थोड्या चुका, पण त्या दुरुस्त करता येतील.
लोकशाहीत राजा नसतो हे खरे.पण
लोकशाहीत राजा नसतो हे खरे.पण प्रजेला 'राजबिंडा' राजा निवडून द्यायची सवय आहे ना. त्या मुळे जो सत्ताधारी बनतो तो सत्ताधार्याचा मुलगा,नातु,पणतु,भाऊ,चुलता,पुतण्या यापैकी नक्किच कोणीतरी असतो.(थोडेफार अपवाद वगळता)
लोकशाहीत राजा नसतो हे खरे असले तरी राजबिंडा नक्किच असतो हेही खरे ना?
.......
आणि नेमक्या किती पिढ्या सत्ता एकाच घराण्यात असली म्हणजे राजेशाही आली असे म्हणता येईल ?.
अतिविचार हा नाकर्तेपणास
अतिविचार हा नाकर्तेपणास कारणीभूत असतो.>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आधी काय निर्माण झाले
आधी काय निर्माण झाले असावे.?
)
कोंबडी की अंडी ? >>>
आधी मिस्टर कोबंडा अन मिसेस कोंबडी आणि मग अंडं
( अॅडम अन ईव्ह येताना कोंबडा अन कोंबडी घेऊन आले होते
देशाच्या दुरावस्थेला आपण सगळेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कारणीभुत आहोत , फक्त नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाही , आणि नेते काही कुणी वेगळे नाहीत , आपल्यातलेच काही महाभाग आहेत .
<< अॅडम अन ईव्ह येताना
<< अॅडम अन ईव्ह येताना कोंबडा अन कोंबडी घेऊन आले होते >>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हो. त्यांना बिर्यानी फारच आवडायची म्हणे..
(मग अॅडम अन ईव्ह येताना पातेले पण नक्कीच घेऊन आले असणार.... :स्मित:)
पातेले आणले अन मग कपडे का
पातेले आणले अन मग कपडे का नाही आणले?
कपड्यांची गरजच नव्हती
कपड्यांची गरजच नव्हती म्हणुन.
(आता तरी कुठे आहे? संधी मिळाली की मनुष्यप्राणी जायला बघतोच की आपल्या मुळ वंशावर. :स्मित:)
आधी काय निर्माण झाले
आधी काय निर्माण झाले असावे.?
कोंबडी की अंडी ? >>>
याचे नेमके उत्तर माहित आहे ना?
हो. त्यांना बिर्यानी फारच
हो. त्यांना बिर्यानी फारच आवडायची म्हणे.. >>> हो मग , सुरुवात सफरचंद अन व्हेज दम बिर्यानी पासुनच झाली .![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पातेले आणले अन मग कपडे का नाही आणले? >>> त्यांनी तेव्हा कपडे आणले असते तर आज आपल्याला त्यांच्या फॅशनची कॉपी करायला चान्स नसता मिळाला , किती ती त्यांची दुरदृष्टी
हो. त्यांना बिर्यानी फारच
हो. त्यांना बिर्यानी फारच आवडायची म्हणे.. >>>:हाहा:
नेते काही कुणी वेगळे नाहीत ,
नेते काही कुणी वेगळे नाहीत , आपल्यातलेच काही महाभाग आहेत
>> नाही पटलं श्री... त्यासाठी वेगळीच कातडी असावी लागते! आपल्या सारख्यांना नाही जमणार ते. पैसे वाटल्यानं (आणि 'बाटल्या' 'तमाशे' आदी गोष्टींची सोय केल्यान) एक नालायक माणूस निवडून आलेला आणि एक आधीच्या प्रत्येक संधीला (सत्तेवर असताना/नसताना) चांगलं काम केलेला माणूस पडलेला मी पाहिला. थोडक्यात चांगल्या,साध्या, सरळ माणसाचं कामच नाही रे ते!
ह्या एका गोष्टीसाठी मला भारतात परत जायची भिती वाटते - माझ्या गावातली सगळीच समीकरण बदलत जाताना पाहिली आहेत गेल्या काही वर्षात.. सध्याचं स्थित्यंतर आपल्यासारख्यांना मानवण्यासारखं नाहीच्चे!
असो! जाऊद्या - विषय काय! मी भरकटतेय किती!
नानबा, भरकटल्या
नानबा,
भरकटल्या नाहीत,मुद्यावरच आहात.बोला पुढे बोला.
हे वाचले ?
http://www.maayboli.com/node/13200
मला कधीकधी वाटते की मुळात
मला कधीकधी वाटते की मुळात भारतीय लोकांची मानसिकता लोकशाहीसाठी नाहीच आहे. एक छानसा सुंदर राजा असावा, त्याने प्रजेला प्रेमाने वागवुन राज्य करावे, त्याच्यानंतर त्याचा गोंडूला राजकुमार सत्तेवर.. मग त्याचा गोंडुला.... असे शतकानुशतके चालुच... यात प्रजेला काही करायचेच नसते. राजा चांगला असला तर त्याचे गोडवे गायचे, वाईट असला तर तो मरुन नवीन चांगला राजा यायची वाट पाहायची.
आजही हे असेच चालु आहे. आज राजा चांगला नाहीये तर तो मरुन नवीन चांगला राजा यायची वाट पाहताहेत सगळे. पण आपल्यातुनच चांगला राजा निर्माण करुया, जे राजपदासाठी उभे आहेत त्यांच्यातल्या त्यातल्यात्यात ब-याला पारखुया आणि त्याला निवडुया, यासाठी मतदान ही गोष्ट आयुष्यात अन्न पाण्याइतकीच महत्वाची आहे असे मानुया हा विचार करणारी प्रजा अजुन जन्माला यायचीय.. मतदानाच्या अधिकाराचा उपयोग एकतर सुट्टी मिळालीय, बाहेर भटकुया.. नाहीतर जो सगळयात मोठी नोट देईल त्याला शिक्का देऊया इतकाच... योग्य माणुस निवडुन मत द्या असा गळा फाटेस्तो प्रचार करुनही यावर्षीही मतदान ४५-५०% इतकेच झाले. आणि हा आकडाही नोट घेऊन वोट देणा-यांमुळेच इतका दिसतोय. मुद्दाम सगळ्या उमेदवारांची माहिती काढुन मग मते देणारे १०-१५% असले तरी डोक्यावरुन पाणी...
आता २६ जानेवारीलाही परत एकदा काथ्याकुट होईल आणि मग १५ ऑगस्टपर्यंत सारे कसे शांत शांत.....
साधनाजी,अगदी खरं आहे तुमचं
साधनाजी,अगदी खरं आहे तुमचं म्हणणं..
अॅडम आणि इव्ह यांचेबद्दल एक
अॅडम आणि इव्ह यांचेबद्दल एक चावट विनोद माझ्याकडे आहे. इच्छुकानी इमेलद्वारे सम्पर्क साधावा
अॅडम आणि इव्ह यांचेबद्दल एक
अॅडम आणि इव्ह यांचेबद्दल एक चावट विनोद माझ्याकडे आहे. इच्छुकानी इमेलद्वारे सम्पर्क साधावा
असू द्या हो हो तो विनोद तिथेच.
वर सुरुवातीला जे प्रश्न विचारले आहेत त्याबद्दल काही तरी बोला. तुम्ही राज्यकर्ते नि जनता या दोघांनाहि जवळून पहाता, तुमचे काय मत?
इयत्ता सातवीत हुकुमशाही आणि
इयत्ता सातवीत हुकुमशाही आणि लोकशाही यांचे फायदे तोटे अभ्यासात होते. त्यात लोकशाहीचा दोष म्हणजे बदलाची अथवा निर्णयाची प्रक्रिया संथगतीने होते. असा होता तो अंगभूत दोष विचारात घेऊन या सर्वाचा विचार केला पाहिजे. भारतीय राज्यपद्धतीला दोष देणार्यानी कॅ. शाम चव्हाण यांचे वॉलाँग हे पुस्तक वाचावे.
ता.क. - अॅडम व इव्हच्या विनोदाचे तेव्ढे लक्षात घ्यावे. झक्कींच्या नादी लागू नये. ते मायबोलीवरचे गावगुन्ड आहेत![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
निर्णयाची प्रक्रिया संथगतीने
निर्णयाची प्रक्रिया संथगतीने होते.
सरकारे पडतात कशी? अविश्वासाचा ठराव आणून. त्यासाठी किति दिवस लागतात?
त्यासाठी किति दिवस लागतात?
त्यासाठी किति दिवस लागतात? >>> झक्की ' दिवस " नाही " पैसे " किती लागतात विचारा .![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
रॉबिनहूडजी, राज्यकर्त्यांचा
रॉबिनहूडजी,
राज्यकर्त्यांचा दोष दाखविने म्हणजे लोकशाहीचा विरोध करणे असा अर्थ का काढायचा ?
मी भारतीय राज्यपद्धतीला दोष देत नाही.ती राबणार्यांबद्दल बोलतोय.
गरज पडल्यास आमदार - खासदारांची खरेदी विक्री करुन सरकार स्थापण्याचा प्रयत्न करावा असे काय राज्यघटनेमध्ये लिहिले आहे ?
शेतकरी देशोधडीला लागला तरी चालेल पण निवडणुकीसाठी निधी देणारांच्या हिताचीच धोरणे राबवा हे राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमुद केले आहे?.
रॉबिनहूडजी, जरा आमचेही काही दु:ख आहेत ते समजुन घ्याना.
आणि हो तुम्हाला ई-मेल कोणत्या पत्त्यावर करायचाजी?.
राज्यकर्त्यांचा दोष दाखविने
राज्यकर्त्यांचा दोष दाखविने म्हणजे लोकशाहीचा विरोध करणे
असे मुळीच नाही. तो राज्यकर्ता जर सज्जन असेल, तर जरा अंतर्मुख होऊन बघेल की काय चुकले, नि ते सुधारेल. त्याला नाही कळले, तर समजावून द्या की सुधारायचे कसे. तेहि नाही जमले तर त्याच्या ऐवजी दुसरे कुणि शोधा. पण नुसते दोष देऊन थांबू नका.
कठीण आहे हे सगळे, पण काय करणार, जगातील सर्वोत्कृष्ट देश व्हायचे तर काम करावेच लागेल ना. सर्व जनतेचेच हे काम आहे.
बायोलॉजी प्रीसीड्स
बायोलॉजी प्रीसीड्स आयडिऑलॉजी... असे काहीसे होतेय का?
झक्कीजी, राज्यकर्त्यांमध्ये
झक्कीजी,
राज्यकर्त्यांमध्ये सज्जन्न शोधणे म्हणजे अंधार्याखोलीत काळे मांजर शोधण्यासारखेच वाटते.
म्हणतात ना उडदामाजी काळे - गोरे काय निवडावे निवडनाराने ?
अॅडम व इव्हच्या विनोदाचे
अॅडम व इव्हच्या विनोदाचे तेव्ढे लक्षात घ्यावे.
आता तुम्हाला सांगायची एवढीच उत्सुकता असेल तर इथेच टाका.. जे प्रौढ आहेत त्यांनीच वाचावे, जे नाहीत त्यांनी तिकडे पाहु नये असा स्पॉइलर आधीच टाका
मुटेसाहेब, तुम्ही जर नीट
मुटेसाहेब, तुम्ही जर नीट निरिक्षण केलेत तर लक्षात येईल की दोन्ही बाजुला माणसे तीच आहेत. राज्यकर्तेही तेच आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा फायदा घेणारेही तेच... (इथे धान्यापासुन दारू चा लेख टाकलेला त्यातही कायदा पास करणारी आणि त्याचा फायदा घेणारी. दोन्हीबाजुची माणसे एकच दिसतात)
आता शोधत बसायचे दिवस संपवायचे, आता दिवस आणायचे आपणच राज्यकर्ते व्हायचे... नाहीतर हे प्रश्न कधीच सुटणार नाही.
आता शोधत बसायचे दिवस
आता शोधत बसायचे दिवस संपवायचे, आता दिवस आणायचे आपणच राज्यकर्ते व्हायचे..
हे इतके सोपे नाही साधनाजी.
सामान्य माणसाचा राज्यकर्ता होईपर्यंतचा प्रवासमार्ग एवढा घाणेरडा व दुषीत झाला आहे की आज ब्रम्हदेवाने जरी राज्यकर्ता व्हायच म्हटले तर त्याला ब्रम्हत्व आणि देवत्व दोन्हीही गमावुन बसावे लागेल.
साधे एक इलेक्शन लढण्यासाठी किमान २५ लाख रु खर्च केले जातात. हा पैसा काय रोजगार हमीच्या कामावर जाऊन घाम गाळून मिळविलेला असतो.?
व्यवस्था नासली आहे,अक्षरशः किडली आहे. पहिल्यांदा ती बदलविण्याचे प्रयत्न करावे लागतील.
सामान्य माणसाचा राज्यकर्ता
सामान्य माणसाचा राज्यकर्ता होईपर्यंतचा प्रवासमार्ग एवढा घाणेरडा व दुषीत झाला आहे की आज ब्रम्हदेवाने जरी राज्यकर्ता व्हायच म्हटले तर त्याला ब्रम्हत्व आणि देवत्व दोन्हीही गमावुन बसावे लागेल.
>> अगदी खरं बोलताहेत गंगाधर!
सैल नावाचा एक मराठी चित्रपट नुकताच पाहिला. त्यात हाच विषय अत्यंत समर्थपणे मांडला आहे.
साधना, फार भयानक आहे ग परिस्थिती.. छोट्या गावच्या परिस्थितही कोटींमधे पैसा खर्च होतो.
नाही केलात तर तुम्ही पडता.. परत तुम्हाला टिकायचं असेल तर गुंडगिरी जमली पाहिजे.
अडवणूक कशी करतात ऐकायचय?
छोट्या गावातली गोष्ट.
एका माणसाला नगराध्यक्ष व्हायचं होतं - त्याच्या इन्फ्लुएन्स मुळे (नक्की कारण आठवत नाही) तो झालाही.
मग सगळेजण मिळून काय करायचे? बाकी सगळे ठराव पास होऊन द्यायचे - फक्त नगरविकासाची कामं नाहित पास होऊन द्यायची. तुम्ही म्हणाल असं का? तर विकासाची कामं म्हणजेच खायचं कुरण असतं.
एक वर्षभर असं झाल्यावर त्यानं शेवटी घायकुतीला येऊन नगराध्यक्ष पद सोडलं.
मला हे राजकारण आयुष्यात कधी कळणार नाही - जमणार नाही. (साधं हाफिसातलं राजकारण जमत नाही!)
मला तरी वाटतं - ह्यात पडून स्वतःचे हात बरबरटवून घेण्यापेक्षा - जर इच्छा असेलच तर आमटे कुटुंबियांसारखी कामं करावीत - ज्यात तुमचा दर्जा तुम्हाला सोडावा लागत नाही - तर तो वाढतो!
मला कल्पना आहे खुप भयानक आहे
मला कल्पना आहे खुप भयानक आहे हे सगळे त्याची. माझी स्वतःची हिंमत होणार नाही यात पडायची. पण मग यातुन मार्ग काय?
आजच वाचले ब-याच लोकांची अंडीपिल्ली बाहेर काढणारे, भ्रष्टाचाराविरुद्ध एकहाती लढणारे सतिश शेट्टी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. सुन्न झाले एकदम वाचुन.
ह्यात पडून स्वतःचे हात
ह्यात पडून स्वतःचे हात बरबरटवून घेण्यापेक्षा >>>>> असं सगळ्यांनी ठरवले तर पुढल्या पिढ्याचं अवघड आहे. अन हे जर मागिल पिढीतील काही लोकांनी ठरवले असते, तर आपली हालत आज काय असती?
(साधं हाफिसातलं राजकारण जमत नाही!)
>>>>>>> सर्वच क्षेत्रात अन सर्वच ठिकाणी राजकारण होते. मग प्रत्यक्ष राजकारणात पडलेले काय वाईट?!
माझी स्वतःची हिंमत होणार नाही यात पडायची.>>>> मग संपलंच!
Pages